Vangyachi Bhaji-वाग्यांची भाजी करा हा मसाला वापरून भाजी लागेल मटणाच्या भाजी सारखी.

Vangyachi Bhaji-वांग्याची भाजी हि महाराष्ट्र राज्यातील आणि प्रामुख्याने खान्देशातील खूप प्रसिद्ध आहे.वांग्याची भाजी-Vangyachi Bhaji भाकरी व बट्टी सोबत प्रामुख्याने खाल्ली जाते.या लेखामध्ये आपण वांग्याची भाजी – Vangyachi Bhaji चविष्ट व सोप्या पध्दतीने कशी बनवायची हे बघणार आहोत.

Vangyachi Bhaji Recipe
Read More : Pav Bhaji Recipe

थोडे वांग्या विषयी.

Vangyachi Bhaji-वांग्याची भाजी ही एक फळभाजी आहे व जांभळ्या रंगात येणारी ही भाजी बाजारात वर्षभर उपलब्ध असते.खानदेशात वांग्याची शेती सगळीकडेच बघायला मिळते.जांभळ्या वांग्या पेक्षा हिरव्या वांग्याला जास्त मागणी असते. खानदेशातील जळगाव जिल्हा तर हिरव्या वांग्याच्या उत्पादनासाठी अगदी प्रसिद्ध आहे. खानदेशात लग्न समारंभ किंवा घरगुती समारंभात सुद्धा वांग्याच्या भाजी अगदी आवर्जून केली जाते.वांग्याची मसाला भाजी, वांग्याची घोटलेली भाजी,वांग्याची सुकी म्हणजेच तवा भाजी,अगदी प्रसिद्ध आहे वांग्याचे भरीत सुद्धा खानदेशाचा प्रसिद्ध मेनू आहे.वांगे दोन प्रकारात असतात.एका प्रकारात वांग्याला कमी काटे असतात व दुसऱ्या प्रकारात वांग्याला थोडे जास्त काटे असतात.खान्देशात जास्त काटे असलेली वांगीला जास्त मागणी असते.कारण जास्त काटे असलेल्या वांग्याना छान असते असे म्हटले जाते.खानदेशात हिवाळ्यात वांगी जास्त प्रमाणात खाल्ले जातात.हिवाळ्यात वांग्याला खूप चव असते असे म्हटले जाते.

भाजीसाठी वांगे कसे निवडावे.

Vangyachi Bhaji-वांग्याच्या भाजीसाठी छोट्या आकाराची ताजे व चकचकीत साल असलेले वांगी घ्यावी.वांगी किडलेली नसावी.Vangyachi Bhaji-वांग्याच्या भाजीत वांग्याच्या देठाला सुद्धा खूप महत्व असते व अनेक जणांना देठाशिवाय वांग्याची भाजी आवडत नाही,म्हणून वांगी घेताना देठही बघून घ्यावे.मऊ झालेले देठाची वांगी जुने म्हणजे शिळे असतात.तसे वांगे शिजायला पण खूप वेळ घेतात व त्या ताठ देठ असलेल्या वांगी खूप चवदार लागतात व तसे वांगे ताजे असतात.भाजी करताना ताज्या वांग्यांना एक प्रकारचे तेल सुटते व त्या तेलामुळे भाजीला चवळी खूप छान लागते.

भाजी करताना घ्यावयाची काळजी.

Vangyachi Bhaji-वाग्यांची भाजी करतांना वांगे प्रथम स्वच्छ धुऊन घ्यावी.वांगे किडलेली नाहीत हे नीट बघून घ्यावी.एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे मीठ घालावे नंतर वांग्याचे काटे काढून टाकावे.वांगी चिरून मिठाच्या पाण्यातच ठेवावे म्हणजे वांगी काळे पडत नाही. वांग्यात बिया जास्त असतील तर बिया काढून टाकावे.तसेच ठेवल्या तर भाजीची चव बदलते. वांगी शिळे असतील म्हणजे जर मऊ झालेले असतील तर ते वांगे अर्धा तास मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावे.थोडा कडकपणा येतो व वांगे टवटवीत होतात.वांगी बुडवून ठेवलेले पाणी काळपट झाले असेल तर ते वांगे दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी.म्हणजे वांग्याला आलेला कडवटपणा निघून जातो. मसाला भाजताना मंद आचेवर भाजावा म्हणजे त्याचा स्वाद व सुगंध टिकून राहतो.वांगी करताना प्रथम वांगी थोड्या तेलावर छान परतून घ्यावी.वांग्याची चव छान टिकून राहते. मसाल्याचे वाटण एकदम बारीक करावे त्यामूळे भाजीला एकसारखा चिकणेपणा येतो व मसाल्याची चव छान मिसळते.

वांग्याची भाजी (Vangyachi Bhaji) साहित्य.

