“मसालेदार Kachori Recipe-कचोरी रेसिपी: एकदा बनवा, पुन्हा बनवावीशी वाटेल”

Kachori-कचोरी म्हणजे मुग किंवा मुगाची डाळ व आपले घरातीलच नेहमी वापरण्याची मसाले घालून तयार केलेल्या पदार्थ. टम्म फुगलेली आत मध्ये थोडे सारण असणारे आंबट गोड चटणी सोबत खाल्ली जाणारी ही Kachori-कचोरी हल्ली सगळीकडे सहज मिळते.

Kachori Recipe - कचोरी रेसिपी
Read More : Vada Pav Recipe.

थोडे Kachori-कचोरी विषयी.

Kachori-कचोरी विषयी असे म्हटले जाते की हि राजस्थान राज्यांमधून आली आहे. आधी राजस्थानी हॉटेलमध्ये मिळणारी ही Kachori-कचोरी आपल्याकडे अगदी महाराष्ट्रीयनच होऊन गेली आहे. वरून खुसखुशीत मैद्याचे आवरण व आत मध्ये चटपटीत सारण भरून तळले जाते. बाहेर मिळणारी कचोरी मध्ये सारण जास्त करून भिजवलेली मुगाची डाळ वापरून तयार केली जाते. पण आपण घरी तयार केलेल्या कचोरीमध्ये हिरवे मूग भिजवून किंवा मुगाची डाळ भिजवून त्याचे सारण करून सुद्धा करू शकतो व ते अतिशय स्वादिष्ट लागते. मुग व घरातीलच मसाले वापरून तयार केलेले हे Kachori-कचोरी खूप स्वादिष्ट होते. बाहेरील आवरणात मैदा वापरला जातो त्यामुळे ती खुसखुशीत होते, जर आपल्याला पूर्णपणे मैदा नको असेल तर आपण अर्धा मैदा व अर्धे गव्हाचे पीठ वापरूनही आवरण तयार करू शकतो. ही Kachori-कचोरी खूप खुसखुशीत होते. कचोरीचे आवरण खुसखुशीत होण्यासाठी त्यात कडकडीत गरम तेलाचे मोहन दिले जाते. बाहेरील Kachori-कचोरी च्या सारणात चे प्रमाण तसे खूप कमी असते त्यामुळे ती जास्त फुगलेली असते. पण आपण घरी केलेल्या कचोरी सारण आपण जरा आपल्या आवडीप्रमाणे भरतो, सारण कमी भरले की कचोरी टम्म फुगते व सारण थोडं जास्त झाले की तिथे हवा भरण्यासाठी जागा मिळत नाही म्हणून थोडी कमी फुलते फक्त इतकाच फरक असतो. फुगलेली कचोरी हवी असल्यास सारण थोडे कमी भरावे.आज आपण हिरव्या मुगाचीच कचोरी पाहणार आहोत.

साहित्य.

  • मैदा एक वाटी.
  • ओवा एक चमचा.
  • तेल साधारण मोठे चार चमचे.
  • मीठ चवीप्रमाणे.
  • एक वाटी बेसन पीठ.
  • दोन चमचे गरम मसाला.
  • दोन चमचे लाल तिखट.
  • दीड चमचा आमचूर पावडर.
  • अर्धा चमचा धने जिऱ्याची पावडर.
  • अर्धा चमचा हळद.
  • पाव चमचा मीठ.
  • हिंग अगदी थोडा.

कृती.

  • Kachori-कचोरीसाठी आवरण तयार करण्यासाठी प्रथम एका परातीत मैदा घ्यावा मैदा चाळून घ्यावा.
  • आता त्यात मीठ व ओवा टाकाव्या ओवा टाकण्यापूर्वी हातावर जरा चुरून घ्याव्यात कचोरीच्या आवरणाला ओव्याचाछान सुगंध येतो.
  • आता एका छोट्या भांड्यात मोहन देण्यासाठी तेल गरम करावे व ते गरम तेल मैद्यात घाला.

Kachori Recipe - कचोरी रेसिपी

  • आता जरा वेळ मैदा गार झाला म्हणजे हाताला चटका लागणार नाही तेलाचा इतका कोमट झाले की पाण्याने कचोरीच्या आवरणासाठी कणिक भिजवून घ्यावे.
  • कणीक फार सैल किंवा फार घट्ट भिजवू नये थोड्या वेळानंतर मैदा असल्यामुळे कणिक थोडी कडक होण्याची शक्यता असते. आता कणीक थोडी झाकून ठेवावे.
  • कचोरी बनवताना हिरवे मूग तीन ते चार तासासाठी भिजवून ठेवावे.
  • आता तीन-चार तासानंतर मूग पाण्यातून काढून चाळणीत निथळत ठेवावे.
  • पाणी निथळल्यावर मिक्सरच्या साह्याने मुग थोडे जाडसर वाटून घ्यावे.
  • मिक्सर मधून फिरवताना त्यात पाणी घालू नये गरज वाटल्यास अगदी एखादा छोटा चमचा पाणी घाला. मुगाची पेस्ट होईल इतके फिरवू नये.
  • आता वाटलेल्या मूग एका भांड्यात काढून घ्यावा.

