ओव्हन शिवाय बनवा स्वादिष्ट पिझ्झा-Pizza घरीच.

Pizza – पिझ्झा हा मैद्यापासून बनवलेल्या पोळीसारखा एक मोठा पाव व त्यावर सॉस लावून विविध प्रकारच्या भाज्या टाकून वाफवून घेतलेला एक पदार्थ. Pizza – पिझ्झा म्हणजे सर्वात लोकप्रिय फस्त फूड.अगदी नुसता पिझ्झा म्हटले तरी डोळ्यासमोर येतो तो भरपुर चीझ घातलेला रंगीत भाज्यांनी सजवलेला Pizza – पिझ्झा.आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी आणणारा Pizza – पिझ्झा.

थोडे Pizza – पिझ्झा विषयी.

Pizza – पिझ्झा हा मुळ इटालियन देशातील पदार्थ आहेत. मैद्याची जाड पोळी करून त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे सॉस लावले जातात .त्यावर चीज व अनेक प्रकारच्या भाज्या घालून वाफवला जातो,किंवा ओव्हनमध्ये बेक केला जातो. अशा प्रकारे तयार करून हा पदार्थ खाल्ला जातो.कालांतराने पिझ्झामध्ये खूप बदल झाले पूर्वी पिझ्झा मांसाहारी केला जात होता.आता पिझ्झा हा शाकाहरी केला जातो. पिझ्झा म्हणजे मैद्याच्या जाड पोळीला कोरडी उष्णता देऊन भाजले जाते म्हणजेच पिझ्झा रोटी म्हणून वापरली जाते. त्यालाच पिझ्झा बेस म्हटले जाते. याच पिझ्झा बेसला सॉस किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तयार केल्या जातात व लावल्या जातात. पोळीवर सॉस प्रमाणे चटणी लावला जाते व वरून भाज्या टाकल्या जातात. संपूर्ण पिझ्झा बेस वर भाज्या पसरवून टाकल्या जातात व वाफवल्या जातात,यालाच टॉपिंग असे म्हणतात. Pizza – पिझ्झा हा इटालियन प्रकार असला तरी जगभर लोकप्रिय आहे. फक्त त्याच्या तयार करण्याच्या पद्धतीत बदल केला जातो. म्हणजे त्या त्या शहरातल्या किंवा देशातल्या लोकांच्या आवडीनिवडीप्रमाणे पिझ्झा मध्ये बदल केले गेले व त्याची नावेही बदलली गेली.
टॉपिंग पिझ्झा वर घातल्या जाणाऱ्या पदार्थांना टॉपिंग म्हटले जाते. त्यावर प्रत्येक पिझ्झात वेगळेपण आढळते म्हणजे शाकाहारी पिझ्झा बनवताना त्यात कांदा, टोमॅटो,सिमला मिरची, बेबीकॉर्न,स्वीट कॉर्न, खास करून पत्ता कोबी घातली जातात.तसेच काही हब्ज व ओरिगानो चवीसाठी वापरले जाते. मांसाहारी पिझ्झा टॉपिंग मध्ये चिकनचे तुकडे, मटणाचे तुकडे, क्वचित ठिकाणी अंडी वापरले जाते. चीज पिझ्झा बनवताना चीज हा प्रमुख घटक वापरला जातो .भरपूर चीज घातलेला पिझ्झा जास्त लोकप्रिय आहे. साधे चीज किंवा मॉझरेला चीज असे चीज वापरले जाते. पिझ्झा तयार झाल्यावर त्याचा त्रिकोणी आकारात तुकडे करून तो खाण्यासाठी सोयीचा केला जातो. नंतर भरपूर सॉस सोबत खाल्ला जातो.प्रत्येक ठिकाणाचा पिझ्झा करण्याची पद्धत सारखी असली तरी चव मात्र वेगवेगळी असते.कारण पिझ्झा हा वेगवेगळे पदार्थ व वेगवेगळ्या भाज्या वापरून केला जातो.जसे व्हेजिटेरियन पिझ्झा,पनीर पिझ्झा,चीझ पिझ्झा काहीही घातले तरी चीज शिवाय पिझ्झा हा अपूर्णच असतो,तसेच नॉनव्हेजीटेरीयन पिझ्झा सुद्धा करतात.पिझ्झा करताना तीन स्टेप्स मध्ये केला जातो.हॉटेलच्या टेबलवर पाहिल्यावर एकदम कठीण वाटणारा हा पदार्थ तसा करायला अगदी सहज व सोपा आहे .हल्ली बाजारात बेस तयार मिळतात,पण एखाद्या गृहिणीने कुठलाही नवीन पदार्थ घरी करण्याचा प्रयत्न केला नाही,असे होतच नाही.नवीन पदार्थ घरी करणे व त्यात यश मिळवणे व इतरांना खाऊ घालणे यातच तर तिचा आनद आणि गृहिणी पणाचे पूर्णत्व असतेपिझ्झा बेस म्हणजे मैद्या पासून केलेली पोळी एव्हडा जाड पाव असतो .हा पिझ्झा बनवतांना ओव्हन पाहिजेच असे अजिबात नाही,अगदी आपल्या कढई त केक बनवतो तसा किवा नॉन स्टिक पान्म्द्ये सुद्धा बनवता येतो.पिझ्झा तसा इटालियन डिश आहे पण आपल्या देशात अगदी आपला होऊन घराघरात पोहचला आहे आणि लोकप्रिय सुद्धा झाला आहे.आपल्या देशात प्रत्येक शहरात Pizza – पिझ्झा हट्स आता छन बस्तान बसून आहेत.

