“Ukadiche Modak-उकडीचे मोदक बनवा पारंपारिक पद्धतीने”

Ukadiche modak – उकडीचे मोदक तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात नारळ व गुळाचे सारण भरून एका विशिष्ट आकाराचे मोदक बनवले जातात.

Ukadiche modak Recipe
Ukadiche modak Recipe

थोडे मोदक विषयी.

Ukadiche modak – उकडीचे मोदक म्हणजे गणपती बाप्पाचा आवडता नैवद्य जो गणेश चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी साठी घरोघरी बनवले जातात. Ukadiche modak – उकडीचे मोदक म्हणजे उकड काढलेल्या पिठापासून तयार केलेले मोदक. तसेच मोदक या शब्दाचा अर्थ आनंद असा होतो मोदक म्हणजे वरून मऊ लुसलुशीत आवरणामध्ये मध्ये स्वादिष्ट नारळापासून तयार केले हे सारण असते. मोदक म्हणजे गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य आहे मोदक याचा नैवेद्य बापाला प्रसन्न करण्यासाठी दिला जातो. महाराष्ट्रीयन देवी देवतांमध्ये गणपती बाप्पाची पूजेला अनन्य साधारण महत्त्व आहे आपल्या संस्कृतीत पूजा छोटी असू दे किंवा मोठी असू दे सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा केली जाते. कारण गणपती बाप्पाची पूजा केल्याशिवाय कुठलीही दुसरी पूजा केली जात नाही.तसेच गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. असे म्हटले जाते गणपती बाप्पाला मोदक अतीप्रीय आहे, म्हणूनच मोदकाचे वेगवेगळे प्रकार करून बाप्पाला प्रसन्न करण्याचा करण्यासाठी मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. आपल्या देशात मोदक हे प्रसिद्ध व लोकप्रिय पदार्थ आहे.भारतात अनेक प्रकारात मोदक बनवले जातात. Ukadiche modak – उकडीचे मोदक तळलेले मोदक, साच्यातून तयार केलेले मोदक. आज आपण उकडीच्या मोदकांविषयी जाणुन घेणार आहोत. उकडीचे मोदकहे तांदळाच्या पिठापासून बनवले जातात. Ukadiche modak – उकडीचे मोदक बनवताना ओले नारळ व गोळ्यापासून सारण तयार केले जाते व ते मोदकाच्या आत मध्ये भरले जाते त्यामुळे उकडीचे मोदक हे पचायला सोपे व स्वादिष्टही होतात.परंतु हल्ली मोदक करताना त्यात वेगवेगळे सारण भरले जाते. तसेच आवरणासाठी ही वेगळी पदार्थ वापरले जातात. जसे तांदूळ, रवा, गव्हाचे पीठ असे पर्याय वापरले जातात. सारणासाठी खवा, खारीक, काजू, बदाम, नारळ असे वेगवेगळे पदार्थ वापरून मोदक बनवले जातात. तसेच लहान मुलांसाठी चॉकलेट मोदक बनवून बाजारात आले आहेत. तसेच वेगवेगळ्या स्वादात मोदक बनवले जातात. म्हणजेच गुलाब काजू मोदक, स्ट्रॉबेरी मोदक, मोतीचुर मोदक. गुलाब काजू मोदक हे मोदक गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाबाचा रंग व सुगंध व काजू वापरून केले जातात. तसेच स्ट्रॉबेरी मोदक या मोदकांमध्ये स्ट्रॉबेरी स्वादाचे सारण भरले जाते.मोतीचूर मोदक या प्रकारात मोतीचूर म्हणजे मोत्याच्या आकारात बुंदी तयार करून मोदकाच्या आकारात लाडू बनवले जातात. लाल पिवळ्या रंगाचे हे मोदक खूपच आकर्षक दिसतात.चॉकलेट मोदक म्हणजे मोदकाचे आवरणात चॉकलेट मिक्स करून आत मध्ये खवा किंवा चॉकलेटचे तुकडे घातले जातात. हे मोदक तयार केल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून गार झाले जातात . चॉकलेट मोदक हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. तसेच खव्या चे मोदक, अंजीर मोदक असे अनेक स्वादाचे व अनेक सुगंधाचे मोदक बनवले जातात. हे मोदक गव्हाच्या पिठापासून किंवा मैद्यापासून आवरण तयार करून बनवले जातात. यात सहसा नारळ गुळ किंवा साखरेचे सारण भरले जाते. तसेच आपल्या आवडीचे सारण भरून करता येतात. म्हणजे खारीक, खोबरे ,खसखस असे बाप्पाला आवडणारे पदार्थ घालून बनवता येतात व तळले जातात. त्यामुळे या मोदकांसाठी तसेच हे मोदक पाच ते सहा दिवस व्यवस्थित टिकतात त्या तुलनेत उकडीचे मोदक हे गरम गरमच खाल्ले जातात . उकडीचे मोदक हे स्वास्थ्यासाठी चांगले मानले जातात .उकडीच्या मोदकात ओले नारळ व गुळाचे सारण असते. नारळ आपल्या शरीराला तृप्ती देते गुळात हा पाचक असल्यामुळे आपल्या आहारात गुळाचा समावेश नियमित केला जातो. तसेच उकडीचे मोदक हे तुपा सोबत खाल्ले जातात. त्यामुळे त्याचे पोषक तत्वे वाढतात. नारळात भरपूर फायबर्स असतात तसेच एंटीऑक्सीडेंट ही असतात त्यामुळे उकडीचे मोदक हे शरीरासाठी उत्तम मानले जातात. तांदळाच्या पिठात विटामिन B१ असते. तसेच साजूक तुपात विटामिन A ओमेगा ३फॅ टी ऍसिड सारखे पोषक तत्त्वे असतात. त्यामुळे उकडीचे मोदक हे स्वास्थ्यवर्धकही मानले जातात.

