Chicken Biryani – चिकन बिर्याणी हि आपल्या भारतीय सुगंधित मसाल्यांमध्ये मॅरीनेट केलेले चिकन व शिजवलेला भात यांचे विशिष्ट प्रकारे एकत्र केलेले मिश्रण आहे. बिर्याणी हा शब्द बिर्याण या शब्दावरून घेतला गेलेला आहे. बिर्याण म्हणजे तळणे किंवा भाजणी असा होतो. म्हणजे मसाले तळून किंवा भाजून केलेल्या पदार्थ बिर्याणी तळलेला कांदा किंवा भाजलेला कांदा व मसाले वापरले जातात. म्हणून बिर्याणी हे नाव देण्यात आले असावे असे अभ्यासकांचे मत आहे. सर्वात प्रथम उत्तर भारतात म्हणजेच हैदराबाद, लखनऊ, दिल्ली या राज्यांमध्ये मुघल राज्य करीत असताना बिर्याणीचे प्रयोग केल्याचे म्हटले जात.
थोडे चिकन बिर्याणी विषयी.
Chicken Biryani – चिकन बिर्याणी हा पदार्थ मुसलमान राष्ट्रांकडून आपल्याकडे आलेला आहे. प्रथम हैदराबाद या शहरात केला गेला. Chicken Biryani – चिकन बिर्याणी चिकनचे मांस सुगंधी मसाले वापरून शिजवलेला भात विशिष्ट प्रकारे एकत्र करून तयार केले जाते. चिकन बिर्याणी मसाले वापरून शिजवलेला भात यांचे विशिष्ट प्रकारे एकत्र केलेले मिश्रण आहे. बिर्याणी हा शब्द बिर्याण या शब्दावरून घेतला गेलेला आहे. बिर्याण म्हणजे तळणे किंवा भाजणी असा होतो. म्हणजे मसाले तळून किंवा भाजून केलेल्या पदार्थ. बिर्याणी त तळलेला कांदा किंवा भाजलेला कांदा व मसाले वापरले जातात. म्हणून बिर्याणी हे नाव देण्यात आले असावे.असे अभ्यासकांचे मत आहे सर्वात प्रथम उत्तर भारतात म्हणजेच हैदराबाद लखनऊ, दिल्ली या राज्यांमध्ये मुघल राज्य करीत असताना बिर्याणीचे प्रयोग केल्याचे म्हटले जाते. उत्तर भारतातूनच बिर्याणीचे वेगवेगळे प्रकार बनवले गेले व देशभर पसरले व लोकप्रिय झाले. आज अनेक प्रकारची बिर्याणी केली जाते पण हैदराबादी बिर्याणी किंवा लखनऊ बिर्याणी जास्त मागणी जास्त मागणी केली जाते. Chicken Biryani – चिकन बिर्याणी ला ज्या भागात बनवायला लागले तिथे बिर्याणीचे वेगवेगळे प्रकार शोधण्याचे प्रयत्न करू लागले. काही बिर्याणीचे प्रकारात तांदूळ व भाजी वेगवेगळे शिजवून एकत्र केली जाते. काही प्रकारात चिकनचे मांस हे शिजवले जातात. भात व चिकनचे एकत्र शिजवले जातात. काही प्रकारात चिकन बिर्याणी सोबत कधी दिली जाते. इतिहास काळापासून मांसाहारी बिर्याणी करताना त्या त्या काळातले उत्तम सुगंधी मसाले वापरण्यात आले आहेत. चिकन बिर्याणी ही एक शाही जेवण म्हणून बनवले जाऊ लागले .आजही Chicken Biryani – चिकन बिर्याणी एखाद्या विशिष्ट दिवशी बनवण्यात येते.परराष्ट्रातून आलेली ही डिश आपल्या देशभर सगळ्या हॉटेल्स व रेस्टॉरंट मध्ये मिळते. तसेच घरी सुद्धा बनवली जाते. बिर्याणी मध्ये वापरण्यात येणारे मसाले वेगवेगळ्या असतात.आपल्याकडे खास करून चिकन, मटण, अंडी आणि मगज बी हे प्रकार वापरून बिर्याणी बनवली जाते. काही ठिकाणी ज्या ज्याप्रमाणे प्राण्यांचे मांस खाल्ले जाते अशा प्राण्यांचे मास वापरून बिर्याणी बनवली जाते. ज्या भागात बिर्याणी बनवली गेली त्या त्या भागातले नाव देऊन बिर्याणीला वेगळी नावे मिळाले. जसे हैदराबादी बिर्याणी, लखनवी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, बोहरी बिर्याणी असे वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध मिळाली. बिर्याणी वेगवेगळ्या प्रत्येक भागातले चिकन बिर्याणी हे त्या त्या भागातली खास मसाल्याचे पदार्थ वापरून केलेली जाते.अनेक प्रकारचे सुगंधित मसाले वापरले जातात. जसे बडीशेप, जायफळ, तेजपान, जावित्री, मिरे, लवंगा, वेलदोडा, दालचिनी, धने या सोबत आपले नेहमी वापरले जाणारे मसाले म्हणजे आले लसूण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना असे घटक वापरून बिर्याणीला सुगंधित बनवले जाते. त्याचप्रमाणे उच्च दर्जाचे घटक म्हणजे केशर वापरून त्याची चव व दर्जा वाढवला जातो. या सर्व मसाल्यांसोबत चिकन मटण वापरून ते भातासोबत मिक्स केले जातात. काही ठिकाणी सुकामेवा म्हणजे काजू, किसमिस, बेदाणा,यासारखे घटक वापरून बिर्याणीची लज्जत वाढवली जाते.जसे जसे बिर्याणीलोकप्रिय होत गेली व देशभर तिची सुगंध देशभर पसरू लागला तसे तसे तिच्यावर केले जाणारे प्रयोगही वाढू लागले. म्हणजे दही,लिंबू, टमाटे सारखे पदार्थ घालून बनवली जाऊ लागली.
