Limbu Sarbat-लिंबू सरबत म्हणजे लिंबू, साखर, मीठ पाण्यात घालून बनवलेले एक उत्तम पेय,जे मनाला व शरीराला तृप्ती देते. Limbu Sarbat लिंबू सरबत उपाशीपोटी घेतले तर ते अमृता समान असते असे म्हटले जाते. Limbu Sarbat लिंबू सरबत तर लहानापासून मोठ्या पर्यंत सगळ्यांनाच आवडते. तसेच वेगवेगळ्या चवीची सरबत करता येतात.नुकताच चैत्र महिना सुरु झालेला आहे ,म्हणजे उन्हाळा सुद्धा सुरु झालेला आहे. उन्हाळा म्हटला कि उष्णता ,पित्त अंगावर उठणारे घामोळे अशा वेगवेगळे त्रास बर्याच जणांना होत असतात. एकीकडे निसर्ग जुनी कात काढून नवीन रूप धारण करत असतो आणि आपण मात्र शरीरातील गारवा आणि शक्ती टिकवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो. अशा वेळेत मिळणारे वेगवेगळ्या कंपन्याचे शीत पेय बाजारात आलेले असतात आणि तरुण पिढी त्या रासायनिक शीत पेये पिऊन स्वतःची तहान भागवण्याची वेडा प्रयत्न करत असते.खरे तर निसर्गानेच आपल्याला अगदी निरोगी आणि प्रत्येक ऋतुला सामोरे जाण्यासाठी लागणारी शक्ती मिळवण्यासाठी भरभरून दान निसर्ग देत असतो म्हणजेच उन्हाळ्यात येणारी फळे कैरी ,चिंच ,लिंबू, पुदिना आणि आमसुल या फळापासून सुंदर चवीची सरबते करता येतात.साधे चिंच भिजवुन त्यात गुळ घालून एकजीव करून ते घेतल्याने सुद्धा उन्हाचा त्रास जाणवत नाही व तरतरी येते.उन्हाळ्यात साधे एक ग्लास सरबत घेतले तरी उन्हाचा त्रास होत नाही.त्या साठी आज आपण लिंबू सरबत कसे बनवतात ते बघणार आहोत.
थोडे लिंबू विषयी.
आपल्याकडे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याची चाहूल लागते.उन्हाळा म्हटला म्हणजे घशाला कोरडपडते व अशाच उन्हाळ्यात मनाला व शरीराला तृप्ती मिळते ती थंडगार Limbu Sarbat-लिंबू सरबत घेतल्याने. उन्हाळ्यात जागोजागी Limbu Sarbat-लिंबू सरबताचे ठेले लागलेले दिसतात.थंडगार माठातले पाणी त्यावर ठेवलेली हिरवी ताजी पुदिन्याच्या पानांची जुडी व त्याच रंगाला शोभून दिसणारे पिवळे पिवळे लिंबू हे चित्र बघितल्यावर आपोआप आपले पाय Limbu Sarabat-लिंबू सरबताच्या ठेल्याकडे वळतात.एक ग्लासभर थंडगार लिंबू सरबत आपल्याला उन्हाळा सहन करण्याची शक्ती देऊन जाते. त्याचबरोबर आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासही Limbu Sarbat-लिंबू सरबत मदत करते.उन्हाळ्यात आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत जाते.शरीराचे तापमान वाढते.अशा वेळेस उन्हाळी लागणे,चक्कर येणे,मळमळ होणे किंवा उष्माघाताचा त्रास होणे असे समस्या निर्माण होतात.अशा समस्यांचा उपाय म्हणजे उन्हाळ्यात भरपूर Limbu Sarbat-लिंबू सरबत घ्यावे. त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान तर नियंत्रित राहतेस परंतु लिंबू तील गुणधर्म म्हणजे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करतो.त्यामुळेच आपल्या उन्हाळ्यात आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.लिंबू हे आपल्या रोजच्या जेवणात वापरात येणारे एक आंबट चवीचे फळ आहे.त्याचा रंग हिरवा असतो.जसे जसे फळ पिकत जाते तसा त्याचा रंग पिवळा होतो पूर्ण पिकलेल्या लिंबाचा रंग सुंदर पिवळा होतो. लिंबू दोन प्रकार ईडलिंबू किंवा कागदी लिंबू असे त्याचे प्रकार असतात.लिंबापासून लिंबाचे लोणचे,लिंबाचे सरबत तयार केले जाते.तसेच पुदिना घालून लिंबाचे सरबत हा एक प्रकार उन्हाळ्यात खूप छान लागतो.तसेच जेवणाच्या पदार्थांची चवही लिंबू मुळे वाढते.