“उपासाची खास Bhagar-भगर: हलकी, पौष्टिक आणि सोपी रेसिपी”

BHAGAR-भगर म्हणजे वरईचा तांदूळ असेही त्याचे एक नाव आहे.भगर पासून उपवासाचे अनेक पदार्थ बनवले जातात.भगर मध्ये BHAGAR-भगर खिचडी मध्ये शेंगदाणे मिरच्या आले हे उपवासाला खाल्ले जाणारे पदार्थ घालून चविष्ट बनवले जातात.

BHAGAR RECIPE
Read More : Kanda Bhaji

थोडे BHAGAR-भगर विषयी.

महाराष्ट्रात उपवासाला खाल्ले  जाणारे एक तृणधान्य म्हणजे BHAGAR-भगर.या धान्याला वरीचे तांदूळ किंवा वरीचे तांदूळ असे म्हटले जाते.हे एक पूर्ण धान्य आहे भगर या धान्याचे उत्पादन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा व खान्देशातील नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागात याची पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.भगर हे एक बारीक आकाराचा छोटा दाणा आहे.खसखशीपेक्षा थोडे मोठे असे एक बीज आहे. खजूर भरपूर कॅलरीज असतात. असे तज्ञांचे मत आहे भगर पासून फोडणीची भगर खिचडी साधा भाताप्रमाणे साधा भात भगरीचे धिरडे भगरीची भाकर असे पदार्थ पूर्वीपासून केले जातात.परंतु आपले आहार शास्त्र नेहमीच नेहमीच नवनवीन प्रयोग करत असते.त्याप्रमाणे BHAGAR-भगर भगरीचे बरेच नवीन पदार्थ पदार्थांचे प्रयोग केले गेले व खूप लोकप्रिय झाले. भगरीपासून इडली डोसा ढोकळा यांसारखे प्रयोग केले गेले व आवडीने खाऊ खाल्ले जाऊ लागले.तसे पाहता BHAGAR-भगर भगरीला कनिष्ठ प्रकारातील धान्य म्हणून गणले जाते.पण BHAGAR-भगर मध्ये प्रथिन व फायबरचे प्रमाण भरपूर असते म्हणून ते आरोग्याला पोषक मानले जाते.BHAGAR-भगर ही फक्त उपवासातच खाल्ले जाते.पण भगरीतले पोषक घटकांचा विचार केला तर भगर इतर दिवशी खाल्ली जायला काही हरकत नाही.BHAGAR-भगर साध्या भातासारखी चव असते.त्यात वेगवेगळे घटक पदार्थ घालून चव आणले जाते. असे म्हटले जाते की BHAGAR-भगर हे शेतात आपोआप येणाऱ्या गवताची बी आहे.परंतु अतिशय पोषक तत्वे असणारे बी आहे हे आपल्या वापरात नेहमी असणे आरोग्यदायी ठरू शकते.
भगरीतील फायबर हे पचनासाठी उपयुक्त असतात.BHAGAR-भगर खाल्ल्याने पोट साफ राहण्यास मदत होत असते.BHAGAR-भगर खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. म्हणूनच तज्ञांच्या मते मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी भाताऐवजी BHAGAR-भगर आहारात नेहमी ठेवावी.तसेच भगरी मुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.BHAGAR-भगर हे ग्लूटेन फ्री धान्य आहे.पचायला जड असते.बऱ्याच व्यक्तींना पचनाच्या समस्या असतात अशा समस्यांना ग्लूटेन फ्री असलेले धान्य खाण्याचा सल्ला दिला जातो.तसेच काही व्यक्तींना ग्लूटेन ची ऍलर्जी असते. अशावेळी बाजरी व ज्वारी खाण्याचा सल्ला दिला जातो. अशा समस्यांमध्ये BHAGAR-भगर खाल्ली तर फार फायदेशीर ठरू शकते. भगरीत आयर्न व खनिज भरपूर असतात.त्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.भगर आपल्या आहारात फायदेशीर ठरू शकते.म्हणूनच उपवासात BHAGAR-भगर खाण्याची परंपरा जपली गेली असेल.चला बघूया भगरीपासून कोणकोणते पदार्थ करता येतात.आषाढी एकादशी दोन दिवसांवर आली आहे.म्हणजेच चातुर्मास सुरू होत आहे.चातुर्मास म्हणजे पूजा, अर्चना, उपवास, व्रतहे आलेच. प्रत्येक घरात एक व्यक्ती तरी उपवास करत असते. आता एकादशी पुढे एकादशीनंतर पुढे श्रावण महिना असतोच.या वर्षी तर अधिक मास ही आहे.अधिक महिना म्हणजे साक्षात महाविष्णूंचा महिना असे म्हटले जाते.या महिन्यात महिनाभर महाविष्णूंची पूजा केली जाते.अनेक जणांचा महिनाभर उपवास असतात.त्यानंतर लगेचच श्रावण महिना येतो.म्हणजे श्रावण महिन्यातले सोमवार, शनिवार,जन्माष्टमी असे उपवास येतातच. लगेचच महिलांचे हरतालिका व देवीचे नवरात्र असे उपवासाचे दिवस चालू झाले आहेत.अशा वेळी रोज रोज उपवासात काय फराळ करायचा हा प्रश्न असतो. रोज एकच प्रकारचा फराळ करून कंटाळा येतो. अशावेळी भगरीचे वेगवेगळे पदार्थ आपल्याला नक्की उपयोगी येतील.

