“दिवाळीची खमंग Chakli-चकली : घरच्या घरी सोपी आणि कुरकुरीत रेसिपी”

Chakli-चकली म्हणजे दिवाळीमध्ये केला जाणार आहे खमंग पदार्थ आहे. Chakli-चकली ही वेगवेगळ्या डाळी व तांदूळ भाजून केलेल्या भाजणी पासून बनवले जाते.

Chakli Recipe
Read More : Anarsa Recipe.

थोडे Chakli-चकली विषयी.

दिवाळी आली म्हणजे लगबग सुरू होते ती दिवाळीच्या फराळ करण्याची त्यात सगळ्यात कस लावणारे पदार्थ म्हणजे अनारसे, भाजणीची चकली हे होय. Chakli-चकली तशी खाण्यास खमंग, खुसखुशीत व अगदी पटकन संपणारी असते. परंतु करायला मात्र खूप वेळ घेते. आधी भाजणी तयार करा व नंतर दळून पीठ चाळून ठेवा. नंतर चकली करायला सुरुवात करा. हे सगळे करत खूप वेळ घेतो कदाचित यासाठीच हल्ली चकली करण्याचे अगदी साधे व सोपे नवे नवे पर्याय शोधले गेले. तांदळाची चकली किंवा मुगाची डाळ शिजवून तयार होणारी झटपट चकली, परंतु भाजणीच्या चकलीला जी चव येते ती हया चकल्यांना नाही. दिवाळीच्या फराळात भाजणीची चकली शिवाय फराळ अपूर्णच राहतो. म्हणून आज आपण भाजणीची Chakli-चकली कशी करतात, भाजणी कशी भाजतात ,काय काळजी घ्यावी हे पाहणार आहोत.चकली व कडबोळी हे प्रकार कर्नाटक राज्यातून आपल्याकडे आले आहेत. तांदूळ व काही निवडक कडधान्य धूवुन भाजले जातात व बारीक दळून घेतले जातात. श्रेष्ठ व सुगरणीचा कस पाहणारे ठरते . चकली बनवण्यासाठी तांदूळ, चना डाळ, उडीद डाळ ,पोहे ,साबुदाणे असे धान्य भाजून चकलीची भाजणी तयार केली जाते. चवीसाठी या भाजणीत धने, जिरे, ओवा, मीठ, तिखट, तीळ असे पदार्थ घातले जातात. भाजणी ही दोन प्रकारात केली जाते एका प्रकारच्या भाजणी त घेतलेली सर्व कडधान्य धूवुन वाळवून भाजले जातात .तसेच दुसऱ्या प्रकारात सर्व धान्य कोरडीच भाजले जातात. चकली चविष्ट व कुरकुरीत होण्यासाठी भाजणी छान असावी लागते. भाजलेल्या धान्यामुळे कर्बोदके हे पटकन पचणारे म्हणजे हलके होतात व त्यातील लोहाचे व रायफ्ले विन जीवनसत्वाचे प्रमाण वाढते. तसे कोणतेही धान्य भाजले की पचायला हलके होते. तसेच चकलीसाठी भाजणीमुळे प्रथिनांच्या गुणधर्मातील बदलांमुळे पदार्थ करताना पिठाच्या गाठी टाळण्यास मदत होते. भरड व बारीक पिठाच्या मिश्रणामुळे ग्लूटेन ची मऊ बनण्याची क्रिया ही टाळले जाते. त्यामुळे पदार्थ तळल्यानंतर खुसखुशीत व कुरकुरीत होतो. Chakli-चकली ही उकड काढून बनवली जाते. चकलीच्या भाजणीसाठी शक्यतो जाड तांदूळ वापरावा म्हणजेच पदार्थाला गरजेपुरताच चिकटपणा येतो. चकलीसाठी भाजणी तेल, तूप किंवा लोण्याचे मोहन देतात, यामुळे चकली खुसखुशीत होते मोहन देण्याचे प्रमाण बिघडल्यास चकली कडक होते म्हणजे मोहन कमी झाले तर चकली कडक होते व मोहन जास्त झाले तर चकली विरघळते. तसेच चकलीचे पीठ जास्त घट्ट भिजवल्या सही चकली कडक होते तर तर जास्त सै ल पिठामुळे चकली मऊ पडते व चकलीला काटेही कमी येतात. Chakli-चकली साठी भाजणी करताना भाजणी हळद पावडर, लाल तिखट वापरू नये. त्यामुळे चकलीचा रंग काळपट होण्याची दाट शक्यता असते. त्या ऐवजी हळकुंडाचा वापर करावा मंद आचेवर हळकुंड भाजून भाजणी सोबत गिरणीतूनच दळायला द्यावे. तसेच चकली मोठ्या आचेवर तळल्यास आतून कच्ची राहते. तसेच तेल गरम नसेल तर चकली विरघळते म्हणून चकली मध्यम आचेवर तळावी. तेल फार तापले असेल तर तेलाचे तापमान कमी झाल्यावरच चकली तेलात टाकावी व मध्यम आचेवर खमंग चकली तळावी.

