प्रत्येक ऋतूत वात पित्त कफ संतुलित ठेवेल असा Masala Tea/Chai-मसाला चहा रेसिपी.

Masala Tea-मसाला चहा हे जगभरात लोकप्रिय असलेले पेय आहे.असे म्हणतात चहाचा शोध चिन ने लावला. पण चीन पेक्षा भारतात Masala Tea-मसाला चहा  जास्त लोकप्रिय झाला आहे. चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात होतच नाही व चहा घेतल्याशिवाय कामाला सुरुवात करता येत नाही असे बरेच जण आहेत.चहा अनेक प्रकारात केला जातो साखरेचा चहा गुळाचा चहा, काळा चहा ब्लॅक टी,आयुर्वेदिक चहा हरबल Masala Tea-मसाला चहा.चहा शरीराला व मनाला तरतरी देतो.

MASALA-TEA
Read More : Chicken Biryani Recipe

थोडे चहा विषयी.

चहा म्हणजे विशिष्ट प्रकारच्या झाडाची वाढलेली पानांची पावडर व साखर एकत्र करून त्यामध्ये दूध घालून केलेले पेय म्हणजे चहा.जगातील चहा लोकप्रिय पेय आहे म्हणजे पाण्यानंतर सर्वात जास्त घेतले जाणारे पेय चहाच आहे. असे म्हणतात ही चहा हा चीन देशाकडून आपल्याकडे आला आहे. सर्वात प्रथम चिनी लोक चहा पीत असत.चहा मनाला व शरीराला तरतरी देणारा आहे. चहामुळे मेंदू व शरीर तात्काळ उत्तेजित होते. व्यक्तीला ताजेतवाने वाटू लागते.भारतात तर चहा हे आदरा तिथ्या चा एक भाग आहे.आपल्या देशात चहाचे उत्पादन घेतले जाणारे राज्य म्हणजे आसाम,दार्जिलिंग, हे आहेत.याच राज्यांमधून चहा देशभर पाठवला जातो. चहा बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात .चहा बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आपापल्या प्रांताप्रमाणे भागाप्रमाणे किंवा आहार शास्त्रच्या परंपरेप्रमाणे बघायला मिळतात.म्हणजे पंजाब प्रांतात बदाम पिस्ते व केशर घालून चहा बनवला जातो. तसेच अनेक भागात वातावरणानुसार त्यामध्ये घातले जाणारे पदार्थ हे वापरले जातात.चहामध्ये मुख्य घटक असतो तो चहा पावडर. चहाचे अनेक प्रकार आहेत.चहाचे उत्पादन साधारण थंड हवामान घेतले जाते.आपल्या देशात चहाचे उत्पन्न हे आसाम दार्जिलिंग निलगिरी डेहराडून या ठिकाणी घेतले जाते.तसेच प्रत्येक ठिकाणच्या चहा पावडरची चवही वेगवेगळी असते. प्रत्येक भागातल्या ऋतू व हवामानानुसार चहा केला जातो पण खास करून मसाला चहा हा सगळीकडे आवडीने घेतला जातो. तेच तसेच हल्ली शारीरिक समस्या वाढल्या आहेत त्यानुसार हर्बल टी, ग्रीन टी यासारखे चहा घेतली जातात. दुसरा पदार्थ चहा मध्ये दुसरा घटक म्हणजे साखर चहाला गोडवा आणणारी व शरीराला तात्काळ ऊर्जा देणारी आहे. नंतर घातले जाते ते दूध चहा पावडर व साखरेचे मिश्रण उकळल्यावर त्या मिश्रणाचे लज्जतदार स्वरूप मिळवण्यासाठी त्यात घट्ट दूध घातले जाते. मग तयार होतो तो अमृततुल्य चहा. पण काही जणांना चहा मुळे पित्ताचा त्रास होतो त्याला पर्याय म्हणून हर्बल टी घेतला जातो. म्हणजे यात वेगवेगळ्या प्रकारच्या औषधीयुक्त वनस्पती टाकून केला जातो.जसे तुळशीची पाने,पुदिन्याची पाने,गवती चहा व सुंठ,मिरे, वेलदोडा ज्येष्ठमध,जटामासी, दालचिनी,जायफळ असे अनेक प्रकारचे औषधी वनस्पती जी आपल्याला आजारांपासून संरक्षण देते.ज्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहते असे घटक टाकले जातात.

