Anarsa-अनारसा हा भारतातील एक पारंपारिक पदार्थ आहे. Anarsa-अनारसा तांदूळ भिजवून दळून त्यात गुळ घालून नंतर तळून घेतलेला गोड पदार्थ आहे. Anarsa-अनारसा हा प्रामुख्याने दिवाळीत केला जातो तसाच अधिक महिन्यात आवर्जून केला जातो.
थोडे Anarsa-अनारसा विषयी.
दसरा आला की फराळाचे तयारी करण्यास गृहिणी सुरुवात करतात. दिवाळीच्या फराळाची सुरुवात म्हणजे सर्वात प्रथम सुंदर खुसखुशीत व जाळीदार Anarsa-अनारसा करण्याची तयारी करावी लागते.तसेच खुसखुशीत व जाळीदार Anarsa-अनारसा येण्यासाठी पीठ छान मुरलेले असावे लागते.त्यासाठी पूर्वीपासूनच असे म्हटले जाते की दसरा झाला की तांदूळ भिजवून व त्यांचे पीठ करून ठेवले की दिवाळी सुंदर अनारसे तयार होतात. तसाAnarsa-अनारसा म्हणजे सुगरणी चे सुगरण पण पणाला लावणारा पदार्थ म्हटला जातो.कारण जाळीदार व खुसखुशीत Anarsa-अनारसा करणे म्हणजे कौशल्याचे काम समजले जाते.कारण Anarsa-अनारसा कधी पुरीसारखा फुलतो तर कधी तेलात टाकल्यावर विरघळतो.अशा वेळेस अनारसाच्या पिठात काय चूक झाली हे सुद्धा कळत नाही व उरलेल्या पिठाचे अनारसे करण्याचा कंटाळा येतो. म्हणूनच आपल्या आई व आजीच्या पिढीतील गृहिणी म्हणायचे की दसरा झाला की अनारश्यासाठी तांदूळ भिजत घालावे. पण हल्लीचा धावपळीच्या जगात इतका वेळ नोकरी व्यवसाय करणाऱ्या गृहिणीजवळ नसतो.तसेच सध्याचे युग हे इन्स्टंट पदार्थाचे युग आहे. पण तरीही काही पदार्थ घरी करायचे म्हटले की इन्स्टंट म्हणजे झटपट करता येत नाही. तसाच अनारसा सुद्धा झटपट न बनवता येणारा पदार्थ आहे. फार तर आपण तांदूळ भिजवण्याचा वेळ कमी करू शकतो, किंवा पीठ मुरवण्याचा वेळ कमी करू शकतो. पण झटपट अनारसा करून खाण्याचा आनंद घेता येत नाही. त्यासाठी एक पर्याय आहे तो म्हणजे हल्ली बाजारात तयार मिळणारे अनारसाचे पीठ. बाजारातील तयार पिठाचे अनारसा होतो छान पण खूप जास्त तेल शोषून घेतो व त्यामुळे अनारसा तेलकट होतो ,व खाताना तोंडात तेल येते. त्यामुळे सुंदर अनारसा खाण्याचे समाधान मिळत नाही .म्हणूनच Anarsa-अनारसा करताना घाई करू नये असे म्हटले जाते.
Anarsa – अनारसा महत्त्व.