Kachori Recipe - कचोरी रेसिपी

  • नंतर फोडणीसाठी गॅसवर एक कढई ठेवावी. कढईत थोडे तेल घालावे.
  • तेल तापले की त्यात थोडा हिंग व मोहरीची फोडणी द्यावी नंतर त्यात हळद, लाल तिखट, आले लसूण पेस्ट व मसाले घालून परतून घ्यावे.
  • मसाले सगळे मंद आचेवर परतावे म्हणजे मसाले करपणार नाही.
  • आता त्यात फिरवलेला मुग घालावा व छान परतून घ्यावा. कचोरी साठी सारण बनवताना मूग थोडा परतत आला की त्यात थोडे आपण घेतलेले बेसन घालावे.
  • बेसन घातल्यामुळे सारण चिकट होत नाहीत पाणी शोषले जाते व थोडा कोरडेपणा येतो.
  • आता त्यात मीठ घालून पूर्ण झाकण ठेवून वाफवून घ्यावे. वाफवल्यावर सारण कोरडे होईल याची काळजी घ्यावी.
  • त्यात वरून आमचूर पावडर टाकून छान मिक्स करून घ्यावी. आता मिश्रण एका पसरट भांड्यात काढून गार होण्यासाठी बाजूला ठेवावे.
  • आता आपण मळून ठेवलेली कणीक थोडीशी तेलाचा हात लावून मळून घ्यावे व तिचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे.
  • मिश्रण गार झाल्यावर जेवढे गोळे तयार झाले असतील तेवढेच छोटे छोटे गोळे मिश्रणाचे करून घ्यावे.
  • आता एकेक गोळा घेऊन तो पोळपाटावर लाटून घ्यावा फार जाड ठेवू नये व फार पातळ लाटू नये. म्हणजे तळताना कचोरी आत मध्ये कच्चे राहत नाही, तसेच पातळ आवरणाची कचोरी फुटू शकते म्हणून फार पातळ लाटू नये.

Kachori Recipe - कचोरी रेसिपी

  • आता लाटलेल्या आवरणाच्या पारितत मिश्रणाचा एक गोळा टाकून ते दोन्ही हाताच्या साह्याने छान बंद करून अगदी हलकाच दाब द्यावा व सारण बाहेर येणार नाही यासाठी छान बंद करावे.
  • कचोरी लाआता तळहातावर घेऊन अगदी हलकाच दाब द्यावा फार दाब देऊ नये. जास्त दाब दिल्यामुळे Kachori-कचोरी फुगणार नाही. अशाप्रकारे सगळ्या कचोऱ्या भरून ठेवाव्या.
  • आता एका कढईत तेल तापण्यासाठी ठेवावे सुरुवातीला तेल छान तापू द्यावे. गरम तेलातच कचोरी टाकावे तेल तापले की ते गॅस थोडा मध्यम करावा व मंद ते मध्यम आचेवर कचोरी सोनेरी रंगावर तळावे.
  • कचोरी तळताना कचोरीला कडेने झाऱ्याच्या साह्याने अगदी हलका हलका दाब द्यावा म्हणजे म्हणजे कचोरी छान फुलून येते.
  • मंद आचेवर तळलेली कचोरी आतपर्यंत तळली जाते कचोरी सोनेरी रंगावर तळून झाली की एका भांड्यात काढावे व चिंचेच्या आंबट गोड चटणी सोबत चटणी सोबत खायला द्यावी.

टीप.

  • मैद्याचे आवरण खुसखुशीत होते त्या कारणाने मैदा आवरणासाठी जास्त वापरला जातो परंतु मैदा नको असेल तर अर्धा मैदा वर्धा गव्हाची कणिक या प्रमाणातही आवरण यासाठी घेऊ शकतात.
  • सारण करताना त्यात थोडे बेसन अवश्य घालावे बेसनामुळे सारणाला थोडा कोरडेपणा व चव येते बेसन थोडे भाजून घेतले तर उत्तम बेसन मंद आचेवर भाजावे.
  • आमचूर पावडर नसेल तर सारण पूर्ण तयार झाल्यावर त्यात एक लिंबूचा रस घालावा व छान मिक्स करून घ्यावे त्यानेही चव छान येते.
  • कचोरी तळताना मंद ते मध्यम आचेवर तळावे म्हणजे आतपर्यंत तळली जाते मोठ्या आचेवर तळलेली कचोरी आत मध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते.
  • कचोरी तेलात टाकल्यानंतर दोन ते दोन मिनिटे तशीच ठेवावी नंतर उलट्या बाजूने करताना तिला कडेने थोडा थोडा ध्यान द्यावा म्हणजे ती छान फुलून येते.
  • ओल्या मुगाच्या शेंगांचे दाणे वापरू नये ही Kachori-कचोरी बनवता येते व ही कचोरी सुद्धा अतिशय खमंग होते.
  • मुगाच्या डाळीची कचोरी करायची असल्यास असल्यास हिरव्या मुगा ऐवजी मुगाची डाळ घ्यावी व अगदी ह्याच पद्धतीने करावे.
  • पूर्णपणे गव्हाच्या कणकेची सुद्धा Kachori-कचोरी बनवता येते कणकेची कचोरी बनवताना त्यात तुपाचे मोहन घालावे व थोडी पातळ आवरण करावे.
  • आवडत असल्यास कचोरीच्या सारणात आपण कांदा बारीक चिरून घालू शकतो.

Leave a comment