“शाही थंडाईची गोड कहाणी: घरीच तयार करा स्वादिष्ट थंडाई-Thandai”

Thandai-थंडाई हे उन्हाळ्यातील उत्तम पेय आहे. दूध, साखर, सुकामेवा, गुलाब पाकळ्या व केशर यासारख्या पदार्थ वापरून केली जाते. Thandai-थंडाई हे उन्हाळ्यातील मुलाला व शरीराला गारवा देणारे पेय आहे. उन्हाळा संशय करण्यासाठीचे एक उत्साहवर्धक पेय असे म्हटले तरी चालेल. दूध व उत्तम प्रतीचे सुकामेवा घालून थंडाई बनवली जाते. तसेच Thandai-थंडाई ही होळी व महाशिवरात्री या सणांसाठी प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. फरक इतकाच आहे की या सणांमध्ये Thandai-थंडाई मध्ये थोडे गोड दुधात मिक्स करून गुलाब पाकळ्या घालून प्यायला दिली जाते. Thandai-थंडाई ही केशर वेलदोडाच्या सुगंधित होते पचनासाठी थोडी काळीमिरी घातली जाते. भिजवलेले बदाम, भिजवलेले काजू, भिजवलेले खसखस, गुलाब पाकळ्या व बडीशेप सगळे पदार्थ शरीराला गारवा देणारे आहेत व उत्तम पोषण देणारे ही आहेत.

Thandai-Recipe
Read More : Samosa Recipe

थोडे थंडाई विषयी.

उन्हाळा म्हणजे तसा सर्वात अवघड वाटणारा ऋतू होय .कारण उन्हाळ्यात पित्त, डोकेदुखी, घाम व पचनाला होणारा त्रास म्हणजेच भूक कमी लागणे, पचन मंदावणे असा आतून बाहेरून होणारा त्रास म्हणजे उन्हाळा. ह्याच उन्हात अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत अगदी प्राणी मात्र सुद्धा गारवा शोधत असतात. परंतु आयुर्वेदाने आपल्याला उन्हाळ्यावर खूप उपाय सांगितलेले आहेत. सगळ्यात प्रथम दूध, दुधापासून थंडाई-Thandai बनवतात. दूध म्हणजे गारवा, शक्ती, उत्साह व चव, उष्णतेने होणारी पित्त व त्या पित्तामुळे वाटणारा थकवा या सगळ्याच गोष्टींसाठी दूध हा उत्तम पर्याय आहे. त्या दुधापासून बनवणारे दही व दह्यापासून तयार होणारे ताक हा सुद्धा उत्तम उपाय आहे.ताकापासून तयार केलेल्या मठ्ठाउन्हाळ्यात वाढलेली उष्णतेमुळे शरीर मन याला येणारा थकवा कमी करतो. उन्हाळ्यात स्वास्थ्य मिळण्यासाठी व शरीर ताजेतवाने करण्यासाठी काहीतरी गार प्यावेसे वाटते.उन्हाळ्यात नेहमीच जेवणापेक्षा शीतपेय किंवा सरबते हवीहवीशी वाटतात. त्यामुळे उन्हाळ्यातील ताप व त्रास थोडा तरी कमी जाणवतो. लिंबू सरबत, कैरीचे पन्हे, पुदिन्याचे सरबत यांसारखी गार सरबते उन्हाळ्यात घ्यावीशी वाटतात. तसेच Thandai-थंडाई हे सुद्धा अतिशय चविष्ट व शरीराला ऊर्जा देणारे ताकद, उत्साह देणारे पेय आहे.दुधापासून तयार केलेली थंडाई शरीराला आरोग्य देते. दूध शरीराला तात्काळ ऊर्जा देणारे, शक्ती देणारे आहे. दुधातील कॅल्शियम व प्रथिने शरीराला ताकद देतात. उन्हाळ्यात होणारे पित्त यावर सुद्धा गार दूध घेतले असता तात्काळ बरे वाटते. तसेच या दुधापासून पंचामृतही तयार करता येते.पंचामृत म्हणजे दूध, तूप, दही,साखर व मध या पाच अमृता समान पदार्थांपासून तयार केलेला पदार्थ .तोही शरीराला गारवा, बुद्धीलातलखपणा देतो. शरीरातील शुक्रधातू वाढवतो, ओज वाढवतो. हे पंचामृत सकाळी उपाशीपोटी घेतला तर खूपच फायदेशीर असते. तसेच वाळा हा सुद्धा उन्हाळ्यातील एक थंड पदार्थ ज्याची महती आयुर्वेदात सांगितलेली आहे. वाळा हा सुद्धा उन्हाळ्यात उष्णतेवरचा अतिशय परिणामकारक इलाज आहे’ वाळा ‘.वाळ्याच्या सुगंधाने मनाला तृप्ती व शरीराला गारवा मिळतो .अगदी घरात वाळ्याचा छोटा पडदा ओला करून ठेवला तरी पूर्ण घराला गारवा मिळतो. तसेच ह्या वाळ्याचे सरबतही उन्हाळ्या त नियमित पितायेते. आपल्या. आहारात नियमित घेता येते.दूध, बदाम, खसखस, गुलाबाच्या पाकळ्या अशा उत्कृष्ट पौष्टिक व गारवा देणाऱ्या पदार्थांपासून तयार केलेली थंडाई-Thandai उन्हाळ्यात आपल्याला उन्हाळा सहन करण्याची ताकद देते.उन्हाळ्यात या सगळ्या पदार्थांची पेस्ट करून फ्रीजमध्ये तीन ते सात दिवसापर्यंत ठेवू शकतो व गरजेप्रमाणे वापरून थंडाई बनवू शकतो. थंडाई कशी बनवतात प्रथम सर्व प्रकारच्या सुकामेवा हा पाण्यात भिजवून घेतला जातो. भिजवलेला सुकामेवा पूर्णपणे भिजवल्यावर त्याची मिक्सर मधून बारीक पेस्ट तयार केली जाते व ती पेस्ट गरम दुधात मिक्स केली जाते. सुगंध व स्वादासाठी केशर, वेलदोडा, गुलाब पाकळ्या टाकल्या जातात त्यात टाकले जाणारे पदार्थ म्हणजे बदाम.