BHAGAR-भगर ही दोन प्रकारे केली जाते.

BHAGAR-भगर खिचडी

अगदी दहा मिनिटात तयार होणारी फराळाची डिश आहे.म्हणजे BHAGAR-भगर खिचडी खानदेशात एकादशीला खाल्ली जाते.

साहित्य.

  • BHAGAR-भगर दीड वाटी .
  • एक वाटी शेंगदाण्याची जाडसर केलेली पूड अर्धी वाटी.
  • मीरच्या तीन ते चार.
  • जिरे अर्धा चमचा.
  • सैंधव मीठ चवीप्रमाणे.
  • बटाटा एक.
  • कोथिंबीर थोडीशी.

BHAGAR RECIPE

कृती.

  • BHAGAR-भगर करतांना प्रथम एका कढईत BHAGAR-भगर मंद आचेवर भाजून घ्यावे व गार झाल्यावर धुवून घ्यावी.धुताना फार चोळु नये.अगदी एका पाण्यानेच धुवावे भाजलेली भगर BHGAR पचनाला सोपी होते.
  • नंतर एका कढईत शेंगदाणे भाजून घ्यावे व साले काढून जाडसर पूड करून घ्यावी.
  • बटाटा कापून त्याचे पातळ काप करून घ्यावी. पातळ काप पटकन शिजतात.
  • आता एका कढईत फोडणीसाठी तूप घेऊन कढई गॅसवर ठेवा. तूप तापले की त्यात जिरे घालावे.
  • जिरे तडतडले की मिरच्या घालाव्या.
  • नंतर बटाट्याची पातळ काप घालावे व थोडे मीठ घालून परतून घ्यावे.मीठ घालून परतलेले काप भगर BHGAR खिचडी खाताना अळणी लागत नाही.

BHAGAR RECIPE

  • बटाटे परतून झाल्यावर दीड वाटी पाणी घालावे व सैंधव मीठ घालावे.
  • पाण्यात शेंगदाण्याची जाडसर पूड घालावी पाणी उकळले की भाजलेलीभगर BHGAR घालावी.
  • BHAGAR-भगर थोडावेळ हलवत राहावे.म्हणजे खाली लागणार नाही. दोन-तीन मिनिटांनी झाकण ठेवून मंद आचेवर वाफवून घेईल. अधून मधून BHAGAR-भगर ची खिचडी चाळत राहील म्हणजे सगळीकडून सारखी शिजेल व खाली लागणार नाही.

BHAGAR RECIPE

  • वरून कोथिंबीर घालावी व गरम गरम BHAGAR-भगर खिचडी खायला द्यावी.

BHAGAR RECIPE

टीप्स.

