“तिखट आणि चवदार: Schezwan Sauce-शेजवान सॉस खास रेसिपी”

Schezwan Sauce-शेजवान सॉस हे कोरड्या लाल मिरच्या, लसूण, आले चवीसाठी थोडे सोया सॉस, टोमॅटो सॉस, मीठ हे पदार्थ एकत्र करून तयार केलेला एक चटपटीत स्वाद आणणारा पदार्थ.

Schezwan Sauce
Read More : Puran Poli.

Schezwan Sauce-शेजवान सॉस विषयी.

स्ट्रीट फूड म्हटले की आपल्या भारतीय पदार्थांसोबतच चायनीज पदार्थातले नूडल्स, शेजवान राईस, मोमोज असे बरेच चटपटीत पदार्थ आठवतात व ह्या पदार्थांना चटपटीतपणा आणण्याचे काम करते ते म्हणजे Schezwan Sauce-शेजवान सॉस. Schezwan Sauce-शेजवान सॉस किंवा चटणी हे एक इंडो चायनीज पदार्थांमध्ये गनले जाते. लसूण ,आले, लाल मिरच्या तसेच सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, विनेगर घालून हे Schezwan Sauce-शेजवान सॉस तयार केले जातात. Schezwan Sauce-शेजवान सॉस बाजारातही अगदी सहज उपलब्ध आहे पण आपण घरी सुद्धा अतिशय कमी वेळेत Schezwan Sauce-शेजवान सॉस किंवा चटणी तयार करू शकतो. अगदी बाजारातल्या चटणी सारखी चटपटीत स्वाद असलेली. करायला अतिशय सोपी असा हा Schezwan Sauce-शेजवान सॉस फार कमी वेळेत व कमी सामग्री मध्ये बनवला जातो. घरी केल्यामुळे आपण तो जास्त प्रमाणातही करू शकतो. फ्रीजमध्ये दोन ते तीन महिने ठेवला तरी टिकतो व आपल्याला हवा तेव्हा वापरता येतो. तसेच घरी बनवल्यामुळे त्या पदार्थाचे शुद्धतेची आपल्याला खात्री असते.

साहित्य.

  • कोरड्या काश्मिरी लाल मिरच्या पंधरा ते वीस.
  • सोल लेला लसूण पाकळ्या दहा-बारा.
  • एक इंच आल्याचा तुकडा.
  • पाव मोठा चमचा सोयासॉस.
  • एक ते दीड मोठा चमचा व्हिनेगर.
  • थोडी काळी मिरी पावडर.
  • दोन चमचे टोमॅटो सॉस.
  • चवीनुसार साखर ,गरजेनुसार मीठ.
  • अर्धी वाटी तेल.

कृती.

