Samosa-समोसा म्हणजे गव्हाच्या पिठापासून तयार केलेला व तेलात तळलेला एक खुसखुशीत व खमंग पदार्थ. Samosa-समोसा हा गव्हाच्या पिठापासून पातळ आवरून तयार करून त्याच्या आत मध्ये बटाट्याच्या उकडलेल्या भाजीचे सारण भरून तळतात व सॉस चटणी सोबत खाल्ला जातो.Samosa-समोसा हा एक प्रकारचे स्वादिष्ट स्नॅक्स आहे.
थोडे समोसा विषयी.
Samosa-समोसा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो हॉटेल मधील वेगवेगळ्या आकारातला एक चमचमीत चटपटीत पदार्थ साधे त्रिकोणी आकाराचे आरामात ट्रे मध्ये पहुडलेले तर काही मस्त उभे राहून आपल्याला आकर्षित करणारे तर काही छोटे छोटे चौकोनी पट्टीचे Samosa-समोसा आपले लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणारे Samosa-समोसा. आकार कुठलाही असू दे चव मात्र सारखीच असते, वरून छान खुसखुशीत तर काही छान कुरकुरीत व आत मध्ये असते ती आपल्या किचनमध्ये नेहमी आयत्यावेळी धावून येणारा बटाटा बटाट्याची भाजी. बटाटा कुठल्याही पदार्थात घातला की त्या पदार्थाच्या चवीत स्वतःला झोकून देणारा व त्या पदार्थाची चव वाढवणारा बटाटा.कधी पराठ्यात कधी बटाटेवड्यात तर कधी पोह्यात अगदी उपवास करणाऱ्या व्यक्तीचीसुद्धा चटपटीत पदार्थाने भूक भागवणारा म्हणजेच वेफर्स किंवा बटाट्याच्या किसाचा चिवडा अगदी साबुदाण्याच्या खिचडीत सुद्धा बटाट्याशिवाय चव येत नाही .असाच हा बटाटा सामोस्या मध्ये सुद्धा स्वतःला छान सामावून घेतो. कधी हिरव्या चटणी सोबत किंवा तळलेल्या हिरव्या मिरच्या सोबत तर कधी टोमॅटो सॉस सोबत समोसा-Samosa खाल्ला जातो. जीवनात प्रत्येकाने समोस्याची चव चाखलेली असते. कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये तर हक्काने स्वतःची जागा निर्माण करणारा समोसा- Samosa प्रत्येकाच्या आवडीचा असतो.कधी सिनेमागृहात तर कधी पार्टी किती पदार्थ असले तरी Samosa-समोसा चा ट्रे पटकन रिकामा होतो. कधी बटाट्यासोबत ओले मटार समोस्याची चव वाढवतात.Samosa-समोसा हा भारतीय स्टेट पुढच्या यादीत येतो पण आता घराघरात आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या चवीत बनवला जातो. समोसा-Samosa हा गव्हाचे पीठ व बटाटे मटार पासून तयार केलेली भाजी यापासून त्रिकोणी आकारात तयार केला जातो. Samosa-समोसा तयार करून तेलात तळला जातो.Samosa-समोसा हा टोमॅटो सॉस चिंचेची चटणी, पुदिना चटणी,अशा आपल्या आवडीच्या चटणी सोबत खाल्ला जातो. काही ठिकाणी समोसा बेक करूनही खाल्ला जातो. जर तुम्ही तेलाचा वापर कमी करत असाल किंवाकाही व्यक्ती कडून तळलेले पदार्थ कमी खाल्ले जातात. अशा वेळेस समोसा-Samosa बेक केला जातो. बेक केलेला सामोसा सुद्धा छान खुसखुशीत होतो.समोसा म्हणजे गव्हाच्या पिठापासून तयार केलेला व तेलात तळलेला एक खुसखुशीत व खमंग पदार्थ. Samosa-समोसा हा गव्हाच्या पिठापासून पातळ आवरून तयार करून त्याच्या आत मध्ये बटाट्याच्या उकडलेल्या भाजीचे सारण भरून तळतात व सॉस चटणी सोबत खाल्ला जातो.समोसा हा एक प्रकारचे स्वादिष्ट स्नॅक्स आहे.
