“Aloo Paratha-आलू पराठ्याची खासियत: घरच्या घरी तयार करा पंजाबी स्वाद”

Aloo Paratha-आलू पराठा म्हणजे काय तर हे आपल्याला नावावरूनच कळते कि हा पदार्थ बटाट्या पासून तयार होतो.हा पदार्थ प्रामुख्याने पंजाब या राज्यात खाला जातो.पण सध्या Aloo Paratha-आलू पराठा सगळीकडे आवडीने खाल्ला जातो.पंजाब प्रांतातुन आलेला Aloo Paratha-आलू पराठा पदार्थ हल्ली सगळ्या छोट्या मोठ्या हॉटेल किंवा ढाब्यावर खायला मिळतो.Aloo Paratha-आलू पराठा लोणी,दही ,लोणचे किंवा वेगवेगळ्या चटण्या सोबत खाल्ला जातो.जास्त करून दही पराठा हे समीकरण जास्त आवडते.

Aloo Paratha-आलू-पराठा
Read More : Kachori Recipe.

थोडे Aloo Paratha – आलू पराठे विषयी.

Aloo Paratha-आलू पराठा म्हणजे गव्हाच्या पिठाच्या पोळी बनवून त्याच्या आत मध्ये बटाट्याच्या भाजीचे सारण करून ते टाकले जाते व पोळी सारखे गोल किंवा त्रिकोणी लाटून तुपावर सोनेरी रंगावर दोन्ही बाजूने खमंग भाजले जाते.Aloo Paratha-आलू पराठा जवळ जवळ सगळ्यांनाच माहिती असलेल्या पदार्थ आहे.Aloo Paratha-आलू पराठा हा भारतात सर्वात प्रथम पंजाब प्रांतात सर्वात आधी खाल्ला जात होता.नंतर महाराष्ट्राच्या हॉटेल व ढाब्यांवर बघायला मिळाला.Aloo Paratha-आलू पराठा पूर्णपणे शाकाहारी पदार्थ आहे. आलू म्हणजे बटाटे सर्वांच्या स्वयंपाक घरात असतात पराठा म्हणजे पावा सारखी जाड पोळी. जीच्या आत मध्ये उकडलेल्या बटाट्याला मसाल्यांची फोडणी देऊन बनवलेल्या भाजीचे सारण भरलेले असते. आलू पराठा ही एक स्वादिष्ट लोक प्रिय डिश आहे.Aloo Paratha-आलू पराठा हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे.वरून गव्हाच्या पिठापासून किंवा काही ठिकाणी मैद्याचा वापर करूनएक आवरण तयार केले जाते.हे आवरन पातळ असते.खरे तर Aloo Paratha-आलू पराठ्याचा उत्तम स्वाद हा पातळ आवरणातील पराठ्यातच असतो.Aloo Paratha-आलू पराठा च्या आवरणाची पोळी जर जाड असेल तर तो नीट भाजला जात नाही व तोंडात पिठाची चव लागते .पातळ आवरणातील Aloo Paratha-आलू पराठा दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर खमंग भाजला जातो व मुख्य म्हणजे कमी वेळात भाजला जातो.Aloo Paratha-आलू पराठा हे वेगवेगळ्या प्रकारात केले जातात. म्हणजे कोबी पराठा, पनीर पराठा, छोला पराठा,मुगाच्या डाळीचा पराठा पण पराठा म्हटले म्हणजे डोळ्यासमोर येत होतो फक्त आलू पराठा. Aloo Paratha-आलू पराठा खास करून तूप, लोणी,दही या सोबत खाल्ले जातात. परंतु आपल्या आवडीप्रमाणे लोणचे,चटणी यासोबत खाता येतात.रोज रोज एकच प्रकारचे जेवण जेवुण कंटाळा येतो.अशा वेळेस नाश्त्याला किंवा जेवणाला आरोप पराठा हा उत्तम पर्याय आहे.

Aloo Paratha – आलू पराठा कसा बनवतात.

  • Aloo Paratha-आलू पराठा करताना मुख्यत्वे करून गव्हाच्या पिठाचा वापर केला जातो.
  • काही ठिकाणी मैदा ही वापरला जातो किंवा दोन्ही घटक एकत्र करून पाण्याच्या साह्याने कणिक भिजवून गोळा तयार केला जातो.
  • त्या कणकेत उकडलेल्या बटाट्यापासून मसाल्याची फोडणी देऊन भाजी तयार करून ती भरली जाते.
  • चांगल्या प्रतीच्या गव्हाच्या पीठा पासून त्याचे बाहेरील आवरण केले जाते व वाफवलेल्या बटाट्याच्या भाजीचे सारण तयार करून ते आत मध्ये भरून पोळी सारखा लाटून केला जातो.
  • Aloo Paratha-आलू पराठा पोळपाट लाटण्याच्या साह्याने लाटला जातो व तव्यावर दोन्ही बाजूने तूप टाकून सोनेरी रंगावर खमंग भाजला जातो.
  • Aloo Paratha – आलू पराठा वेगवेगळे प्रकारे तयार केला जातो कोबी पराठा ,चीझ पराठा ,पनीर पराठा अशा वेगवेगळ्या चवीमध्ये पण केले जातात.
  • काही ठिकाणी बटाटे वाफवुन ते कुस्करून त्यात वरूनच सगळे मसाले टाकले जातात तर काही ठिकाणी भाजीला फोडणी देऊन मसाले घातले जातात. या दोन्ही प्रकारे पराठे हे छान लागतात.
  • Aloo Paratha – अल्लू पराठा करतांना ते तेल किंवा तूप टाकून छान तांबूस रंगावर भाजतात व गरमच सर्व्ह करता.
  • असा हा Aloo Paratha-आलू पराठा बघू घरी कसा तयार करता येतो तो.