चहा घेतला की आळस पटकन निघून जातो व काम करण्याची ऊर्जा देतो. जसे चहाचे वेगवेगळे प्रकार आहेत तसाच पिनाऱ्यांचेही वेगवेगळे प्रकार आहेत . कुणाला मसाला चहा आवडतो तर कुणाला काळा चहा आवडतो. पित्त झाले असेल पोट जड झाले असेल व अपचन झाल्यासारखे वाटत असेल तर अशा वेळेस हर्बल टी आपल्यासाठी धावून येतो.थंडीत मस्त मसाला चहा घेतला जातो. पावसाळ्यातील भिजून आल्यावर चहा घेतल्याशिवाय शरीराला ऊर्जा मिळत नाही. उन्हाळ्यात हर्बल टी किंवा ब्लॅक टी ला जास्त पसंती दिली जाते. हर्बल टी म्हणजेच आयुर्वेदिक चहा हा वेगवेगळ्या प्रकारात केला जातो. अगदी आपले हळद जिरे, मिरे वेलदोडा, सुंठ , दालचिनी, आले, लिंबू हे मसाल्याचे पदार्थ वापरून हा चहा,(Tea) बनवला जातो.कधी तुळशीची पाने घालून कधी पुदिण्याची पाने घालून कधी गवती चहा(Tea) घालून चहाचा वेगवेगळा स्वाद तयार केला जातो. चहाला अगदी अमृताची उपमा दिली जाते. अमृततुल्य असे म्हटले जाते. चहा पिण्यासाठी अगदी काहीही कारण पुरते कधी पाऊस पडतोय ,म्हणून तर कधी थंडी वाजते म्हणून ,तर कधी सहजच गप्पा रंगल्या आहेत मित्रमंडळी जमली म्हणून. कॉफीपेक्षा चहा केव्हाही उत्तम. चहाची लोकप्रियता तर केवढी 15 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून ओळखला जातो.याच चहाचे आपण आज वेगवेगळे प्रकार व बनवण्याची पद्धत पाहणार आहोत. सर्व प्रथम चहाचा मसाला कसा बनवायचा ते बघु.

मसाला चहा साहित्य.

आपल्या माहितीतलेच पदार्थ वापरून हा मसाला तयार केला जातो.

  • सुंठ 50 ग्रॅम.
  • जायफळ एक.
  • हिरवा वेलदोडा पंधरा ते वीस ग्रॅम.
  • लवंगा दहा ते बारा.
  • दालचिनी बोटभर लांबीच्या दोन काड्या.
  • मिरे एक चमचा.
  • बडीशोप एक चमचा. बडीशोप ने चहाला छान स्वाद येतो.

Masala Tea

मसाला चहा बनवताना एका कपासाठी पाव चमचा मसाला घालावा. स्वादिष्ट सुगंधी पाचक व ऊर्जा देणारा चहा तयार होतो.

मसाला चहा कृती.

चहाचा मसाला बनवताना प्रथम एक पॅन गरम करायला ठेवावे. पॅन गरम झाल्यावर त्यात सर्व मसाल्याचे साहित्य टाकून अगदी थोडा वेळ गरम करून घ्यावे. खडा मसाला जास्त वेळ गरम करू नये.गरजे पेक्षा जास्त वेळ गरम केल्यामुळे मसाल्याचा वास फार काळ टिकत नाही. मसाले बारीक फिरवले जातील इतपतच गरम करावे.सर्व मसाले गरम झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक फिरवून घ्यावे व एका हवाबंद बरणीत भरून ठेवा.
Masala Tea
  • मसाला चहा बनवताना प्रथम एका भांड्यात अर्धा कप पाणी घालावे.
  • त्या नंतर त्या पाण्यात दोन चमचे साखर घालावी.
  • नंतर पाव चमचा चहाचा मसाला घालावा व एक मिनिट भर चहा उकळू द्यावा.
  • नंतर त्यात एक चमचा चहा पावडर घालून परत उकळू द्यावे.
  • नंतर चहा मधे गरम केलेले दुध घालावे. व थोडा वेळ उकळू द्यावे.
  • चहा उकळ ल्यावर कपात गाळून घ्यावा.

Masala Tea

MASALA TEA-मसाला चहाचे फायदे.

  • MASALA TEA-मसाला चहा वेलदोडा,दालचिनी,सुंठ, मिरे,जायफळ, बडीशेप,लवंगा घालून मसाला तयार केला जातो व चहासोबत उकळून घेतला जातो.हे सगळे पदार्थ शरीराला उत्तम आरोग्य देणारे व पचनशक्ती वाढवणारे आहेत. तसेच सर्दी खोक ला व औषधांपासून लांब ठेवणारे आहेत. तसेच प्रतिकारशक्ती वाढवणारे आहे.