समोसाचा शोध.
Samosa-समोसा हा सर्वात प्रथम उत्तर भारतात तयार करण्यात आला. नंतर हळूहळू संपूर्ण देशात बनवला जाऊ लागला. थोडयाच काळात समोसा हा खूपच लोकप्रिय झाला. तसे पाहता समोसा परदेशातूनच आपल्याकडे आला आहे पण Samosa-समोसा आपल्या देशात कमी वेळेत खूपच लोकप्रिय झाला. हळूहळू आपल्या देशाबरोबर Samosa-समोसा पाकिस्तान व बांगलादेशात सुद्धा लोकप्रिय झाला. तसा तर इतिहासात 14 व्या शतकात काही व्यवसाय करणाऱ्या व्यापारी वर्गासोबत समोसा उत्तर भारतात आला. परदेशात समोसाचे सारण म्हणून मांसाहारी पदार्थ भरले जात होते.उत्तर भारतात प्रथमच समोसा हा शाकाहारी पदार्थ म्हणून बनवण्यात आला. हजारो वर्ष गेली हजारो बदलही झाले प्रत्येक वेळी मागच्या पिढीपेक्षा पुढच्या पिढीने दहा पाऊल पुढे प्रगती केली. पण सामोस्यांचा त्रिकोणी आकारमात्र तसाच राहिला.तो बदलण्याचे धाडस कोणीही केलं नाही. Samosa-समोसा शाकाहारी किंवा मांसाहारी दोन्ही प्रकारे बनवला जातो. पण सामोसा म्हटले की बटाटा घालून केलेला समोसां जास्त आवडीने खाल्ला जातो. सामोसात बटाटा सोबत मटारही घातला जातो.काही ठिकाणीसमोश्या मध्ये पनीर भरले जाते. समोसा खरे तर बटाटा मटार घालून जास्त खाल्ला जातो. समोसा हा प्रत्येक भागात आपल्या आवडीच्या पदार्थ भरून बनवला जातो.म्हणजे उत्तर प्रदेशात बटाटा घालून Samosa-समोसा केला जातो. तसाच गोव्यात मांसाहारी समोसा केला जातो. परंतु पंजाबी सामोसे हे जास्त लोकप्रिय ठरतात कारण पंजाबी समोसा हा जास्त चटपटीत असतो.आपणही बटाट्याचा Samosa-समोसा कसा बनवतात ते बघू.
Samosa-समोसाच्या आतील भाजीसाठी साहित्य.
- बटाटे-चार ते पाच बटाटे मध्यम आकाराचे तुकडे उकडलेले व साल काढलेले.
- मटार एक वाटी ओले किंवा ओले नसल्यास फ्रोजन मटारही घेतले तरी चालती.
- हिरवी मिरची-सात आठ.
- लसुन-पाच ते सहा पाकळ्या.
- आले लसूण व हिरव्या मिरचीचे वाटण करूनही घालता येते.
- बडीशोप-1 चमचा जाडसर वाटून घ्यावी.
- थोडे जिरे.
- धने पावडर एक चमचा.
- हळद अर्धा चमचा.
- गरम मसाला पाव चमचा.
- आमचूर पावडर अर्धा चमचा किंवा अर्ध्या लिंबाचा रस.
- मीठ गरजेनुसार.
- काळे मीठ पाव चमचा याने चव छान येते.
- चिमुट भर साखर.
- कोथिंबीर मूठ भर बारीक चिरुन घ्यावी.
- तेल फोडणीसाठी.
वरील आवरणासाठी साहित्य.
- मैदा -2-छोटी वाटी.
- ओवा – एक चमचा.
- मीठ चवीप्रमाणे.
- तेल – पाव वाटी.
कृती.
- समोसा-Samosa करतांना एका परातीत मैदा ओवा व मीठ एकत्र करावे.