Aloo Paratha – आलू पराठा साहित्य.

  • गव्हाचे पीठ एक किवा दीड वाटी.
  • बटाटे – ५-६.
  • मिरची – ८ ते १० स्वादानुसार.
  • किवा लाल चटणी – ३ ते ४ चमचे.
  • काळे मीठ – एक छोटा चमचा.
  • साधे मीठ – गरजे नुसार
  • बडीशोप – १ चमचा बारीक करून.
  • आमचूर पावडर – १ चमचा.
  • साखर – १/२ चमचा.
  • धने जीरे पावडर – १ चमचा.

Aloo Paratha – आलू पराठा कृती.

  • एका भांड्यात पीठ घ्यावे.त्यात ओवा , मीठ तेल किंवा तूप टाकून कणिक छान भिजवून घ्या.कणिक फार पातळ किवा घट्ट नसावी.कणिक भिजवून झाल्यास ती झाकून ठेवावी.

Aloo Paratha-आलू-पराठा

  • कुकरमध्ये पाणी घालुन्त्यावर जाली ठेवून एका भांड्यात बटाटे ठेवा व त्यात थोडे पाणी घालुन कुकर बंद करा आ मध्यम आचेवर १ ते २ शिट्या घ्या.

Aloo Paratha-आलू-पराठा

  • कुकर गार झाल्यावर बटाटे एका भांड्यात काढून त्याची साले काढून घ्या व नंतर बटाटे बारीक करून घ्या.फार लगदा करू नये.
  • त्यानंतर वरील सर्व मसाले बटाट्यामध्ये एकजीव करून घ्या.आवडत असल्यास एका छोट्या काढाईत एक पाली तेल घेवून थोडे गरम करा व त्या तेलात सर्व मसाले टाकून मिनिटभर परतून घ्या मसाले जाळणार नाही याची काळजी घ्या व ते तेल चुरलेल्या बटाट्या मध्ये एकजीव करून घ्या. भाजी पूर्ण पाने गार होवू द्या मगच पराठे करायला घ्या.

Aloo Paratha-आलू-पराठा

  • नंतर भिजवलेली कणकेचा गोळा घेवून तो कोरड्या पिठात दोन्ही बुडवून घ्या व त्याला लाटून नंतर खोल वाटीसारखा आकार द्या.तयार झालेल्या वाटीत भाजीचा गोळा टाकून तो व्यवस्थित सगळ्या बाजूने बंद करा व परत कोरड्या पिठात बुडवून घ्या.
  • आता पोळपाटावर तो गोळा ठेवून अगदी हलक्या हाताने लाटण्याचा साह्याने हळुवार पणे गोल फिरवा.भाजी सगळी कडे सारखी पसरली पाहिजे.

Aloo Paratha-आलू-पराठा

  • पराठा जास्त जाड किवा फार बारीक नसावा.पोळपाटाला चिकटणार नाही याची काळजी घ्यावी.लाटून झाल्यावर हलक्या हाताने जास्तीचे पीठ झटकून गरम तव्यावर टाका व मध्यम आचेवर भाजा. दोन्ही बाजूने लालसर तांबूस होईपर्यंत भाजा व तूप टाकून खमंग करा.तूप टाकून भाजल्यावर छान खमंग सुगंध येतो.

Aloo Paratha-आलू-पराठा

  • पराठ्याला दह्यासोबत कि चटणीसोबत गरमच सर्व्ह करा.

Aloo Paratha – आलू पराठा करतांना घ्यावयाची काळजी.

