Malai Kofta-मलाई कोफ्ता ही एक कांदा टोमॅटो पनीर क्रीम यांपासून बनवलेली एक चविष्ट व लोकप्रिय पदार्थ आहे. कोफ्ता भारतात आपल्याकडे मिळणाऱ्या भाज्या व मसाले वापरून मकाच्या पीठ किंवा तांदळाचे पीठ वापरून वडे तयार करून ते तेलात तळून मलाई कोफ्ता तयार करण्यात आले.
थोडे कोपत्याविषयी.
Malai Kofta-मलाई कोफ्ता म्हणजे काही शाका हारी घटक पदार्थ मिक्स करून व त्याचे बॉल प्रमाणे गोल गोल आकार तयार करून तेलात तळलेले वडे. सर्वात प्रथम कोफ्ता या शब्दाचा उल्लेख परप्रांतात आढळते. पूर्वी परदेशातमिट बॉल म्हणजे (मटण किंवा चिकन याच्यापासून तयार केलेलेगोल आकाराचे गोळे.) नावाने प्रसिद्ध रेसिपी वरून हा पदार्थ तयार करण्यात आल्याचे आढळते. हा पदार्थ खरे तर दक्षिण आशियाई देशाकडचा पदार्थ आहे. तिकडे पूर्वीपासून मांसाहाराचे बॉल म्हणजे मांसाहार व काही भाज्याव काही पिठे एकत्र करून त्याचे विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाण्याची पद्धत होती. चिकन मटन यांचे बारीक तुकडे करून त्याचे बॉल बनवून ते तळले जायचे. तिकडचे हे प्रसिद्ध व लोकप्रिय पदार्थ होते. तसे आपल्याकडे सर्वात आधी उत्तर भारतात हे बनवले जाऊ लागले. तोच प्रकार भारतीय आहार शास्त्रानुसार आपल्याकडे शाकाहारी जेवणात करण्यास तयार करण्याचा प्रयत्नकेलेला दिसत. Malai Kofta-मलाई कोफ्ता भारतात आपल्याकडे मिळणाऱ्या भाज्या व मसाले वापरून मकाच्या पीठ किंवा तांदळाचे पीठ वापरून वडे तयार करून ते तेलात तळून मलाई कोफ्ता तयार करण्यात आले. नंतर आपल्या पद्धतीने मसाले वापरून बनवण्यात आले. तिथूनचआपल्याला मलाई कोफ्ता त्याची चविष्ट डिश आपल्याला मिळाले. प्रत्येक भागात आपापल्या आहार संस्कृती प्रमाणे भाज्या व मसाले वापरून बॉल सारखे गोल किंवा लांबट आकारात गोळे करून तळून त्याची रस्से दार भाजी म्हणजेच करी करण्यात येऊ लागली व भातासोबत भाकरी व पोळी सोबत खाऊ लागले. Malai Kofta-मलाई कोफ्ता मधे मुख्य घटक म्हणुन बटाटा वापरण्यात आला.त्याला बाईंडिग म्हणुन तांदळाचे पीठ घालून कोफते तयारकरण्यात आले. तसेच बटाटा हे माध्यम ठेवून वेगवेगळे कोफ्ते तयार करण्यात आले व भारतीय मसाले वापरून खमंग ग्रेव्हीच्या साह्याने मलई कोफ्ता चविष्ट बनवण्यात आला. आज मलाई कोफ्ता करी ही भारतात प्रसिध्द झाली आहे.कुठेही गेलो तरी प्रत्येक छोट्या मोठ्या हॉटेल मध्ये मेन्यू कार्ड मध्ये मलाई कोफ्ता करी हे नाव बघायला मिळते. खरे तर भारतात कबाब प्रसिध्द आहेत त्याच प्रकारातली ही डिश आहे.मलाई कोफ्ते म्हणजे मलाई म्हणजेच क्रीम किंवा दुधावरचे साय व कोफ्ता म्हणजे शाकाहारी कबाबअसे एकत्र करून ही सुंदर डिश बनविण्यात आली आहे. Malai Kofta-मलाई कोफ्ता पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणीमलाई कोफ्ता हे फक्त हॉटेल रेस्टॉरंटच्या मेनू कार्ड मध्ये पाहिलेली एक डिश.नवीन असल्यामुळं पहिली पसंती तिलाच दिली जात असे. बऱ्याच वेळा वाटायचे की घरी तयार कशी करतात किंवा करता येऊ शकते का परंतु ती तशी फारच सोपी व सहज आहे. मलाही कोफ्ता करताना घरचे पनीर वापरले तर उत्तम स्वाद येतो.
