“Jain Paneer Butter Masala: कांदा-लसूण न घालता रेस्टॉरंटचा स्वाद!”

Jain Paneer Butter Masala-जैन पनीर बटर मसाला हा भातीयांचा अत्यंत आवडीचा पदार्थ आहे. Jain Paneer Butter Masala-जैन पनीर बटर मसाला हा आवडीचा पदार्थ असण्यामागचे कारण म्हणजे हा पदार्थ कांदा, लसून न वापरता याची चविष्ट ग्रेवी आपण काजू , टोमाटो वापरून बनवु शकतो. जैन धर्मात कांदा, लसून खाणे टाळता त्या साठी जैन पनीर बटर मसाला एक छान पर्याय आहे.

Jain Paneer Butter Masala
Read More : Chicken Tikka.

थोडे Jain Paneer Butter Masala-जैन पनीर बटर मसाला विषयी.

आपल्या देशात कांदा आणि लसूण वापरल्याशिवाय स्वयंपाक पूर्ण होत नाही. कांदा, लसूण आहे चव देणारे व आरोग्य वाढवणारे घटक आहेत. पण तरीही श्रावण नवरात्र अशा काही दिवसात तसेच काही धार्मिक विधींमध्येही कांदा खाल्ला जात नाही, असे म्हटले जाते की कांदा हा माणसाला जास्त उत्तेजित करणारा घटक असल्यामुळे धार्मिक विधीत कांदा व लसूण खाल्ला जात नाही. बरेच जण कांदा व लसूण खात नाही अशावेळी कांदा लसूण शिवाय कुठल्या भाज्या करायचा असा प्रश्न पडतो. परंतु कांदा लसूण शिवाय सुद्धा खूप छान भाज्या होऊ शकतात. यालाच सात्विक आहार असेही म्हटले जाते. आज आपण पाहणार आहोत कांदा, लसूण शिवाय Jain Paneer Butter Masala-जैन पनीर बटर मसाला.
Jain Paneer Butter Masala-जैन पनीर बटर मसाला ही रेसिपी पूर्णपणे बटर मध्ये केली जाते. त्यासाठी तुम्ही बाजारात मिळणारे बटर किंवा घरचे ताजे लोणीही वापरू शकतात.

साहित्य.

  •  दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या.
  • दीडशे ग्रॅम पनीर.
  • एक तेजपान.
  • छोटा पाव चमचा हळद.
  • दोन-तीन मोठे चमचे तूप.
  • आठ ते दहा काजू.
  • दोन टोमॅटो.
  • चवीनुसार मीठ.
  • आवडीप्रमाणे लाल तिखट.
  • दोन चमचे गरम मसाला.
  • थोडी कसुरी मेथी.
  • गरजेनुसार कोथिंबीर.
  • थोडी साखर.

कृती.

  • Jain Paneer Butter Masala-जैन पनीर बटर मसाला करतांना प्रथम पनीर धुवून त्याचे चौकोनी तुकडे करून घ्यावे.
  • टोमॅटोच्या चिरून घ्यावा टोमॅटोच्या मोठ्या फोडी ठेवाव्या.
  • आता एका कढईत तूप किंवा बटर घेऊन त्यात मी कोरड्या लाल मिरच्या व काजू थोडे परतून घ्यावे नंतर त्यात टोमॅटोच्या फोडी घालून परतून घ्यावे दोन ते तीन मिनिटे परतल्यानंतर झाकण ठेवून टोमॅटो होई पर्यंत शिजवून घ्यावे.
  • टोमॅटो झाला की अगदी थोडेसे पाणी घालून छान हलवून घ्या व मिक्सरच्या भांड्यात एकदम बारीक पेस्ट करून घ्यावी.
  • फिरवलेल्या मसाल्याची पेस्ट अगदी बारीक असावी म्हणजे भाजीच्या ग्रेव्हीला छान चव येते व तिचा दाटसरपणा छान होतो.
  • आता त्याच कढईत थोडे बटर टाकून तेजपान घालावे व तयार केलेली ग्रेव्ही म्हणजेच फिरवलेली मसाल्याची पेस्ट घाला व तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
  • आता मसाला छान परतून झाल्यावर त्यात लाल तिखट गरम मसाला मीठ व साखर घालून परत परतून यात आता मसाल्याला तेल सुटेपर्यंत परता मसाला परतताना मंद आचेवरच परतावा.
  • मसाला छान मिक्स करून घ्या. आता त्यात पनीरचे तुकडे घाला व थोडे पाणी घालून मिक्स करा या ग्रेव्हीमध्ये जास्त पाणी घालू नये छान दाटसरच ग्रेव्ही ठेवावी.
  • आता ग्रेव्ही पाच मिनिटा पर्यंत छान उकळून घ्या. कसुरी मेथी हातावर चुरून घाला व कोथिंबीर बारीक चिरून घालावी. वरून थोडे बटर किंवा क्रीम घालू शकतो.
  • भाजीला उकळी आली की गॅस बंद करा व ही भाजी पोळी चपाती पराठा नान सोबत खाऊ शकतो.

टीप.

  • परतून तयार केलेला टोमॅटो काजू मिरच्यांचा मसाला हा एकदम बारीक फिरवावा किंवा फिरवून झाल्यानंतर चाळणीने चाळून घ्यावा म्हणजे त्यातील जाड राहिलेले घटक निघून जातील व भाजीची ग्रेव्ही छान दाटसर व मलाईदार होईल.
  • तसेच मसाला फिरवताना फार पाणी घालून फिरवू नये पातळ होण्याची शक्यता असते नंतर खूप वेळ मसाला परतावा लागतो व त्यामुळे त्याच्या चवीतही बदल पडू शकतो.
  • पनीर बटर मसाल्यासाठी टोमॅटो पूर्ण पिकलेले लाल असावे ग्रेव्हीला रंग छान येतो.
  • आवडत असल्यास पनीर तुपावर परतून नाही भाजीत घालू शकतो.
  • ग्रेव्ही पातळ वाटत असेल तर थोडे काजू किंवा थोडी खसखस भिजवून त्याची पेस्ट करून घालू शकतो.
  • ह्या ग्रेव्हीमध्ये थोडी साखर अवश्य घालावी टोमॅटोचा आंबटपणा निघून जाण्यास मदत होते व ग्रेव्हीला छान चव येते.
  • Jain Paneer Butter Masala-जैन पनीर बटर मसाला यामध्ये करताना त्याची ग्रेव्ही फार पातळ नसते.ग्रेव्ही ही घट्टच असावी तशीच छान लागते.
  • गरज वाटल्यास टोमॅटोचे प्रमाण वाढवून ग्रेव्हीला दाटसरपणा आणता येतो.
  • कसुरी मेथी नसल्यास ओल्या मेथीचे पाने बारीक करून घालू शकतात.
  • चिमूटभर हळद घालावी हळदीमुळे रंग छान येण्यास मदत होते.आपल्याला हळद नको असेल तर आपण ते टाळू शकतो.

Leave a comment