Thandai-थंडाई मध्ये वापरले जाणारे घटक पदार्थ.

  • खसखस :- खसखस ही भरपूर कॅल्शियम असलेली एक बीच आहे. खसखस मेंदू शांत ठेवते म्हणूनच झोपेच्या विकारात पण ते खसखस वापरले जाते. खसखस मधल्या कॅल्शियम मुळे हाडांना मजबुती मिळते म्हणून थंडाई मध्ये खसखसही वापरली जाते.
  • बदाम :- बदाम शरीराला शक्ती व आरोग्य देणारा एक तेल बी आहे. बदाम मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स विटामिन्स आढळतात. बदाम मेंदूसाठी हृदयासाठी अत्यंत उपयुक्त आहे. भिजवलेले बदाम शरीराला गारवा देतात व म्हणूनच थंडाई मध्ये भिजवलेले बदाम वापरले जातात. नेहमीच बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती उत्तम राहते.
  • काजू :- काजू मध्ये भरपूर फायबर्स असतात. तसेच फॉस्फरस, प्रोटीन, कॅल्शियम तसेच अनेक विटामिन्स असतात. जे तुमचे हृदय आरोग्य हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते व काजू मुळे पचनही चांगले होते.
  • बडीशोप  :- बडीशोपी पाचक पदार्थ पैकी एक आहे बडीशोप मुळे रक्त वाढीसाठी उपयुक्त ठरते डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. बडीशेप उष्णता व पित्त कमी करणारी आहे चन उत्तम ठेवते.
  • केशर :- केशर हे सर्दी, खोकला व दमा यासारख्या विकारात उत्तम गुणकारी असते. केशर हे पदार्थाला चव व सुगंध आणते त्याचबरोबर उत्तम पचन करणारी आहे. केशर नियमित आहारात ठेवावे. केशर मुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
  • मगज बी :- मगज बी म्हणजे टरबुजाच्या बिया या बियांमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे आपले रक्तदाब नियंत्रण नियंत्रणात राहतो. टरबुजाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन A व बीटा कॅरोटीन असते. बऱ्याच रेसिपी मध्ये सुद्धा वापरले जाते.
  • गुलाब पाकळ्या :- गुलाब पाकळ्या सुद्धा शरीराला गारवा देतात. गुलाब पाकळ्यांपासूनच गुलकंद बनवला जातो. तसेच गुलाब पाकळ्यांमध्ये शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचा गुणधर्म असतो. हे असे सगळे आरोग्यवर्धक पदार्थांपासून थंडाई बनवली जाते. थंडाई मध्ये वेगवेगळे स्वाद तयार करता येतात जसे चॉकलेट थंडाई, स्ट्रॉबेरी फ्रुट्स थंडाई  म्हणजेच फळांचे बारीक  फोडी टाकून ही थंडाई करता येते.

साहित्य.

  • दूध एक लिटर.
  • साखर 200 ग्रॅम.
  • बदाम दहा ते बारा.
  • बडीशेप एक चमचा.
  • खसखस एक चमचा.
  • पाच-सहा मिरे.
  • हिरवा वेलदोडा एक.
  • गावठी गुलाबाच्या पाकळ्या मूठभर.
  • केशर पूड चिमुट भर.
  • दालचिनी अर्धा इंच.