- तेल हलके गरम करून मैद्यात टाकावे. समोसे खुसखुशीत हवे असतील तर तेला ऐव जीं तुप घालावे.प्रमाण तेच ठेवावे.
- गरम तेलाने समोसा-Samosa कुरकुरीत होतो.नंतर हलक्या हाताने तेल मैद्याला चोळून घ्यावे.
- हाताने कोरड्या पिठाच्या मुटके वळले पाहिजे इतके तेल घालावे.नंतर गरजेप्रमाणे हळूहळू पाणी घालत मैद्याचा घट्ट गोळा मळून घ्यावा व कणिक झाकून ठेवावी.
- समोसा-Samosa च्या सारणासाठी एका कढईत तेल घालून गरम करून त्यात जिरे,धणे पावडर, बडीशोप पावडर घालून परतून घ्यावे.
- नंतर आले लसूण मिरचीचे वाटण घालावे, व मटार चे दाणे घालावे. मटार छान परतून घ्यावे व शिजू द्यावे.
- मटार शिजल्यावर बटाटे छान चुरून घ्यावे.व ते त्यात घालावे.तेलात मसाले घातले तरी चालतील पण मसाले करपणार नाही याची काळजी घ्यावी.
- नंतर वरुन राहिलेले मसाले त्यात घालावे व छानपरतून घ्यावेत.हळद तेलात घालावी. वरून चिमुटभर साखर घालावी.गरजेप्रमाणे मीठ घालावे.
- झाकण ठेवून एक वाफ आणावी.दोन मिनिटांनी गॅस बंद करावा. व भाजी गार करून घ्यावी.
- आतापर्यंत मैद्याचा गोळा छान मऊ झालेला असेल. तो गोळा छान मळून घ्यावा व समोसा साठी मैद्याचे मध्यम आकारात गोळे तयार करून घ्यावे.
- वरील पारीसाठी पोळपाट लाटणे घेऊन त्यावरपुऱ्यांप्रमाणे एक पोळी लाटून घ्यावी.
- पोळी फार मोठी करू नये व सगळ्या बाजूने सारखी लाटावी, नाहीतर तळताना समोसा-Samosa सगळीकडून सारखा तळला जाणार नाही व मऊ पडतो.
- पुरी पातळच लाटावी थोडी लांबट आकारात लाटा वी.आता सुरीच्या साह्याने पोळीचे दोन समान भाग करावे.
- कापलेल्या बाजूने पाणी किंवा दूध लावून पोळी तळहातावर घेऊन त्रिकोणी आकार येईल अशा कडा चिटकवून तो कोण तयार करावा.
- त्या कोणात गार झालेली भाजी व्यवस्थित भरावी, व वरील भाग परत थोडे पाणी लावून पूर्णपणे चिकटवावा. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी.
- असेच सर्व समोसा-Samosa करून घ्यावे.आता एका कढईत तेल गरम करावे समोसे बुडतील इतके तेल घ्यावे.
- समोसा-Samosa तळतांना मध्यम आचेवर समोसा-Samosa तळावा, छान तांबूस रंगाचा झाल्यावर बाहेर काढून टिशू पेपरवर निथळत ठेवावा. टिशू पेपर नसेल तर साधा कागदही चालेल न्युज पेपर घेऊ नये.
- हिरव्या मिरची सोबत किंवा चटणी सोबत गरमच सर करावा.
आंबट-गोड चटणी.
- प्रथम एका भांड्यात पाणी घेऊन चिंच अर्धा तास भिजत घालावी.
- अर्ध्या तासानंतर चिंच हाताने चोळून त्याचा कोळ काढून घ्यावा व तो एका चाळणीने चाळून घ्यावा.
- एका भांड्यात गूळ आणि खजूर पाण्यात घालून भिजवून ठेवा. अर्ध्या तासानंतर गूळ आणि खजूर मिक्सरमधून फिरवून घेणे.गुळ आणि खजूरचे पाणी घट्ट असावे.