How To Make Pizza – पिझ्झा कसा बनवतात.

पिझ्झा रेसिपी – Pizza Recipes तीन स्टेप्स मध्ये केली जाते ती पुढील प्रमाणे :-

Pizza Recipes - पिझ्झा रेसिपी.
  • पिझ्झा बेस ( पिझ्झा रोटी ) :-म्हणजे मैद्या पासुन तयार केलेली पोलीसारखा पाव.
  • सॉस म्हणजे पिझ्झा बेसवर लावले जाणारा एक चटपटीत पदार्थ .जो सगळ्याच्याच ओळखीचा आहे.
  • टोपिंग म्हणजे पिझ्झ्यावर घातले जाणारे वेगवेगळे मसाले व भाज्या.

पिझ्झा बेससाठी लागणारे साहित्य.

  • मैदा :- दीड वाटी.
  • साखर :- एक चमचा.
  • ड्राय यीस्ट :- एक चमचा.
  • मीठ :- एक चमचा.
  • कोमट पाणी :- अर्धी वाटी.
Pizza Recipes - पिझ्झा रेसिपी

कृती.

  • Pizza – पिझ्झा बेस तयार करतांना आधी आपल्याला यीस्ट आक्टीवेट करून घ्यायचे आहे,त्यासाठी एका बाऊ ल मध्ये कोमट पाणी  घ्यावे
  • आपण घेतलेल्या कोमट पाण्यात एक चमचा साखर व एक चमचा मैदा घाला.व ते चमच्याने मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यापण्यात एक चमचा यीस्ट घाला व ते पण चांगले एकत्र करून घ्या.मैदा घातल्या मुळे यीस्ट लवकर आक्टीवेट होते.
  • आता या मिश्रणावर किमान अर्धा तास पक्के झाकण ठेऊन उबदार टिकाणी ठेवा.अर्ध्या तास नंतर ते छान फेसाळून येईल.
Pizza Recipes - पिझ्झा रेसिपी कृती.
  • अर्ध्या तासानंतर मिश्रण अक्टीवेट झाले असेल आता त्या पाण्यात मीठ व चाळलेला मैदा एकत्र करून घ्या व सैलसर गोळा मळून घ्या.
  • सैलसर गोळा मळूनझाल्यावर त्या गोळ्याला तेल लाऊन तो गोळा थोडा मळून घ्या .त्या मैद्याला  सगळी कडून  तेल लाऊन झाकून ठेवा साधरण एक ते दीड  तास झाकून ठेवा.आता आपण Pizza – पिझ्झा सॉस तयार करून घेऊ.
Pizza Recipes - पिझ्झा रेसिपी कृती.