  • Schezwan Sauce-शेजवान सॉस करण्यासाठी प्रथम कोरड्या मिरच्यांचे देठे काढून बाजूला करावे. तसेच लसणाच्या पाकळ्यांचे अगदी कापून छोटे छोटे तुकडे करावे. आले सुद्धा बारीक कापून घ्यावे.
  • नंतर एका भांड्यात लाल कोरड्या मिरच्या कोमट पाण्यात वीस मिनिटे किंवा अर्धा तासापर्यंत भिजवून ठेवा.
  • अर्ध्या तासानंतर मिरच्या छान भिजवून मऊ झालेल्या असतील. वेळ नसल्यास म्हणजे अगदी वेळेवर सॉस करायचे असल्यास मिरच्या गरम पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे उकळून घ्यावे तरीही त्या छान मऊ होतात.
  • आता मऊ झालेल्या मिरच्या चाळणीने चाळून पाणी बाजूला काढून ठेवावे पाणी फेकू नये.
  • आता मिक्सरच्या भांड्यात मिरच्या घालून पाणी न वापरता मिरच्यांची अतिशय बारीक पेस्ट करून घ्यावी.
  • Schezwan Sauce-शेजवान सॉस किंवा चटणी तिखट आवडत असल्यास त्यात कुठल्याही तिखट मिरच्या वापरू शकतो व कमी तिखट करायची असेल तर मिरच्यांच्या बिया काढून टाकाव्या.
  • आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यात तेल घालावे. तेल तापले की त्यात मिरच्यांची तयार केलेली पेस्ट घालावी व मंद आचेवर छान परतून घ्यावे. परतलेल्या पेस्ट ला बाजूने तेल सुटायला लागले की त्यात लसणाचे कापलेले तुकडे घालावे तेही दोन ते तीन मिनिटांपर्यंत छान परतून घ्यावे.
  • आता लसूण परतून झाला की त्यात आल्याचे बारीक केलेले तुकडे घालावे व तेही छान परतून घ्यावे.
  • पाच ते सात मिनिटात छान परतून झाले की त्यात आपण घेतलेले सोयासॉस, टोमॅटो सॉस गरजेनुसार मीठ व चवीपुरता साखर व काळी मिरी पावडर घालावी व तीही छादोन ते तीन मिनिटे परतल्यानंतर त्यात विनेगर घालून परत छान हलवून घ्यावे. सॉस तयार करताना थोडे पाण्याची गरज वाटली तर मिरच्यांचे आपण गाळून घेतलेले पाणी वापरावे.
  • शेजवान सॉस मध्ये तेल थोडे जास्त असले तरी चालते जास्त तेलाचा पदार्थ पटकन खराब होत नाही. ज्याप्रमाणे आपण लोणच्या तेल घालतो व ते वर्षभर तसेच टिकून राहते त्याचप्रमाणे शेजवान सॉस सुद्धा थोडे तेल जास्त असले तर सॉस टिकवण्याचा काळ वाढतो.
  • आता Schezwan Sauce-शेजवान सॉस पूर्णपणे थंड झाल्यावर एका हवाबंद बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे व आपल्याला लागेल तसे फ्राईड राईस, नूडल्स सोबत खायला घ्यावे.

टीप.

  • Schezwan Sauce-शेजवान सॉस साठी आपण तिखट खाल असाल तर कुठलीही तिखट मिरची वापरू शकतो काश्मिरी मिरची ही रंगाने लाल व चवीला कमी तिखट असते.तसेच मिरची जास्त तिखट असेल तर तिच्या बिया काढून टाकाव्या.
  • शेजवान सॉस साठी शक्यतो तिळाचे तेल वापरावे. शक्य नसल्यास कुठलेही वापरले तरी चालेल.
  • Schezwan Sauce-शेजवान सॉस ला छान लालचटूक रंग येण्यासाठी मिरच्या चांगल्या निवडाव्या काळपट झालेल्या मिरच्या किंवा जास्त काळ उन्हात राहिल्यामुळे पांढरट झालेल्या मिरच्या वापरू नये म्हणजे सॉस ला छान लाल रंग येतो.
  • Schezwan Sauce-शेजवान सॉस तयार करताना त्यात विनेगर उपलब्ध नसेल तर त्याच प्रमाणात लिंबूचा रस वापरता येतो.
  • शेजवान सॉस मध्ये थोडी साखर अवश्य घालावी .
  • शेजवान सॉस तयार करताना कुठेही कुठलाही पदार्थ करपणार नाही याची काळजी घ्यावी नाहीतर करपलेल्या पदार्थाचा वास स्वासला येऊ शकतो.
  • Schezwan Sauce-शेजवान सॉस तयार करतात करताना आपल्याकडे दोन-तीन प्रकारच्या मिरच्या उपलब्ध असतील तर त्या आपण वापरू शकतो कारण काश्मिरी मिरची अगदी सगळ्या भागात मिळेल असे नाही काही ठिकाणी बेगडी मिरची मिळते तरकाही ठिकाणी काश्मिरी मिळते, काही ठिकाणी नेहमीच्या वापरातल्या साध्या मिरच्या मिळतात . त्यामुळेआपल्याकडे उपलब्ध असलेल्या मिरच्या आपण घालू शकतो.
  • शेजवान सॉस हा आपल्या रोजच्या जेवनातही आपल्या जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरू शकतो. अगदी साधा डोसा किंवा आपण नेहमी करत असलेले धिरडे वगैरे यांच्यासोबत लहान मुलांना खूप आवडतो.

Leave a comment