Chicken Mayo Sandwich-चिकन मेयोनीज सँडविच हे चिकन व मेयोनीज तसेच आकर्षक व पौष्टिकता वाढवण्यासाठी रंगीत सिमला मिरची व लेटूसची पाने वापरून बनवले जाते. Read More : Limbu Sarbat
सँडविच विषयी.
सँडविच हा असा पदार्थ आहे ज्यात अनेक प्रकारच्या भाज्या घालून तयार केले जाते. भाज्या, पनीर, वेगवेगळे सॉस तसेच चिकन, अंडी असे वेगवेगळे पदार्थ चव वाढणारे म्हणजेच चटणी व वेगवेगळे मसाले हे पदार्थ दोन्ही बाजूने ब्रेड वापरून तयार केले जाते.खरे तर सँडविच हा पाश्चात्य देशातील एक पदार्थ आहे. परंतु अनेक वर्षापासून तो आपल्या देशातही अगदी आवडीने खाल्ला जातो. परदेशात वातावरणामुळे ब्रेड, पाव हे पदार्थ जास्त खाल्ले जातात. याच ब्रेड व पाव मध्येवेगवेगळे पदार्थ घालून त्याला चविष्ट बनवला जातो.त्यातीलच एक प्रकार म्हणजे चिकन मेयोनीज सँडविच-Chicken Mayo Sandwich.
Chicken Mayo Sandwich-चिकन मेयोनीज सँडविच विषयी:
सँडविच हे कमी वेळेत व आपल्या आवडीनुसार बनवता येते, त्यामुळे अतिशय लोकप्रिय पदार्थ मानला जातो. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ला जातो. दोन ब्रेडच्या सहाय्याने तयार होणारा हा सँडविच बनवायला अतिशय सोपा आहे सँडविच मध्ये आपल्या आवडीनुसार कोणतेही पदार्थ वापरू शकतो. सॅंडविच व्हेज किंवा नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारात करता येते व दोन्ही प्रकार अतिशय चविष्ट होतात. व्हेज सँडविच बनवताना त्यामध्ये भाज्या म्हणजेच काकडी, टोमॅटो, गाजर, कांदा, सिमला मिरची किंवा बेबी कॉर्न तसेच बटाट्याची भाजी व त्याचबरोबर पदार्थाला चटपटीत चव येण्यासाठी टोमॅटो सॉस, चिली सॉस किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या लावल्या जातात , सँडविच प्रामुख्याने बटरचाही वापर केला जातो.बटर मुळे चव व पदार्थाचा दर्जा वाढतो . तसेच बटर मुळे सँडविच ला ओलावा राहत नाही .तसेच सँडविचला चीज मेयोनीज हे पदार्थ लावून त्याला अजून चविष्ट बनवले जाते. नॉनव्हेज सँडविच मध्ये चिकन, मटन, अंडी यासारखे पदार्थ वापरून सँडविच बनवले जाते.त्यातीलच एक प्रकार म्हणजे चिकन मेयोनीज सँडविच करायलाही सोपा व चवीला चविष्ट असे हे Chicken Mayo Sandwich-चिकन मेयोनीज सँडविच चिकन व मेयोनीस पासून बनवले जाते.
साहित्य.
- ब्रेड ब्रेड चार स्लाईस.
- बोनलेस चिकन चे तुकडे एक वाटी.
- कापलेले सिमला मिरची एक वाटी.
- हिरवी पिवळी लाल आपल्याकडे जी उपलब्ध असेल ती आपण वापरू शकतो.
- बारीक चिरलेला कांदा एक वाटी.
- मी आणि तीन ते चार चमचे .
- चीज स्लाईस गरजेनुसार .
- स्लाईस नसेल तर आपल्या आवडीनुसार कुठलेही घालू शकतो.
- गरजेनुसार मीठ.
- पावते अर्धा चमचा मिरेपूड.
- एक चमचा चिली फ्लेक्स.
- टोमॅटो सॉस चार ते पाच चमचे.
- पुदिन्याची व मिरचीची चटणी चार ते पाच चमचे.
कृती.
- Chicken Mayo Sandwich-चिकन मेयोनीज सँडविच करतांना प्रथम आपण घेतलेले बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घ्यावे व त्याचे बारीक तुकडे करून घ्यावे म्हणजे ब्रेडवर टाकताना व्यवस्थित टाकले जाते.
- नंतर सिमला मिरची व कांदा छान बारीक आकारात कापून घ्यावा.
- आता एका पॅनमध्ये थोडे बटर किंवा तूप घालून स्वच्छ केलेले चिकन चार ते पाच मिनिटे परतून घ्यावे चिकन चार ते पाच मिनिटात छान शिजवून मऊ होते.
- आता त्याच पॅनमध्ये कांदा व चिरलेल्या शिमला मिरची सुद्धा छान परतून घ्याव्यात म्हणजे त्या थोड्या मऊ होतील व कच्चेपणा निघून जाईल.
- आता एका भांड्यात परतून घेतलेल्या चिकन घ्यावे त्यात मेयोनीज व भाज्या घालून मिक्स करून घ्यावे त्यात चिली फ्लेक्स मिरेपूड व गरजेनुसार मीठ टाकून छान मिक्स करून घ्यावे.
- आता सँडविच साठी घेतलेल्या ब्रेडच्या चारी बाजूने कडा व्यवस्थित सुरीच्या साह्याने कापून घ्यावे व ब्रेडला आतल्या बाजूने छान बटर लावून घ्यावे बटर लावल्यामुळे सँडविचला ओलेपणा येत नाही.
- आता बटर लावल्यानंतर एका स्लाईसला टोमॅटो सॉस व एका स्लाईसला हिरवी चटणी लावून घ्यावे.
- आता सॅंडविच साठी तयार केलेले चिकनचे मिश्रण दोन्ही एका स्लाईस वर टाका छान पसरून घ्यावे व त्यावर चीज चीज नाही ठेवून घ्यावे व वरून दुसरा ब्रेडचीस ठेवावे.
- आता एका पॅनमध्ये बटर किंवा तूप टाकून तयार केलेले सँडविच दोन्ही बाजूने छान तांबूस रंगावर परतून घ्यावे सँडविच परतून झाल्यावर त्याचे त्रिकोणी आकारात कापून दोन भाग करावे व खायला द्यावे.
टिप्स.
- Chicken Mayo Sandwich-चिकन मेयोनीज सँडविच आपण कच्चे म्हणजेच न करताही खाऊ शकतो.
- सँडविच वापरताना आपण कुठलाही ब्रेड वापरू शकतो म्हणजेच मिल्क ब्रेड किंवा ब्राऊन ब्रेड.
- Chicken Mayo Sandwich-चिकन मेयोनीज सँडविच बनवताना आपल्याला आवडत असल्यास त्यात सॅलडची पाने घालता येतात.
- तसेच सिमला मिरची किंवा कांदा किंवा आवडत असल्यास गाजर त्यात घालता येते व भाज्या नको असल्यास आपण फक्त चिकन वापरू न ही हे सँडविच बनवू शकतो.