“Kanda Bhaji-कांदा भजीचं खमंग रहस्य: पावसाळ्याच्या मजेत न विसरता खा!”

Kanda Bhaji-कांदा भजी कांदा बारीक कापून व बेसन पिठात मिक्स करून कुरकुरीत तळलेला एक पदार्थ. Kanda Bhaji-कांदा भजी पूर्ण जगभरात खाल्ले जाणारा एक पदार्थ.

Kanda Bhaji-कांदा भजी
Read More : Poha Chivda.

थोडे Kanda Bhaji-कांदा भजी विषयी.

पूर्ण जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने कांद्याचे उत्पादन घेतले जाते. अगदी महाराष्ट्रात, नाशिक जिल्हा किंवा खान्देश अतिशय प्रसिद्ध आहे ते कांद्याच्या उत्पादनासाठी. कांदा जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो, अगदी चायनीज पदार्थांमध्ये सुद्धा कांदा सर्रासपणे वापरला जातो. कांदाच नाही तर कांदा कांद्याची हिरवी पात ही सुद्धा खूप पौष्टिक मानली जाते व ती अनेक प्रकारात वेगवेगळ्या पद्धतीने वापरून पदार्थाची चव वाढवली जाते. त्याचप्रमाणे आज आपण पाहणार आहोत Kanda Bhaji-कांदा भजी. Kanda Bhaji-कांदा भजी हे आपल्या देशातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे, अगदी प्रत्येक हॉटेल रेस्टॉरंट छोट्या-मोठ्या ढाब्यांवरही Kanda Bhaji-कांदा भजी अगदी सहज उपलब्ध होते. कांदा बारीक चिरून बेसन पिठामध्ये घोळवून त्याची कुरकुरीत भजी बनवली जाते. त्यात कधी मिरच्या, कधी कोथिंबीर वापरून त्याची चव वाढवली जाते. अगदी नुसता कांदा घालून केलेली भजी सुद्धा अगदी चवदार होते. पावसाळ्यात तर आवर्जून भजी खाल्ली जाते. कांदा जसा चव वाढवतो तसच शरीराचे आरोग्यही उत्तम राहतो. कांदा हा उन्हाळ्यात जास्त प्रमाणात वापरला जातो. उन्हाळ्यात शरीराचे तापमान जास्त वाढते अशा वेळेस कांदा सतत हुंगत राहिल्यास उन्हाचा त्रास होत नाही. तसेच उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढवून अंगात तापही भरतो अशा वेळेस कांद्याचा रस काढून हाता पायाला लावला तर शरीराचे तापमान लगेचच नॉर्मल होते. कांद्यातील काही पोषक तत्वांमुळे आपल्या रक्तवाहिन्या ह्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य उत्तम राहते व शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत राहतो. त्यामुळेच रक्तदाबाचा त्रासही कमी होण्यास मदत होते. कांद्याप्रमाणेच पातीचा हिरवा कांदा सुद्धा वापरला जातो. पातीचा कांदा ही अतिशय पौष्टिक मानला जातो. चायनीज पदार्थांमध्ये पाठीच्या कांद्याला फार महत्त्वाचे स्थान आहे याच कांद्यापासून Kanda Bhaji-कांदा भजी कशी बनवतात ते आपण पाहणार आहोत.

साहित्य.

  • बेसन पीठ एक वाटी.
  • तीन हिरव्या मिरच्या.
  • अर्धा चमचा जिरे.
  • मूठभर कोथिंबीर.
  • चवीनुसार मीठ.
  • एक चमचा तांदळाचे पीठ
  • चिमूटभर खाण्याचा सोडा.
  • तळण्यासाठी तेल.
  • एक चमचा ठेचलेला लसून.

कृती.