  • 1/4 किलो वांगी.
  • एक मोठा कांदा.
  • पाऊण वाटी ओले खोबरे.
  • एक छोटा चमचा हरभरा डाळ.
  • एक छोटा चमचा उडीद डाळ.
  • लाल मिरची किंवा लाल तिखट आवडीप्रमाणे.
  • मीठ गरजेनुसार.
  • गरम मसाला दीड ते दोन चमचे.
  • धने जिरे पावडर एक चमचा.

vange

कृती.

  • Vangyachi Bhaji-वांग्याची भाजी बनवतांना सर्व प्रथम कांदे उभे चिरुन घावे.
  • ओले खोबरे किसुन घ्यावे.एका पॅन मध्ये कांदा व ओले खोबरे भाजुन घ्या.
  • भाजुन झाल्यावर बाजूला काढून घ्या व त्याच पॅनमध्ये थोडे तेल घालून हरभरा डाळ व उडीद डाळ मंद आचेवर परतून घ्या.
  • या डाळीमुळे वांग्याच्या भाजीला खमंग स्वाद येतो.
  • डाळींचा रंग बदलला की त्यात लाल मिरच्या टाका व थोड्या परतून घ्या (जळणार नाही याची काळजी घ्या).
  • सर्व मसाला मिक्सर मधुन बारीक वाटुन घ्या.

vange

  • नंतर मिक्सर मधून वाटून घेतलेला मसाला एका भांड्यात काढून घ्या, व गरजेनुसार मीठ घाला.
  • मीठ घालून मसाला तयार झाल्या नंतर वांगी धुवून घ्या व त्यांना पुढच्या बाजूने एक उभी व एक आडवी चीर द्या.
  • त्या नंतर वांग्याना आतून चिमूटभर मीठ लावून घ्या, म्हणजे वांगी खातांना अळणी लागत नाही.
  • आता त्यात मसाल्याचे वाटण व्यवस्थित भरून घ्या.
  • एका पॅनमध्ये तेल घालून त्यावर वांगे एकेक करुन ठेवावे ,वरून झाकण ठेवावे.थोड्या वेळाने वांगे हळुवारपणे परतून घ्यावे.
  • वांगी शिजत आली की त्यात गरजेप्रमाणे पाणी घालून उकळी आणावी.
  • भाजी थोडा वेळ उकळली की त्यात डाळींचा छान स्वाद येतो व भाजीला दाटपणा येतो.
  • घाई असल्यास प्रेशर कुकरमध्ये टाकुन एक शिट्टी घ्यावी.
  • वरून कोथिंबीर घालावी.अशा पद्धतीने चविष्ट व रुचकर वांग्याची भाजी तयार होईल.
  • तिचा आस्वाद पोळी किंवा भाकरी बरोबर घ्यावा.

vange

टिप्स.

  • जास्त प्रमाणात भाजी करायची असेल तर तेलात प्रथम थोडे हरभरा डाळीचे व थोडे बाजरीचे पीठ खमंग भाजून घ्यावे. पिठामुळे भाजीला छान चव येते व घट्टपणा येतो.
  • भाजी करण्याआधी वांगे मीठ लावून वाफवून घेतली तर वांगी अळणी लागत नाही.
  • मसाला फिरवताना त्यात कोथिंबीर किंवा कोथिंबीरीचे देठ काढून टाकल्यावर उरलेल्या जाड काड्या बारीक वाटून घ्याव्यात चव छान येते.
  • वांग्याची भाजी पित्तकर असते व वातूळही असते. बऱ्याच जणांना वांगी खाल्ल्यावर तोंडाला खाजव येते,अशा वेळेस भाजीत सुपारी एवढा गुळ घालावा भाजीचा वातुळ पणा कमी होतो व पचायलाही सहज होते.

Ghotleli Vangyachi Bhaji – घोटलेली वांग्याची भाजी.

खान्देशात Ghotleli Bhaji – घोटलेली भाजी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे.खान्देशातील लग्नाच्या पंक्तीत बऱ्याच वेळा ही भाजी केली जाते.या भाजीसाठी कोवळी ताजे वांगी निवडावे.

साहित्य.

  • पाव किलो वांगी.
  • दहा ते बारा हिरव्या मिरच्या वाटून घ्याव्या.
  • वाटीभर चिरलेली कोथिंबीर.
  • जिरे एक चमचा.
  • आले लसूण पेस्ट एक चमचा.
  • मीठ चवीनुसार.
  • हळद पाव चमचा.

मसाले.

वांगे हे पित्तकारक असते त्यामुळे बऱ्याच जणांना वांग्याची ऍलर्जी असते जिभेला किंवा शरीराला खाज येते, म्हणूनच वांग्याच्या भाजी थोडा गुळ घालावा.पित्तकारक असल्यामुळे त्यात जास्त करून खोबरे,कांदा धणे,जिरे पावडर यासारखे पित्तशमन करणारे मसाले वापरले जातात.आपण आपल्या घरातील व्यक्तीच्या आवडीचा विचार करून त्याप्रमाणे मसाले वापरावे. म्हणजेच तिखट मिरची लाल मिरची वगैरेआपल्या आवडीप्रमाणे घालावी.

