“माझ्या आईची खास Rava Laddu-रव्याचे लाडू बनवण्याची सोपी पद्धत”

Rava Laddu-रवा लाडू म्हणजे बारीक रवा भाजून त्यात तू साखर सुकामेवा घालून तयार केलेले एक लोकप्रिय पदार्थ.

Rava Laddu Recipe
Read More : Evening Snacks Recipe.

थोडे Rava Laddu-रवा लाडू विषयी.

रवा लाडू हा भारतातील एक गोड पदार्थ आहे. जो विशेषता महाराष्ट्रात दिवाळीच्या सणामध्ये बनवला जातो. याला लहान मुलं अतिशय आवडीने खातात. म्हणून रवा लाडू हा एक दिवाळीतील प्रमुख फराळ मध्ये एक आहे. रवा लाडू हा विशेषता रवा, तूप, साखर व सुखमेवा टाकून तयार केला जातो. हा लाडू महाराष्ट्रातील सणांमध्ये अतिशय लोकप्रिय असा गोड पदार्थ आहे. भारतीय सणांमध्ये गोडच विशेष महत्त्व आहे. कोणत्याही सणांमध्ये किंवा शुभप्रसंगी भारतामध्ये गोड पदार्थ हे तयार केले जाते. यामध्ये बरेच पदार्थ असतात जसे की लाडू, बासुंदी, पुरणाच्या पोळ्या, सोनपापडी असे अनेक पदार्थांचा समावेश असतो. पण त्यातल्या त्यात सर्वात फेमस असा पदार्थ आहे तो म्हणजे लाडू तो देखील रव्याचा. लाडूंमध्येही बरेच प्रकार असतात जसे की बेसनचा लाडू, मोतीचूर चा लाडू, रव्याचा लाडू, डाळि चा लाडू. आज आपण या ब्लॉगमध्ये रव्याचा लाडू कशा उत्तम पद्धतीने व सोप्या पद्धतीने कसा बनवावा हे शिकणार आहोत. चला तर मग बघूया रवा लाडू बनवण्याची कृती आणि साहित्य.

साहित्य.

  • अर्धा किलो बारीक रवा.
  • पाव किलो साखर.
  • एक ते दीड वाटी तूप.
  • एक चमचा वेलची पूड.
  • पाव वाटी हरभरा डाळीचे पीठ.
  • एक वाटी खवा.

कृती.

  • Rava Laddu-रवा लाडू करताना प्रथम रवा एका जाड बुडाच्या कढईत घेऊन मंद आचेवर भाजायला ठेवा, रवा भाजत असताना सतत हलवत राहावे.
  • रवा भाजताना प्रथम कोरडाच रवा भाजावा, रवा थोडा वेळ भाजून झाल्यानंतर त्यात थोडे तूप टाकावे व परत छान परतून घ्यावा. नंतर दहा मिनिटांनी परत थोडे तूप टाकावे व परत छान भाजून घ्यावा.
  • रवा भाजण्यासाठी 15 ते 20 मिनिटे लागतात रवा मंद आचेवरच भाजावा. पंधरा-वीस मिनिटांनंतर रवा छान भाजून होतो, रव्याला खमंग असा सुगंध येतो.
  • नंतर रवा पूर्णपणे भाजून झाल्यावर एका भांड्यात काढून ठेवा.
  • रवा भाजल्यानंतर त्याच कढईत दोन चमचे तूप टाकून हरभरा डाळीचे पीठ भाजून घ्यावे. पीठही अगदी मंद आचेवर भाजावे व सतत हलवत राहावे. पिठाला छान सुगंध येईस्तोवर भाजावे. हरभरा डाळीचे पीठ सोनेरी रंगावर होईस्तोवर मंद आचेवर भाजत राहावे व सतत हलवत राहावे.
  • पाच ते सात मिनिटांनी पीठ छान भाजले जाते, पीठ पूर्णपणे भाजून झाले की पीठही एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवावे.
  • नंतर त्याच कढईत एक चमचा तूप टाकून खवा भाजून घ्यावा, खवा ही मंद आचेवरच भाजावा व सतत हलवत राहावा. खवा खाली लागण्याची शक्यता असते, खवा भाजायला फार वेळ लागत नाही. अगदी दोन ते चार मिनिटात खवा छान मोकळा होऊन व्यवस्थित भाजला जातो.
  • खवा पूर्णपणे भाजून झाल्यावर गॅस बंद करा.

