POHA -पोहा साधारण प्रत्येक घरात नाश्ता साठी केला जाणारा लोकप्रिय व प्रसिद्ध पदार्थ आहे. POHA-पोहा महाराष्ट्रात कांदा बटाटा घालून पोहे केले जातात. चवीसाठी शेंगदाणे घातले जातात.भरपूर कांदा घालून केलेले पोहे जास्त लोकप्रिय आहेत.पोहा मध्ये चवीसाठी बटाटे वाटाणे असे आपल्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ घालून केले जातात.
थोडे पोह्याविषयी.
POHA -पोहा हे आपल्या खाद्य संस्कृतीत अतिशय लोकप्रिय डिश आहे. कुठल्याही समारंभात अगदी आवडीने केला जाणारा व तितक्याच आवडीने खाल्ला जाणार पदार्थ म्हणजे पोहे. आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीत आदरा तिथ्याचा एक भाग म्हणजे सुद्धा पोहेच आहेत. घरी पाहुणे आल्यावर पोहे केले जातात. अगदी मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात तर कांदा पोहे ठरलेलीच डिश असते. पोहाचे प्रकारही वेगवेगळे आहेत व त्यांची करण्याची पद्धत ही वेगवेगळे आहे. म्हणजे जाड पोहे हे पोहे थोडेसे जाडसर असतात. कागदी पोहे-POHA हे पोहे पातळ असतात व या पोह्यांपासून चिवडा ही केला जातो. मध्यम जाडीचे पोहे म्हणजे नेहमीच्या वापरातले असतात. तसेच पोह्यांचा नाष्टा म्हणजे अगदी पोटभर होतो म्हणूनच त्याला पहिली पसंती दिली जाते. एक डिश पोहा खाल्ले तरी बराच वेळ भूक लागत नाही. म्हणूनच अनेक ठिकाणी घराबाहेर पडताना पोहे खाऊनच जातात. हेच पोहे-POHA अगदी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवले तर पौष्टिक नाष्टा होतो. म्हणजेचपोह्यांमध्ये कांदा, गाजर, वाटाणे, टोमॅटो पदार्थ घालून केल्या तर पोह्यांमधून आपल्याला पौष्टिक घटकही मिळतात. पोह्यात भरपूर फायबर असतात त्यामुळे पोहे खाल्ल्यावर खूप वेळ भूक लागत नाही. पोह्यात जितका जास्त कांदा तितके जास्त चव पोह्याला येते. कांद्यामुळे पोहे छान मऊ होतात. आपण तसेच छान पोहे कसे बनवायचे ते बघू. पोहे एक प्रकारचे तांदळापासून तयार केलेले जातात. तांदुळावर प्रक्रिया करून. तांदळाला चपटे बनवले जातात व तांदळाला थोडे उकळून घेतले जाते. त्यामुळे त्याचा पदार्थ करताना कमी वेळेत होतो. POHA -पोहा हे पाण्यात किंवा कुठल्याही पातळ पदार्थ टाकल्यावर पदार्थ शोषण घेतात व थोडे फुलतात. पोहे महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशभर खाल्ले जातात. महाराष्ट्रात घरी पाहुणे आल्यानंतर सर्वात प्रथम चहा सोबत पोह्याचा नाश्ता दिला जातो. पोहे हे महाराष्ट्रात आदरातिथ्य चा एक भाग आहे. पोहे पाण्यात भिजवून त्याचे पदार्थ केले जातात. पाण्यात भिजवल्यानंतरच पोहे खाण्या योग्य होतात. महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय नाश्ता हा पोह्यांचा आहे.