असे बनवा कुरकुरीत व पौष्टिक Cutlet-कटलेट.

Cutlet-कटलेट हे भाज्या किसून त्या भाज्यांमध्ये तांदळाचे पीठ किंवा तिखट मीठ घालून आपल्या लांबट गोल व चपट्या आकारात तयार केले जातात व त्याला तळले जातात. Cutlet-कटलेट वेगवेगळ्या प्रकारात केले जातात जसे पोह्यांचे कटलेट, रव्याचे कटलेट, भाज्यांचे कटलेट.

POTATO-CUTLET
Read More : Masala Tea/Chai

थोडे Cutlet-कटलेट विषयी.

घराघरात लहान मुले भाज्या खाताना नाके मुरडतात,अशावेळी भाज्यांचे कटलेट उत्तम पर्याय ठरतो. वेगवेगळ्या भाज्यांचे कटलेट मुले सॉस सोबत आवडीने खातात.तसेच भाज्यामुळे मुलांना पोषण ही उत्तम मिळते.कटलेट हे घरी बनवायला अतिशय सोपे असतात व तसेच घरातल्या साहित्यापासून बनवता येतात. आपल्या देशात कटलेट घराघरात बनवले जातात .कटलेट घरी बनवताना घरातील साहित्य पासून बनवले जातात .तसेच आपल्या देशात अगदी कुठल्याही हॉटेल रेस्टॉरंट मध्ये Cutlet-कटलेट बनवले जातात. कटलेट नाश्त्यासाठी किंवा स्टार्टर म्हणून खाल्ले जातात. कटलेट शाकाहारी किंवा मांसाहारी असे दोन्ही प्रकारात बनवले जातात. मासाहारी कटलेट मध्ये चिकन, मटन चे बारीक तुकडे करून घातले जातात. त्यात वेगवेगळे पिठे व तिखट मीठ घालून तिला तळले जातात. तसेच शाकाहारी कटलेत अनेक प्रकारच्या भाज्यांपासून बनवले जातात. शाकाहारी कटलेट बनवताना कांदा, लसूण, बटाटा,गाजर, कोबी,श्रावण घेवडा अशा अनेक भाज्या वापरल्या जातात. बटाट्यापासून बनवलेले कटलेट जास्त लोकप्रिय समजले जातात.तसेच पोह्यांपासून बनवलेले Cutlet-कटलेट ही खूप प्रसिद्ध आहेत व चविष्ट होतात. कटलेट हे चविष्ट बनवण्यासाठी त्यात तिखट, मीठ,आले, लसूण, धने, जिरे तसेच कोथिंबीर व कांद्याचा वापर केला जातो .भारतीय संस्कृतीत प्रत्येक भाजीचा स्वतःची वेगळी अशी चव असते. कटलेट बनवताना याच वेगळ्याच चवीच्या भाज्यांचा वापर केला जातो. कटलेट मध्ये वेगळेपणा आणण्यासाठी व भाज्यांचा व्यवस्थित एकत्रित करण्यासाठी ब्रेड वापरला जातो. तसेच कटलेट ला कुरकुरीत करण्यास ब्रेडचा चुरा वापरला जातो. Cutlet-कटलेट हे भारतीय पदार्थांमधील एक प्रसिद्ध लोकप्रिय पदार्थ आहे. अनेक घरांमध्ये सकाळी नाष्टासाठी सुद्धा कटलेट आवडीने खाल्ले जातात. Cutlet-कटलेट हे काही वेळा शॅलो फ्राय केले जातात. शालो फ्राय केले जाणारे कटलेट हे सहसा शिजवलेल्या भाज्यांपासून बनवले जातात .तसे पाहता कटलेट हे बटाटा, गाजर सारख्या भाज्यांपासून बनवले जातात. तसेच कटलेट मध्ये आपल्या आवडीच्या कुठल्याही भाज्या घालतात येतात.

How To Make Cutlet – कटलेट कसे बनवावे.

Cutlet-कटलेट बनवताना बटाटा ,गाजर ,कोबी ,किंवा आपल्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घ्याव्या .सर्व भाज्या बारीक कापून किंवा वाफवून घेतल्या जातात. भाज्या फार जास्त वापरू नये .नंतर वाफवलेल्या भाज्यांमध्ये असलेले पाणी काढून टाकावे. नंतर भाज्या कुस्करून घ्याव्या व कुस्करलेल्या भाज्यांमध्ये कांदा ,आले लसूण पेस्ट, तिखट , मीठ, कोथिंबीर घातली जाते .भाज्यांचे मिश्रण फार पातळ नसावे. नंतर त्या मिश्रणाचे गोल व चपटे आकाराचे कटलेट तयार करावे व ब्रेड क्रम किंवा रव्यामध्ये घोळवून घेतात. नंतर तेलात मध्यम ते मंद आचेवर तळून घेतले जातात. Cutlet-कटलेट हे सॉस सोबत खाल्ले जातात ,किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल चटणी किंवा हिरव्या चटणी सोबत खाल्ले जातात. कटलेट हे फक्त बटाटा घालूनही केले जातात. बटाटा कटलेट जास्त लोकप्रिय समजले जातात. बटाट्याचे कटलेट बटाटा उकडून घेतात. उकडलेल्या बटाट्यात कांदा बारीक चिरून लसुण, आले, तिखट, मीठ घालून केले जातात. बटाट्याची Cutlet-कटलेट कुरकुरीत बनवण्यासाठी कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचे पीठ घेतले जाते .काही वेळा आपण केलेल्या स्वयंपाकात भाजी उरते अशा वेळेस या उरलेल्या भाज्यांपासूनही Cutlet-कटलेट बनवले जातात. हे कटलेट सुंदर लागतात . उरलेल्या भाज्यांमध्ये आधीपासूनच सगळे मसाले घातलेले असतात. त्यात थोडी पिठी घालून कटलेट बनवले जातात व सॉस सोबत खाल्ले जातात.