HOW TO MAKE UKADICHE MODAK – उकडीचे मोदक कसे बनवतात.

Ukadiche modak – उकडीचे मोदक तांदळापासून बनवले जातात जसे बासमती, इंद्रायणी किंवा आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कोणताही सुगंधित तांदूळ वापरला जातो. प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन घेतात नंतर तांदूळ सावलीतच पूर्णपणे कोरडा करून घेतला जातो. तांदूळ पूर्णपणे कोरडा झाल्यावर गिरणीतून बारीक दळून घेतात. बारीक केलेले तांदुळाचे पीठ चाळणीने चाळून घेतात. नंतर सारणासाठी ओले नारळ खवुन त्यात आपल्या गरजेप्रमाणे गुळ मिक्स करून शिजवून घेतात. सारण कोरडे झाले की गार करायला गारकरून घेतात.करून मोदकात भरले जाते नंतर उकडीचे मोदक करताना एका भांड्यात पाणी घेऊन त्याच मापात तांदळाचे पीठ घेतात. नंतर पाण्याला उकळी आली की त्यात थोडेसे मीठ घातले जाते व थोडे दूधही चवीसाठी थोडे दूध घातले जाते. पाणी उकळले की त्यात तांदळाचे पीठ घालून चांगले हलवून शिजवून घेतले जाते. थोडा तूप लावून मळून घेतला जातो त्यात वाटीसारखा आकार करून त्यामध्ये तयार केलेले सारण भरून घेतले जाते. नंतर सगळ्या बाजूने तोंड बंद करून हाताच्या साह्याने कळ्या पाडल्या जातात. उकडीच्या मोदकांना कळ्या पाडणे तसे फार कौशल्याचे काम असते परंतु सरावाने तेही अगदी सोपे होते. तयार केलेले मोदक एका भांड्यात पाणी घेऊन त्यावर चाळणी ठेवावी व पाण्याला उकळी आली की एक त्या जाळाने सुती कापड टाकून त्यावर केलेले मोदक वाफवुन घेतले जातात व तुपा सोबत गरम गरम खाल्ले जातात.

साहित्य.

  • अर्धा किलो बासमती तांदूळ किंवा आपल्याकडे उपलब्ध असलेला कुठलाही सुगंधित तांदूळ.
  • एक कप दूध गरजेनुसार तूप.
  • स्वादासाठी वेलदोडा.
  • एक नारळ.
  • थोडे केशर.
  • गुळ.