How to make Chicken Biryani – चिकन बिर्याणी कशी बनवतात.
Chicken Biryani – चिकन बिर्याणी अनेक प्रकारे बनवले जाते. चिकन व भात वेगवेगळे शिजवून त्यांचे थर लावले जातात.काही प्रकारात अर्धवट शिजवून चिकनच्या भाजी सोबत एकत्र केल्या जातो व परत एकाच भांड्यात चिकन सोबत पूर्ण शिजवला जातो. वेगवेगळ्या पद्धतीने चिकन बिर्याणी शिजवतात तसेच प्रत्येक पद्धतीत शिजवण्याचा वेळही वेगवेगळ्या असतो. काही प्रकारा कच्च्या मासाल्यात मीठ, मिरची, दही,गरम मसाले धने जिरे पूड या प्रकारे मसाले लावून एक ते दीड तास तसेच ठेवले जाते. त्यालाच मॅरीनेट करणे असे म्हणतात.एक दीड तासानंतर चिकन तुपावर टाकून वाफवले जाते व नंतर भातासोबत थर दिले जातात.काही प्रकारात कांदा व टोमॅटो घालून भाजी शिजवली जाते व कांदा व टोमॅटोची ग्रेव्ही चिकन बिर्याणी सोबत खायला दिली जाते. बिर्याणी मध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे तळलेला कांदा असतो. चिकन बिर्याणी कुठल्याही प्रकारात केली तरी तळलेला कांदा हा घातला जातो. चिकन बिर्याणी तळलेल्या कांदा मिक्सरमध्ये फिरवून भाजीच्या मसाल्यात घालून भाजी परतली जाते व भातात मिक्स केली जाते. काही प्रकारात अर्धवट शिजवलेली चिकन व अर्धवट शिजवलेला भात हा एका जाड बुडाच्या भांड्यात घालून भांड्यावर झाकण ठेवून झाकणाच्या कडेला कणिक लावून पक्के केले जाते. जेणेकरून आतली वाफ आतच राहील मसाल्याचा सुगंध वाफेवर बिर्याणी शिजवली जाते. बिर्याणी त घातलेल्या मसाल्यामुळे बिर्याणी सुगंधित होते. बिर्याणी शिजत आली की लावलेली कडेची कणिक सुटायला लागते तेव्हा गॅस बंद करून बिर्याणी खायला दिली जाते.
बिर्याणी साठी तांदूळ कोणता वापरावा.
Chicken Biryani – चिकन बिर्याणी साठी जुना तांदूळ वापरला जातो. म्हणजे जुना बासमती तांदूळ वापरला जातो. बासमती तांदळाचे अनेक प्रकार असतात. बिर्याणी साठी बारीक दाणा व मऊ शिजणाऱ्या तांदळाचा जास्त प्रमाणात वापर केला जातो.
मसाले.
बिर्याणी उच्च दर्जाचे मसाले व बिर्याणीला सुगंध देणारे मसाले जसे की लवंग,वेलदोडा, तेजपान, दालचिनी, मिरे, केशर यांसारखे मसाले वापरले जातात.सोबत बिर्याणीत सुक्या मेवालाही विशेष महत्त्व असते. काजू, बदाम, किश मिश, बेदाणे यासारखा सुकामेवा घातला जातो. हा सुकामेवा बिर्याणीची बिर्याणीची चव वाढवतात. हैदराबादी चिकन बिर्याणी मध्ये काजू व बदाम तळून घेतले जातात.
साहित्य.