कृती.

  • Thandai-थंडाई करतांना बदाम, बडीशोप,आणि खसखस पाच सहा तासासाठी पाण्यात वेगवेगळे भिजत घालावे. नंतर बदाम सोलून साल काढून घ्यावे.
  • बदाम खसखस बडीशेप हे तीनही भिजवलेले पदार्थ थोड्याशा दुधाबरोबर वाटून पेस्ट करून घ्यावी.
  • एका भांड्यात दूध घेऊन त्यात साखर टाकून मंद आचेवर गरम करण्यास करून घ्यावे.
  • दुधाला उकळी आली की बनवलेली बदाम, खसखस, बडीशेप यांची बनवलेली पेस्ट दुधात नीट मिक्स करून घ्यावी.
  • वेलदोडा, गुलाबाच्या पाकळ्या, दालचिनी यांची पूड टाकून गॅस बंद करावा. गार झाले की प्यायला द्यावे.

Panchamrit Recipe-पंचामृत रेसिपी.

दुधापासून आपण Panchamrit-पंचामृत ही बनवु शकतो. Panchamrit-पंचामृत म्हणजे दूध, दही, साखर, तूप व मध या पदार्थांपासून बनवलेला पदार्थ. या पाचही पदार्थांना अमृताची उपमा दिलेली आहे. हे पाचही पदार्थ ठराविक प्रमाणात घेऊन तयार केलेला पदार्थ म्हणजे Panchamrit-पंचामृत.हे पाचही पदार्थ शरीराला अतिशय फायदेशीर असल्यामुळे त्यांना अमृत म्हणतात व त्यांच्यापासून बनलेला पदार्थ म्हणजे पंचामृत. पंचामृत शरीराला ताकद देणारे बुद्धी तल्लख करणारे, मन प्रसन्न ठेवणारे व शरीरातील उष्णता कमी करणारे आहे.शरीरातील ओज धातू वाढवणारे शुक्रधातू वाढवणारे आहे. असे हे Panchamrit-पंचामृत ही आरोग्याला खूप फायदेशीर असते.लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत Panchamrit-पंचामृत सगळ्यांना घेता येते. Panchamrit-पंचामृत तयार कसे करावे.

  • दुध :– दुध हे शक्ती वर्धक व मेधा वर्धक आहे असे म्हटले जाते.तसेच आयुर्वेद शास्रा नुसार दुधाला पूर्णान्न आहे असे म्हणतात.
  • साखर :– साखर हि पदार्थाला गोडवा आणण्याचे काम करते.तसेच साखरेमुळे शरीराला तत्काळ उर्जा मिळते.
  • मध :- आयुर्वेद शास्रा नुसार असे  म्हणतात कि ज्या पदार्थात मध मिसळून घेतले जाते त्या पदार्थाचा दर्जा व  त्याचे औषधी गुणधर्म दुप्पट होते.
  • दही :- दही हे सुद्धा शरीशुद्धीकरण करण्याचे काम करते.तसेच आपली पचनशक्ती वाढवते.
  • तूप :- तूप हे शरीराला शक्ती देण्याचे काम करते तसेच तुपामुळे आपले हाडांना मजबुती मिळते.

या पाचही पदार्थाना आयुर्वेदात अमृत म्हटले जाते.म्हणूनच यांच्यापासून बनवलेल्या पदार्थाला पंचामृत म्हटले जाते.

  • चार ते पाच चमचे दूध.
  • एक चमचा साखर.
  • एक चमचा दही.
  • दोन चमचे तूप.
  • एक चमचा मध.

कृती.

 

Wala Sarbat-वाळा सरबत.

Wala-वाळा म्हणजे एक प्रकार ची वनस्पतीची मुळे आहेत. Wala-वाळा ही मुळात भारतातील एक वनस्पतीचे मूळ आहे. Wala-वाळा ही वर्षभर उगवणारे तृण प्रकारातील एक वनस्पती आहे.वाळ्यातला तिचा स्वतःचा एक सुगंध असतो. वाळ्यात उष्णता नाशक गुणधर्म असतात त्यापासून उन्हाळ्यातील सरबत बनवली जातात. उष्ण हवामानाच्या ठिकाणी उन्हाळ्यात वाळ्याचे पडदे तयार केले जातात व ओले करून गार वारा मिळवण्यासाठी वापरले जातात. वाळा च्या छोट्या छोट्या जुड्या तयार करून घेतल्या जातात.त्या वाळ्याच्या जुड्या उन्हाळ्यात माठात टाकून ते पाणी पिण्यासाठी वापरले जाते.वाळा घातलेले पाणी हे उन्हाळ्यात शरीराला गारवा देते.त्यामुळेच उन्हाळ्यात होणारे त्रासापासून मुक्ती मिळते.