पोह्यांपासून विविध प्रकारचे पदार्थ केले जातात. पोह्यांपासून कांदे पोहे,बटाटे पोहे कच्चे पोहे व दूध असेहि खाल्ले जाते. पोह्यांपासून अनेक प्रकारचे पदार्थ तर होतातच पण गणपती बाप्पाला दही पोह्याचा नैवेद्य गणेश विसर्जनाच्या दिवशी दाखवला जातो. असे म्हटले जाते की गणपती बाप्पाला दही पोहे खूप आवडतात म्हणून गणेश विसर्जनाच्या दिवशी जाताना मोदकांसोबत दही पोहे दिले जातात. तसेच गोकुळाष्टमीच्या प्रसादात दही घालून पोहे दिले जातात. त्याप्रसादात वेलदोडा, मेरे, सुंठ, साखर घालून त्याची चव वाढवली जाते. तसेच आयुर्वेद तज्ञांच्या मते दूध व कच्चे पोहे खाल्ल्याने शुक्रधातु वाढतो, म्हणूनच अशक्त मुलांना दूध व कच्चे पोहे खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच कच्च्या पोह्यांमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. पोहे कुठल्याही पदार्थात घातल्यास त्या पदार्थाची गुणवत्ता वाढवतात जसे इडली, मेदुवडा यांच्या मिश्रणात कच्चे पोहे बारीक करून घातल्यास इडली, वडे हलकी होतात. तसेच तळल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये कच्ची पोहे बारीक करून घातले तर पदार्थ कुरकुरीत होतो. अनेक राज्यात पोह्यांमध्ये वेगवेगळे मसाले वापरून गोड किंवा तिखट पदार्थ बनवले जातात. मध्य प्रदेशात इंदोर, उज्जैन, रतलाम, भोपाळ या शहरांमध्ये तर पोह्यांपासून तयार केलेली पोहा जिलेबी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात पोह्यांपासून अनेक पदार्थ बनवले जातात.पोहे कटलेट, पोह्यांची चकली, पोहे चिवडा, महाराष्ट्रात पोहे चिवडा सुद्धा खूप लोकप्रिय आहे.
- जाड पोहे:-जाड पोहे हे जास्त करून तळून तळून चिवडा बनवण्यासाठी वापरले जातात.तसेच नाश्त्यासाठी सुद्धा वापरले जातात.
- मध्यम जाडीचे पोहे:-मध्यम जाडीचे पोहे हे नाश्त्यासाठी व वेगवेगळे पदार्थ करण्यासाठी वापरले जातात. जसे पोहे भीजवून चकल्या केल्या जातात व उन्हात वाळवून डब्यात भरून ठेवल्या जातात व वर्षभर खाल्ले जातात.जसे हे पोहे इडली, वडे,आप्पे अशा रेसिपी मध्ये वापरले जातात.
- पातळ पोहे :- .ह्या पोह्या ना कागदी पोहे असे म्हणतात हे पोहे नाश्त्यासाठी व चिवड्यासाठी वापरले जातात.
महाराष्ट्रात घराघरात बनवला जाणारा व सर्वांना आवडणारा नाष्टा म्हणजे पोहे.पोहे बनवण्याआधी पाण्याने ओले केले जातात.
POHA -पोहा कसे बनवतात.
नाश्त्यासाठी POHA -पोहा बनवताना सर्वात प्रथम पाण्याने भिजवले जातात. नंतर निथळत ठेवतात पोह्या मधील पाणी निथळल्यावर पोह्यांना फोडणी दिली जाते. फोडणीसाठी मोहरी, जिरे, कांदा, बटाटा, शेंगदाणे वापरले जातात. पोह्यामधील पोषक तत्वे वाढवण्यासाठी त्यात मोड आलेले मूग,हिरवे वाटाणे घातले जातात. वरून सजावटीसाठी व चवीसाठीबारीक शेव,किसलेले खोबरे,कोथिंबीर वापरले जाते व लिंबू सोबत खाल्ले जातात. कांदे पोहे, बटाटे पोहे अशाप्रकारे पोहे आवडीने खाल्ले जातात. महाराष्ट्रात काही ठिकाणी रस्सापोहे ही डिश प्रसिद्ध आहे व आवडीने खाल्ली जाते. पोहे गुजरात, गोवा, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सुद्धा आवडीने खाल्ले जातात व लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात हा पोहे खास करून कांदे व बटाट्याच्या सोबत बनवले जातात. पुण्यात पोहे व रस्सा डीश प्रसिद्ध आहे.
