ह्या पद्धतीने करा Appe-आप्पे होतील अतिशय हलके, मऊ व लुसलुशीत

Appe-आप्पे हे नाव ऐकले तरी लक्षात येते कि हा दक्षिण भारतातला पदार्थ आहे. दक्षिण भारतातले वातावरण उष्ण असते .आणि उष्ण वातावरण म्हणजे त्याचा परिणाम पचनावर होतो म्हणजे उष्ण वातावरणात पचन मंदावते. तसेच दक्षी भारतालाही मोठा समुद्रकिनारा लाभला आहे समुद्र किनार्यावर दमत वातावरण असते व त्या वातावरणासाठी पचनाच्या समस्या असतात. कदाचित म्हणूनच दक्षिण भारतात थंड व पचनासाठी हलके पदार्थ खाल्ले जातात.

Appe Recipe - आप्पे रेसिपी
Read More : Pizza Recipe.

थोडे आप्पे रेसिपी विषयी.

Aape-आप्पे म्हणजे दक्षिण भारतातला शाकाहारी पदार्थआहे. Aape-आप्पे करताना मुख्य घटक तांदूळ असतो. आप्पे हे अनेक प्रकारे केले जातात.आप्पे वरून कुरकुरीत व आतून मऊ लुसलुशीत असतात. आप्पे वेगवेगळ्या प्रकारात केले जातात जसे रवा आप्पे,तांदूळ आणि उडदाची डाळीचे आप्पे किंवा मिश्र डाळीचे Aape-आप्पे. मिश्र डाळीचे Aape-आप्पे करताना त्यात तांदूळ उडीद डाळ हरभरा डाळव मुगडाळ घातल्या जातात.आप्पे हा दक्षिण भारतातला एक प्रसिद्ध पदार्थ आहे Aape-आप्पे हे दक्षिण भारतात नाश्त्यासाठी बनवले जातात.दक्षिण भारतात आप्पे सांभार किंवा चटणी सोबत खाल्ले जातात. किंवा चहा सोबत ही खाल्ले जातात.आप्पे, इडली सांबर ,मेदूवडे असे तांदूळ आणि डाळ पासून बनवलेले अनेक पदार्थ जास्त खाल्ले जातात .जे पौष्टिक आणि पचनास हलके असतात. तांदूळ हा गुणधर्माने थंड आणि पचायला सहज असतो .तसेच डाळी ह्या पौष्टिक आणि प्रथिनांनी भरपूर असतात. व भरपूर फायबर्स युक्त असतात अशी अनेक पोषक तत्वे डाळी मध्ये असतात. आरोग्यासाठी प्रथिने खूपच महत्वाची कार्य करतात .म्हणूनच दक्षिण भारतात दाळी जास्त प्रमाणात वापरल्या जातात तसे पाहता Appe Recipe-आप्पे रेसिपी वेगवेगळ्या प्रकारात केले जातात .जसे पोह्याचे आप्पे ‘,रव्याचे आप्पे मिक्स वेज आप्पे , उपवासाचे केले जातात आप्पे खाल्यावर पोट खूप वेळ भरल्यासारखे सारखे वाटते .आणि शरीराला पोषक तत्वेही मिळतात आज आपण मिश्र डाळीचे आपे पाहणार आहोत.

How To Make Appe-आप्पे कसे बनवतात.