  • वाळा हा गुणधर्माने अतिशय थंड असतो.
  • वाळ्याचे उत्पन्न दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
  • वाळ्याला खस असेही म्हटले जाते.
  • वाळाहा उन्हाळ्यात सरबताच्या माध्यमातून किवा आपल्या सध्या पाण्यात घालुन घेतले जातो.
  • वाळ्याचे सरबत हे उन्हाळ्यात अत्यंत गुणकारी असते.
  • वाळ्याच्या सरबत हे उन्हाळ्यात होणारे त्रास म्हणजे पित्त,मळमळ,डोकेदुखी थकवा यासारखे समस्यांपासून लांब ठेवते.

साहित्य.

  • वाळा 50 ग्रॅम.
  • खडी साखर 500 ग्रॅम.

कृती.

  • वाळ्याचे सरबत करण्यासाठी प्रथम वाळ्याची मुळे छान स्वच्छ धुऊन घ्यावीत व छोटे छोटे तुकडे करावेत.
  • साधारण एक लिटर पाण्यात हे तुकडे दहा ते बारा तास भिजत ठेवावे.
  • दुसऱ्या दिवशी ते पाणी छान सुती कापडाने किंवा बारीक चाळणीने चाळून घ्यावे.
  • ह्याच पाण्या त 500 ग्रॅम खडीसाखर मिसळावी व हे सर्व मिश्रण मंद आचेवर एक तारी पाक होईपर्यंत आटवावे.
  • गार झाल्यावर बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे.
  • सरबत तयार करायचे असेल तेव्हा एक भाग मिश्रण व दोन ते तीन भाग गार पाणी घालून द्यावे.

वाळ्याचे फायदे.

  • अक्षय तृतीयाला पासून चिंच व गूळ घालून आंबट गोड पदार्थ केला जातो.कारण अक्षय तृतीया हि उन्हाळ्यात येते व वाळा हा थंड असतो तसेच चिंच व गुळ या पदार्थांमुळे वाळ्याचा गोडवा तर वाढतोच पण त्याची गुणवत्ता हि वाढते.वाळाचा उपयोग त्वचेची काळजी घेण्यासाठी केला जातो म्हणजेच फेस पॅक तयार करून लावला जातो.तसेच उन्हाळ्यात अंगाला वाळ्याच्या मुळे कोरडी करून त्याची पावडर बनवली जाते व ती पावडर उटण्या प्रमाणे अंगाला लावली जाते.त्यामुळे शरीर स्वच्छ होते व थंड हि राहते.
  • पूर्वी वाळा शिकेकाईमध्ये घालून केस धुण्यासाठी वापरत असे अजूनही काही ठिकाणी वापरला जातो पण हल्ली वाळ्यापासून शाम्पू,साबण इत्यादीवस्तु बनवल्या जातात.तसेचधुप , अत्तरयासारख्या वस्तू तयार केल्या जातात. बाळा पाण्यात टाकून ते पाणी घेतल्यास उष्णतेचा त्रास होत नाही.
  • पूर्वी मोठमोठी घरे असायची अशा घरांमध्ये गार हवेसाठी उन्हाळ्यात वाळ्याची पडदे वापरली जात असत.अजूनही काही ठिकाणी वाळ्याचे पडदे वापरली जातात. तसेच कुलर मध्ये गार हवेसाठी वाळ्याची पडदे तयार करून ते लावले जातात.तसेच वाळ्याच्या पानांपासून शुभेच्छा वस्तू बनवल्या जातात .वाळ्यात औषधी गुणधर्म हि भरपूर असतात उन्हाळ्यात उन्हाळी लागणे ,अंगाची आग होणे,पित्त होणे या त्रासावर वाळ्याचे सरबत घेणे हा उत्तम पर्याय ठरतो.

FAQs.

प्रश्न १.  वाळ्याचे शास्रीय नाव काय आहे ?

उत्तर :-  वाळ्याचे शास्रीय नाव व्हेतीवेरीया जीजेनी आयडीस (vetiveria zizanoides) हे आहे.

प्रश्न २. वाळ्याची लागवड कुठे केली जाते ?

उत्तर :- वाळ्याची लागवड हि मुख्यत दक्षिण भारतात केली जाते.

प्रश्न ३. वाळ्याची लागवड कशा जामिनीत केली जाते ?

उत्तर :- वाळ्याची लागवडहि भरपूर पाणी असलेल्या जमिनीत म्हणजे नदीच्या काठी केली जाते.

Leave a comment