Herbal Tea-आयुर्वेदिक चहा.

Herbal Tea-आयुर्वेदिक चहा कसा बनवतात एका भांड्यात गरजेप्रमाणे पाणी उकळून त्यात औषधी वनस्पती टाकले जाते. साधारण एक कप चहासाठी पाव चमचा ते अर्धा चमचा वनस्पतींची कोरडी पावडर टाकली जाते. नंतर पाणी उकळल्यावर त्यात आवडत असल्यास साखर घातली जाते काही व्यक्ती बिना साखरेचा चहा घेतात. त्याला काढा म्हटले जाते. साखर विरघळल्यानंतर त्यात दोन ते तीन चिमूट चहा पावडर घालून उकळून घेतात.कुठल्याही प्रकारचा चहा किंवा काढा हा गाळूनच घेतला जातो.हर्बल टी साठी वाळलेल्या औषधी वनस्पतींची पावडर वापरली जाते. कारण कोरडी पावडर साठवणुकीला सोपी असते.क्वचित वेळा ओल्या वनस्पती वापरल्या जातात. पावसाळ्यात बऱ्याच वेळा सर्दी तापाचा त्रास होतो. घशात खवखव जाणवते. अशा वेळेस आयुर्वेदिक घेता येतो.आयुर्वेदिक चहा दोन प्रकारे तयार करता येतो ते आपण बघूया.

MASALA-TEA

प्रकार.

  • Herbal Tea-आयुर्वेदिक चहा बनवतांना प्रथम एका भांड्यात चार कप पाणी घ्या.
  • त्या पाण्यात थोडासा गवती चहा घाला.नंतर त्यात अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घाला.
  • नंतर एक इंच दालचिनीचा तुकडा घाला व थोडी तुळशीची ताजी पाने घाला.
  • हे सर्व साहित्य एकत्र करून मंद आचेवर उकळून घ्यावे.
  •  हा काढा एक कप उरला की चवीपुरती साखर घालावी.व गरम गरम प्यावा. लगेचच बरे वाटते.

टीप.

  • तुळशीची पाने वापरताना मंजिऱ्या नसलेल्या तुळशीची पाने वापरावी. ती जास्त परिणामकारक असतात.

प्रकार २.

  • नीट भूक लागत नसेल,पोटात जडपणा जाणवत असेल, गॅसेसचा त्रास होत असेल, तर असा चहा करावा.
  • प्रथम एका भांड्यात एक कप पाणी घ्यावे.नंतर त्या एक कप पाण्यात चमचाभर साखर घालावी.
  • नंतर त्या पाण्यात एक इंच भर आल्याचा तुकडा किसून घालावा .
  • नंतर त्यात एक चिमूटभर हळद घालावी.व जिऱ्याची पूड  घालावी.लगेचच अर्धी चिमूट मिरीपूड घालावी.
  • चिमुटभर सैंधव मीठ मिसळून उकळण्यास ठेवावे.
  • पाण्याला उकळी आली  की गॅस बंद करून दोन मिनिटांसाठी झाकून ठेवावे.
  •  नंतर त्यात दोन-तीन थेंब लिंबाचा रस पिळून गाळून घ्यावे.
  • गरम असतानाच घोट घोट घ्यावा. लगेच आराम पडतो व तोंडाला चव येते.

प्रकार ३.

उन्हाळ्यात जवळजवळ आपल्या सर्वांनाच थोड्याफार प्रमाणात उन्हाचा त्रास होत असतो अशा वेळी काय करावे हे सुचत नाही प्रत्येक वेळी घरात औषधी असतातच असे नाही.अशा वेळी उत्तम उपाय म्हणजे हा काढा आपला त्रास कमी करू शकतो.चला तर बघू कसा बनवायचा ते.

  •  प्रथम एका भांड्यात एक कप पाणी घ्यावे.नंतर एक कप पाण्यात पाव चमचा धणे घालावे ,पाव चमचा जिरे घालावे, व अर्धा चमचा बडीशोप घालावी.
  • हे सर्व साहित्य थोडे जाडसर कुटून घालावे व मिश्रण मंद आचेवर उकळावे.
  • मिश्रण उकळले की गॅस बंद करावा व थोडा वेळ झाकण ठेवावे.
  • नंतर गाळून घ्यावे व कोमात झाल्यावर घोट घोट प्यावे.
  • चवीसाठी साखर घालू शकता. हा चहा उन्हाळ्यात नेहमी घेतल्यास आपला उन्हाळा सुसह्य होतो.उन्हाचा त्रासहि  होत नाही.

टीप.

