Site icon Ashlesha's Recipe

मुलांसाठी बनवा पौष्टिक व चविष्ट चिकन मेयोनीज सँडविच-Chicken Mayo Sandwich.

Chicken Mayo Sandwich-चिकन मेयोनीज सँडविच हे चिकन व मेयोनीज तसेच आकर्षक व पौष्टिकता वाढवण्यासाठी रंगीत सिमला मिरची व लेटूसची पाने वापरून बनवले जाते.                                                                                                                                              chicken mayo sandwichRead More : Limbu Sarbat

सँडविच विषयी.

सँडविच हा असा पदार्थ आहे ज्यात अनेक प्रकारच्या भाज्या घालून तयार केले जाते. भाज्या, पनीर, वेगवेगळे सॉस तसेच चिकन, अंडी असे वेगवेगळे पदार्थ चव वाढणारे म्हणजेच चटणी व वेगवेगळे मसाले हे पदार्थ दोन्ही बाजूने ब्रेड वापरून तयार केले जाते.खरे तर सँडविच हा पाश्चात्य देशातील एक पदार्थ आहे. परंतु अनेक वर्षापासून तो आपल्या देशातही अगदी आवडीने खाल्ला जातो. परदेशात वातावरणामुळे ब्रेड, पाव हे पदार्थ जास्त खाल्ले जातात. याच ब्रेड व पाव मध्येवेगवेगळे पदार्थ घालून त्याला चविष्ट बनवला जातो.त्यातीलच एक प्रकार म्हणजे चिकन मेयोनीज सँडविच-Chicken Mayo Sandwich.

Chicken Mayo Sandwich-चिकन मेयोनीज सँडविच विषयी:

सँडविच हे कमी वेळेत व आपल्या आवडीनुसार बनवता येते, त्यामुळे अतिशय लोकप्रिय पदार्थ मानला जातो. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ला जातो. दोन ब्रेडच्या सहाय्याने तयार होणारा हा सँडविच बनवायला अतिशय सोपा आहे सँडविच मध्ये आपल्या आवडीनुसार कोणतेही पदार्थ वापरू शकतो. सॅंडविच व्हेज किंवा नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारात करता येते व दोन्ही प्रकार अतिशय चविष्ट होतात. व्हेज सँडविच बनवताना त्यामध्ये भाज्या म्हणजेच काकडी, टोमॅटो, गाजर, कांदा, सिमला मिरची किंवा बेबी कॉर्न तसेच बटाट्याची भाजी व त्याचबरोबर पदार्थाला चटपटीत चव येण्यासाठी टोमॅटो सॉस, चिली सॉस किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या लावल्या जातात , सँडविच प्रामुख्याने बटरचाही वापर केला जातो.बटर मुळे चव व पदार्थाचा दर्जा वाढतो . तसेच बटर मुळे सँडविच ला ओलावा राहत नाही .तसेच सँडविचला  चीज मेयोनीज  हे पदार्थ  लावून त्याला अजून चविष्ट बनवले जाते. नॉनव्हेज सँडविच मध्ये चिकन, मटन, अंडी यासारखे पदार्थ वापरून सँडविच बनवले जाते.त्यातीलच एक प्रकार म्हणजे चिकन मेयोनीज सँडविच करायलाही सोपा व चवीला चविष्ट असे हे Chicken Mayo Sandwich-चिकन मेयोनीज सँडविच चिकन व मेयोनीस पासून बनवले जाते.

साहित्य.

कृती.

टिप्स. 

Exit mobile version