सॉससाठी लागणारे साहित्य.

  • पिझ्झा बेस ( पिझ्झा रोटी ) : म्हणजे मैद्या पासुन तयार केलेली पोलीसारखा पाव.
  • सॉस म्हणजे पिझ्झा बेसवर लावले जाणारा एक चटपटीत पदार्थ .जो सगळ्याच्याच ओळखीचा आहे.
  • टोपिंग म्हणजे पिझ्झ्यावर घातले जाणारे वेगवेगळे मसाले व भाज्या.

कृती.

  • Pizza – पिझ्झा सॉस हे अनेक प्रकारे केले जाते.आज आपण एकदम सोप्या पद्धतीने पिझ्झा सॉस करणार आहोत.
  • Pizza – पिझ्झा सॉस  करण्यासाठी प्रथम टोमाटो स्वच्छ्धूवून घ्या व  एका खोल भांड्यात दीड वाटी पाणी घ्या.
  • त्या पाण्यात टोमाटो घाला तसेच कांदा उभा चिरून घ्या म्हणजे थोड्या जाड फोडी करून घ्या.तसेच आले बारीक चिरून घ्या व लसून व लाल मिरची  हे सगळे साहित्य एकत्र शिजून घ्या.
  •  पाच ते सात मिनिटा ते छान शिजून मऊ होते.सात मिनिटानंतर ग्यास बंद करा व ते मिश्रण गार करून घ्या.
  • मिश्रण गार झाल्यावर मिक्सर मधून बारीक पेस्ट तयार करून घ्या.
  • आता तयार केलेली पेस्ट कढई त थोडे तेल घालून परतून घ्या त्यात मीठ ओरीग्यानो ,चिमुट भर साखर ,तीन चार चमचे टोमाटो सॉस व चमचा भर लाल तिखट घालुन परतून घ्या.
  • सॉस मधले पाणी आटले कि ग्यास बंद करा,सॉस पातळ नसावे नाहीतर पिझ्झा वर लावल्यावर पिझ्झा ओला होतो.

टोपिंग लागणारे साहित्य.

  • लांब व बारीक चिरलेला कोबी :- अर्धी वाटी.
  • सिमला मिरची चिरून पाव वाटी (कुठल्याही रंगाची लाल पिवळी,हिरवी ).
  • ऑंलिव्ह रिग :- चार ते पाच.
  • चिली फ्लेक्स :- एक चमचा चीझ आवडीप्रमाणे.
Pizza Recipes - पिझ्झा रेसिपी साहित्य.

टॉपिंग.

  • Pizza – पिझ्झा च्या टॉपिंग साठी भाजी बनवताना प्रथम पत्ता कोबी बारीक व उभी चिरून घ्यावी.
  • सिमला मिरची बारीक चिरावी.कोथिंबीर चिरून घ्यावी.
  • तेल तापले की त्यात जिरे घाला. जिरे तडतडल्यावर चिरलेला पत्ताकोबी घाला.
  • नंतर चिरलेली सिमला मिरची घाला वरून चिली फ्लेक्स व लाल तिखट व एक हिरवी मिरची बारीक चिरून घाला . नंतर आले लसूण पेस्ट घाला ,व भाज्या परतून घ्या.
Pizza Recipes - पिझ्झा रेसिपी कृती.
  • वरून ओरिगानो घाला व मीठ घाला परत एकदा भाज्या परतून घ्या.
  • भाज्या परतताना मोठ्या आचेवर परता एक ते दीड मिनिटे परतून झाल्यावर गॅस बंद करा.
Pizza Recipes - पिझ्झा रेसिपी कृती.

पिझ्झा रेसिपी (Pizza Recipes).