Rava Laddu Recipe

  • आता एका भांड्यात साखर घेऊन त्यात साखरबुडे पर्यंत पाणी घालावे व साखरेचा एक तारी पाक करून घ्यावा. साखरेचा एक तारी पाक करण्यासाठी फार वेळ लागत नाही साखर उकळले की सतत हलवत राहावे .
  • साखरेचा पाक लगेच तयार होतो दोन बोटांमध्ये पाक घेऊन साखरेचा पाक तयार झाला आहे की नाही बघून घ्यावे. दोन बोटांमध्ये एक तार तयार झाला असेल तर पाक तयार झाला असे समजावे.
  • आता पाकात प्रथम खवा घालावा व खवा छान परतून पाकात मिक्स करावा खव्यात एकही गाठ राहिला नको म्हणजे तो लाडू छान मिक्स होतो व छान चव येते.
  • खवा पूर्णपणे पाकात मिक्स झाल्या नंतर त्या डाळीचे पीठ टाकून तेही छान एकत्र करून घ्यावे.
  • आता मिश्रणात भाजलेला रवा घालून छान एकत्र करून घ्यावा व त्या मिश्रणात एक चमचा किंवा आपल्या आवडीनुसार वेलदोड्याची पूड घालावी.
  • हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे व पूर्णपणे गार होण्यास ठेवावे.
  • एक तासानंतर मिश्रण पूर्णपणे गार झाले असेल, लाडू जास्त असतील तर मिश्रण गार व्हायला जास्त वेळ लागू शकतो.
  • मिश्रण पूर्णपणे गार झाल्यावर परत एकदा मिश्रण संपूर्णपणे एकजीव करून घ्यावे व छान लाडू वळून घ्यावे.

Rava Laddu Recipe

  • हिरव्या खव्याचे लाडू अतिशय चविष्ट होतात.

टीप.

  • Rava Laddu-रवा लाडू करताना रवा बारीक असावा. रवा जाड असेल तर लाडू नीट होत नाही व चवीतही थोडा बदल होतो. घरात बारीक रवा उपलब्ध नसेल तर जाड रवा मिक्सरमधून छान फिरवून घ्यावा.
  • Rava Laddu-रवा लाडू करताना रवा व खवा मंद आचेवरच भाजावा.
  • Rava Laddu-रवा लाडू मध्ये बेसन अवश्य घालावे बेसनामुळे लाडूला छान खरपूस चव येते.
  • Rava Laddu-रवा लाडू करताना लाडू साठी बनवलेला पाक पक्का नसावा थोडा पाक हातावर घेऊन चिकटपणा तपासून बघावा गॅस बंद करावा.
  • Rava Laddu-रवा लाडूत खवा घातल्यामुळे लाडवाला अतिशय छान चव येते. खवा घालताना खवा भाजून घालावा.
  • रव्याच्या लाडूचे मिश्रण पूर्णपणे गार झाल्यानंतरच लाडू वळायला घ्यावे. गरम मिश्रणाचे लाडू केले तर त्यात घातलेल्या खवा खराब होण्याची शक्यता असते.
  • रव्याचे लाडू करताना चिमूटभर पिवळा खाण्याचा रंग घालू शकता. त्यामुळे लाडूला रंग खूप छान येतो किंवा हरभरा डाळीचे पिठाचे प्रमाण थोडे वाढवून घ्यावे त्यामुळे छान तांबूस रंग येतो. किंवा पाकात केशर घातले तरी लाडूला छान सोनेरी रंग येतो.
  • Rava Laddu-रवा लाडू व खवा घातल्यामुळे त्याची तिकडायचा कालावधी थोडा कमी होतो पाच ते सहा दिवस हे लाडू छान राहतात जास्त दिवस ठेवायचे असल्यास फ्रीजमध्ये ठेवावे.
  • रव्याच्या लाडूसाठी साखरेचे प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो जास्त गोड आवडत असल्यास साखरेचे प्रमाण वाढवावे.
  • रवा लाडू मध्ये आपल्या आवडीनुसार सुकामेवा आपण घालू शकतो.
  • रव्या ठेवायचे लाडू साजूक तुपात खूप छान लागतात परंतु साजूक तूप उपलब्ध नसेल तर अर्धे वनस्पती व अर्धे साजूक तूप घ्यावे.
  • भाजताना थोड्या वनस्पती तुपात भाजावे व नंतर वरून साजूक तूप घालावे म्हणजे लाडूला छान साजूक तुपाचा सुगंध येतो.
  • रवा लाडू करताना पाकाचा अंदाज येत नसेल तर आपण पिठीसाखर घालून हे लाडू करता येतात रवा खवा बेसन भाजून झाल्यानंतर साखरेचे थोडे प्रमाण वाढवून पिठीसाखर घालावी व पूर्ण मिश्रण छान एकजीव करून त्याचे लाडू वळावे गरज वाटल्यास वरून थोडे तूप गरम करून घालावे.

Leave a comment