- नंतर चिंचेचा कोळ गुळ आणि खजुराची पेस्ट एकत्र करून घेणे.
- यामध्ये मीठ, तिखट व जिरेपूड घालावे.
- ही चटणी थोडी घट्ट करायची असल्यास त्यात शेंगदाणे व तीळ यांची पावडर घातली तरी चालेल.
हिरवी चटणी.
- पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी प्रथम पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
- आता कांदा घ्या आणि त्याचे बारीक तुकडे करा कांदा खात नसल्यास कांद्याशिवाय पुदिन्याची चटणी ही करू शकतात. आता एका भांड्यात लिंबू पिळून त्याचा रस काढा त्यानंतर हिरव्या मिरच्या चिरून घ्या.
- मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने टाका. यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला.
- आता मिक्सरच्या भांड्यात लिंबू पिळून त्याचा रस काढा. यानंतर हिरव्या मिरच्या चिरून घ्या.आता मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने टाका.
- त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला सर्व साहित्य टाकल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात लिंबाचा रस चिरलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ मिसळा.
- त्यानंतर पाणी टाकून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून सर्व साहित्य बारीक करून घ्या .
- चटणी बारीक करताना लक्षात ठेवा कि ती खूप बारीक करू नका चटणी थोडी जाडसर ठेवा .
- आता एका बाऊलमध्ये चटणी काढा पुदिन्याची चटणी सर्व करण्यासाठी तयार आहे.
टिप्स.
- काही जणांना मैदा खाता येत नाही किंवा आवडत नाही तसे असेल तर गव्हाची कणीक व मैदा एकत्र घेऊ शकतात.
- बटाटे जास्त पाणी घालून शिजवू नये नाहीतर ते जास्त पातळ होतात.
- समोसे भरताना सारण तेलात टाकल्यावर समोसा फुटणार नाही याची काळजी घ्यावी.
- मोठ्या आचेवर तळू नये नाहीतर आतून कच्चे राहतात व लगेचच मऊ पडतात.
- भाजी आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालून बनवता येते ,पण लिंबू व काळे मीठ अवश्य घालावे चव छान लागते.थोडा चाट मसाला घातला तरी चालेल.
- कुठलाही पदार्थ तळताना तेलात चिमूटभर मीठ घालावे, पदार्थात तेल कमी शोषले जाते व तळतानाही कमी जळते.
- समोस्याच्या भाजीत बडीशोप पावडर अवश्य घालावी बडीशेप पावडरने भाजीला छान चव येते.
FAQs.
प्रश्न १ :- समोसा फ्रीजमध्ये ठेवू शकतो का ?
उत्तर :- हो समोसा हवा बंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवू शकतो व एक दोन दिवस टिकतो परंतु फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे समोस्याची नैसर्गिक बदलू शकते.
प्रश्न २ :- समोसे बेक केले जातात का ?
उत्तर :- हो आपण जर कमी तेल खात असाल तर समोसे बेक करता येतो किंवा सामोसा तळून झाल्यावर लगेच टिशू पेपरवर ठेवा म्हणजे जास्तीचे तेल शोषले जाते.
प्रश्न ३ :- समोश्यासाठी गव्हाचे पीठ वापरू शकतो का ?
उत्तर :- हो समोसा करताना गव्हाचे पीठ वापरू शकता कारण गव्हाचे पीठ हे भारतीय आहारात मुख्य अन्न म्हणून वापरले जाते व ते पचायलाही सहज असते. तसा मैदा पचायला जड असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी समोशात गव्हाचे पीठ वापरले जाते.
प्रश्न ४ :-एका समोश्यात किती कॅलरीज असतात ?
उत्तर :- समोसा हा साधारण मैदा, तेल, बटाटे व वाटाणे या पदार्थांपासून बनवला जातो एका समोसा सरासरी 250 Cal असतात जर आपण एक समोसा खाल्ला तर प्रौढ व्यक्तीच्या रोजच्या जेवणातील गरजेच्या अंदाजे 11 टक्के कॅलरीज असतात.