  • Kanda Bhaji-कांदा भजी बनवताना प्रथम कांदे चिरून घेणे म्हणजे कांद्याचे उभे काप करून घ्यावे व त्याला थोडा वेळ मीठ लावून ठेवावे व तसेच थोडावेळ झाकून ठेवावे.
  • आता कांद्याला थोडं पाणी सुटले असेल आता त्यात जिरे बारीक करून मिरच्या बारीक कापून घ्याव्या.
  • कोथिंबीर स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावे.
  • आता चिरलेल्या कांद्यांमध्ये बेसन, ठेचलेला लसून मिरच्या, जिरे व कोथिंबीर तांदळाचे पीठ टाकून छान मिक्स करून घ्यावे.
  • आता कमीत कमीत कमी पाण्याचा वापर करून मिश्रण छान मिक्स करून घ्यावे. आता त्यात थोडे तेल टाकावे व चिमूटभर सोडा घालावा.
  • एका जाड कडे तळण्यासाठी तेल ठेवावे तेल प्रथम गरम करून घ्यावे गार तेलात भजी टाकली तर ती नेट तळली जात नाही व जास्त गरम तेलात टाकले तर ती कांदा थोडासा कडवट लागू शकतो.
  • भजी तेलात टाकतांना कांद्याचे काप जरा मोकळे करून टाकावे म्हणजे भजी छान कुरकुरीत होते व भजी दिसते हि छान.कप मोकळे केले नाही तर भजी पिठाच्या गोळ्या प्रमाणे तळली जाईल .
  • तेलाचे तापमान तपासून बघावे. योग्य तापमानात आले म्हणजे पीठ टाकल्यावर अगदी तळाशी बसणार नाही व अगदी एका सेकंदात वर येऊन तरंगणार नाही अशा तापमानात तेल आले की त्यात आता मिश्रणाचे छोटे छोटे गोळे हाताने टाकावे.
  • आता कढईत टाकलेले मिश्रणाचे गोळे व्यवस्थित तळून घ्यावे तेलात टाकल्या टाकल्या तिला लगेच हलवू नये एक दोन मिनिटांनी तिला उलटवून दुसऱ्या बाजूने छान सोनेरी रंगावर तळून घ्यावे म्हणजे छान कुरकुरीत तळले जाते.
  • कांदाभजी व्यवस्थित तळून झाल्यावर तिला झाल्याच्या सहाय्याने संपूर्ण तेल निथळून घ्यावे व टिशू पेपरवर काढून घ्यावे म्हणजे जास्तीचे राहिलेले तेल शोषले जाईल व कांदा भजी जास्त तेलकट होणार नाही.
  • ही भजी सॉस सोबत किंवा चिंचेच्या चटणी सोबत खायला द्यावे.
  • तसेच तळलेल्या मिरची सोबतही खाल्ली जाते उत्तम स्वाद येतो.
  • गरम गरम चहा सोबत तर कांदा भजी ची मजाच वेगळी असते.

टीप.

  • कांदा भजी बनवताना कांद्याचे उभे काप करावे फार बारीक करू नये बारीक कांद्याचे काप मऊ पडतात व जाडही ठेवू नये ते पूर्णपणे तळले जात नाही.
  • कांदा भजी बनवण्यासाठी तयार केलेले मिश्रण फार पातळ करू नये त्याची भजी नीट होत नाही थोडे घट्ट मिश्रण थोडे घट्टसरच असावे.
  • कांदा भजी साठी मिश्रण तयार करताना पाण्याचा वापर थोडा जपूनच करावा कारण कांद्या मुळातच पाणी सोडतो व जर थोडा वेळ मिश्रण तसेच राहिले तर ते थोडे पातळ होण्याची शक्यता असते.
  • कांदा भजी मिरची मिक्सरमध्ये फिरवून किंवा तुकडे करून घातले जाते आपल्या आवडीप्रमाणे आपण घालावे तसेच भरपूर कोथिंबीर घालून ह्या कांदा भजीची चव वाढवता येते.
  • कांदा भजी चमचाभर तांदळाचे पीठ नक्की घालावे तांदळाच्या पिठामुळे ती पटकन कुरकुरीत होण्यास मदत होते.
  • तांदळाचे पीठ किवा कोर्न फ्लोर घालावे.
  • तळण्याच्या तेलात मीठ पाव चमचा मीठ घातले तर पदार्थ कमी तेलकट होतो. तसेच तेलही कमी जळते. म्हणूनच पदार्थ कमी तेल शोषून घेतो हा प्रयोग नक्की करून बघावा.
  • विशेष टीप कुठल्याही प्रकारची भजी तळताना भजे खुसखुशीत हवी असेल तर पिठात सोडा टाकून सोडल्यावर थोडा लिंबाचा रस घालावा व लगेचच मिश्रण एकजीव करून घ्यावे भजी छान होते फक्त ही भजी तळताना पूर्णपणे तेल निथळून घ्यावे व टिशू पेपरवर टाकून बघितले जास्तीचे तेल काढून टाकावे.
  • त्याचप्रमाणे आपल्या नेहमीच्या भजेत शिजलेली तुरीची डाळ अगदी थोडी म्हणजे चमचाभर टाकले तरी भजी खुसखुशीत होते.
  • भजी च्या मिश्रणात थोड गरम तेल टाकावे त्यामुळे भजी कुरकुरीत होते.
  • कांद्याची चव थोडी गोड सर असते,त्यामुळे भजी बनवतांना तिखटाचे प्रमाण थोडे जास्त घ्यावे म्हणजे भजीला छान चव येईल.
  • कांदा भजी चटपटीत हिरव्या चटणी सोबत खाल्यास हि कांद्याचा गोडवा कमी होतो व भजी खमंग लागते.
  • लसून घातल्या मुळे कांदा भजी ला खमंग स्वाद येतो.

Leave a comment