Anarsa-अनारसा एक भारतीय खाद्यपदार्थ आहे. तसेच अनारसा हा एक पारंपारिक पदार्थ आहे. हा पदार्थ अगदी इतिहास काळापासून बनवल्या जाण्याचे आढळते . अनारसा दिवाळीत केला जातो तसेच अधिक महिन्यात आवर्जून केला जातो. अनारसा करताना तीन दिवस तांदूळ भिजवून थोडा आंबवला जातो. भिजवलेला तांदूळ दळून त्यात गुळ घालून अनारसा बनवला जातो. दिवाळीच्या पदार्थात अनारसाचे खास महत्त्व असते. तसेच अधिक मासा दान देण्यासाठी किंवा जावयाला वाण लावण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तसेच अधिक मासात प्रत्येक मंदिरात देवाला वा न लावतात. त्या वानात अनारशांना खूप महत्त्व असते. म्हणूनच तांदळाचे 33 अनारसे देण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत पूर्वीपासून चालत आलेली आहे. तसेच महाविष्णूला अनारसे अतिशय प्रिय आहेत असे म्हटले जाते व अधिक महिना हा महाविष्णूंचा महिना असतो म्हणूनच या महिन्यात मुलगी व जावई यांना महाविष्णू व लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेअधिक मासात मुलगी व जावई यांना वान लावताना Anarsa-अनारसा दिला जातो. तसेच आपल्या भारत भारतीय संस्कृती तांदुळाला अक्षता असे म्हटले जाते. अक्षदा म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही म्हणजेच ते कधीही संपत नाही. म्हणूनच भारतीय संस्कृतीत तांदुळाला धार्मिक कार्यात खूप महत्त्व दिले जाते. अगदी कोणत्याही दैवताची पूजा असते किंवा घरगुती धार्मिक कार्य असू द्या तांदूळ म्हणजेच अक्षदा अर्पण केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. म्हणूनच तांदुळाला धार्मिक भाषेत अक्षता म्हटले जाते. कदाचित त्या कारणाने अधिक मासात Anarsa-अनारसा धार्मिक महत्त्व दिले जाते. अधिक मासातील दानाचे पुण्याचे महत्व कधीही न संपणारे असते असे मानले जाते.आरोग्याच्या दृष्टीने अनारसा ही खूप पौष्टिक मानला जातो अनारसा म्हणजे तांदूळ, गूळ, तूप, खसखस यांचे एक प्रकारचे मिश्रणच आहे. हे सगळेच पदार्थ अतिशय शक्तिवर्धक आहेत. असे म्हटले जाते की अनारसा खाल्ल्यामुळे शरीरातील शुक्रधातू वाढतो व शरीर दष्टपुष्ट होते. व दिवाळीतील हवामानही आरोग्यदृष्ट्या एकदम पोषक असते म्हणून कदाचित दिवाळीत अनारसा करण्याची परंपरा आहे.
Anarsa – अनारसा शोध.
असे म्हटले जाते की 16 व्या शतकात विजय नगर येथील सम्राट कृष्णदेवराय यांच्या राज्यात तांदूळ गूळ व लोणी यापासून एक गोड पदार्थ केला गेला. असे तेथील शिलालेखावर आढळून लिहिलेले आढळून आल्याचे म्हटले जाते. कदाचित त्याच प्रेरणेनेAnarsa-अनारसा हा तयार झालेला पदार्थ असावा. हल्ली अनारसा सुद्धा अनेक प्रकारात केला जातो.म्हणजे चॉकलेट अनारसा, नाचणीचा अनारसा.चॉकलेट Anarsa-अनारसा करताना तांदळाच्या पिठात चॉकलेट पावडर घातले जाते. चॉकलेट व तांदळाचे पीठ एकत्र करून ते अनारश्यासाठी ठेवले जाते.हा अनारसा करताना यात सुकामेवा घातला जातो व तळला जातो.नाचणीचे अनारसे करताना तांदूळ ऐवजी तीन दिवस नाचणी भिजत घालतात. नंतर तांदुळाच्या अनारसाप्रमाणे दळून त्यात गुळ घालून घेतात व पिठाचा गोळा तयार करून एक दिवसासाठी ठेवतात .हे अनारसे दुसऱ्या दिवशी करून घेतात हे पीठ फार दिवस ठेवता येत नाही.असे अनारसे कितीही प्रकारचे केले गेले तरीसुद्धा तांदळाचा अनारसा खाण्यात व करण्यात एक वेगळाच आनंद आहे. तांदळाच्या Anarsa-अनारसा सारखी चव कुठल्या अनारसंना येत नाही हे मात्र नक्की.
Anarsa-अनारसा बनवण्यासाठी लागणारे मुख्य घटक.
- तांदूळ :- तांदूळ हा अनारसा बनवताना लागणारा महत्त्वाचा घटक आहे. तांदूळ हा शरीरासाठी सुद्धा खूप पोषक मानला जातो. अनारसा बनवताना तांदुळ भिजवून तयार केलेल्या पिठात गुळ किंवा साखर घालून पिठाचे गोळे करून ठेवतात व तीन ते चार दिवसांनी अनारसे बनवले जातात.