  • भगर करताना फोडणीत सर्व साहित्य टाकल्यावर भगर टाकून परतून घेऊ शकतात.फक्त पाणी घालताना वरून गरम पाणी घालावे.
  • काही ठिकाणी उपवासाला काकडी,टोमॅटो,गाजर खाल्ले जाते. जर आपण खात असाल तर हे काकडे.टोमॅटो गाजर बारीक चिरून फोडणीत परतून घ्यावे.
  • भगर खिचडी खाताना तूप घालून खाल्ली जाते.म्हणजे तिचा त्रास होत नाही.
  • भगर करताना पाण्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते म्हणून अंदाजानुसार पाणी घालावे.

भगर-2.

या प्रकारात भगर ही भातासारखी फक्त मीठ घालून शिजवली जाते व शेंगदाण्याची आमटी सोबत खाल्ली जाते.

साहित्य.

  • BHAGAR-भगर एक वाटी.
  • सेंधव मीठ चवीप्रमाणे.

कृती.

  • प्रथम BHAGAR-भगर भाजून घ्यावी व गार झाली ती धुऊन घ्यावी.BHAGAR-भगर धुताना फार चोळून धुऊ नये.
  • नंतर एका कढईत दीड ते दोन वाट्या पाणी घालावे. पाण्यात मीठ घालून घ्यावे.
  • पाण्याला उकळी आली त्यात पाण्यात धुतलेली BHAGAR-भगर घालून साध्या भाताप्रमाणे शिजवून घ्यावे.
  • शिजवताना पाण्याची पुरेसे घालावे व अधून मधून चालत राहावे.

BHAGAR RECIPE

  •  भगरीचा भात शिजला की गॅस बंद करावा.भगरीच्या भाताला फार वेळ लागत नाही.
  • घाईच्या वेळेस आपण कुकरचा प्रेशर कुकर चा उपयोगकरु शकतो.

BHAGAR RECIPE

भगर आमटी.

BHAGAR RECIPE

साहित्य.

  • शेंगदाण्याची बारीक केलेली पूड अर्धी वाटी.
  • चिंच आवडीप्रमाणे.
  • गुळ गरजेप्रमाणे.
  • मीठ चवीनुसार.
  • लाल तिखट दोन छोटे चमचे.
  • जिरे अर्धा चमचा.

कृती.

  • प्रथम चिंच पाण्यात घालून भिजवून घ्यावी व तिचा कोळ तयार करून घ्या.
  • एका कढईत फोडणीसाठी तेल घालावे.
  • तेल तापले की त्यांची घालावे लाल तिखट घालावे.तिखट तेलात टाकल्यावर जळणार नाही याची काळजी घ्यावी.
  • तेल जास्त तापले असेल तर गॅस बंद करून द्यावा.मग तिखट घालावे.तिखट जळले तर आमटीला चव येणार नाही.
  • तिखट घातल्यानंतर फोडणीत पाणी घालावे व मीठ घालावे. पाणि उकळले की त्यात शेंगदाण्याची बारीक पूड घालावी. चिंचगुळाचे पाणी घालावे व पाच ते सात मिनिटे आमटी उकळू द्यावे.कोथिंबीर घालावी व भगरीच्या भातासोबत गरम गरम वाढावी.
  • ही आंबट गोड आमटी भागरीच्या भाता सोबत खूप छान लागते.

BHAGAR RECIPE

टिप्स.

  • भात शिजवताना त्यात जिरे घालू शकतात.भगर भाजून केलेली भगर मोकळी होते व चव छान लागते.
  • आमटीत चिंच ऐवजी आमसूल वापरले तरी चालेल. आवडीप्रमाणे साहित्य कमी जास्त लागू शकते.
  • शेंगदाणे भाजून झाल्यावर साले न काढताच बारीक केले तरी चालेल.आमटीला छान रंग येतो.
  • हिरव्या मिरच्या घालून आमटी करत असाल तर साले काढून टाकावे.

BHAGAR-भगर चे धिरडे.

भगर चे धिरडे हे खूप चविष्ट होतात.करायलाही अतिशय सोपे आहेत रोज एकच प्रकारचा फराळ करून कंटाळा येतो अशावेळी आपण धिरडे म्हणजे उत्तम पर्याय आहे.