लिंबू आपल्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत म्हणजेच संपूर्ण शरीरासाठी खूप उपयोगी असणारे फळ आहे.लिंबू मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते.जे आपले रोगप्रतिकार शक्ती उत्तम ठेवते.लिंबू मुळे पचन सुधारते. तसेच लिंबू मुळे वजनही घटते.असे म्हणतात की रोज उपाशीपोटी एक ग्लास Limbu Sarabat-लिंबू सरबत घेणे म्हणजे अमृत घेण्यासारखे आहे. Limbu Sarbat-लिंबू सरबत आपले वाढलेले पित्त कमी करते. लिंबू सरबतात आल्याचा रस किंवा सुंठ पावडर घालून घेतले तर वाढलेले पित्त लगेच शांत होते. तसेच लिंबू मुळेआपल्या लहान व मोठ्या आतड्यांचे आरोग्य उत्तम राखले जाते. लिंबू नुसताच आपल्या शरीरातील आरोग्यासाठी नाही तर बाहेरील सौंदर्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. लिंबू मधील विटामिन सी मुळे आपले केस व आपली त्वचा चमकदार होते. एक ग्लास Limbu Sarabat-लिंबू सरबतात तीन ते चार चिमूट खाण्याचा सोडा घालून घेतल्याने उन्हाळ्यात आपल्या शरीरातील क्षार दिवसभर टिकून राहण्यास फार मदत होते व चव ही खूप छान लागते.ताजा लिंबू प्रमाणे वाळलेल्या लिंबूची साले सुद्धा उपयोगी पडतात. वाळूलेल्या लिंबूच्या कोरड्या सालांची पावडर उटण्यासारखी अंगाला लावली तर त्वचेचे आरोग्य उत्तम राहते. तसेच पचनासाठी तर लिंबू सरबत अतिशय उत्तम मानले जाते. Limbu Sarbat-लिंबू सरबतात विटामिन सी म्हणजेच सायट्रिक ऍसिडचे प्रमाण भरपूर असल्यामुळे किडनी स्टोनचा त्रास सुद्धा कमी होतो. सायट्रिक ऍसिडमुळे किडनीमध्ये झालेले तयार झालेले खडे विरघळण्याची किंवा ते बाहेर टाकले जाण्याचा गुणधर्म लिंबूच आहे.तसेच हल्ली बदललेल्या जीवनशैलीमुळे बरेच आजारपण निर्माण झालेले आहेत व व्यायामाचा अभाव असल्यामुळे आपल्या शरीरात बरेच विषारी पदार्थ साचून राहतात.लिंबू मुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात म्हणून डॉक्टर रोज सकाळी एक ग्लास लिंबू पाणी घेण्याचा सल्ला देतात. तसेच चेहऱ्यावरील मुरमे सुद्धा लिंबू सरबतामुळे किंवा लिंबूची पावडर लिंबूच्या कोरड्या सालाची पावडर जर चेहऱ्यावर लावली तर चेहऱ्यावरील मुरमे नाहीसे होतात. असा हा लिंबू आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी आहे.
साहित्य.
- लिंबू रस – १ कप.
- साखर – ३ कप.
- मीठ – चवीनुसार.
- काळे मीठ – १ चमचा.
- लेमन इसेन्स.
कृती.
- लिंबू सरबत-Limbu Sarbat तयार करतांना,स्वच्छ व पूर्ण पिकलेले लिंबू घ्यावे.
- लिंबू सरबता साठी पिवळ्या रंगाचे लिंबू घ्यावे.पिवळ्या रंगाचे लिंबू पिकलेले असतात.
- .लिंबू सरबता साठी कागदी लिंबू घ्यावे.कागदी लिंबूमध्ये जास्त रस असतो.
- लिंबू स्वच्छ धुवून घ्यावेव पुसून घ्यावे.नंतर सर्व लिंबू सुरीच्या साह्याने कापून दोन दोन फोडीकरून घ्या.
- लिंबू च्या बिया काढून टाकाव्या.आता एका कपात किंवा आपल्या सोयीनुसार कुठलेही भांडे घ्यावे म्हणजे प्रमाण ठरवण्यासाठी सोयीचे होईल.
- थोड्या वेळाने मंद आचेवर ठेवून साखर एकजीव करून घ्या.साखर पूर्ण विरघळली कि ग्यास बंद करावा.
- मिश्रण गार झाल्यावर त्यात एक चमचा लेमन एसेन्से घालावा.परत छान मिश्रण ठवळून एकजीव करावे.
- ते मिश्रण पूर्ण गार झाल्यावर काचेच्या व प्लास्टिक च्या बॉटल मध्ये काढून गाळून घ्यावे व फ्रीज मध्ये ठेवावे.
- Limbu Sarabat- लिंबू सरबता चे मिश्रण फार काळ टिकते.
- आयत्या वेळेस त्यात पाव कप मिश्रण व पावून कप पाणी म्हणजे एक भाग Limbu Sarbat-लिंबू सरबत व तीन भाग पाणी घालावे.