- गुळ :- गुळामुळे अनारसाचे पीठ हे छान मुरण्यासाठी मदत करते गूळ हा तांदळाच्या पिठीत पूर्णपणे एकजीव होतो व तांदळाच्या पिठाला छान स्वाद येतो गुळामुळे अनारश्याला खमंग अशी चव पण येते
- खसखस :- खसखस म्हणजे एक प्रकारे अनारशाचे सौंदर्य ,चव व अनारसाचा दर्जा वाढवणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. खसखस लावलेला अनारसा हा अतिशय मोहक दिसतो. तसेच खसखस अतिशय पौष्टिक असल्यामुळे शरीराचे पोषणही उत्तम होते. काही ठिकाणी अनारसा करताना खसखस ऐवजी तीळ लावली जाते. तीळही आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असते मानली जाते.
How To Make Anarsa-अनारसा कसा बनवायचा.
साहित्य.
- तांदूळ : एक किलो.
- गूळ : पावुन किलो.
- तूप :अर्धी वाटी
- खसखस : तीन ते चार चमचे.
पूर्वतयारी.
- अनारसा करण्यासाठी प्रथम तांदूळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.
- नंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात धुतलेला तांदूळ भिजत घालावा. तांदूळ भिजत घालताना तांदळाच्या वर दोन ते तीन इंच पाणी येईल इतके पाणी घालावे. म्हणजे तांदूळ छान भिजला जाईल.
- तांदूळ किमान तीन दिवस भिजवून ठेवावा. रोज तांदळाचे पाणी बदलत राहावे म्हणजे तांदळाला व आंबूस वास येणार नाही.
- पाणी बदलताना तांदूळ हलवून सर्व पाणी काढून टाकावे, व नवीन पाणी घालावे व झाकण ठेवावे, असे तीन दिवस करावे.
- चौथ्या दिवशी तांदूळ छान भिजलेला असेल. तांदळातले पाणी काढून तांदूळ एका चाळणीत निथळ ठेवावे. वरून स्वच्छ पाणी ओतावे. तांदळाचे पाणी पूर्णपणे निथळून घ्यावे.
- तांदळातले पाणी पूर्णपणे निथळल्यावर एका सुती कापडावर तांदूळ पसरवून द्यावे. तांदूळ हवेशीर जागेत पसरवावे किंवा पंख्याखाली ठेवावे.
- तांदूळ पूर्णपणे कोरडा करू नये. अनारसा करताना तांदळात थोडा ओलसरपणा असतानाच मिक्सरमधून बारीक दळून घ्यावा.
- तांदूळ दळून झाल्यावर बारीक चाळणीने चाळून घ्यावा. चाळल्यानंतर चाळणीत राहिलेल्या जाडसर तांदूळ परत एकदा बारीक दळून घ्यावा, म्हणजे जाड तांदूळ जास्त जास्तीत जास्त वापरला जाईल.
- थोडा जाडसर राहिलेला तांदूळ बाजूला काढून ठेवा.
- आता चाळून घेतलेला बारीक तांदळाची पिठी एका पसरट भांड्यात काढून घ्या.
- आता गुळ विळीच्या साह्याने बारीक किसून घ्या.
- आता चाळून घेतलेली तांदळाची पिठी घातलेल्या भांड्यात त्यात किसलेला गूळ घालावा.
- आता गुळ आणि तांदळाची पिठी छान एकजीव करावी. तांदळाची पिठी छान मळून घ्यावी. जर तांदळाची पिठी थोडे कोरडे वाटत असेल तर त्यात एक दोन चमचे तूप घालावे.
- आता पिठाचे छान गोळे करून एका हवाबंद डब्यात ठेवून द्यावे. अनारसा तयार करण्यासाठी किमान तीन ते चार दिवस पीठ तसेच ठेवावे.
- डब्यात ठेवलेले पीठ एक दिवसानंतर काढून थोडे मळून घ्यावे व परत डब्यात भरून ठेवावे असे एक दोन वेळा करावे.
कृती.
- आता तीन ते चार दिवसानंतर अनारसाचे पीठ काढून छान मळून घ्यावे.
- पीठ जास्त पातळ झाली असेल तर त्यात थोडी काढून ठेवलेली तांदळाची चमचाभर पिठी घालावी.