Appe-आप्पे रेसिपीमध्ये मुख्य घटक तांदूळ असतो एक ठराविक प्रमाणात तांदूळ व डाळी घेतल्या जातात. तांदूळ व डाळी सात ते आठ तास भिजवतात. सात आठ तासानंतर तांदूळ डाळी पाण्यातून काढून घेतात व निथळून घेतात. पाणी निथळल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घेतात. हे मिश्रण एका भांड्यात एकत्र करून रात्रभर आंबवण्यासाठी ठेवले जाते.रात्रभर आंबवल्यावर सकाळी आप्पे मिश्रण एकदम फुलून येते.म्हणजेच मिश्रण एकदम हलके होते. मिश्रणात मीठ घालून Appe-आप्पे बनवले जातात.त्या नंतर आप्पे पात्र घेऊन ते गॅसवर गरम करायला ठेवले जाते. Appe-आप्पे पात्र गरम झाले की त्याच्या प्रत्येक वाटी ला तेल लावून घ्यावे.म्हणजेच मिश्रण खाली चिकटणार नाही.नंतर त्या वाट्यांमध्ये मिश्रण हळूहळू टाकून ते झाकण ठेवून वाफवले जाते.एका बाजूने वाफवल्या वर चमच्याच्या साह्याने आप्पे उलटे करून दुसऱ्या बाजूने वापरले जातात. आप्पे छान सोनेरी रंगावर वाफवले जातात.आप्पे गोड आंबट चटणी, हिरवी चटणी किंवा सांबार  सोबत खाल्ले जातात.काही ठिकाणी आप्पे चहा सोबतही खाल्ले जातात.काही ठिकाणी तांदूळ आणि उडीद डाळीचे आप्पे केले जातात.मिश्र डाळीचे आप्पे चवीला खूप छान लागतात.काही ठिकाणी या मिश्रणाचे मसाला आप्पे केले जातात. म्हणजेच आप्प्याच्या मिश्रणात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण घालून Appe-आप्पे तयार केले जातात.तसेच या मिश्रणात आपल्या आवडीच्या भाज्या घालून केली जातात. म्हणजे फ्लॉवर, बटाटा, मटार, गाजर, मोड आलेले मूग आप्पे मिश्रणात घातले जातात. तसेच काही वेळा अचानक आप्पे करायचे ठरले तर अशा वेळेस रवा Appe-आप्पे पण केले जातात. यात रवा दह्यात एक तास भिजत घालून ठेवावा. एक तासानंतर रवा छान फुलून येतो व मिश्रण हलके होते त्या मिश्रणाचे आप्पे केले जातात काही ठिकाणी Appe-आप्पे करून त्याला तडका देऊन खाल्ले जातात.म्हणजेच आप्पे तयार झाल्यावर एका कढईत तेल घालून जिरे, मोहरी, चिमूटभर, हिंग, लाल मिरची, कढीपत्ता घालून फोडणी देतात.त्या फोडणीत एक मिनिटभर आप्पे परतवून घेतात व खायला देतात. आप्पे नारळाच्या चटणी सोबत खाल्ले जातात. Appe-आप्पे मध्ये जर भाज्या टाकायच्या असतील तर मिश्रण थोडे घट्ट ठेवा. काही वेळा भाज्यांना पाणी सुटते व मिश्रण पातळ होते.

प्रकार १ :- मिश्र डाळीच्या पीठाचे Appe-आप्पे.

साहित्य.

  • तांदूळ :- तीन वाट्या उकडीचा तांदूळ नसेल तर कुठलाही तांदूळ घ्यावा.
  • उडीददाल :- एक वाटी.
  • मुग दाल :- अर्धी वाटी.
  • मेथी दाने :- एक चमचा.
  • पोहे :- एक सपाट वाटी.
  • मीठ गर्जे प्रमाणे.

आप्पे रेसिपी साहित्य

कृती.