- अर्धा किलो चिकन.
- अर्धा किलो बासमती तांदूळ जुना.
- खडा मसाला.
- 100 ग्रॅम दही.
- एक लिंबू .
- पाव वाटी कोथिंबीर.
- दोन चमचे धने जिरे पावडर.
- दोन चमचे आले-लसूण पेस्ट.
- दोन ते तीन हिरवे वेलदोडे.
- एक इंच दालचिनीचा तुकडा.
- चार ते पाच लवंगा.
- दोन चमचे बिर्याणी मसाला.
- एक चमचा गरम मसाला.
- चार ते पाच कांदे.
- तूप चार चमचे .
- तेजपान दोन ते तीन पाने.
चिकन मॅरीनेशन.
- प्रथम चिकन चे मास स्वच्छ धुऊन घ्या त्यातले पाणी पूर्णपणे स्वच्छ निघते तोपर्यंत धुवून घ्यावे. धुतल्यानंतर निथळून घ्यावे.
- पाणी निथळल्यावर चिकनचे मांस एका भांड्यात घ्या.त्यावर प्रथम एक लिंबू पिळून घ्यावा.
- नंतर एका भांड्यात दही फेटून घ्यावी त्यात पुदिन्याची पाने बारीक चिरून धने जिरे पावडर आले-लसूण पेस्ट दोन वेलदोडे एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद घालून छान फेटून घ्यावे.
- त्या दह्यात आता धुतलेले चिकन टाकून मिक्स करून ठेवावे. थोडे मीठ घालून मिक्स करून झाकून ठेवा. एक ते दीड तासासाठी झाकून ठेवावे.
कांदा तळणे.
- प्रथम कांदा उभा चिरून घ्यावा. चिरलेला कांदा हाताने चोळून पूर्ण मोकळा करून घ्यावा म्हणजे तळताना कांदा सगळीकडून सारखा तळाला जाईल.
- कांदा मोकळा केल्यावर एका कढईत तेल घालून गॅसवर ठेवा.तेल तापले की आच मंद करावी व मंद आचेवर कांदा सोनेरी रंगावर तळून घ्यावा.
- कांदा कुरकुरीत तळावा. कांदा तळून झाल्यावर एका भांड्यात काढून घ्यावा.
- कांदा जळणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे बिर्याणीची चव बिघडते.
भात शिजवणे.
- Chicken Biryani – चिकन बिर्याणीसाठी भात शिजवताना प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावे. म्हणजे तांदळाचे पाणी स्वच्छ निघेपर्यंत धुवून घ्या.
- एक तास भिजत घालावा भिजत घातलेला तांदूळ मऊ शिजतो. एक तासानंतर तांदूळ पाण्यातून काढून निथळायला ठेवा.
- एका पातेल्यात तांदळाच्या तीन ते चार पट पाणी घाला. पाण्यात दोन वेलदोडे, दालचिनीचा अर्धा इंच तुकडा तीन लवंग व एक चमचा तूप घालावे.
- चवीनुसार मीठ घालावे.पाणी जास्त असल्याकारणाने थोडे मीठ जास्त घालावे लागते. पाण्याला थोडेसे खारट पना येईल इतपत मीठ घालावे.
- पाण्याला उकळीआणावी, पाण्याला उकळी आली की त्यात निथळत ठेवलेला तांदूळ घालावा व झाकण ठेवून तांदूळ 70 ते 75 टक्के पर्यंत शिजवून घ्यावा.
- तीन ते चार मिनिटांनी तांदूळ हाताने दाबून बघावा तांदूळ अर्धवट शिजला असेल तर चाळणीत ओतून घ्यावा, म्हणजे जास्तीचे पाणी काढून घ्यावे. चाळणीतला तांदूळ तसाच निथळत ठेवा.
कृती.
- आता चिकन मॅरीनेट झालेली असेल.
- एका जाड बुडाच्या पॅनमध्ये दोन तीन चमचे तूप टाकावे .तूप टाकल्यावर त्यात कांदा बारीक चिरून घालावा.
- नंतर राहिलेले मसाले म्हणजेच वेलदोडा, लवंग, मिरे, दालचिनी व तेजपान घालावे. चिरलेला कांदा घालावा. थोडा तळलेला कांदा व गरम मसाला व थोडे मीठ घालून परतून घ्यावे.
- दोन मिनिटांनी मॅरीनेट केलेले चिकन हळूहळू पॅनमध्ये टाकावे .थोडा तळलेला कांदा वरून घाला व झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्यावे.चिकन शिजवायला फार वेळ लागत नाही लक्षात असू द्यावे.
- चिकन पॅनमध्ये शिजले की गॅस बंद करावा. आता एका खोल पातेल्यात खाली दोन एक दोन तेजपत्त्याची पाने पसरून घ्यावी.