गव्हाचे पीठ हे चांगल्या प्रकारच्या गव्हापासून तयार करावे.नेहमीच्या वापरातील गहू घेतले तरी चालतात. त्या पिठाला बारीक चाळणीने चाळून घ्यावे ,म्हणजे कणिक माळून झाल्यावर छान मऊ पराठे होतात.आपल्या आवडीप्रमाणे पिठात तेल किंवा तूप काहीही घातले तरी चालेल.कणिक भिजल्यावर छान रबरा सारखी ताणली गेली पाहिजे.म्हणजे पराठा उत्तम होतो.जर पीठ तास नसेल तर ओईथ भिजवण्या आधी त्यात थोडा मैदा टाकून एकजीव करून घ्यावा.पीठ भिजवातांना त्यात तूप,तेल व पाव कप दुध घालावे पराठे छान मऊ होतात.पिठ भिजवून झाल्यावर थोडा वेळ (५ ते १० मिनिटे) झाकून ठेवा.पीठ जर जास्त घट्ट झाले असेल तर सुती कापड ओले करून झाकून ठेवा.पराठे करतांना तेलाचा हात लावून पीठ छान मळून घ्या.जेणेकरून पीठ चिकटणार नाही.सारणासाठी घ्यावयाची काळजी.सारण करतांना प्रथम चांगल्या प्रतीचे बटाटे घ्यावे,बटाटे स्वच्छ धुवून, कुकर मध्ये खाली पाणी घालुन त्यावर जाली ठेवून एका भांड्यात बटाटे ठेवावे.बटाट्यात फार पाणी घालू नये, नाहीतर ते चिकट होतात व पराठा परतांना त्रास होतो.त्या नंतर बटाटे कुकर मधून काढून चांगले हाताने बारीक करून घ्यावे व किसून घ्यावे.सारण एकसारखे असावे जेणेकरून पराठा फाटणार नाही.बटाटे व मसाले एकजीव करून घेणे जेणेकरून पूर्ण पराठ्यामध्ये एकसारखी चवयेईल.मिश्रण तयार झाल्यास चव घेऊन बघावी.

टिप्स:-

  • पराठ्याची कणीक भिजवताना थोडा मैदा घातला तरी चालेल. मैदा घातल्यावर पराठ्याच्या कणीक भिजवताना थोडे दूध पण घालावे म्हणजे पराठे मऊ होतात गार झाल्यावर छान राहतात.
  • पराठे गोल किंवा त्रिकोणी आकारात करता येतात.
  • आलूपराठे दोन पद्धतीने करता येतात. एक प्रकार जो वर मी सांगितलेला आहे त्याप्रमाणे,व दुसरा प्रकार म्हणजे दुसऱ्या प्रकारात दोन सारख्या आकाराचे गोळे घेऊन त्याच्या सारख्या पोळ्या लाटून घ्याव्यात,व एका पोळीवर बटाट्याचे सारण भरून दुसरी पोळी वरून ठेवून परत थोडी हलक्या हाताने लाटून घ्यावी. व कडेने पूर्णपणे चिकटवावी व तव्यावर भाजून घ्यावी.
  • पराठा सोनेरी रंगावर भाजावा. पराठा भाजताना तेल तूप किंवा बटर लावले तरी चालते.आपल्या आवडीप्रमाणे आपण का आपण काहीही वापरू शकतो.
  • आलू पराठ्यात बटाट्याऐवजी कोबी,पनीर किंवा मुगाची डाळ घालू शकतो. आपल्या आवडीप्रमाणे कसलेही सारण भरू शकतो.
  • पराठ्याच्या सारणात आपल्या आवडीप्रमाणे आपण मसाले घालू शकतो,म्हणजेच लिंबू,आमचूर पावडर घरातील आपल्या आवडीचे वेगळे मसाले वापरून भाजी करता येते. थोडी बडीशोप पावडर मात्र अवश्य घालावी. त्यामुळे आलू पराठ्याला वेगळा असा छान स्वाद येतो.
  • आलू पराठा खास करून दह्यासोबत खाल्ला जातो.
  • आलू पराठ्यासोबतआपल्यालाआवडत असल्यास लोणचे किंवा चिंचेची आंबट गोड चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी सोबतही खाल्ला जातो.
  • आलू पराठा करताना त्याच्या आतले सारण अगदी एकसारखे असावे.आलू पराठ्याच्या भाजीत जर कांदा वापरणार असाल तर बारीक चिरावा.नाही तर कांद्यामुळे पराठे नीट लाटता येणार नाही.
  • बटाटा हा वातूळ असतो त्यामुळे बटाट्याचे पदार्थ करतांना ओवा घालावा.ओवा हा  बटाटा पचनासाठी उत्तम असतो.

FAQs :-

प्रश्न १ :- आलू पराठा हा कशासोबत खाल्ला जातो ?

उत्तर :- आलू पराठा हा मुख्यतः पंजाब मधील पदार्थ आहे. त्यामुळे दही, लोणी व तूप या पदार्थांसोबत आवडीने खाल्ला जातो. तसेच हिरवी चटणी सॉस किंवा चिंचेच्या चटणी सोबतही खाल्ला जातो.
 

प्रश्न २ :- आलू पराठा हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध पदार्थ आहे ?

उत्तर :- आलू पराठा हा पंजाब राज्यातील प्रसिद्ध पदार्थ आहे. परंतु हल्ली पूर्ण देशभर आवडीने खाल्ला जातो.

Leave a comment