साहित्य.

  • बटाटे पाच ते सहा .
  • ब्रेडक्रम्स करण्यासाठी ब्रेड चार ते पाच स्लाईस.
  • पाऊण चमचा आमचूर किंवा चाट मसाला पावडर.
  • मीठ चवीप्रमाणे.
  • एक चमचा लाल तिखट.
  • तीन कांदे.
  • एक गाजर .
  • एक ते दीड चमचा आले लसूण पेस्ट.
  • दोन ते तीन हिरवी मिरची.

कृती.

  • प्रथम बटाटे स्वच्छ धुऊन घ्या .बटाटे धुतल्यानंतर कुकरमध्ये पाणी घालून त्यावर एका भांड्यात बटाटे ठेवून कुकरमध्ये बटाटे शिजवून घ्या.
  • बटाटा वाफवतना पाणी थोडेच घाला कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्या. दोन शिट्या झाल्यावर गॅस बंद करा.
  • आता कुकर गार करायला ठेवा.
  • आता ब्रेड क्रम्स तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात ब्रेडचे स्लाईस टाकून घ्या व थोडा वेळ फिरवून मिक्सरमध्ये फिरवून घ्या म्हणजे ब्रेडचा जाडसर पावडर तयार होईल मी पावडर म्हणजेच ब्रेडक्रम्स तयार झालेला असेल तो कटलेट साठी वापरायला घ्या.
  • आता कुकर गार झाल्यावर बटाटे बाहेर काढून बटाट्याची साले काढून घ्या.
  • आता बटाटे एका पसरट भांड्यात घेऊन बटाटे कुस्करून घ्या.
  • आता हिरवी मिरचीचे बारीक तुकडे कापून किंवा आपल्या आवडीप्रमाणे मिक्सरमध्ये फिरवून बटाट्यात घाला.
  • आता कुस्करलेल्या बटाट्यामध्ये लाल तिखट आमचूर पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
  • आता ब्रेडचे छोटे छोटे तुकडे करून बटाट्यात घाला गरज वाटल्यास ब्रेड थोडा ओले करा.
  • आता बटाट्याचे मिश्रण हाताने एकसारखे करून घ्या मिश्रण पातळ करू नये पातळ झाल्यास चमचाभर कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचे पीठ घालावे.
  • आता या तयार केलेल्या मिश्रणाचे आपल्या आवडीप्रमाणे गोळे करून घ्या.
  • आता तयार केलेल्या गोळ्यांचे आपल्या आवडत्या आकाराची कटलेट करून घ्या. म्हणजे गोल किंवा लांबट गोल किंवा चपट्या आकाराचे कटलेट तयार करून घ्या.
  • आता तयार केलेले कटलेट किंवा ब्रेड क्रम्स मध्ये घोळून घ्या.
  • आता एक एका कढईत तेल घेऊन कढई गॅसवर गरम करायला ठेवा .तेल पूर्ण गरम झाले की गॅस ची आच मंद करा.तेल तापल्यावर तयार केलेले कटलेट तळून घ्या कटलेट हे मध्यम ते मंद आचेवर तळावे कटलेट हे गरम गरम खायला द्यावे.
  • कटलेट हे सॉस किंवा चटणी सोबत खाता येतात कटलेट गरमच छान लागतात.

Veg Cutlet – व्हेज कटलेट.

व्हेज कटलेट हे वेगवगळ्या भाज्या एकत्र करून घेतात. एकत्र केलेल्या भाज्या वाफवून घेतल्या जातात. वाफलेल्या भाज्या मधे वेगवेगळे पिठे घालुन कटलेट केले जातात. ह्या कटलेट मुळे उत्तम चव उत्तम पोषण मिळते.

POTATO-CUTLET

साहित्य.

  • बटाटे दोन ते तीन.
  • गाजर एक .
  • मटाराचे दाणे पाव वाटी .
  • कांदा एक .
  • चाट मसाला एक चमचा.
  • लाल तिखट दोन चमचे .
  • आले लसूण पेस्ट दोन चमचे.
  • हिरवी मिरची दोन .
  • मीठ चवीनुसार .
  • ब्रेडक्रम्स करण्यासाठी दोन ते तीन ब्रेडच्या स्लाईस.