पनीर तयार कसे करावे.
एक लिटर दुधामध्ये दोन ते तीन चमचे व्हिनेगर विनेगर नसल्यास एका लिंबाचा रस पिळावा. प्रथम एक लिटर दूध एका पातेल्यात उकळण्यास ठेवावे. दूध उकळले की त्यात विनेगर किंवा लिंबूरस टाकावा व हलवत राहावे. थोड्या वेळाने दुध फाटल्या सारखे होते. म्हणजे दुधात एका बाजूला घट्ट पदार्थ व तयार होतो व पाणी वेगळे सुटायला लागते. घट्ट पदार्थ म्हणजेच पनीर असते. नंतर एका सुती कापडाने ते दूध गाळून घ्यावे म्हणजे पाणी निघून जाईल व वर घट्ट पदार्थ म्हणजेपनीर आपल्याला मिळेल. ते वर राहिलेले पनीर छान घट्ट पिळून घेणे. त्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे काढून टाकावा व ते मलाई कोफ्त्यासाठी वापरावे. हे पनीर वापरण्याआधी हाताने छान मळून एकसारखे करून घ्यावे.म्हणजे कोफ्ते सफाईदार होतील व तळताना तेलात विरघळणार नाही.
Malai Kofta-मलाई कोफ्ता कसे बनवतात.
- सुक्या मेवा उकडलेल्या बटाट्यासोबत तांदळाच्या पिठाचा व पनीरचा वापर करून केलेल्या पदार्थ. आपले भारतीय मसाले वापरून तयार केलेल्या ग्रेव्हीत तो मलाई कोफ्ता टाकून एक सुंदर व रुचकर अशी तयार केलेली डिश.
- वेलदोडे, दालचिनी, तमालपत्र, केशर असे उत्तम दर्जाचे सुगंधी व उत्तम स्वादाची मसाले वापरून ग्रेव्ही टाकून तयार केले जातात. तोंडात विरघळतील अशी मलाईदार चव याला येते.
- Malai Kofta-मलाई कोफ्ता म्हणजे वरून कुरकुरीत, खुसखुशीत व आतून छान मलाईदार बॉल्स तयार केले जातात.
- Malai Kofta-मलाई कोफ्ता कांदे व टोमॅटो थोडे काजु व मलाई म्हणजेच क्रीम किंवा दुधा वरची जाड साय पासून फेटुन मलाई तयार केली जाते.व ती मलाईपासून करी बनवली जाते.अशा प्रकारे बनवलेल्या करी मधे टाकून मलाई कोफ्ता वाढले जातात.
मलाई कोफ्ता कशा सोबत खाल्ली जाते.
Malai Kofta-मलाई कोफ्ता करी पोळी, जीरा राईस सोबत खाल्ली जाते.जर आपण हॉटेलमध्ये ही डिश मागवली तर आपल्याला मलाई कोफ्ता सोबत पराठा व नान हे पर्याय देतात.
साहित्य.
- कोफ्ते.
- चार बटाटे.
- पनीर पाव किलो.
- अर्धा चमचा लाल तिखट.
- एक चमचा धने पावडर.
- एक चमचा गरम मसाला.
- दोन ते तीन हिरव्या मिरच्या.
- चिमूटभर साखर.
- मैदा किंवा कॉर्नफ्लोअर गरजेनुसार.
- सहा ते सात काजूचे तुकडे व पाच ते सहा बेदाणे.
मसाले.
- चार ते पाच टोमॅटो.
- दोन कांदे.
- एक चमचा जिरे.
- एक छोटा तुकडा दालचिनी.
- तीन ते चार लवंगा.
- हिरवा वेलदोडा दोन ते तीन.
- काळी मिरी तीन ते चार.
- आले एक इंच.
- लसूण सहा ते सात पाकळ्या.
- काजु सात ते आठ.
- मगज बी एक चमचा.
