Site icon Ashlesha's Recipe

“गोड दिवाळीची गोड भेट: घरगुती Anarsa-अनारसा बनवण्याची सोपी पद्धत”

Anarsa-अनारसा हा भारतातील एक पारंपारिक पदार्थ आहे. Anarsa-अनारसा तांदूळ भिजवून दळून त्यात गुळ घालून नंतर तळून घेतलेला गोड पदार्थ आहे. Anarsa-अनारसा हा प्रामुख्याने दिवाळीत केला जातो तसाच अधिक महिन्यात आवर्जून केला जातो.

                                                   Read More : Mix Veg Curry.

थोडे Anarsa-अनारसा विषयी.

दसरा आला की फराळाचे तयारी करण्यास गृहिणी सुरुवात करतात. दिवाळीच्या फराळाची सुरुवात म्हणजे सर्वात प्रथम सुंदर खुसखुशीत व जाळीदार Anarsa-अनारसा करण्याची तयारी करावी लागते.तसेच खुसखुशीत व जाळीदार Anarsa-अनारसा येण्यासाठी पीठ छान मुरलेले असावे लागते.त्यासाठी पूर्वीपासूनच असे म्हटले जाते की दसरा झाला की तांदूळ भिजवून व त्यांचे पीठ करून ठेवले की दिवाळी सुंदर अनारसे तयार होतात. तसाAnarsa-अनारसा म्हणजे सुगरणी चे सुगरण पण पणाला लावणारा पदार्थ म्हटला जातो.कारण जाळीदार व खुसखुशीत Anarsa-अनारसा करणे म्हणजे कौशल्याचे काम समजले जाते.कारण Anarsa-अनारसा कधी पुरीसारखा फुलतो तर कधी तेलात टाकल्यावर विरघळतो.अशा वेळेस अनारसाच्या पिठात काय चूक झाली हे सुद्धा कळत नाही व उरलेल्या पिठाचे अनारसे करण्याचा कंटाळा येतो. म्हणूनच आपल्या आई व आजीच्या पिढीतील गृहिणी म्हणायचे की दसरा झाला की अनारश्यासाठी तांदूळ भिजत घालावे. पण हल्लीचा धावपळीच्या जगात इतका वेळ नोकरी व्यवसाय करणाऱ्या गृहिणीजवळ नसतो.तसेच सध्याचे युग हे इन्स्टंट पदार्थाचे युग आहे. पण तरीही काही पदार्थ घरी करायचे म्हटले की इन्स्टंट म्हणजे झटपट करता येत नाही. तसाच अनारसा सुद्धा झटपट न बनवता येणारा पदार्थ आहे. फार तर आपण तांदूळ भिजवण्याचा वेळ कमी करू शकतो, किंवा पीठ मुरवण्याचा वेळ कमी करू शकतो. पण झटपट अनारसा करून खाण्याचा आनंद घेता येत नाही. त्यासाठी एक पर्याय आहे तो म्हणजे हल्ली बाजारात तयार मिळणारे अनारसाचे पीठ. बाजारातील तयार पिठाचे अनारसा होतो छान पण खूप जास्त तेल शोषून घेतो व त्यामुळे अनारसा तेलकट होतो ,व खाताना तोंडात तेल येते. त्यामुळे सुंदर अनारसा खाण्याचे समाधान मिळत नाही .म्हणूनच Anarsa-अनारसा करताना घाई करू नये असे म्हटले जाते.

Anarsa – अनारसा महत्त्व.

Anarsa-अनारसा एक भारतीय खाद्यपदार्थ आहे. तसेच अनारसा हा एक पारंपारिक पदार्थ आहे. हा पदार्थ अगदी इतिहास काळापासून बनवल्या जाण्याचे आढळते . अनारसा दिवाळीत केला जातो तसेच अधिक महिन्यात आवर्जून केला जातो. अनारसा करताना तीन दिवस तांदूळ भिजवून थोडा आंबवला जातो. भिजवलेला तांदूळ दळून त्यात गुळ घालून अनारसा बनवला जातो. दिवाळीच्या पदार्थात अनारसाचे खास महत्त्व असते. तसेच अधिक मासा दान देण्यासाठी किंवा जावयाला वाण लावण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तसेच अधिक मासात प्रत्येक मंदिरात देवाला वा न लावतात. त्या वानात अनारशांना खूप महत्त्व असते. म्हणूनच तांदळाचे 33 अनारसे देण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत पूर्वीपासून चालत आलेली आहे. तसेच महाविष्णूला अनारसे अतिशय प्रिय आहेत असे म्हटले जाते व अधिक महिना हा महाविष्णूंचा महिना असतो म्हणूनच या महिन्यात मुलगी व जावई यांना महाविष्णू व लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेअधिक मासात मुलगी व जावई यांना वान लावताना Anarsa-अनारसा दिला जातो. तसेच आपल्या भारत भारतीय संस्कृती तांदुळाला अक्षता असे म्हटले जाते. अक्षदा म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही म्हणजेच ते कधीही संपत नाही. म्हणूनच भारतीय संस्कृतीत तांदुळाला धार्मिक कार्यात खूप महत्त्व दिले जाते. अगदी कोणत्याही दैवताची पूजा असते किंवा घरगुती धार्मिक कार्य असू द्या तांदूळ म्हणजेच अक्षदा अर्पण केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. म्हणूनच तांदुळाला धार्मिक भाषेत अक्षता म्हटले जाते. कदाचित त्या कारणाने अधिक मासात Anarsa-अनारसा धार्मिक महत्त्व दिले जाते. अधिक मासातील दानाचे पुण्याचे महत्व कधीही न संपणारे असते असे मानले जाते.आरोग्याच्या दृष्टीने अनारसा ही खूप पौष्टिक मानला जातो अनारसा म्हणजे तांदूळ, गूळ, तूप, खसखस यांचे एक प्रकारचे मिश्रणच आहे. हे सगळेच पदार्थ अतिशय शक्तिवर्धक आहेत. असे म्हटले जाते की अनारसा खाल्ल्यामुळे शरीरातील शुक्रधातू वाढतो व शरीर दष्टपुष्ट होते. व दिवाळीतील हवामानही आरोग्यदृष्ट्या एकदम पोषक असते म्हणून कदाचित दिवाळीत अनारसा करण्याची परंपरा आहे.

