Palak Paneer -पालक पनीर: आपल्या आरोग्याची चविष्ट कथा

Palak Paneer-पालक पनीर ही पंजाबी डिश आहे परंतु आता महाराष्ट्रातच काय तर अगदी सगळीकडे आवडीने बनवली जाते पालक पनीर व आपल्या घरातील रोजच्या वापरातील काही मसाले घालून ही डिश बनवली जाते चवीसाठी त्यात क्रीम वापरले जाते.

PALAK-PANEER
Read More : Schezwan Sauce

पालक विषयी.

पालक म्हणजे एक आपल्याकडे अगदी नेहमी मिळणारे जीवनसत्वांनी भरलेली पालेभाजी. पालकमध्ये भरपूर कॅल्शियम विटामिन तसेच लोह असते तसेच बीट वेल ह्या जीवनसत्व असाही उत्तम स्रोत मानले जाते. B12 हे विटामिन कमी असणाऱ्यांना पालक खाल्ल्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो.पालक हि आपल्याकडे वर्षभर मिळणारे हिरवी पालेभाजी आहे भरपूर पोषक तत्वे असलेली ही पालेभाजी चवीमुळे बरेच जण खाणे टाळतात परंतु पालकमध्ये भरपूर कॅलरीज, प्रोटीन्स, फायबर्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम अशी अनेक पोषक तत्व असतात. जे आपल्या शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते तसेच पालक मधील फायबर वजन वाढीसाठी वजन वाढ टाळण्यासाठी उपयुक्त ठरते. कॅल्शियम हाडांचा मजबुती देते. पालक मधील पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते व ते हार्ट साठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. तसेच डोळ्यांसाठी ही पालक अतिशय महत्वाची ठरते. वजन कमी करणाऱ्यांसाठी तज्ञ पालक खाण्याचा सल्ला देतात.पालकची पाने व मऊ देठ हे खाण्यासाठी उपयुक्त मानले जात. याच पालक मध्ये डाळ घालून डाळ पालक,बटाटा किंवा डाळीचे पीठ घालुन किंवा  ताक घालून ताकातली पालक. असे वेगवेगळे पदार्थ घालून चविष्ट भाज्या बनवल्या जातात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे Palak Paneer-पालक पनीर.

पनीर विषयी.

पनीर हे दुधापासून बनवले जाते त्यामुळे पनीर सुद्द्धा पोषक तत्वांयुक्त आहारात गणले जाते.पनीर मध्ये कॅल्शिअम व फोस्फारस असते जे आपल्या हाडांसाठी अतिशय महत्वाचे असते .पनीर हे फक्त चवीला च नाही तर आरोग्यासाठी सुद्धा चांगले असते .पनीर दुधापासुनचतयार केले जाते त्यामुळेच त्यात भापूर प्रथिने असतात.पनीर पासून सुद्धाअनेक पदार्थ केले जातात ,जसे पनीर पराठा,पनीर भुर्जी,मटार पनीर सारखे डिश बनवल्या जातात.त्याच प्रमाणे आपण आज एक प्रथिनांयुक्त डिश पाहणार आहोत ती म्हणजे Palak Paneer-पालक पनीर.

पालक व पनीर या दोन्ही पदार्थांमुळे ही डिश अतिशय समृद्ध बनते.Palak Paneer-पालक पनीर कशी बनवावी तेच आपण पाहणार आहोत.

साहित्य.

  • 200 ग्रॅम पालक साधारण एक लहान जुडी येईल.
  • 150 ग्रॅम ताजे पनीर .
  • एक छोटा टोमॅटो.
  • एक छोटा कांदा.
  • अर्धा चमचा जिरे .
  • दोन चमचे आले लसणाची पेस्ट.
  • तीन-चार हिरव्या मिरच्या.
  • एक ते दीड चमचे धने व जिरेपूड.
  • थोडी कसुरी मेथी.
  • एक वेलची.
  • एक छोटा तुकडा दालचिनीचा.
  • दोन ते तीन लवंगा.
  • एक तेजपान .
  • फोडणीसाठी तेल.
  • मीठ चवीनुसार.
  • एक चमचा लाल तिखट.

कृती.