भाजणी तयार करताना घ्यावयाची काळजी.

  • Chakli-चकली साठी भाजणी भाजताना म्हणजेच डाळी व तांदूळ भाजताना मंद आचेवर भाजावे.
  • मंद आचेवर भाजलेले तांदूळ व डाळी आतून संपूर्णपणे भाजले जातात .मोठ्या आचेवर भाजलेल्या धान्य वरून कडक होते व आतून कच्चे राहते त्यामुळ चकली मऊ पडते.
  • चकलीत टाकले जाणारे जिरे, धने हे सुद्धा मंद आचेवर भाजून घ्यावे, तसेच पोहे व साबुदाणे हेही मंद आचेवरच भाजावे.
  • धान्य प्रमाणापेक्षा जास्त भाजले जाणार नाही याची काळजी घ्यावी . धान्याचा रंग जास्त लाल होऊ देऊ नये नाहीतर चकली काळपट दिसते.
  • धान्य भाजत असताना मधून मधून एक एक एक दाणा तोंडात टाकून बघावा, दाणा छान कुरकुरीत लागला म्हणजे भाजणी भाजून तयार झाली आहे असे समजावे.
  • दाणा आतून कच्चा वाटला किंवा दातात फसला तर मंद आचेवरच थोडा वेळ परत धान्य भाजून घ्यावे. भाजणी भाजताना धान्य सतत हलवत राहावे.

प्रकार 1 : चकली भाजणी. 

साहित्य.

  • चार वाट्या तांदूळ धुऊन निथळत ठेवावे.
  • तीन वाट्या चण्याची डाळ.
  • एक वाटी मुगाची डाळ.
  • एक वाटी उडीद डाळ.
  • एक वाटी जाड पोहे .
  • एक मोठा चमचा.
  • जिरे एक लहान हळकुंडाचा तुकडा.

भाजणीसाठी कृती.

प्रत्येक धान्य वेगवेगळे कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यावे जिरे भाजून घ्यावेतसेच हळकुंड ठेचून भाजून घ्यावे व गिरणीत गिरणीतून बारीक दळून आणावे व दळलेले पीठ बारीक चाळणी चाळून घ्या.

चकलीसाठी साहित्य.

  • चार वाट्या भाजणी तयार केलेले पीठ.
  • चार वाट्या पेक्षा थोडे कमी पाणी.
  • अर्धी वाटी तेल.
  • एक मोठा चमचा ओवा.
  • एक मोठा चमचा तीळ.
  • अर्धा चमचा हिंग.
  • चिमूटभर हळद.
  • चवीनुसार मीठ.
  • आवडीनुसार लाल तिखट.

कृती.

  • Chakli-चकली करताना प्रथम चार वाट्यांपेक्षा थोडे कमी पाणी एका भांड्यात उकड काढण्यासाठी ठेवावे.
  • आता पाण्यात अर्धी वाटी तेल, एक चमचा ओवा, हिंग, हळद मीठ व तिखट घालावे.
  • आता त्या पाण्याला उकळी आणावी .पाणी उकळल्यावर पाण्यात भाजणी घालून चमच्याच्या टोकाने हलवून घ्यावे. पाण्यात पूर्णपणे भाजणी मिक्स झाल्यावर भांड्यावर झाकण ठेवावे.
  • आता एका मिनिटानंतर खाली उतरवून घ्यावे म्हणजे भाजणी छान वाफवली गेली असेल वएक दोन तास भाजणी गार करण्यास ठेवावे.
  • दोन तासानंतर गार पाण्याचा हात लावून चकलीचे पीठ छान मळून घ्यावे. जर फूड प्रोसेसर असेल तर फूड प्रोसेसर मधून आपण ते पीठ काढू शकतो पीठ छान मऊ करावे.
  • आता चकलीच्या साचा घेऊन आतून त्याला संपूर्ण साच्याला तेल लावून घ्यावे .म्हणजे चकलीचे पीठ चिकटणार नाही व चकली छान काढता येईल.
  • आता चकली काढून एका वेळेस पाच ते सहा चकल्या काढून ताटात काढून घ्यावे व एका कढईत मध्यम आचेवर तेल गरम करण्यास ठेवावे .तेल मध्यम आचेवरच तापवावे तेल तापल्यावर एकेक चकली हळुवारपणे घेऊन तेलात टाकावे व मध्यम किंवा मंद आचेवर तळावे.
  • Chakli-चकली तळून झाल्यानंतर एका कागदावर तेल निथळण्यास ठेवावी.
  • अशाच प्रकारे सगळ्या चकल्या तळून घ्याव्या सगळ्या चकल्या तळून झाल्यानंतर चकल्या गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्या म्हणजे त्यांचा खुसखुशीतपणा टिकून राहील.