  • आता एका तासानंतर मैदा छान फुगून येईल अगदी दुप्पट झालेला असेल,परत एकदा मैद्याला तेल लाऊन चंगले मळून घ्या.
  • अगदी सहज हाताने पसरवता येईल इतका मऊ असला पाहिजे.
  • आता एक ट्रे घ्या किवा ज्या भांड्यात तुम्हाला पिझ्झा करायचा असेल म्हणजे नॉन स्टिक चा तवा हि तुम्ही घेवू शकता.त्यावर थोडा कोरडा मैदा पसरून घ्या.
  • आता त्यावर मैद्याच्या गोळ्याला पोळी सारखा गोल करून घ्या.पोळी थोडी जाड करा.वरून फोर्क किवा सुरीने टोचून घ्या म्हणजे फुगणार नाही.
  • ह्या तयार केलेल्या पोळीला वरून पिझ्झा सॉस सगळी कडून लाऊन घ्या व त्यवर तयार केलेल्या भाज्या पसरून घ्या.

Pizza Recipes - पिझ्झा रेसिपी कृती.

  • वरून भरपूर चीझ किसून घाला.आता (कढई किवा ओवन आधी पंधरा मिनिटे फ्री हित करून ठेवा ) तयार केलेला पिझ्झा ओवन मध्ये बेक करायला ठेवा.( १८० डिग्रीवर अर्धा तास) व कढई त मध्यम आचेवर ३० ते ४५ मिनिटे लागतात.
Pizza Recipes - पिझ्झा रेसिपी कृती.

झटपट पिझ्झा – INSTANT PIZZA.

Pizza – पिझ्झा हा दोन प्रकारे केला जातो.एक म्हणजे घरी पिझ्झा बेस तयार करणे व दुसऱ्या म्हणजे झटपट पिझ्झा बेस म्हणजे पिझ्झा रोटी बाजारात तयार मिळते तिच्यावर आपल्या आवडीच्या भाज्या व सॉस लावून पिझ्झा तयार करणे. चला तर बघूया कसा बनवतात पिझ्झा घरी करताना जरा वेळ खाऊ पदार्थ आहे. कारण पिझ्झा बेस तयार करताना बराच वेळ द्यावा लागतो. त्यामुळे पिझ्झाहा मनात आले आणि करून खाल्ले असा पदार्थ होत नाही.पण जर आपल्याला लगेचच करून खावासा वाटला तर आपण बाजारात मिळणारे तयार पिझ्झा बेस आणून पिझ्झा बनवू शकतो. बाजारात मिळणाऱ्या पिझ्झा बेस आणून पिझ्झा तयार करणे तसेच सोपे आहे. पिझ्झावर लावण्यासाठी पिझ्झा सॉस ही बाजारात तयार मिळते.बघूया झटपट पिझ्झा कसा बनवतात.

Pizza Recipes - पिझ्झा रेसिपी.

साहित्य.

  • पिझ्झा बेस एक.
  • पत्ता कोबी अर्धी वाटी उभा चिरून घेतलेला.
  • ऑलिव्ह रींग दोन ते तीन.
  • ओरिगानो एक चमचा.
  • चिली फ्लेक्स एक चमचा.
  • आले लसूण पेस्ट एक चमचा.
  • मीठ चवीनुसार.
  • तूप गरजेनुसार.
  • टोमॅटो सॉस चार ते पाच चमचे.
  • पिझ्झा सॉस चार ते पाच चमचे.
  • सिमला मिरची, लाल,हिरवी शिमला मिरची चिरून घेतलेली पाव वाटी.

टॉपिंग.

  • पिझ्झा च्या टॉपिंग साठी भाजी बनवताना प्रथम पत्ता कोबी बारीक व उभी चिरून घ्यावी.
  • सिमला मिरची बारीक चिरावी.कोथिंबीर चिरून घ्यावी.
  • तेल तापले की त्यात जिरे घाला. जिरे तडतडल्यावर चिरलेला पत्ताकोबी घाला.
  • नंतर चिरलेली सिमला मिरची घाला वरून चिली फ्लेक्स व लाल तिखट व एक हिरवी मिरची बारीक चिरून घाला . नंतर आले लसूण पेस्ट घाला ,व भाज्या परतून घ्या.
  • वरून ओरिगानो घाला व मीठ घाला परत एकदा भाज्या परतून घ्या.
  • भाज्या परतताना मोठ्या आचेवर परता एक ते दीड मिनिटे परतून झाल्यावर गॅस बंद करा.

कृती.

