Detox Water-डिटॉक्स वॉटर म्हणजे शरीर शुद्ध करणारा व त्यासाठी वापरण्यात येणारे काही भाज्या फळ हे पाण्यात मिसळून त्यापासून तयार केले जाणारे एक पेय.
Detox Water-डिटॉक्स वॉटर का घ्यावे.
खरे तर आपल्या नेहमीच्याच जीवनशैली ही आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उत्तम आहे. परंतु आता होती असे म्हणावे लागेल कारण प्रत्येकाच्या जीवनशैलीत खूप फरक पडला आहे. घराबाहेर जाऊन नोकरी करणे तसेच अगदी लहानपणापासून मुलांच्या शाळा व अनेक प्रकारचे क्लास यामध्ये लहान मुलांच्याही जीवन शैलीवर परिणाम झालेला आहे. तसेच आज प्रत्येकाला नोकरीनिमित्त बाहेर पडावे लागते. आपल्या वाढलेल्या गरजा व त्या भागवण्यासाठी आर्थिक क्षमता वाढवण्यासाठी चाललेली धावपळ या सगळ्या कारणांमुळे सगळ्यांचीच जीवन जगण्याची पद्धत बदलली आहे. स्वतःकडे तसेच शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ मिळत नाही. त्यात वेळेअभावी बाहेरचे खाणे होते किंवा वेळेअभावी नुसतेच पोट भरणे यासाठी खाल्ले जाणारे पदार्थ, त्यात मैदा भरपूर प्रमाणात वापरले जाणारे तेल तसेच या पदार्थांमध्ये तेलाच दर्जाही बघितला जात नाही व आपण आपल्या पोटात काय टाकतो याकडे सुद्धा कोणाचे लक्ष नसते. अशाच कारणांमुळे शरीरात घाण साचली जाते व ही घाण बाहेर टाकण्यासाठी नंतर डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेऊन औषधोपचारही केली जातात. त्यात लिव्हर, किडनी व हृदया असे अनेक अवयवांवर परिणाम होताना आपण पाहतो.
तसे पाहिले तर शरीरशुद्धीकरणासाठी Detox Water-डिटॉक्स वॉटर सारखे पेय घेऊन फार प्रयत्न करावे लागत नाही. जर आपण आपली जीवनशैली आहार विहार योग्य प्रकारे ठेवला तर सकाळी उठून एक ग्लास गरम पाणी पिणे व फिरायला जाणे प्राणायाम करणे थोड्याफार प्रमाणात योगासने करणे व खाताना जेवताना जरा पौष्टिक ते कडे लक्ष देणे हे अशा सोप्या उपायांनी सुद्धा आपण अगदी ठणठणीत राहू शकतो. पण आता ह्या सगळ्या गोष्टींना गोष्टींसाठी कोणाकडेही वेळ नाही व त्यामुळेच अगदी कमी वेळेत शरीरशुद्धीकरणासाठी Detox Water-डिटॉक्स वॉटर सारखे वेगवेगळे उपाय शोधले जातात. खरे तर आपल्या भारतीय आहारात आपल्या रोजच्या जेवणात सुद्धा आपण जर सॅलड लिंबू फळे असे पदार्थ खाल्ले तर आपोआपच आपलं डिटॉक्सिफिकेशन होत राहते पण आता या सगळ्याच गोष्टी मागे पडल्या आहेत. पिझ्झा, बर्गर, स्ट्रीट फूड, फास्ट फूड अशा अनेक गुंतागुंतीच्या आहारामुळे पचनाला जड असलेल्या पदार्थांमुळे शरीरालाही एक जडपणा येतो व आपोआपच शरीराच्या अवयवांवर क्षमतेपेक्षा जास्त तणाव येतो व याच कारणामुळे शरीरातील घाण बाहेर टाकली जात नाही आणि अनेक आजारांना आमंत्रण दिले जाते हे टाळण्यासाठीच Detox Water-डिटॉक्स वॉटर अगदी सोप्या भाषेत म्हटले तर शरीरशुद्धी करण्यासाठी घेतले जाणारे पिले जाणारे पाणी असे अगदी साध्या सोप्या पदार्थांपासून तयार केले जाते व सकाळी किंवा दिवसभर आपण ते Detox Water-डिटॉक्स वॉटर घेऊ शकतो.
Detox Water-डिटॉक्स वॉटर कश्यापासून तयार केले जाते.
डिटॉक्सिफिकेशन साठी म्हणजेच आपल्या शरीरशुद्धीकरणासाठी खरे तर आपले नेहमीच आहारातील काकडी, पुदिना, लिंबू, आले, संत्री तसेच मसाल्यातील दालचिनी व फळांमध्ये स्ट्रॉबेरी, टरबूज, अननस, कोरफड अशा अगदी साध्या व घराघरात मिळणारे पदार्थांपासूनच आपल्या शरीर शुद्धीकरण होत असते.ह्याच पाधार्थ पासून Detox Water-डिटॉक्स वॉटर तयार केले जाते. लिंबू हे फळ आपण आपल्या रोजच्या आहारात वापरले तरीसुद्धा आपल्याला सी विटामिन भरपूर प्रमाणात सी विटामिन मिळते. सी विटामिन हे शरीरात लोह शोषून घेण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. तसेच आपल्या शरीरातील घाण बाहेर टाकण्यासाठी सुद्धा सी विटामिन महत्त्वाचे काम करत असते. तसेच लिंबू प्रमाणेच संत्री संत्र्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात सी विटामिन असते त्याचप्रमाणे पुदिना सुद्धा आहाराच्या दृष्टिकोनातून अतिशय पौष्टिक असतो पुदिना पुदिन्याचे पान हे तुमचे लिव्हर स्वच्छ करण्याचे काम करत असतात. तसेच शरीरातील किंवा रक्तातील वाढलेले पित्त पुदिन्याच्या रसामुळे कमी होते व ते बाहेर टाकले जाते. कावीळ सारख्या आजारात रक्त शुद्धी करण्यासाठी पुदिना वापरला जातो म्हणजेच आहारातून घेतला जातो. उन्हाळ्यात मिळणारे टरबूज हे सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे शरीरशुद्धीकरण करते कारण टरबूज व् या फळांमध्ये 70 टक्के पाणी असते व पाण्याशिवाय आपल्या शरीराचे डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच शुद्धीकरण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते.