- फ्रेश क्रिम अर्धी वाटी.
- मीठ.
ग्रेव्हीसाठी वाटण.
- एका जाड बुडाच्या कढईत थोडे तूप टाकावे.
- तूप टाकल्यावर त्यात जिरे घालावे.जिरे तडतडले कि दालचिनी, लवंगा, मिरे, वेलदोडा टाकावा.
- नंतर त्यात कांदा जाडसर चिरून टाका.कांदा उभा व जाडसर चिरावा.कांदा छान परतावा.
- टोमॅटो च्या मोठ्या फोडी कराव्या व त्या कढईत टाकाव्या.
- कांदा व टोमाटो पूर्णपणे शिजू द्यावे.पाच मिनिटे झाकण ठेवून द्यावे व छान वाफेवर शिजू घ्यावे.
- कांदा व टोमाटो पूर्ण मऊ झाले पाहिजे.
- नंतर त्यात आले,लसूण टाकावे व थोडे मीठ घालावे व छान शिजू द्यावे.झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटे शिजवाव.
- कांदा टोमॅटो शिजले की गॅस बंद करावा.
- हे मिश्रण पूर्ण शिजले कि दालचिनीचा तुकडा काढून टाकला तरी चालतो,कारण त्याचा अर्क मसाल्यात आलेला असतो.
- नंतर ग्रेव्हीचे चे मिश्रण गार झाल्यावर मिक्सर मधून बारीक वाटावा व चाळणीने चाळून घ्यावा.
- टोमॅटोची साले,व थोडे जाडसर राहिलेले मसाल्याचा चोथा निघून जाईल व ग्रेव्हीला छान चिकणेपणा येईल.
- चाळणीने चालणे गरजेचे आहे.
कोफ्ते कृती.
- Malai Kofta-मलाई कोफ्ता करतांना प्रथम बटाटे उकळून घेणे. बटाटे मऊ शिजवावे पण त्यात पाणी अजिबात नसावे.
- बटाट्यात जर जास्तीचे पाणी आले तर कोफ्ते करण्यासाठी गरजे पेक्षा जास्तीचे पीठे घालावे लागतील व त्यामुळे कोफ्त्यांची चव बिघडेल.
- बटाटे गार झाल्यावर बटाट्याची साले काढून बटाटे हातानेच कुस्ककरून घ्यावे.
- नंतर त्त्यात पनीर मिक्स करावे.पनीर छान मऊ करून घ्यावे किवा बारीक चाळणीने किंवा किसणीने किसून घ्यावे.
- बारीक केलेले पनीर छान मिक्स होते.पनीर व बटाट्याचे मिश्रण एकजीव करावे.
- गाठी राहणार नाही याची काळजी घ्यावी. गाठी राहिल्यास तेलात कोफ्ते फुटतात.
- नंतर त्या मिश्रणात हिरव्या मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरून घालावी. गरम मसाला, थोडे लाल तिखट घालावे.
- गरजेनुसार मीठ घालावे ,व नंतर कॉर्नफ्लोर घालावे ,व छान घट्ट गोळा बनवावा.
- गोळा छान मळून मऊ करून घ्यावा व त्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे.
- एक गोळा घेवून त्याला प्रथम वाटीसारखा आकार देवून त्यात काजूचे तुकडेघालावे.
- आपल्या आवडीप्रमाणे कोणताही सुकामेवा म्हणजे बदाम,किशमिश किंवा मावा व पनीर ही घालू शकतात.
- नंतर त्याचे गोल किंवा लांबट गोळे तयार करुन ठेवावे.कॉर्न फ्लोअर किंवा मैद्यात घोळवून घ्यावे.
- गोळे तयार झाले की एका कढईत तेल टाकावे. तेल तापल्यावर मध्यम आचेवर कोफ्ते तळावे.
- सुरवातीला एक एक कोफ्ता टाकावा.कोफ्ते टाकल्यावर लगेचच हलवू नये,नाहीतर कोफ्ते फुटण्याची शक्यता असते.
- Malai Kofta-मलाई कोफ्ता तळतांना मध्यम आचेवर करावा.तळताना कोफ्ते टाकल्यावर लगेच हालवू नये.असे केल्यास कोफ्ते विरघळतात.