  •  पिझ्झा तयार करण्यासाठी प्रथम गॅस लावून तवा ठेवून तापवून घ्यावा.
  • नंतर बाजारातून आणलेला पिझ्झा बेसला खालच्या बाजूने तूप किंवा बटर लावावे तव्यावर एक चमचा तूप टाकावे व पूर्ण तव्यावर पसरवून घ्यावे.
  • तवा थोडा तापल्यावर पिझ्झा बेस तव्यावर ठेवून भाजून घ्यावा. पिझ्झा बेसला वरून हलक्या हाताने दाब देऊन घ्यावा व सगळ्या बाजूने तिचा बेस खरपूस भाजून घ्यावा. तयार पिझ्झा बेस छान कुरकुरीत भाजला जातो.
Pizza Recipes - पिझ्झा रेसिपी कृती.
  • आता भाजलेल्या बाजूवर पिझ्झा सॉस लावून घ्यावा, थोडा टोमॅटो सॉस लावावा,त्यावर आपण तयार केलेली भाजी पसरवून द्यावी व वरून भरपूर चीज किसून घ्यावे.
  • नंतर तापलेल्या तव्यावर तूप टाकून पिझ्झा ठेवावा व झाकण ठेवावे गॅस मंद ठेवावा.
  • थोड्या वेळाने म्हणजे दोन ते तीन मिनिटांनी खालची बाजू उलथ ण्याच्या साह्याने पिझ्झा वर उचलून बघावे जर खालची भाजून झाली असेल तर पिझ्झातव्यावरून काढून घ्यावा.
Pizza Recipes - पिझ्झा रेसिपी कृती.
  • आता पिझ्झाच्या त्रिकोणी आकारात स्लाईस करून घ्याव्यात. टोमॅटो सॉस सोबत खायला द्यावा गरम गरम पिझ्झा खूप छान लागतो.

टिप्स.

  • पिझ्झाच्या टॉपिंग साठी भाज्या आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता,म्हणजे ब्रोकोली,फ्लावर, कांदा घालता येतात. पिझ्झाच्या टॉपिंग साठी भाज्या ऐवजी पनीरही घालू शकता त्याला पनीर पिझ्झा म्हणतात.
  • पिझ्झा साठी भाज्या शिजवताना मोठ्या आचेवर शिजवा म्हणजे भाज्या फार मऊ पडत नाही.
  • पिझ्झासाठी भाज्या थोड्या कच्च्याच ठेवाव्या कारण पिझ्झा वाफवताना भाजी वाफवल्या जातात.
  • पिझ्झासाठी भाज्यांसोबत स्वीट कॉर्न ही घालू शकता.
  • लहान मुले तिखट खात नाही अशा वेळेस लहान मुलांसाठी पिझ्झा बनवताना पिझ्झा वर टूटी फ्रूटी व चेरी घालून पिझ्झा करू शकता,खूप छान लागतो व मुलांनाही आवडतो.

FAQs.

प्रश्न १ :- पिझ्झा करून ठेवता येतो का ?

उत्तर :- पिझ्झा बेस हा तयार करून फ्रिजमध्ये चार ते पाच दिवस ठेवता येतो.पिझ्झा तयार करताना म्हणजे पिझ्झा बेस वर टॉपिंग करताना पिझ्झा बेस गरम करून घेतले जातात पिझ्झा बेस गरम केल्यावर थोडे कुरकुरीत होतात व त्यावर आपल्या आवडीचे सॉस लावून वरून आवडीच्या भाज्याचे टॉपिंग करून वाफवला जातो व खाल्ला जातो.

प्रश्न २ :- पिझ्झा कसा भाजतात ?

उत्तर :- पिझ्झा हा घरी बनवताना तव्यावर किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये भाजला जातो किंवा प्रथम ओव्हनमध्ये भाजला जातो. हॉटेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पिझ्झा बेस बनवून ठेवले जातात ते ओव्हनमध्ये भाजले जातात. टॉपिंग साठी अनेक प्रकार वापरले जातात जसे पनीर, चीज, मशरूम, टमाटे, मोझरेला चीज, कोबी, सिमला मिरची, ब्रोकोली आपल्या आवडीप्रमाणे आपण टॉपिंग वर काहीही घालू शकतो.

Leave a comment