- खाली थोडे चिकन घालावे व चिकन वर थोडा तळलेला कांदा घालावा व दुसरा थर भाताचा द्यावा भातावर परत तळलेला कांदा घालावा.
- असे होतील तितके दोन किंवा तीन थर द्यावे. थर कमी जास्त लागू शकतात. थर देऊन झाल्यावर पातेल्यात पक्की झाकण ठेवावे व मंद आचेवर वाफवायला ठेवावे.
- पाच मिनिटांनी वरून केशर घातलेले दूध सगळ्या बाजूने टाकावे म्हणजे हैदराबादी चिकन बिर्याणीला केशराचा सुगंध येईल.
- पातेल्यात थर लावल्यानंतर तर गॅसवर एक तवा ठेवून त्यावर पातेले ठेवावे. म्हणजे खाली बिर्याणी लाग ण्याची शक्यता राहत नाही. पाच ते सात मिनिटात बिर्याणी तयार होते. बिर्याणी गरमच वाढावी.
टिप्स.
- Chicken Biryani – चिकन बिर्याणी साठी लांब दाण्याचा व जुना तांदूळ वापरावा. बासमती तांदळात खूप प्रकार असतात काही तांदूळ लांब असतात. पण शिजल्यावरदाणा जाड राहतो.
- Chicken Biryani – चिकन बिर्याणी साठी खडा मसाला हा उत्तम दर्जाचा वापरावा. जुना खडा मसाल्याला वास टिकत नाही. बिर्याणी मध्ये चवी सोबत सुगंधालाही खूप महत्त्व असते.
- चिकन मॅरीनेट करताना जास्त आंबट दही वापरू नये व दही अजिबात आंबट नसेल तरच लिंबू वापरावा. योग्य प्रमाणात आंबट असलेले दही वापरले तर लिंबू घालू नये नाहीतर भाजी जास्त आंबट होणे होते.
- चिकन व भाताचे थोर लावताना पातेल्यात किंवा तुम्ही वापरत असलेल्या भांड्यात खाली थोडे तूप टाकून तीन ते चार तेजपान पसरवून ठेवावी व त्यावर चिकन व भाताचे थर लावावे.
- भातात टाकलेले मसाले खडे मसाले काढून टाकू शकतात.
- कांदा तळताना लवकर तळला जाण्यासाठी कांदा कापल्यावर प्रथम गरम तव्यावर थोडा परतून घ्यावा म्हणजे तेलात टाकल्यावर कांदा पटकन कुरकुरीत होतो.
- कांदा सोनेरी रंगावर तळावा जास्त तळलेला कांदा जळका लागतो.
- कांदा तळताना मंद आचेवर तळावा.
- हैदराबादी बिर्याणी चिकन किंवा मटण वापरू शकतात.
- हैदराबादी चिकन बिर्याणी दही,सॅलड्स, कांदा,टोमॅटो,गाजर काकडी किंवा रस्स्या सोबत वाढली जाते.
- हैदराबादी बिर्याणी काही प्रकारात भात व भाजी वेगवेगळ्या शिजवून एकत्र वाढले जाते व सोबत भाजीचा रस्सा दिला जातो आपल्या आवडीनुसार आपण खाऊ शकतो.
FAQs
प्रश्न १ :- Chicken Biryani – चिकन बिर्याणीसाठी जुना तांदूळ का वापरावा?
उत्तर :-बिर्याणीसाठी जुना बासमती तांदूळ वापरावा. जुना बासमती तांदूळ हा शिजल्यावर चिकट होत नाही नवा तांदूळ शिजल्यावर खूप चिकट होतो म्हणून चिकन बिर्याणी साठी जुना तांदूळ वापरावा.
प्रश्न २ :- चिकन बिर्याणी साठी मसाला कोणता वापरावा ?
उत्तर :- चिकन बिर्याणी साठी खडा मसाला वापरावा. खडा मसाला हा फार जुना वापरू नये मसाला पावडर करताना आपली नेहमीची मसाला पावडरकिंवा बाजारातून तयार मिळणारीमसाला पावडर वापरू शकतात.
प्रश्न ३ :- चिकन बिर्याणी साठी दही आवश्यक आहे का ?
उत्तर :- चिकन बिर्याणी मध्ये दही घातल्यामुळे चिकन बिर्याणीला एक प्रकारचा ओलसरपणा येतो व चवही छान लागते. मसाल्याची चव हि त्यात मिक्स होऊन प्रत्येक दाण्याला मिक्स होते. तरीही दही आवडत नसेल तर दह्या ऐवजी लिंबू अवश्य घालावा लिंबू घातल्याने चव हि छान येते व चिकन बिर्याणी पचण्यासही सोपी होते.