कृती :-

  • Ukadiche modak – उकडीचे मोदक करताना तांदूळ प्रथम स्वच्छ धुऊन घ्यावा व सुती कापडावर पसरवून पूर्णपणे कोरडा करून घ्यावा.

  • तांदूळ सावलीतच कोरडा केला तरी चालेल किंवा पंख्याखाली ठेवून कोरडा करून घ्यावा. तांदूळ पूर्णपणे कोरडा झाल्यावर गिरणीतून अगदी बारीक दळून आणावा शक्य असल्यास आपण मिक्सरमधून दळू शकतो. तांदूळ एकदम बारीक दळायला गेलेला असावा.
  • दळून आणलेले तांदळाचे पीठ बारीक चाळणीने किंवा सुती कापडाने चांगले चाळून घ्यावे व एका बाजूला ठेवावे.
  • आता मोदकासाठी सारण करण्यासाठी नारळ सोलून फोडून घ्यावे. नारळ खवणीने खऊन घ्यावे खवणे नसेल तर नारळाचे मागची काळी बाजू काढून घ्यावी व बारीक किसणीने किसून घ्यावे. म्हणजे नारळाचा चव छान निघतो.
  • नंतर त्यात गुळ घालून घ्यावा व एका कढईत हे मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्यावे .मिश्रण शिजवताना सारखे हलवत राहावे मिश्रण जळणार नाही याची काळजी घ्यावी.
  • मिश्रण कोरडे होत आले की त्यात एक ते दोन छोटे चमचे भरून तांदळाची पिठी मिक्स करावी व छान हलवून परतून घ्यावे. म्हणजे मिश्रणाला पाणी सुटणार नाही व मिश्रण मोदक शिजवताना मिश्रण पातळ होणार नाही.
  • मिश्रण तयार झाले की त्यात वेलदोडा घालावा व परत एकदा मिश्रण हलवून घ्यावे.
  • आता मिश्रण गार करायला ठेवावे.
  • आता मोदक तयार करण्यासाठी एका पातेल्यात एक वाटी पाणी व एक वाटी दूध एकत्र करून गरम करायला ठेवावे. त्यात अगदी थोडे कणभर मीठ घालावे ,तसेच दोन ते तीन चमचे तूप घालावे.
  • आपल्याला सुरुवातीला कमी प्रमाणात मोदक करायचे असल्यास प्रमाण कमी घ्यावे म्हणजे अर्धी वाटी पाणी व अर्धी वाटीदूध मिक्स करावे. वाटीभर पाण्यात वाटीभरच तांदळाचे पीठ मोजून घ्यावे.
  • आता पाणी उकळले की त्यातदोन वाटी तांदळाचे पीठ घालूनघ्यावे .एका चमच्याच्या साह्याने छानमिक्स करुन घ्यावे. पिठात गाठी राहणार नाही याची काळजी घ्यावी. पीठ हलवल्यानंतर झाकण ठेवावे गॅस बंद करून द्यावा.
  • आता पीठ हाताने सारखे करता येईल किंवा मळून घेता येईल एवढे गरम असावे. आता दहा ते पंधरा मिनिटांनी पीठ एका परातीत घेऊन हाताला तूप लावावे व पीठ छान मळून मऊ करून घ्यावे.
  • गरज भासल्यास थोडे कोमट दूध किंवा कोमट पाणी याचा हात लावून पीठ मऊ करावे. म्हणजे मोदक तयार करताना मोदक छान होतील.
  • आता पीठ छान मळून झाल्यावर त्याचा एक लिंबाएवढा छोटा गोळा घेऊन त्यात हाताच्या साह्याने वाटीसारखा आकार तयार करावा.
  • आता तयार केलेल्या वाटीच्या आकारात सारणाचा एक छोटा गोळा घेऊन वाटीत ठेवावा व सगळ्या बाजूने तोंड बंद करावा. मोदकांना कळ्या पाडणे हे तसे कौशल्याचे काम असते हळूहळू सरावाने जमते परंतु पहिल्यांदा मोदक करत असाल तर मोदकाच्या साच्यात घालून मोदक तयार करावा.
  • आता अशा प्रकारे सगळ्या पिठाचे मोदक तयार करून झाल्यानंतर मोदक वाफव ण्यासाठी एका मोठ्या पातेल्यात पाणी ठेवावे. त्यात वरून चाळणी ठेवावी चाळणीवर ओलासुती करून चाळणीत पसरवून द्यावा.
  • आता तयार केलेले मोदक हे दुधात बुडवून ठेवावे व वरून केशर घालून भिजवलेले दूध चमच्याच्या साह्याने प्रत्येक मोदकावर टाकावे म्हणजे मोदक वापरल्यानंतर मोदकाला छान केशराचा सुगंध येईल व चवळी छान लागेल.
  • आतावरून झाकण ठेवावे चार ते पाच मिनिटे वाफवून घ्यावे व हे मोदक तुपा सोबत खायला द्यावे. उकडीचे मोदक हे गरम गरम मग खूप छान लागतात.