कृती.

  • प्रथम वांगी स्वच्छ धुऊन घ्यावी.एका वांग्याच्या चार फोडी होतील असे वांगे चिरून घ्यावे व मिठाच्या पाण्यातच ठेवावे.
  • एका पातेल्यात तेल घालून वांगे तेलावर परतून घ्यावी.
  • वांग्याचा रंग बदलला की वांगी बाजूला काढून ठेवावी व त्यात उरलेल्या तेलात थोडेसे तेल वाढवून घ्यावे.
  • त्यात एक चमचा जिरे घालावे.जिरे तडतडले की त्यात हळद, आले लसूण पेस्ट घालावी.
  • नंतर वाटलेली मिरची घालावी व एक मिनिटभर परतून त्यात तळलेले वांग्याच्या फोडी घालाव्या.
  •  झाकण ठेवून वाफवून द्यावे.
  • भाजी खाली जळणार नाही याची काळजी घ्यावी.
  • नंतर थोडे गरम पाणी घालावे व वांगी घोटले जातील इतपत शिजवून घ्यावे.यासाठी कुकरमध्ये भाजी केली तरी चालेल.
  • शिजल्यावर रवीच्या साह्याने भाजी घोटून घ्यावी.वरून शेंगदाण्याचे जाडसर पूड घालावी.
  • मीठ घालावे व कोथिंबीर घालावी.ही भाजी जास्त पातळ करत नाही म्हणून पाणी जरा जपूनच घालावे.

Vangyachi Tava Bhaji – वांग्याची तवा भाजी :-

तवा भाजी म्हणजेच एक प्रकारची सुकी भाजी. हल्ली लग्नांमध्ये पंगत प्रकार कमी झालेला आहे सगळीकडे बफे डिनर ची पद्धत रूढ झालेली आहे.म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थ वेवेगळ्या टेबल वर मांडलेले असतात. अशा सगळ्या प्रकारांचे टेबल्स रांगेने मांडलेले असतात व ते आपण आपल्या हाताने म्हणजेच सेल्फ सर्विस घेऊन वाढून घ्यायचे असते.अशाच भरपूर पदार्थांच्या रांगेमध्ये एक टेबल तवा भाजीचा असतो म्हणजेच गरम तव्यावर थोड्या थोड्या प्रमाणात भाजी केली जाते व वाढली जाते.कारण ही भाजी गरमच छान लागते.ही भाजी अगदी सोपी व घरगुती मसाल्याने तयार केलेली असते. खूपच रुचकर लागते एकदा नक्की करून बघा.

साहित्य :-

  • वांगे पाव किलो.
  • फोडणीसाठी तेल.
  • दोन चमचे मोहरी.
  • एक चमचा जिरे.
  • हळद पाव चमचा.
  • लाल तिखट दोन चमचे.
  • गरम मसाला एक चमचा.
  • मीठ चवीप्रमाणे.

कृती :-

  • प्रथम वांगी स्वच्छ धुऊन घ्या.एका वांग्याच्या चार फोडी होतील असे चिरून घ्या.थोडी पाण्यातच ठेवा.
  • तव्यावर तेल घालून तेल नेहमीपेक्षा थोडे जास्त घ्या.तेल तापल्यावर त्यात मोहरी घाला.
  • मोहरी कडकडली की त्यात हळद घालावी, लगेचच वांग्याच्या फोडी घालाव्या व झाकण ठेवून वाफवून घ्यावे.
  • त्यात धने जिरे पावडर,गरम मसाला, लाल तिखट घालून परतून घ्यावे.मसाला करपणार नाही याची काळजी घ्यावी.
  • गरज पडल्यास थोड्याशा पाण्याचा शिपका मारावा.ही भाजी फार मऊ शिजवत नाही फोडी थोड्या वातडच छान लागतात.
  • आपल्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त घेऊ शकतात.
  • आवडत असल्यास या भाजीत अर्धी वाटी फ्लावरची फुले घालावी किंवा अर्धा बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घालाव्या.

FAQs.

प्रश्न १ :- वांगी कोणी खाऊ नयेत ?

उत्तर :- ज्या लोकांना मुतखडा म्हणजे किडनी स्टोन चा त्रास आहे, अशा लोकांनी जास्त वांगे खान टाळावे.

प्रश्न २ :- वांग्यांमध्ये कोणते जीवनसत्वे असतात ?

उत्तर :- वांग्यामध्ये प्रामुख्याने VITAMINE C, VITAMINE B6, VITAMINE K असतात.

प्रश्न ३ :- वांग्यामध्ये कोणत्या प्रकारचे खनिजे आढळतात ?

उत्तर :- वांग्याम्ध्ये मागनीज ,फोस्फारस ,तांबे ,पोटशियाम आणि फायबर प्रमुखाने आढळतात.

Leave a comment