  • Palak Paneer-पालक पनीर बनवतांना प्रथम पालक स्वच्छ निवडून धुवून घ्या. जुडी असेल तर पालकाची पाने व कोवळी देठ व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घ्या. एका चाळणीत निथळत ठेवा पाणी निथळल्यावर पालक अगदी बारीक चिरून घ्यावा.
  • आता एका पॅनमध्ये थोड्या तेलावर थोडी हळद घालून फोडणी करावी व त्यात पालक टाकून शिजवून घ्यावा.
  • पालक टाकल्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवू नये म्हणजे पालकाचा रंग हा छान हिरवा राहतो .थोड्यावेळाने झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यावा.
  • आता पालक शिजला हे बघावे व नंतर गॅस बंद करून झाकण शिजलेला पालक थंड होण्यासाठी ठेवून द्या.
  • आता पालक थंड झाल्यावर मिक्सरमधून पालकाची छान प्युरी तयार करून घ्यावी.
  • तसेच पालकप्युरी तयार करण्याची दुसरी पद्धत म्हणजे निवडलेला पालक हा एका भांड्यात पाणी घालून छान दोन ते तीन मिनिटांपर्यंत उकळून घ्यावा व गार झाला हे पाणी निथळून पालकाची मिक्सर मधून प्युरी काढून घ्यावे. दोन्ही पद्धतीने आपण प्युरी तयार करू शकतो.
  • आता एका बाजूला पनीर स्वच्छ धुऊन त्याचे आपल्या आवडीच्या आकारात छोटे छोटे तुकडे करून घ्यावे व मंद आचेवर ते छान तांबूस रंगावर तळून घ्यावे.
  • तळलेले पनीर भाजीमध्ये व्यवस्थित राहतात . आवडत असल्यास कच्चे पनीर घालावे परंतु ते भाजीत मिक्स होण्याची शक्यता असते.
  • आता एका बाजूला कांदा व टोमॅटो छान बारीक चिरून घ्यावे. तसेच आले लसूण पेस्ट तयार करून घ्यावी व हिरवी मिरची आवडत असल्यास पेस्ट करावी किंवा तुकडे करून घालावे.
  • आता एका पॅनमध्ये थोडे फोडणीसाठी तेल टाकावे व त्यात खडा मसाला घालावा. मसाला वेलची ,तेज पान, दालचिनी हे सगळे एक मिनिट पर्यंत थोडे परतून घ्यावे म्हणजे त्यात मसाल्याचा छान वास येतो.
  • नंतर त्यात जिरे घालावे जिरे तडतडले की त्यात कांदा घालावा व छान तांबूस रंगावर परतून घ्यावा.
  • नंतर त्यात टोमॅटो घालावा व थोडे मीठ घालून झाकण ठेवून टोमॅटो मऊ शिजेस्तोर परतून घ्यावा.
  • नंतर टोमॅटो परतून झाल्यावर आले लसूण पेस्ट ,हिरवी मिरची चे तुकडे ,लाल तिखट ,धने जिरे पूड घालावी व छान बाजूने तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे .मसाला करपणार नाही याची काळजी घ्यावी.
  • नंतर त्यात पालक भाजी तयार केलेली प्युरी घालावी व आपल्या आवडीप्रमाणे थोडे पाणी घालावे फार पाणी घालू नये.व पाच ते सात मिनिटापर्यंत शिजू द्यावे.
  • एक उकळी आली की त्यात तळलेले पनीरचे तुकडे घालावे व एक दोन तीन मिनिटांनंतर गॅस बंद करावा. वरून स्वादासाठी कसुरी मेथी घालावी.
  • आवडत असल्यास पालक पनीर मध्ये फ्रेश क्रीम घालू शकतो.

टीप.

  • Palak Paneer-पालक पनीर साठी पालक हा ताजा व स्वस्छ असावा म्हणजे भाजीला छान चव व रंग येतो.
  • पालेभाज्या नेहमी स्वच्छ धुवून घ्याव्या कारण पालेभाज्यांवर कीटक नाशकांची फवारणी असण्याची शक्यता जास्त असते.
  • पालक आधी थोडा वेळ मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावा,नंतर नळाखाली स्वच्छ धुवून घ्यावा.
  • पालक सोबत नेहमी टोमाटो वापरावा कारण टोमाटो मधील विटामिन सी हे पालकाच्या भाजीमधील लोह शोषून घेण्यास उपयुक्त ठरते.
  • तसेच पालक पनीर साठी पनीर ताजे वापरावे घरी तयार केलेले पनीर वापरले तरी चालेल.
  • पनीर प्रथम धुवून घ्यावे .
  • पनीर तळतांना मंद ते मध्यम आचेवर तळावे.
  • पनीर टाकल्यानंतर भाजी फार वेळ उकळू नये,पनीर विरघळन्याची शक्यता असते.

Leave a comment