- जर अनारश्याचे पीठ कोरडे झाले असेल व अनारसा करता येत नसेल तर थोडी दुधावरची घट्ट साय किंवा साईचं दही घालावे.
- साय किंवा दही अगदी थोड्याच प्रमाणात घालावी.अनारसे पीठ पटकन पातळ होते.
- आता साय घातल्यावर पीठ परत एकदा मळून घ्यावे.अनारशाचे पीठ एकदम मऊ करून घ्यावे तुपाचा बोट लावून पीठ मऊ करावे.फार तूप वापरू नये.
- आता पिठाचा एक छोटा गोळा घेऊन हातावर छान मळून घ्यावा.
- गोळा तयार झाल्यावर एका ताटात किंवा पोळपाटावर एक प्लास्टिक पेपर घ्यावा. प्लास्टिक पेपरवर थोडी खसखस पसरवून घ्यावी व त्यावर बोटाच्या साह्याने अनारसा हळुवारपणे थापावा.
- अनारसा बारीक थापावा जाड अनारसा आतून तळला जात नाही.
- आता कढईत तेल घेऊन गॅसवर ठेवावे.तेल मध्यम आचेवर गरम करावे.तेल तापले की आच मंद करावी.
- तोपर्यंत आपण चार ते पाच अनारसे थापून ठेवावे.
- आता अनारसा हळूच तेलात टाकावा. अनारसा टाकताना खसखस लावलेली बाजू वरच्या बाजूला येईल असा टाकावा.
- आता झाऱ्याच्या सहाय्याने अनारश्यावर तेल घालत राहावे. अनारसा छान सोनेरी रंगावर तळून घ्यावा.
- अनारसा तळून झाला की अलगद काढून एका चाळणी ठेवावा व चाळणी थोडी तिरकस ठेवावी.म्हणजे जास्तीचे तेल निथळून जाईल. नंतर अनारसे टिशू पेपरवर ठेवावे.जास्तीचे तेल निघून जाण्यास मदत होईल.
- अनारसा गरम गरम खायला द्यावा अनारसा हा गरमच छान लागतो.
अनारसा करताना घ्यावयाची काळजी.
- अनारस्यासाठी तांदूळ दळताना तांदूळ 80 टक्के कोरडा असावा. अनारश्याचा तांदूळ पूर्ण कोरडा करू नये व जास्त ओला तांदूळ दळू नये. अनारसा करतानाहा समतोल खूप महत्त्वाचा असतो.
- तांदळाची पिठी बारीक चाळणीने चाळून घ्या.चाळणी नसेल तर स्वच्छ कापडाने चाळून घ्यावे.
- बारीक पिठाच्या अनारसे चांगले थापता येतात व तेलात टाकल्यावर विरघळत नाही.
- अनारसासाठी गूळ वापरताना फार जुना गुळ वापरू नये. काही वेळेस साठवलेल्या गुळाचा आंबूस वास येतो. असा गुळ अनारशांची चव बिघडवू शकतो.असा गूळ वापरू नये.
- गुळ जास्त पातळ असेल तर अनारश्याच्या पिठात थोडी पिठीसाखर घालावी. पीठ फार पातळ होत नाही व पीठ जास्त काळ चांगले टिकते.
टिप्स.
- यत्याअनारसासाठी तांदूळ वापरताना तांदूळ सुगंधी व जुना तांदूळ वापरावा. सुगंधी तांदूळ उपलब्ध नसेल तर रेशन चा तांदूळ वापरावा त्या तांदळाचे अनारसे हीछान होतात.
- अनारशाचे पीठ फार कोरडे झाले असेल व अनारसा थापता येत नसतील तर अनारसे करताना थोडे केळ घालावे. पण केळाची एक चकतीच घालावी केळामुळे अनारशाचे पीठ पटकन पातळ होते.
- अनारसे तळून झाल्यावर रव्यावरही ठेवतात. म्हणजे तेल र व्यावर शोषले जाते. त्या रव्याचा नंतर लाडू किंवा शिरा बनवताना वापर करता येतो.
- अनारश्याचे पीठ हे हवाबंद डब्यात ठेवावे. हे पीठ अगदी महिनाभर टिकते.