BHAGAR RECIPE

साहित्य.

  • भगर एक वाटी.
  • शेंगदाणे पाऊण वाटी.
  • मिरच्या पाच ते सहा.कोथिंबीर मुठभर .
  • मीठ चवीनुसार.
  • तूप गरजेप्रमाणे.

कृती.

  • प्रथम भगर दोन दीड ते दोन तासासाठी भिजवून ठेवावे नंतर शेंगदाणे भाजून घ्यावे व साले काढून घ्यावी.
  • दोन तासानंतर भागरीतले पाणी निथळून घ्यावे व भगर मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदम बारीक फिरवून घ्यावे.
  • भगर फिरवताना त्यात शेंगदाणे,मिरच्या,कोथिंबीर एकदम बारीक फिरवून घ्यावे.
  • नंतर हे मिश्रण पाच ते दहा मिनिटे झाकून ठेवावे.दहा मिनिटानंतर या मिश्रणात मीठ घालून मिक्स करून घ्यावे.
  • मिश्रण फार घट्ट किंवा फार पातळ करू नये.
  • आता गॅसवर तवा ठेवावा तवा पूर्ण तापल्यावर आच कमी करावी व तव्यावर तूप टाकून पूर्ण तव्याला पसरवून घ्यावे.
  • तवा तापला असेल तर त्यात चमच्याच्या साह्याने मिश्रण तव्यावर टाकावे व डोसा प्रमाणे व्यवस्थित पसरवून घ्यावे.
  • बाजूने थोडे तूप सोडून BHAGAR-भगर धिरडे छान वाफवुन घ्यावे. वरून छान कोरडे होत आले की धिरडे उलटवून घ्यावे व परत तूप टाकून दोन्ही बाजूने तुपावर भाजून घ्यावे.
  • हे धिरडे खूप छान होतात चटणी.उपवासाचे गोड लोणचे यासोबत खाल्ले जातात.BHAGAR-भगर चे धिरडे नुसते खाल्ले तरी सुद्धा खूप छान लागतात.

BHAGAR RECIPE

टिप्स.

  • भगर पूर्ण भिजवलेली असावी तरच बारीक वाटली जाते. हे धिरडे तुपावर करतात पण आपण जर तेल वापरत असाल तर तेलावर करावे.
  • याच मिश्रणात उपवासाची बटाट्याची भाजी करून तिचे वडे तयार करून या मिश्रणात बुडवून तळून घ्यावे हे बटाटेवडे खूप सुंदर होतात. वडे बनवता ना या मिश्रणात चिमूटभर सोडा घालावा.

FAQs.

प्रश्न १ :- भगर म्हणजे काय ?

उत्तर :- भगर म्हणजे एक प्रकारचे तृणधान्य आहे .ज्याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. जसे भगर, वरीचा तांदूळ, वरईचा तांदूळ,असे म्हटले जाते. ही एक पौष्टिक तृणधान्य आहे जे उपवासासाठी खाल्ले जाते.

प्रश्न २ :- भगरीचे पीक कुठल्या भागात घेतले जाते ?

उत्तर :- भगरीला वरचे तांदूळही म्हटले जातात भगर ही उपवासाच्या दिवसात आहारात खाल्ली जाते. भगर ही गोड किंवा तिखट प्रकारात बनवले जाते.भगर हे एक प्लुटेन फ्री धान्य आहे. एक हे धान्य दक्षिण आणि उत्तर भारतात पिकवले जाते.

प्रश्न ३ :-भगर आपल्या नेहमीच्या जेवणात खावी का ?

उत्तर :- भगर हे एक प्रकारचे तृणधान्य आहे. तसेच भगर ही अतिशय पौष्टिक आहे आपल्या नेहमीच्या जेवणात साईड डिश म्हणून भगर अवश्य खावे.भगर मधील भरपूर प्रमाणात फायबर असतात व ते आरोग्यासाठी उत्तम असतात. म्हणून भगर जेवणात अवश्य खावे.

Leave a comment