कृती.

  • कटलेट करण्यासाठी प्रथम बटाटे स्वच्छ धुऊन घ्या व कुकरमध्ये थोडे पाणी घालून बटाटे उकडून घ्या. कुकर च्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर गार करायला ठेवा.
  • आता बटाटे तयार होईपर्यंत गाजर किसून ठेवा. कांदा बारीक कापून घ्या .हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून ठेव.
  • आता उकडलेले बटाटे गार झाल्यानंतर त्याची साले काढून घ्या.
  • आता गॅसवर एक कढई ठेवून त्यात थोडे तेल घाला व तेलात थोडे जिरे घाला, कांदा घाला,कांदा परतून झाल्यावर त्यात आले लसूण पेस्ट घाला. थोडा वेळ परतून झाल्यावर त्यात हिरवी मिरचीचे तुकडे व मटार घालून परतून घ्या. दोन ते तीन मिनिटे परतून घ्या.
  • नंतर त्यात गाजर घालून परत थोडा वेळ परतून घ्या.
  • आता त्यात लाल तिखट, धने जिरे पावडर ,चाट मसाला घाला.
  • आता थोडा वेळ मसाले परतून घ्या आता या मिश्रणात कुस्करलेले बटाटे घालून हाताने एकजीव करून घ्या.
  • आता तयार केलेल्या मिश्रण थोडा वेळ गार होऊ द्या. तयार केलेल्या मिश्रणाचे आपल्या आवडीच्या आकारात कटलेट तयार करून घ्या.
  • आता अर्धी वाटी मैदा घेऊन त्यात लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून पातळ सर्व मिश्रण तयार करून घ्या .मिश्रण फार पातळ नको किंवा फार घट्ट नको. या मिश्रणात थोडे मीठ घालून घ्या.
  • आता या मिश्रणात कटलेट बुडवून घ्या व मैद्याच्या मिश्रणात बुडवलेले कटलेट आता ब्रेडक्रम्स मध्ये घोळून घ्या.
  • आता एका कढईत तेल घेऊन त्यात कटलेट तळून घ्या कटलेट मध्यम ते मंद आचेवर तळावे.
  • आता कुरकुरीत कटलेट गरम गरम खायला द्या.

टिप्स.

  • बटाट्याचे कटलेट बनवताना कुरकुरीतपणा येण्यासाठी कटलेट च्या मिश्रणात थोडे तांदळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घालावे.
  • कटलेट तळताना गरम तेलात कटलेट टाकू नये कटलेट फुटण्याचे शक्यता असते किंवा फार गार केला तरी कटलेट टाकू नये कटलेट खूप जास्त तेलकट होण्याची शक्यता असते.
  • ऋतूनुसार उपलब्ध असलेल्या भाज्या घालून कटलेट बनवू शकतात.
  • बटाटे उकडून घेताना बटाट्या जास्त पाणी घालू नये बटाटे जास्त शिजवू नये जास्त शिजलेल्या बटाट्याचे कटलेट जास्त तेल शोषून घेतात.
  • कटलेट आपल्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे बनवू शकतात कटलेट करमच वाढावे वेळ नसेल तर कटलेट तयार करून फ्रिजमध्ये ठेवू शकता व आयत्यावेळी मैद्याचे मिश्रण तयार करून त्यात घोळून तळून घेता येतात.
  • कटलेट तयार केल्यावर ब्रेड क्रम्स उपलब्ध नसतील तर रव्यात घोळून घ्यावे हे रव्यात घोळलेले कटलेट छान कुरकुरीत होतात.
  • कटलेट चे मिश्रण पातळ झाल्यास मिश्रणात ब्रेड कुस्करून एकजीव करून घ्या कोरडा ब्रेड हा मिश्रणातील ओलसरपणा शोषून घेतो व मिश्रण कोरडे होण्यास मदत होते.

FAQs.

प्रश्न १ :- कटलेट मध्ये अंडे वापरता येते का ?

उत्तर :- कटलेट तयार केल्यावर ब्रेडक्रम्स किंवा मैद्याच्या मिश्रणात घोळवून घेतात त्या मिश्रणाऐवजी अंडे फेटून त्यात कटलेट बुडवून तव्यावर शालो फ्राय करू शकतात असे हे कटलेट ही खूप छान चव देतात.

प्रश्न २ :- कटलेट तेलकट होऊ नये म्हणून काय करावे ?

उत्तर :- कटलेट तेलकट होऊ नये यासाठी कटलेट चे मिश्रण थोडे घट्ट असावी पातळ झाल्यास त्या मिश्रणात थोडा रवा घाला किंवा कोरडे ब्रेड मिक्स करावे यामुळे मिश्रण घट्ट होईल व कटलेट तेल शोषून घेणार नाही.

Leave a comment