  • सकाळी सर्व डाळी व तांदूळ स्वच्छ धुवून वेगवेगळे भिजत घाला.तांदळात चमचाभर मेथीदाणे टाका किवा कुठल्याही डाळीत टाकले तरी चालतील.
  • रात्री सगळे पदार्थ मिक्सरमधून बारीक वाटून सर्व पदार्थ एकत्र करून घ्या .पोहे वेगळे बारीक वाटून घ्या व ते ही एकत्र करून घ्या.
  • मिश्रण थोडे पाणी घालुन सरसरीत करून घ्या इडलीच्या पीठ प्रमाणे व रात्रभर झाकून ठेवा.
आप्पे मिश्रण
  • दुसर्या दिवशी सकाळी पीठ छान फुगून वर आलेले असेल एकदा सर्व पीठ छान ढवळून घ्या. त्यात मीठ घालुन परत एकदा मिश्रण ढवळून घ्या.
फुललेले आप्पे मिश्रण.
  • आता आप्पेपात्र घेऊन गॅसवर ठेवा हल्ली नॉनस्टिक चे पण आप्पेपात्र मिळतात बीडाचे असेलतर तेल जरा जास्त लागते.
  • आप्पेपात्राला सगळी कडून छान तेल लाऊन घ्या.पात्र तापल्यावर त्याच्या वाट्या मध्ये पळीच्या साह्याने मिश्रण घाला.
  •  मध्यम आचेवर ठेऊन झाकण ठेवा.५ ते ७ मिनिटानंतर आप्पे एका चमच्याच्या सह्याने सर्व आप्पे उलटून घ्या.दुसऱ्या बाजूने पण सर्व आप्पे छान तांबूस रंगावर भाजून घ्या.
Appe Recipe-आप्पे रेसिपी
  •  चटणी सोबत गरम गरम आप्पे खायला द्या.
Aape-आप्पे

टिप्स.

  • डाळ तांदूळ भिजत घालण्या आधी स्वच्छ धुवून घ्यावे.डाळ तांदूळ भिजवलेले पाणी मिश्रण पातळ करण्यासाठी वापरावे.
  • मिश्रण पातळ झाल्यास उडदाच्या डाळीचा रवा घालू शकतात.उडदाची डाळ कोरडीच मिक्सर मधून फिरवून घ्या व रव्याच्या चाळणीने चाळून घ्या जो रवा मिळेल तो वापर.
  • मिक्सरच्या भांड्यातून मिश्रण काढल्यानंतर दोन ते तीन मिनिटे चांगले फेटून घ्यावे  त्यामुळे मिश्रण खूप हलके होते व कमी वेळेत छान फुलून येते.
  • रवा घातल्या नंतर पीठ थोडा वेळ फेटून घ्यावे .व अर्धा तास झाकून ठेवा.

प्रकार २ :- Instant Rava Appe – रवा आप्पे.

रवा आप्पे आपल्या घरात वापरला जाणारा रवा व कांदा टोमॅटो गाजर किंवा आपल्या आवडीच्या भाज्या घालून केला जाणारा पदार्थ म्हणजे रवा आप्पे. रवा आप्पे वरून कुरकुरीत सुंदर सोनेरी रंग रंगाचे व आतून मऊ लुसलुशीत पदार्थ असतो. जो दक्षिण भारतातच नाही तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात नाश्त्यासाठी खाल्ला जातो. रवा आप्पे करायला अतिशय सोपा आहे रवा आप्पे बनवताना रवा दह्यात थोडा वेळ भिजत घालून त्यात मिश्रण तयार केले जाते. त्या मिश्रणात आपल्या आवडीच्या भाज्या घालून आप्पे पात्रात आप्पे बनवले जातात. रवा आप्पे कशा सोबत खाल्ले जातात. आप्पे वरून नारळाची चटणी,पुदिन्याची चटणी किंवा चहा असे यांच्यासोबत खाल्ले जातात.

रवा आप्पे कसे बनवतात.

