Paneer Masala-पनीर मसाला ही डिश बटर पनीर व आपले नेहमीचेच वापरात येणारे कांदा टोमॅटो व घरातले मसाले वापरून तयार केलेली एक डिश. पनीर मटर मसाला ही एक अत्यंत लोकप्रिय डिश आहे. प्रत्येक हॉटेल रेस्टॉरंट मध्ये आपल्याला Paneer Masala-पनीर मसाला मिळते. तसे तर हल्ली सगळ्याच रेसिपी मध्ये बटर वापरले जाते. स्ट्रीट फूड साठी तर बटर, चीज याशिवाय रेसिपीज तयार होत नाही. परंतु पनीर बटर मसाल्यामध्ये बटर व पनीर खूप छान लागतात. Paneer Masala-पनीर मसाला म्हणजे पनीरहे बटर मध्ये मिक्स करून ग्रेव्ही तयार केली जाते. त्याच सोबत आपले मसाले व काही सॉस वापरून Paneer Masala-पनीर मसाला तयार केली जाते. घरी सुद्धा आपल्याला हे रुचकर डिश बनवता येतेपनीर हे दुधापासून तयार केलेला पदार्थ आहे. जेवढे दुध शरीरासाठी उपयुक्त आहे, तेवढेच पनीर देखील उपयुक्त आहे. पनीर मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, काल्शियाम असतात. ज्या व्यक्तींना मांसाहार चालत नाही अशा व्यक्तींना पंनेर खाऊन आवश्यक पोषण मिळते. पनीर वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकतो जसे कि पनीर टिक्का, पनीर पराठा व पनीर बटर मसाला इत्यादी. आज आपण Paneer Masala-पनीर मसाला रेसेपी.
थोडे Paneer Masala-पनीर मसाला विषयी.
Paneer Masala-पनीर मसाला मध्ये मुख्य घटक पनीर असतो. पनीर बटर मसालाही टोमॅटो, कांदा, व बटर म्हणजेच लोणी हे पदार्थ एकत्र आणून तयार केली जाते. ग्रेव्हीला छान मलाईदार चव येण्यासाठी व थोडी गुळ चट चव येण्यासाठी काजू व थोडे क्रीम वापरले जाते. पनीर बटर मसाला ह्या डिशमध्ये बटर हे पदार्थाला चव आणणारा मुख्य घटक आहे. बटर हे फक्त शाकाहारी पदार्थातच नाही तर मांसाहारी पदार्थांमध्ये सुद्धा वापरले जाते. बटरमुळे पदार्थाची चव खूप छान लागते. पनीर हे दुधापासून तयार केले जाते व पनीर पासून बऱ्याच डिश केल्या जातात. जसे पालक पनीर, मटार पनीर, पनीर भुर्जी, पनीर पुलाव, पनीर कोफ्ते, पनीर पराठाअशा डिश केल्या जातात. त्याच पनीर मध्ये लोणी व क्रीम घालून पनीर बटर मसाला तयार करतात. बटर म्हणजे आपले घरचे लोणी. त्यालाच बटर म्हटले जाते. लोणी हे घरी सुद्धा तयार केली जाते. बाजारात मिळणारे बटर मध्ये थोडी मिठाची चव असते. आपण या पदार्थासाठी घरी तयार केलेले लोणी वापरू शकतो. क्रीम म्हणजे दुधावरची मलाई. ही मलाई हल्ली बाजारात तयार मिळते ह्याच त्या मलई मध्ये काही रिझर्व्हेटिव्ह घालून तयार केलेली व त्यालाच क्रीम असे म्हटले जाते. परंतु क्रीम नसेल तर आपण घरच्या दुधाची साय छान फेटून घेऊन तीही क्रीमच्या जागी घालू शकतो. क्रीम मुळे पदार्थाला छान मलाईदार चव येते. Paneer Masala-पनीर मसाला कशी बनवतात Paneer Masala-पनीर मसाला या भाजीत मुख्य घटक पनीर व बटर असते. बटर म्हणजे लोणी आपण आपले घरी तयार केलेले लोणी सुद्धा वापरू शकतो. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पनीर. पनीर दुधापासून तयार होणारे पनीर वापरले जाते.काही ठिकाणी सोया पनीर म्हणजेच सोयाबीन दुधापासून केलेले पनीरही वापरले जाते. दोन्ही प्रकारचे पनीर बाजारात सहज उपलब्ध होते. ते आपण वापरू शकतो किंवा घरीच तयार करू शकतो. पनीरचे छोटे छोटे चौकोन तुकडे करून ते मसाल्यात व बटर मध्ये मिक्स केले जातात.