टिप्स :-

  • Ukadiche modak – उकडीचे मोदक करताना बासमती तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ किंवा आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कुठलाही सुगंधित तांदूळ घ्यावा .
  • मोदक करण्यासाठी जास्त स्टार्च असलेल्या तांदूळ घ्यावा म्हणजे मोदक छान होतात.
  • मोदक तयार करण्यासाठी तांदळाचे पीठ हे बारीक चाळणीने किंवा कापडाने चाळून घ्यावे म्हणजे त्यात असलेले तांदळाच्या कण्या किंवा काही जाड पदार्थ असतील तर ते निघून जातील. पीठ एक सारखे बारीक येईल मोदक करताना त्रास होणार नाही.
  • उकडीचे मोदक मऊ व लुसलुशीत होण्यासाठी तांदळाच्या पिठाची उकड ही पूर्णपणे दुधात घ्यावी व त्यात एक ते दोन चमचा तूप घालावे मोदक अतिशय सुंदर होतात.
  • पूर्ण पण दूध नसल्यास अर्धे पाणी व अर्धे दूध घेऊन उकड काढू शकतात.
  • तांदळाची उकड घेताना त्यात कणभर मीठ घालावे व एक ते दोन चमचे तूप घालावे त्यामुळे उकड छान मऊ शिजवली जाते व मोदकही छान लुसलुशीत होतात.
  • मोदकाच्या सारणात आपण सुकामेवा घालू शकतो बदाम काजू चारोळ्या किंवा बेदाणे अशा प्रकारे कुठलाही सुकामेवा वापरू शकतो.
  • मोदक झाल्यानंतर मोदक वाढताना मोदक तयार करून आपण आयत्यावेळी चाळणी वाफवु शकतो मोदक वापरताना दुधात बुडवून मग चाळणीत ठेवावे म्हणजे मोदकाला छान स्वाद येतो.

FAQs :-

प्रश्न १ :- उकडीचे मोदक करताना कोणता तांदूळ वापरावा ?

उत्तर :- Ukadiche modak – उकडीचे मोदक करताना आंबेमोहोर इंद्रायणी बासमती असे सुगंधित तांदूळ वापरावे किंवा आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कुठलाही सुगंधित तांदूळ घ्यावा परंतु जास्त स्टार्च असलेला तांदूळ वापरावा त्यामुळे मोदक छान लुसलुशीत व मऊ होतात.

प्रश्न २:- उकडीचे मोदक हे स्वास्थ्यवर्धक आहेत का ?

उत्तर :- हो अगदी नक्कीच स्वास्थ्यवर्धक आहेत उकडीच्या मोदकात तांदूळ गूळ ओले नारळ तसेच सुकामेवा घातला जातो त्यामुळे त्यांचा पौष्टिक पण नाही वाढतो गुळामुळे पचायलाही अगदी सहज होतात.

1 thought on ““Ukadiche Modak-उकडीचे मोदक बनवा पारंपारिक पद्धतीने””

Leave a comment