प्रकार 2 : चकली भाजणी.

साहित्य.

  • चार वाट्या तांदूळ.
  • तीन वाट्या चण्याची डाळ.
  • दोन वाट्या मुगाची डाळ.
  • एक वाटी उडदाची डाळ.

कृती.

  • तांदूळ व सर्व डाळी धुवून निथळून कापडावर वेगवेगळ्या पसरवून ठेवाव्यां.
  • एक वाटी साबुदाणा.
  • एक मोठा चमचा जिरे.
  • एक लहान हळकुंडाचा तुकडा.
  • धान्य थोडे कोरडे झाले की भाजायला घ्यावे. प्रत्येक धान्य वेगवेगळे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावे हळकुंड ठेचून भाजावे व गिरणीतून दळून आणावे.

चकलीसाठी साहित्य.

  • चार वाट्या तयार भाजणीचे पीठ.
  •  एक चमचा ओवा.
  • एक चमचा तीळ.
  •  एक चमचा हिंग.
  • चिमूटभर हळद.
  • चवीप्रमाणे मीठ व लाल तिखट.
  • कडकडीत केलेले अर्धी वाटी तेल.

कृती.

  • एका परातीत भाजणीचे पीठ घेऊन त्यात ओवा, तीळ, हिंग, हळद, मीठ, तिखट एकत्र करून घ्यावे व गरम केलेले अर्धी वाटी तेल घालून छान हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यावे.
  •  आता चार वाट्या पाणी कोमट करावे व लागेल तसे पाणी घालून पीठ भिजवावे.
  •  आता एक ते दोन तास पीठ तसेच झाकून ठेवावे.
  • आता  एक दोन तासांनी गार पाण्याचा हात लावून पीठ छान मळून घ्यावे व नेहमीप्रमाणे चकल्या काढून मध्यम आचेवर मंद ते मध्यम आचेवर तळून घ्यावे.

टिप्स.

  • Chakli-चकली साठी शक्यतो जुने झालेले लाल तिखट घालावे म्हणजे चकलीचा रंग फार लाल किंवा काळपट येत नाही.
  • भाजणी  मंद आचेवर जास्त लाल न भाजता केल्यास चकल्या चांगल्या होतात. चकलीची भाजणी भिजवण्यापूर्वी पीठ चाळून घ्यावे.
  • भाजणी दळून आणताना चकल्याची भाजणी जास्त बारीक दळू नये व फार जाडसरही दळू नये.
  • भाजणी दळण्यास देताना प्रथम चण्याची डाळ गिरणी दळण्यास देऊन त्यावर भाजणी टाकावी कारण बहुतेक वेळा ज्वारी, गहू यावरच भाजणी दळली जाते त्यामुळे भाजणी खराब होते व चकल्यामवू होतात.
  • भाजणी भिजवताना  तेलाचे मोहन प्रमाणातच मोजून घ्यावे.
  • Chakli-चकली तळताना प्रथम तेल मध्यम आचेवर गरम करून मंद आचेवर चकल्या तळाव्यात.
  • चकल्या दोन्ही बाजूने दोन ते तीन वेळा उलटवून तळाव्यात मात्र तेल थंड झाले तर चकल्या तुटतात म्हणून तेलाचे तापमान एकसारखे राहिली याकडे लक्ष ठेवावे.
  • Chakli-चकली छान खुसखुशीत होण्यासाठी बऱ्याच वेळा मोहन केला ऐवजी चकलीच्या पिठात लोणी टाकतात. त्याही चकल्या छान होतात मात्र लोणी अगदी प्रमाणातच टाकले जावे थोडे जरी जास्त झाले तरी लोणी टाकलेल्या चकल्या ह्या तेलात पटकन विरघळतात.
  • चकल्यांचे पीठ भिजवताना थोडे पीठ शिल्लक ठेवावे  तिखट, मीठ, मोहन काही जास्त झाले तर त्या पिठाचा उपयोग होतो.
  • Chakli-चकली चे पीठ भिजवताना मोहन जास्त झाले तरी गोल चकल्या निघत नाही व भाजणी शिल्लक नसली तर साधे बेसन थोडे कोरडे भाजून पिठात भिजवावे चांगले होतात.

Leave a comment