Detox Water-डिटॉक्स वॉटर कसे तयार करतात.
- काकडी व ताजी पुदिन्याची पाने, एका भांड्यात म्हणजे ग्लास किंवा कुठलेही भांडे घेऊ शकतात. एक लिटर पाण्यात अर्ध्या काकडीचे चकत्या करून टाकाव्या व त्यातच पुदिन्याचे पाने स्वच्छ धुऊन टाकावे व हे पाणी तुम्ही रात्रभर झाकून ठेवावे किंवा दोन ते तीन तासांसाठी तसेच ठेवू शकता. पाण्याला चव येण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तरी चालेल व हे पाणी तुम्ही सकाळी किंवा दिवसभर थोडे थोडे घ्यावे.
- एका ग्लासात लिंबूच्या बारीक फोडी करून टाकाव्या तसेच आल्याचे बारीक तुकडे करून किंवा चकत्या करून टाकावे एका ग्लासासाठी एक छोट्या आकाराचा लिंबू व पाव इंच आल्याच्या चकत्या घ्याव्या. एक ते दीड लिटर पाण्यात टाकून ठेवावे. रात्रभर झाकून ठेवावे व सकाळी उठून हे Detox Water-डिटॉक्स वॉटर घ्यावे लिंबू व आल्याचे हे पाणी अतिशय परिणामकारक आहे वाढलेले वजन कमी करण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे तसेच प्रतिकारशक्ती वाढवते.
- एका काचेच्या भांड्यात पाणी घेऊन संत्र्याच्या चकत्या व एक इंच दालचिनीच्या काडीचे दोन तुकडे करून त्या पाण्यात टाकून ठेवावे व रात्रभर झाकून ठेवावे. सकाळी उठल्यावर हे Detox Water-डिटॉक्स वॉटर घ्यावे किंवा शक्य असल्यास दिवसभरही तुम्ही हे पाणी घेऊ शकतात. दालचिनी हे रक्त पातळ ठेवण्यासाठी तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी उत्तम कार्य करते.
- एका भांड्यात पाणी घेऊन त्यात स्ट्रॉबेरी चे तुकडे व ताजी तुळशीची पाने टाकून ठेवावी व सकाळी उठल्यावर हे पाणी घ्यावे.
- तसेच अननस व पुदिन्याची पाने एका भांड्यात रात्रभर पाण्यात टाकून ठेवावे व सकाळी उठून घ्यावे. अननस हे शरीरातील घाण बाहेर टाकण्यासाठी अतिशय उत्तम मानले जाते. शरीरातील वाढलेले यूरिक ॲसिड हे सुद्धा अननस यामुळे शरीराबाहेर टाकले जाते. पोटात गेलेल्या केसाला सुद्धा अननस विरघळून शरीराबाहेर टाकण्याची शक्ती ह्या अननसामध्ये असते. त्यामुळे सकाळी अननसाची एक चक्ती उपाशीपोटी खाल्ली तर त्याच्यानेही खूप चांगला परिणाम शरीरावर होतो. यूरिक ॲसिडचे तयार झालेले क्रिस्टल सुद्धा अननसामुळे विरघळतात व शरीराबाहेर टाकले जातात.
- तसेच कोरफड सुद्धा शरीरशुद्धीकरणासाठी अतिशय उत्तम औषध मानले जाते. कोरफडीचा गर हा थोडा चिकट असतो परंतु शरीरातील रक्तवाहिन्या किंवा आपले आतडे याला चिकटलेली घाण काढून टाकण्यासाठी कोरफडीचा गराचा वापर केला जातो. बाजारात कोरफडीचे तयार ज्यूस सर्वत्र मिळतात पण आपण घरीच एका भांड्यात पाणी घेऊन त्यात एक ग्लास पाण्याला एक चमचा कोरफड गर अर्धा लिंबाचे तुकडे व दोन ते तीन काकडीच्या चकत्या टाकून ते Detox Water-डिटॉक्स वॉटर रोज सकाळी घेतल्याने शरीराचे उत्तम शुद्धीकरण होते व शरीरातील सगळे घाण बाहेर टाकले जाते.
टीप.
- या सगळ्या पदार्थांपासून तयार केलेले Detox Water-डिटॉक्स वॉटर फ्रीजमध्ये ठेवू शकतो.
- तसेच प्रत्येक फळामध्ये विटामिन सी आहे व त्याचा कुठल्याही धातूंवर परिणाम होतो यामुळे शक्यतोवर काचेचे भांडे वापरले तर उत्तम.
- Detox Water-डिटॉक्स वॉटर घेण्याबरोबर सकाळी फिरायला जाणे, प्राणायाम करणे तसेच शरीराला थोडा वेळ देऊन सूर्यनमस्कार सारखे सोपे योगासन करणे हे सुद्धा शरीरशुद्धीकरणाचा अतिशय उत्तम उपाय आहे.