रवा आप्पे बनवताना एका भांड्यात दही घेऊन छान फेटून घ्या. त्या फेटलेल्या दह्यात थोडे पाणी घालून घ्या. दह्यामुळे आप्प्याना थोडा आंबटपणा येईल व मिश्रण फुलून थोडे हलके होईल. रवा आप्पे भाज्या घालून करायचे असतील तर त्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, सिमला मिरची, गाजर यापैकी कुठल्याही भाज्यांच्या उपलब्ध आहेत त्या भाज्या बारीक चिरून त्या मिश्रणात मिक्स करून घ्या.काही वेळेस कांदा, टोमॅटो मुळे मिश्रण पातळ होते.म्हणून पाणी बेताने घालावे.रवा आप्प्यांमध्ये भाज्या घातल्यामुळे आप्पे चवदार लागतात. व रवा आप्पेचा पौष्टिक पनाही वाढते. या मिश्रणाला मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची घालून फोडणी देऊ शकतात. छान चव येते किंवा आप्पे तयार झाल्यानंतर एका कढईत हिरवी मिरची, कढीपत्ता जिरे याची फोडणी देऊन आप्पे एक मिनिटासाठी परतून घ्यावे. तसेही खूप छान लागतात. रवा आप्पे बनवतात ना फार वेळ जात नाही कारण रवा, दही व भाज्या तशा तयारच असतात त्यामुळे फार वेगळे तयारी करावी लागत नाही व आप्पे लगेच बनवता येतात. रवा आप्पे गरम गरम खाल्ले जातात.

साहित्य.

  • रवा :- एक वाटी.
  • दही :- एक वाटी.
  • हिरव्या मिरच्या :- तीन ते चार.
  • कांदा :- एक बारीक कापलेला.
  • सिमला मिरची :- एक कापलेली.
  • गाजर :- एक कापलेले किंवा किसलेले.
  • मीठ :- चवीनुसार.
  • तेल :- गरजेनुसार.
  • मोहरी :- छोटा चमचाभर.
  • जिरे :- छोटा चमचा.
  • कडीपता :- दहा ते बारा पाने.

कृती.

  • प्रथम एका भांड्यात दही थोडे पाणी घालून फेटून घ्या व त्या फेटलेल्या दह्यात रवा मिक्स करून घ्या.
  • रव्याच्या गाठी होणार नाही याची काळजी घ्या. पाणि गरजेनुसारच घालावे. मिश्रण फार पातळ करू नका.
  • कांदा सिमला मिरची ,कोथिंबीर सगळे पदार्थ बारीक चिरून घ्या व मिश्रणात मिक्स करून घ्या.
  • आता आपल्याकडे असलेले आप्पे पात्र घेऊन ते गॅसवर गरम करायला ठेवा.
  • आप्पे पात्राला सगळीकडे ब्रशच्या साह्याने तेल लावून घ्या. म्हणजे मिश्रण चिकटणार नाही.
  • आप्पे पात्राच्या प्रत्येक वाटीत चमच्या च्या साह्याने मिश्रण टाका.
  • थोड्यावेळाने मिश्रणाच्या सर्व बाजूंनी थोडे तेल टाका व झाकण ठेवून आप्पे वाफवून घ्या व आप्पे वरून पूर्ण कोरडे झाले की एका बारीक चमचा किंवा काट्याच्या साह्याने उलटवून घ्या.
  • दुसऱ्या बाजूने पण छान सोनेरी रंगावर भाजून घ्या.आप्पे गरम गरम चटणी किंवा सांबार सोबत खायला द्या.

टिप्स.

  • रवा आप्पे करताना दही व रव्याच्या मिश्रणाला जिरे मोहरी कढीपत्ता घालून फोडणी देऊन मग आप्पे करता येतात.
  • आप्पे करताना कांदा किंवा भाज्या थोड्या तेलावर वाफवून घेतल्या तर उत्तम. कांदा जास्तीचे पाणी सोडत नाही व मिश्रण पातळ होत नाही . च व ही छान लागते.
  • सर्व भाज्या तेलावर परतून घेवु शकतो किंवा आप्पे करताना सुरुवातीला जिरे मोहरी कढीपत्ता घालून तेलात रवा थोडा परतून घेतला तरी चालतो त्याचीही चव खूप छान लागते. आप्पे कुरकुरीत होतात.
  • आप्पे करताना जर फोडणी आवडत नसेल तर आप्पे झाल्यावर एका कढईत फोडणी देऊन थोडा वेळ परतून घ्यावे. आप्पे छान लागतात .
  • आप्पे करताना आप्पेपात्र पूर्ण मोठ्या आचेवर गरम करून घ्यावे. नंतर मध्यम आचेवर आप्पे करावे थंड आप्पेपात्रात मिश्रण टाकले तर आप्पे चिकटण्याची शक्यता असते.