- छान सोनेरी रंगावर तळून झाल्यावर काढाव.टिशू पेपरवर टाकावे म्हणजे जास्तीचे शोशलेले तेल निघून जाईल व कोफ्ते तेलकट होणार नाही.
ग्रेव्ही कृती.
- एका जाड बुडाच्या भांड्यात तूप टाकावे.
- तुप तापले की त्यात तयार केलेले वाटण घालावे व जरा परतावे फार परतू नये.
- आपण आधीच सगळे पदार्थ शिजवलेले असतात.
- नंतर त्यात एक चमचा लाल तिखट, गरम मसाला, हळद घालावी.
- मसाले जळणार नाही याची काळजी घ्यावी नाहीतर ग्रेव्ही चा रंग बदलतो.
- थोडा वेळ झाकण ठेवावे. मिश्रणाला थोडे तेल सुटले की चिमूटभर साखर घालावी.
- त्यात क्रीम घालावे (क्रीम नसेल तर साय छान फेटून घालावी) व झाकण ठेवून थोडावेळ थोडा वेळ झाकण ठेऊन वाफ आणावी.
- नंतर त्यात कोथिंबीर घालावी व थोडी कसुरी मेथी हातावर थोडी चुरून घ्यावीव वरून घालावी.
- कसुरी मेथी चुरून घातल्यामुळे तिचा सुगंध व स्वाद अजून वाढतो.गॅस बंद करावा व कोफ्ते घालावे.
- मलाई कोफ्ते आयत्या वेळेस घालावे. जास्त वेळ कोफ्ते ग्रेव्हीत राहिल्यास कोफ्ते विरघळून ग्रेव्हीत मिक्स होतात.
- हि ग्रेव्ही एक दिवस आधी करून हवा बंद डब्यात ठेवून फ्रीज मध्ये ठेवू शकतो.
टिप्स.
- बटाटे शिजवतांना प्रेशर कूकर मध्ये एका झाकणाच्या डब्यात बटाटे ठेवून शिजवले तर उत्तम,त्यामुळे बटाटे जास्त पाणी शोषून घेणार नाही व योग्य प्रकारे शिजवले जातील.
- मलाई कोफ्त्याची ग्रेव्ही मलाई दार व चवदार होण्यासाठी ग्रेव्ही साठी तयार केलेले मिश्रण चाळणीने चाळून घेणे फार आवश्यक आहे.
- ग्रेव्हीमध्ये कांद्याच्या प्रमाणापेक्षा टोमॅटोचे प्रमाण जास्त घ्यावे.म्हणजे दोन कांद्याला तीन ते चार टोमॅटो असावे टोमॅटो मुळे ग्रेव्हीला रंग व चिकणेपणा छान येतो.
- कांदा टोमॅटोचे मिश्रण तेलावर पूर्णपणे शिजू म्हणजेछान वाफवून घ्यावे.म्हणजे कांद्याचा उग्र वास व टोमॅटोचा आंबटपणा कमी होत.
- रंगासाठी लाल काश्मिरी मिरची पावडर वापरू शकतात.किंवा थोडा खाण्याचा लाल रंग हा पर्याय सुद्धा घेऊ शकतात.
- मलाई कोफ्ता या हा नावाप्रमाणेच मलाईदार चव आणण्यासाठी ग्रेव्हीमध्ये काजू पेस्ट घालावी काजू उपलब्ध नसल्यास मगज बी वापरू शकता किंवा चमचाभर पण एक अगदी बारीक किसून ग्रेव्हीमध्ये मिक्स करू शकतात.
- कोफ्ते बनवताना कोफ्ते तेलात विरघळणार नाही याची काळजी घ्यावी व कोफ्ते तळताना मध्यम आचेवर तळावे म्हणजे आतूनही छान तळले जातील.
FAQs.
प्रश्न १ :- मलाई कोफ्ता करताना विचार घट्टपणासाठी काय वापरू शकतो ?
प्रश्न २ :- मलाई कोफ्ता करताना कोणते पनीर वापरावे ?
उत्तर :- खरे तर पनीरची कुठलीही रेसिपी करताना घरी बनवलेले पनीर हे उत्तम ठरते परंतु जर ते शक्य नसेल तर आपण बाजार बाजारातून आणलेले पनीर वापरावे.