त्यासाठी ग्रेव्ही तयार केली जाते. ग्रेव्हीसाठी टोमॅटो काजू किंवा कांदे वापरले जातात. ग्रेव्हीसाठी मुख्य घटक म्हणून टोमॅटोचा वापर केला जातो. ग्रेव्हीसाठी छान पूर्ण पिकलेले लाल रंगाची ताजी टोमॅटो वापरले जातात. सहसा कमी आंबट असलेले टोमॅटो वापरावे. म्हणजे चव छान येते. आंबट टोमॅटो ने ग्रेव्हीची चव बदलू शकते. टोमॅटो उपलब्ध नसतील तर बाजारात मिळणारे टोमॅटो प्युरी वापरली तरी चालेल. टोमॅटो प्युरी काजू पेस्ट घालून ग्रेव्ही तयार करतात. काजू ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी व ग्रेव्हीला चिकणेपणा येण्या साठी तसेच टोमॅटोच्या आंबटपणाचा समतोल राखण्यासाठी काजू पेस्ट वापरली जाते. काजू पाण्यात भिजवून त्याची पेस्ट तयार करतात. काजू उपलब्ध नसतील तर काजू ऐवजी मगज बी किंवा बदाम भिजवून व त्याची पेस्ट करून वापरू शकतो. पनीर बटर मसाल्यासाठी थोडे क्रीम वापरले जाते. बाजारात सहज उपलब्ध होते. क्रीम नसेल तर घरच्या दुधाची वाटीभर साय छान फेटून घ्यावी व ती क्रीम ऐवजी वापरावी. किंवा थोडी मिल्क पावडर ही वापरू शकतो. पनीर बटर मसाला ग्रेव्हीसाठी टोमॅटो सोबत थोडा कांदा वापरता येतो. कांदा आवडत नसेल तर तो टाळू शकतात. Paneer Masala-पनीर मसाला डिश क्रीम बटर च्या खूप छान चवीमुळे तिला वेगळेपण मिळते. याचबरोबर या ग्रेव्हीत आपले घरचे मसाले ह्या डिशची चव वाढवतात.
ग्रेव्ही मसाला कसा करतात.
कांदे व टोमॅटोच्या फोडी करून त्या बटरमध्ये वाफवून घेतल्या जातात.कांदा टोमॅटो वाफवताना त्यात तमालपत्र, दालचिनी, व वेलदोडा स्वाद उतरण्यासाठी घालतात. कांदा टोमॅटो सोबत तोही शिजवला जातो. सगळे साहित्य पूर्ण शिजल्यावर त्याची पेस्ट केली जाते. त्या पेस्टमध्ये वेलदोडा तमालपत्र दालचिनीचा स्वाद उतरलेला असतो त्यामुळे मिक्सरमधून फिरवण्याआधी ते मसाले काढून घ्यावे. हे सगळे साहित्य मिक्सर मधून बारीक वाटून घेतले जाते. व हे सगळे मसाले तुपात किंवा बटर मध्ये घालून छान वाफवली जातात. त्यापासून ग्रेव्ही तयार केली जाते. हे साहित्य परतवून ग्रेव्ही तयार केली जाते. त्या ग्रेव्हीत आपले मसाले घालून व पनीर तुपात तळून मिक्स केले जाते.
लोणी घरे कसे काढले जाते.
जर घरचे लोणी वापरायचे असेल तर आपली रोजचे दूध तापवून त्यावर येणारी साय ही म्हणजे एक प्रकारचे स्निग्ध पदार्थ असतात हीच साय आपण एका भांड्यात जमा करावी. आठ ते दहा दिवसानंतर त्या साईला दह्याचे विरजण लावावे साधारण आपल्या सोयीनुसार साय साचली की लाकडी रवीच्या साह्याने फिरवून छान घुसळले जाते. आता बाजारात इलेक्ट्रिक रवी किंवा ब्लेंडर उपलब्ध असतात ते आपण वापरू शकतो. त्यामुळे आता आपणइलेक्ट्रिक ब्लेंडर किंवा मिक्सरच्या साह्याने लोणी काढतो. मिक्सर मधून काढायचे असल्यास. मिक्सरच्या भांड्यात साय टाकून थोडे पाणी घालावे व थोडा वेळ थोडे फिरवल्यानंतर त्यात लोण्याचा गोळा तयार होतो. तो बाजूला काढून घ्यावा. तो लोण्याचा गोळा दोन ते तीन वेळा गार पाण्याने धुऊन घ्यावा. म्हणजे त्याचा आंबटपणा निघून जातो व त्याला छान चव येते. त्यानंतर ते लोणी आपण आपल्या कुठल्याही पदार्थासाठी वापरू शकतो.
साहित्य.
- पनीर पाव किलो.
- टमाटे सहा.
- कांदे 3.
- लवंगा चार.
- दालचिनी अर्धा इंच.
- वेलची एक.
- आले एक इंच.
- लसुन सात आठ पाकळ्या.
- काजू 10 ते 15.
- मगज बी एक चमचा पाण्यात भिजवून वाटून घेणे.
- दही पाव वाटी.
- फ्रेश क्रीम किंवा साय तीन-चार चमचे.
- लाल तिखट गरजेनुसार किंवा लाल मिरच्या.
- मिठ गरजे नुसार.
ग्रेव्ही मसाला.
- टोमॅटो धुऊन त्याच्या मोठ्या फोडी कराव्यात.
- तसेच कांदे जाड चिरून घ्यावे. एका कांद्याच्या चार ते पाच फोडी कराव्यात.