- अनारसे लागतील तसेच तळावे. अनारसे गरमच छान लागतात. अनारसा एकाच बाजूवर तळला जातो तेलात टाकल्यावर अनारसा उलटवू नये. झाऱ्याने किंवा चमच्याने अनारशावर तेल टाकावे व वरच्या बाजूने अनारसा तळ ला जातो.
- अनारसा थापताना खसखस नसेल तर त्या ऐवजी तीळ टाकून त्यावर अनारसा थापावा .
- अनारसाचे पीठ कोरडे असल्यास अनारसे करताना किंचित तुपाचा हात लावून पीठ मळून घ्यावे.
- अनारसे एकदम तळून ठेवू नये तळून ठेवलेली अनारसे मऊ पडण्याची शक्यता असते.
- अनारसे जर उन्हाळ्यात करत असाल तर तांदूळ दोन दिवस भिजवले तरीही चालतात. अनारसे छान होतात परंतु हिवाळ्यात अनारसे करताना तांदूळ तीन ते चार दिवस भिजवावे.
- अनारसा हा घाईगडबडीत करण्याचा पदार्थ नाही.म्हणून अनारसा करताना घाई करून चालत नाही. अनारसा करताना थोडा वेळ द्यावा, म्हणजे अनारसा अगदी जाळीदार व खुसखुशीत कुरकुरीत होतो.
- अनारसा तळताना मंद आचेवर तळावा जास्त तापलेल्या तेलात अनारसा तळला तर तो विरघळतो किंवा जळतो अशा अनारशांची चव बिघडते व दिसायलाही थोडे काळपट दिसतात.
- अनारसात तेलात जास्त लाल होऊ देऊ नये. अनारसा तळून काढल्यावर थोडा वेळ त्यातील उष्णतेमुळे तळण्याची क्रिया चालू असते व रंग बदलत राहतो थोड्यावेळाने रंग छान होतो.
- अनारसा जास्त जाड थांपु नये बारीक अनारसा चांगला तळला जातो व पटकन तळला जातो.
- अनारसा करताना पिठात गुळ मिक्स करताना तांदळाची कोरडे पिठी थोडी बाजूला काढून ठेवावी. पीठ पातळ झाले तर आवेळी काढून ठेवलेली पिठी घालता येते.
FAQs.
प्रश्न १ :- अनारशांमध्ये सुगंधासाठी वेलदोडा घालावा का ?
उत्तर :- अनारशाला स्वतःचा असा एक खमंग स्वाद व सुंदर सुगंध असतो .तांदूळ व गुळामुळे त्याचा स्वतःचा एक वेगळा सुगंध तयार होतो. म्हणून अनारशाला वरून वेगळा सुगंध देण्याची गरज पडत नाही. पण जर आपल्याला आवडत असेल व पचनाच्या दृष्टिकोनातून आपण वेलदोडा घालू शकतो.
प्रश्न २ :-अनारसा तुपाच्या ऐवजी लोणी घातले जाते का ?
उत्तर :- अनारसात तुपाऐवजी लोणी घातल्यास काही हरकत नाही. परंतु लोणी घातल्याने अनारसा हा खूप तेलकट होऊ शकतो .लोण्यामुळे कुठलाही पदार्थ हा हलका होतो परंतु तेल जास्त शोषून घेतो. तसेच अनारसा सुद्धा तेल जास्त शोषून घेतो. आपल्याला आवडत असल्यास आपण लोणी चा वापर नक्की करून बघा.
प्रश्न ३ :-गुळाचे व साखरेच्या अनारशात काय फरक असतो ?
उत्तर :- गुळाचे व साखरेचे अनारसे फार फरक नसतो. दोन्ही पदार्थ हे अनारश्याचा गोडवा वाढवण्यासाठी टाकले जातात. परंतु हल्ली आरोग्याचे दृष्टिकोनातून जागरूकता निर्माण झालेली आहे. म्हणूनच साखरे ऐवजी गुळ खाण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो. तसेच गुळाचा अनारशाला स्वतःचा असा एक छान खमंग स्वाद असतो. त्यामुळेच अनारशाला स्वादही खमंग येतो. म्हणून साखरे ऐवजी गुळाची अनारसे केले जातात. आपल्याला आवडत असल्यास आपण साखर घालू शकतात. साखरेचे अनारसे ही सुंदर होतात.