Anarsa – अनारसा शोध.

असे म्हटले जाते की 16 व्या शतकात विजय नगर येथील सम्राट कृष्णदेवराय यांच्या राज्यात तांदूळ गूळ व लोणी यापासून एक गोड पदार्थ केला गेला. असे तेथील शिलालेखावर आढळून लिहिलेले आढळून आल्याचे म्हटले जाते. कदाचित त्याच प्रेरणेनेAnarsa-अनारसा हा तयार झालेला पदार्थ असावा. हल्ली अनारसा सुद्धा अनेक प्रकारात केला जातो.म्हणजे चॉकलेट अनारसा, नाचणीचा अनारसा.चॉकलेट Anarsa-अनारसा करताना तांदळाच्या पिठात चॉकलेट पावडर घातले जाते. चॉकलेट व तांदळाचे पीठ एकत्र करून ते अनारश्यासाठी ठेवले जाते.हा अनारसा करताना यात सुकामेवा घातला जातो व तळला जातो.नाचणीचे अनारसे करताना तांदूळ ऐवजी तीन दिवस नाचणी भिजत घालतात. नंतर तांदुळाच्या अनारसाप्रमाणे दळून त्यात गुळ घालून घेतात व पिठाचा गोळा तयार करून एक दिवसासाठी ठेवतात .हे अनारसे दुसऱ्या दिवशी करून घेतात हे पीठ फार दिवस ठेवता येत नाही.असे अनारसे कितीही प्रकारचे केले गेले तरीसुद्धा तांदळाचा अनारसा खाण्यात व करण्यात एक वेगळाच आनंद आहे. तांदळाच्या Anarsa-अनारसा सारखी चव कुठल्या अनारसंना येत नाही हे मात्र नक्की.

Anarsa-अनारसा बनवण्यासाठी लागणारे मुख्य घटक.

How To Make Anarsa-अनारसा कसा बनवायचा.

साहित्य.

पूर्वतयारी.

कृती.

अनारसा करताना घ्यावयाची काळजी.

टिप्स.

FAQs.

प्रश्न १ :- अनारशांमध्ये सुगंधासाठी वेलदोडा घालावा का ?

उत्तर :- अनारशाला स्वतःचा असा एक खमंग स्वाद व सुंदर सुगंध असतो .तांदूळ व गुळामुळे त्याचा स्वतःचा एक वेगळा सुगंध तयार होतो. म्हणून अनारशाला वरून वेगळा सुगंध देण्याची गरज पडत नाही. पण जर आपल्याला आवडत असेल व पचनाच्या दृष्टिकोनातून आपण वेलदोडा घालू शकतो.

प्रश्न २ :-अनारसा तुपाच्या ऐवजी लोणी घातले जाते का ?

उत्तर :- अनारसात तुपाऐवजी लोणी घातल्यास काही हरकत नाही. परंतु लोणी घातल्याने अनारसा हा खूप तेलकट होऊ शकतो .लोण्यामुळे कुठलाही पदार्थ हा हलका होतो परंतु तेल जास्त शोषून घेतो. तसेच अनारसा सुद्धा तेल जास्त शोषून घेतो. आपल्याला आवडत असल्यास आपण लोणी चा वापर नक्की करून बघा.

प्रश्न ३ :-गुळाचे व साखरेच्या अनारशात काय फरक असतो ?

उत्तर :- गुळाचे व साखरेचे अनारसे फार फरक नसतो. दोन्ही पदार्थ हे अनारश्याचा गोडवा वाढवण्यासाठी टाकले जातात. परंतु हल्ली आरोग्याचे दृष्टिकोनातून जागरूकता निर्माण झालेली आहे. म्हणूनच साखरे ऐवजी गुळ खाण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो. तसेच गुळाचा अनारशाला स्वतःचा असा एक छान खमंग स्वाद असतो. त्यामुळेच अनारशाला स्वादही खमंग येतो. म्हणून साखरे ऐवजी गुळाची अनारसे केले जातात. आपल्याला आवडत असल्यास आपण साखर घालू शकतात. साखरेचे अनारसे ही सुंदर होतात.

Exit mobile version