साहित्य.
- पोहे – अर्धा किलो.
- एक चमचा मोहरी.
- एक चमचा जिरे.
- सात -आठ हिरव्या मिरच्या.
- अर्धा चमचा हळद.
- कांदे- दोन.
- शेंगदाणे- अर्धी वाटी.
- गाजर- पाव वाटी बारीक चिरलेला.
- टोमॅटो – अर्धा बारीक चिरलेला.
- बटाटा – एक.
- वाटाणे – मुठ भर (ओले).
- मोड आलेले हिरवे मूग – अर्धी वाटी.
- किसलेले खोबरे (ओले किंवा सुके).- अर्धी वाटी.
- बारीक शेव – अर्धी वाटी.
- बारीक चिरलेली कोथिंबीर – मुठ भर.
- पाव फोड चिरलेले लिंबाची.
कृती.
- POHA पोहा करण्यासाठी प्रथम पोहा आपल्या गरजेनुसार एका भांड्यात काढून घ्या.
- नंतर पोहा चाळणीने चाळून घ्या.म्हणजे त्यात काही काडी कचरा असेल किंवा घाण असेल तर ती निघून जाईल व आपल्याला स्वच्छ पोहा मिळेल
- आता पोह्यात पाणी घालून घ्या व हलक्या हाताने हलवून पोहे धुवून घ्या.
- आता पोह्यातील जास्तीचे पाणी काढून टाका.
- जर POHA पोहा थोडा जाड असेल तर एक मिनिट भर पाण्यात भिजवुन ठेवा.एक मिनिटा नंतर पोहे एका चाळणीत ओतून निथळत ठेवा.
- नंतर एक कढई घेऊन गॅसवर ठेवा.कढईत फोडणीसाठी तेल टाका.तेल तापले की तर एक चमचा मोहरी टाका.
- मोहरी तडतडली की त्यात जिरे घाला.
- जिरे तडतडले कि तेलात चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला.लगेच कांदा घाला व चिमुट भर मीठ घाला म्हणजे कांदा लवकर परतला जातो.
- नंतर फोडणीत अर्धा चमचा साखर घाला.साखरे मुळे पोह्याला छान चव तर येतेच पण पोहे मऊ होतात .
- आता त्यात शेंगदाणे,गाजर,टोमॅटो,मूग,वाटाणे हे सगळे घालून थोडे मीठ घाला व वाफेवर छान परतून शिजवून घ्या.
- नंतर त्यात हळद घाला व परत एकदा परतून घ्या
- भाज्या छान वाफवून घ्या व त्या तेलात पोहे घालून छान वाफवुन घ्या. गरजेप्रमाणे मीठ घालून झाकण ठेवून दोन ते तीन वाफ आणा.
- म्हणजे पोहे छान खमंग होतील. नंतर एका डिश मध्ये काढून त्यावर खोबऱ्याचा कीस थोडी कोथिंबीर व थोडी बारीक शेव घाला व त्यावर एक लिंबाची फोड ठेवा व गरम गरम सर्व्ह करा.
टिप्स.
- POHA -पोहा करताना पोहे थोडे कोरडे वाटत असतील तर वरून थोडे दूध शिंपडावे यांना ओलसरपणा येईल व चवही वाढेल.
- पोहे जर दुसऱ्यांदा गरम करावे लागले तर ते कडक होतात. अशावेळी पोहे दुसऱ्यांना गरम करताना पोहे चाळणी ठेवून एका भांड्यात पाणी उकळायला ठेवावे. पाणी उकळले की त्या भांड्यावर चाळणी ठेवून झाकण ठेवावे. दोन ते तीन मिनिटांनी पोहे छान गरम झालेले असतात हे गरम गरम पोहे वाढावे. अशा पद्धतीने गरम केलेले पोहे अगदी छान होतात व चवही बदलत नाही.