- एका पॅनमध्ये तूप टाकावे तुपात आले, लसूण, मिरच्या, लवंगा, दालचिनी ,वेलची टाकावी. थोडावेळ परतावे.
- नंतर चिरलेले कांदे टोमॅटो काजू घालावे. कांदा टोमॅटो छान शिजू द्यावे. काजू जास्त परतू नये.
- सगळा मसाला छान मऊ होईस्तोवर झाकण ठेवून शिजू द्यावा. पंधरा ते वीस मिनिटात मसाला छान तयार होतो. मसाला शिजल्यावर गॅस बंद करावा व गार झाल्यावर मिक्सर मधून छान बारीक वाटून घ्या.
- मसाला बारीक वाटला गेला नसेल तर चाळणीने चाळून घ्यावा. म्हणजे ग्रेवीसाठी छान मलाईदार वाटण तयार होईल.
कृती.
- Paneer Masala-पनीर मसाला करतांना प्रथम पनीर स्वच्छ धुवून ठेवावे व त्याचे छान चौकोनी तुकडे करून घेणे.
- मीठाच्या पाण्यात 15 ते 20 मिनिटे बुडवून ठेवावे.मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे पनीर छान हलके होते व भाजी टाकल्यावर छान मुरते.
- पनीर तळून घालायचे असल्यास तळून ठेवावे. तळून घालायचे असल्यास मिठाच्या पाण्यात ठेवले नाही तरी चालतात.
- Paneer Masala-पनीर मसाला करतांना एका भांड्यात तूप टाकावे.
- तूप तापले की त्यात आपण तयार केलेला मसाला टाकावा.
- मध्यम आचेवर पाच ते सहा मिनिटे छान परतून घ्यावा.
- मसाल्याला सर्व बाजुने तेल सुटे पर्यंत परतावा. थोडा वेळ झाकण ठेवावे.
- मसाल्याला सर्व बाजुने तेल सुटले की त्यात क्रीम मिक्स करावी. क्रीम नसेल तर आपल्या घरात असलेली साय फेटून घ्यावे व ती घालावी.
- नंतर त्यात काजू पेस्ट घालावी. काजू पेस्ट नसेल तर मगज बी चि पेस्ट घालून एक उकळी आणावी.
- दोन मिनिटे परतावे व त्यात पनीरचे तुकडे घालावे व झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्यावे. पाच मिनिटांनी गॅस बंद करावा.
टिप्स.
- Paneer Masala-पनीर मसाला रेसिपीसाठी पनीर वापरताना उत्तम दर्जाचे व ताजे पनीर वापरावे शक्य असेल तर पनीर घरीच बनवले तर उत्तम.
- Paneer Masala-पनीर मसाला कच्चे पनीर वापरले तरी चालते परंतु आवडत असल्यास आपण पनीर तळून घालू शकतो.
- टोमॅटो हा मुख्य घटक असल्याने किंचित गोड चव असलेले पिकलेले व लाल रंगाचे टोमॅटो वापरावे पिकलेले टोमॅटो उपलब्ध नसल्यास त्याऐवजी बाजारात मिळणारी टोमॅटो प्युरी वापरली तरी चालेल.
- कांदा व टोमॅटो गोल्डन रंगावर परतावा जेणे करून टोमॅटोचा आंबटपणा पूर्णपणे निघून जाईल व टोमॅटोचा छान गोड स्वाद येईल टोमॅटो शिजवताना मऊ शिजले पाहिजे.
- खडे मसाले वापरताना उत्तम दर्जाचे व ताजे असावे जेणेकरून त्याचा सुगंध भाजीला येईल.
- काजू पेस्ट करताना काजू 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवावे म्हणजे पेस्ट एकदम मलाईदार येईल व ग्रेव्हीला छान घट्टपणा येईल.
- ग्रेव्हीला सुंदर लाल रंग येण्यासाठी टोमॅटो पूर्ण लाल पिकलेले असावे व तसेच रंगासाठी लाल काश्मिरी मिरची पावडर वापरावी.
पनीरचे फायदे.
- पनीर मध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप असते.
- त्याच बरोबर कॅल्शियम, फॉस्फरसचे देखील जास्त असल्यामुळे व्यायाम करणाऱ्या व्यक्तीसाठी देखील खूप उपयुक्त असतात.
- स्नायूच्या व हाडांच्या आरोग्यासाठी व वाढीसाठी नियमित पनीर आहारात ठेवावे.
FAQs.
प्रश्न १ :- Paneer Masala-पनीर मसाला करताना ग्रेव्ही करताना ग्रेव्हीच्या घट्टपणासाठी काय घालावे ?
प्रश्न २ :- Paneer Masala-पनीर मसाला करताना क्रीम ऐवजी मिल्क पावडर वापरता येते का ?
प्रश्न ३ :- ग्रेव्ही जास्त आंबट झाल्यास काय करावे ?
उत्तर :- Paneer Masala-पनीर मसाला करताना ग्रेव्ही जास्त आंबट झाली तर त्यात थोडे क्रीम व थोडी साखर घालावी ग्रेव्हीचा आंबटपणा कमी होईल.