चटणी.

  • जीरे :- एक चमचा.
  • उडीद डाळ :- एक चमचालसून चार ,पाच पाकळ्या.
  • आले :- अर्धा इंच तुकडा.
  • कढीपत्ता :- चार, पाच पाने.
  • शेगदाणे :- पाव वाटी.
  • सुक्या खोबऱ्याचे कप :- पाव वाटी.
  • हिरव्या मिरच्या :- पाच , सहा आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकतात.
  • पुदिना :- ८ -१० पाने.
  • फोडणी साठी तेल व मोहरी.
  • मीठ गरजेनुसार.

कृती.

  • मध्यम आचेवर एक प्यान ठेऊन त्यात थोडे तेल घाला.नंतर जीरे घाला नंतर त्यात उडदाची डाळ घाला. नंतर लसून पाकळ्या ,नंतर आल्याचा तुकडा व कढीपत्त्याची पाने घाला.
  • हे सगळा मंद आचेवर परतत रहा.नंतर पाव वाटी शेगदाणे व पाव वाटी खोबऱ्याचे पातळ काप घाला.त्यातच ५ -६ हिरव्या मिरच्या पुदिन्याची पाने घाला.हे सर्व साहित्य २ -३ मिनिटे परतून घ्या.
  • कुठलाही पदार्थ करपणार नाही याची काळजी घ्या. ग्यास बंद करायच्या आधी थोडी कोथिंबीर घाला.व काही सेकंद परतून ग्यास बंद करा.
  • सर्व साहित्य थंड होऊ द्या.सर्व पदार्थ गार झाल्यावर मिक्सर मधून एकदम बारीक वाटून घ्या आवडी प्रमाणे पाणी घालुन घ्या.
  • थोडी पातळच छान लागते फोडणीसाठी एका छोट्या कढईत एक पळी तेल घेऊन ग्यासवर ठेवा तेल तापल्यावर त्यात थोडी मोहरी घाला,मोहरी छान तडतडू द्या.नंतर त्या चिमुटभर हिग घाला ,व गरमच ती फोडणी चटणी वर घाला व छान मिक्स करून घ्या.या चटकदार चटणी सोबत आप्पे खायला द्या.
चटणी

FAQs.

प्रश्न १ :- आप्पे हा पदार्थ कुठल्या राज्यात प्रसिद्ध आहे ?

उत्तर :- आप्पे हा दक्षिण भारतातील प्रसिद्ध पदार्थ आहे. दक्षिण भारतात वेगवेगळ्या  प्रकारचे आप्पे केले जातात त्यात मिश्र डाळींचे आप्पे हा लोकप्रिय पदार्थ आहे.

प्रश्न २ :- आप्पे हे कशा सोबत खाल्ले जातात ?

उत्तर :- दक्षिण भारतात आप्पे हे चहा सोबत किंवा नाश्त्यासाठी खाले जातात. परंतु महाराष्ट्रात आप्पे हे जेवनातही खाल्ले जातात किंवा नाश्त्यालाही खाल्ले जातात.

प्रश्न ३ :- आप्पे हे इडलीच्या तयार पिठापासून करता येतात का ?

उत्तर :- बऱ्याच वेळा इडली केल्यानंतर इडलीचे पीठ उरते अशा वेळेस उरलेल्या पिठापासून आप्पे केले जातात हे आप्पे चवीलाही छान लागतात.

Leave a comment