- Limbu Sarbat- लिंबू सरबत करतांना चिमुट भर सोडा घातला तर चवही चांगली येते आणि आपल्या शरीरात क्षार टिकून राहण्यात मदत होते.
- आवडत असल्यास त्यात चमचाभर पुदिन्याचा रस घालू शकतात खूप छान लागतो. Limbu Sarbat-लिंबू सरबतात पुदिना रस आयत्या वेळेस घालायचा. त्याचा सुगंध हि छान येतो.
Limbu Sarbat – लिंबू सरबत फायदे.
Limbu Sarbat लिंबू सरबत हे लिंबू या पासून बनवतात. लिंबू बाजारात सहज उपलब्ध होतात. लिंबू मध्ये “C Vitamine” मुबलत प्रमाणात असते. ते आपल्याला खूप गरजेचे असते. प्रतिकार शक्ती वाढवते व सर्दी , खोकल्या आजारापासून दूर ठेवते. लिंबू पचनासाठी सुद्धा चांगला असतो. लिंबूचे सरबत मनाला गारवा आणि तृप्ती देते. रोज सरबत बनवण्याचा कंटाळा येतो, अशा वेळेस आपण एकदम लिंबू रस करून ठेवू शकतो व आयत्या वेळेस आपण एक भाग लिंबू रस आणि तीन भाग पाणी घालुन झटपट सरबत करू शकतो.सरबतीसाठी लागणारे लिंबू छान पिवळ्या रंगाचे पूर्णपणे पिकलेले घ्यावे. लिंबू घेतांना शक्यतो पातळ सालीचे लिंबू घ्यावे. त्यांना कागदी लिंबू म्हणतात. ते छान रसदार असतात. (हिरव्या रंगाचा रस कमी निघतो ). लिंब स्वच्छ धुवून घ्यावे आ स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे. कपभर रसासाठी दहा ते बारा रसदार लिंबू पुरतात. लिंबू कापून रस काढावा व ते चाळणीने गळून घ्यावा म्हणजे बिया बाजूंला काढता येतात.
टिप्स.
- उन्हाळ्यात सकाळी उठल्यावर लिंबू पाणी प्यायल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते
- तसेच सकाळी उपाशीपोटी Limbu Sarbat लिंबू सरबत प्यायल्याने शरीराला खूप फायदेशीर ठरते.
- लिंबू सरबतासाठी ताजे व पूर्ण पिकलेले व रसाळ लिंबू वापरावे.
- लिंबू सरबत करताना लिंबू रसाच्या तीन पट साखर घ्यावी.
- लिंबू सरबत भिजवलेला सब्जा बी घालता येतो उन्हाळ्यात नक्की घालावे. सब्जा बी मध्ये पाणी धरून ठेवण्याची शक्ती जास्त असते म्हणून उन्हाळ्यात सरबत घेतांना त्यात सब्जा बी अवश्य घालावे.
- लिंबू सरबत आपल्याला आवडत असेल तर चिमूटभर वेलची पावडर घालता येते.
- कधी कधी अचानक पाहुणे आल्यावर घरात लिंबू उपलब्ध नसतात अशा वेळेस सरबत करायचे असेल तर बाजारात मिळणारी लेमन पावडर आपण वापरू शकतो.
- लेमन पावडर फार जास्त आंबट असते.त्यामुळे एक चमचा लेमन पावडरला सहा ते सात चमचे साखर घालावी.
FAQs.
प्रश्न १ :- लिंबू सरबत पिण्याचे फायदे ?
उत्तर :- लिंबू सरबत हे मुख्यतः लिंबू पासून बनवले जाते. त्यामुळे त्यात विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. विटामिन सी हे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी उत्तम असते व त्यामुळेच आपले रोगप्रतिकारशक्ती वाढते. विटामिन सी हे आपल्याला अनेक आजारांपासून लांब ठेवते. म्हणून आज तज्ञांच्या मते उन्हाळ्यात रोज एक ग्लास लिंबू सरबत घेणे फायदेशीर असते.
प्रश्न २ :- लिंबू चे दुष्परिणाम आहेत का ?
उत्तर :- हो अति तेथे माती या म्हणीप्रमाणे लिंबूचे सुद्धा दुष्परिणाम होऊ शकतात. लिंबू रस अतिशय आंबट असतो व तो उष्ण ही असतो. जर लिंबूरस जास्त सेवन केला तर उष्णता वाढून मळमळ होणे, छातीत जळजळ होणे व उलट्या होणे असे त्रास होऊ शकतात.
प्रश्न ३ :- लिंबू सरबत हे कोणत्या वेळी घ्यावी ?
उत्तर :- लिंबू सरबत हे सकाळी उपाशीपोटी घेतले तर अगदी अमृता समान असते असे मानले जाते म्हणूनच लिंबू सरबत उपाशी पोटी घेतलेले फायदेशीर ठरतं.