  • काहींना उन्हाळ्याचा ( उन्हाळी) त्रास होतो. लघवीला साफ होत नाही. अशा वेळेस खाली दिल्या प्रमाणे आयुर्वेदिक  चहा घ्यावा.

प्रकार ४.

उन्हाळा म्हंटले कि सगळ्या पचनाच्या समस्या उद्भवतात म्हणजे पित्त होणे. हे पित्तच सगळ्या समस्यांचे मूळ  कारण असते.जसे भुक मंदावणे,डोके दुखणे,मळमळ होणे अशा या पित्तासाठी घरीच व तात्काळ उपाय म्हणजे हा चहा आहे.हा चहा कसा बनवायचा ते बघू.

  • प्रथम एका पातेल्यात एक कप पाणी घ्यावे.नंतर एक कप पाण्यात एक चमचा साखर घालावी.
  • नंतर त्या पाण्यात अर्धा इंच आले किसून छान उकळून घ्यावे.
  •  पाणी उकळल्यावर एका कपात गाळून  घ्यावे.गाळून झाल्यावर त्यात सात ते आठ लिंबू रसाचे थेंब टाकावे.
  •  गरम असतानाच घोट घोट प्यावा पित्त लगेच थांबते. भूक लागते
  • हा चहा म्हणजे पित्तावर अतिशय उत्तम उपाय आहे..

टीप.

  • लहान मुले वारंवार आजारी पडतात . अपचनामुळे भूक न लागणे ,जेवण आवडीने न खाणे ,पोट साफ न होणे ,अशी लक्षणे असतात .तेव्हा त्यांना बडीशोप घातलेला आयुर्वेदिक चहा पाजावा.
  • कपभर कडकडीत पाण्यात पाव चमचा जाडसर कुटलेली बडीशेप घालावी व पंधरा मिनिटांनी गाळून घेऊन ती कोमट असताना प्यायला द्यावी पचन सुधारते. भुक लागते.

Herbal Tea-आयुर्वेदिक चहाचे फायदे.

  • Herbal Tea-आयुर्वेदिक चहाचे फायदे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
  • Herbal Tea-आयुर्वेदिक चहा हा पचन सुधारणे व आतडे जे आरोग्य मजबूत करण्यासाठी घेतला जातो. त्यामुळे आपले रोग प्रतिकार शक्ती वाढते. Herbal Tea-आयुर्वेदिक चहा साधारण उन्हाळ्यात जास्त घेतला जातो.
  • रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणता चहा चांगला.
  • रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी चहा मध्ये हळदीचा चहा, आल्याचा चहा,पुदिना चहा आणि असेच अनेक प्रकारचे चहा असतात.
  • हर्बलच्या आणि नियमित चहा मध्ये काय फरक.
  • नियमित चहा मध्ये चहा पावडर दूध व साखर असते ज्यामुळे तरतरी येते पण काही वेळेस पित्त वाढू शकते.हर्बल टी संपूर्णपणे आरोग्याला फायदेशीर ठरतो हरबल टी मध्ये औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती घातल्या जातात, त्यामुळे त्यांचे गुणवत्ता खूप पटीने वाढते.

FAQs

प्रश्न १ :- जेवण झाल्यावर लगेच चहा घेतात का ?

उत्तर :- आयुर्वेद तज्ञांच्या मतानुसार जेवणानंतर लगेच चहा घेतल्याने आपल्या पचन संस्थेचे कार्य बिघडते व अन्नातील लोह शरीरात कमी शोषले जाते.त्यामुळे आपले हिमोग्लबिन कमी होण्याचा संभव असतो.

प्रश्न २ :- मसाला चहा रोज घेणे योग्य आहे का ?

उत्तर :- मसाला चहा थंडीच्या दिवसात रोज घेता येतो तसेच पावसाळ्यात दमट हवामान असते त्यामुळे आपले पचन मंद होतेअशा ऋतूत मसाला चहा रोज घेणे योग्य ठरु शकते पण उन्हाळ्यात घेतल्याने उष्णता वाढून              पित्त वाढू शकते.

प्रश्न ३ :- हर्बल टी घेतल्याने वजन कमी होते का ?

उत्तर :- होय कारण हरबल टी घेतल्याने पचन व्यवस्थित होते व त्यामुळे आपल्या शरीरात जीवन सत्वे योग्य प्रमाणात शोषले जातात. त्यामुळे आपल्या शरीरात मेद वाढत नाही. व वाढलेला मेद कमी होतो.म्हणूनच                  हर्बल टी घेतल्याने वजन वाढत नाही.

Leave a comment