“शुद्ध Desi Ghee-देसी तूप: पारंपारिक पद्धतीने घरगुती तूप बनवा”

Desi Ghee-देसी तूप म्हणजे लोणी मंद आचेवर गरम करून ते वितळवले जाते व त्यानंतर लोणी पारदर्शक झाल्यानंतर त्याचे तूप तयार होते ह्या क्रियेला कढवणे असे म्हटले जाते. बाजारात मिळणारे तयार लोणी आणून घरी तापवून त्यापासूनही Desi Ghee-देसी तूप तयार केले जाते. परंतु आपण बाजारात मिळणाऱ्या डोळ्यावर किंवा तुपा विषयी कुठलेही शुद्धतेची खात्री देऊ शकत नाही अशा वेळेस घरी तयार केलेले Desi Ghee-देसी तूप हे उत्तम असते. Desi Ghee-देसी तूप दोन प्रकारचे असते एक गायीच्या दुधापासून तयार होणारे व दुसरे म्हशीच्या दुधापासून तयार होणारे गाईच्या दुधापासून तयार होणारे तूप हे जास्त प्रमाणात वापरले जाते.

Desi Ghee Recipe
Read More : Bhagar Recipe.

थोडे Desi Ghee-देसी तूप विषयी.

Desi Ghee-देसी तूप म्हणजे भारतीय आहारातील एक परंपरा आहे. तूप म्हणजे ऊर्जा. तूप म्हणजे समृद्ध आहार त्यात शुद्ध गाईचे तूप म्हणजे सात्विक आहार. तूप शरीराला समृद्धी देते आरोग्य देते तसेच पदार्थालाही पोषक तत्वांनी समृद्ध बनवते. भारतीय आहारशास्त्रात तुपाला अनन्य साधारण महत्त्व आहे. तूप म्हणजे परिपूर्ण आहार. रोज एक ते दोन चमचा साजूक तूप खाणे म्हणजे शरीराला सुदृढ बनवणे. तुपामुळे हाडांना ताकद मिळते. तुपामुळे शरीरातील मास धातू समृद्ध होतो व शरीराला विशिष्ट आकार मिळतो तसेच कांती सतेज होते. तुपामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. अगदी पूर्वीपासून आपल्या भारतीय आहारात व आयुर्वेदात तुपाचा वापर सर्रास पणे केला जातो. तूप जसे खाण्यासाठी वापरले जाते तसेच अगदी पूजा पाठ, होम हवन साठी सुद्धा वापरले जाते. होम हवन साठी शुद्ध गाईचे तूप वापरले जाते. तुपाला एक विशिष्ट चव असते तसेच पदार्थाला सुगंध देणारा स्वाद असतो. बाजारात अनेक प्रकारचे तूप मिळते व्यवसायिक दृष्ट्या अनेक कंपन्या तर्फे बाजारात तूप उपलब्ध केले जाते परंतु त्या तुपा विषयी आपल्याला कुठलीही खात्री देता येणार नाही. त्यामुळे घरी बनवलेले साजूक तूप याची कोणत्याही बाजारातील तुपाशी तुलना होऊ शकत नाही. भारतीय आहारशास्त्रात तुप हे पंचामृतातील एक महत्त्वाचाभाग मानला जातो. तूप पदार्थांना जशी चव देतो तसंच आपल्याला आरोग्य देतो. अगदी आपण इतिहास काळातील काही गोष्टी वाचल्या असतीलच त्यानुसार पूर्वी जुने तूप साठवून ठेवून त्यापासून औषधे तयार करण्यात येत असे. आजही आपण जखमेला तूप लावले तर जखम लवकर भरून येण्यास मदत होते त्याचप्रमाणे तुपातील आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणे अनेक फायदे आहेत. रोज रात्री झोपताना नाकात दोन थेंब तुपाचे टाकले तर झोप शांत येते तसेच नाकात तूप टाकल्यामुळे केस गळती थांबते. उन्हाळ्यात बऱ्याच व्यक्तींना उष्णतेचा त्रास होतो व पायांची आग होते अशा वेळेस पायांना तू लावण्याचा सल्ला दिला जातो पायांना तूप लावून काशाच्या वाटी ने घासले असता शरीरातील उष्णता पूर्णपणे निघण्यास मदत होते. तूप हे साधारण दुधापासूनच तयार करण्यात येते. शुद्ध व चांगल्या प्रकारच्या दुधापासून तूप तयार केले जाते. साजूक तूप घरी तयार करणे अतिशय सोपे आहे चला तर बघूया आज घरी तूप कसे तयार करावे.

Desi Ghee-देसी तूप कसे तयार करावे.

  • Desi Ghee-देसी तूप तयार करण्यासाठी गाईचे शुद्ध व उत्तम दर्जाचे दूध असणे महत्त्वाचे आहे. दुधाला मंद आचेवर तापवून आठ ते दहा तासासाठी थंड होऊ द्यावे त्यासाठी दूध फ्रीजमध्ये ठेवून गार केले तर उत्तम त्यामुळे त्यातील तुपाचा स्निग्ध अंशाचा पूर्ण पणे थर म्हणजेच साय चांगल्या पद्धतीने तयार होईल.
  • आठ ते दहा तासानंतर ती साय काढून एका भांड्यात घ्यावी अशाच प्रकारे रोज कमीत कमी आठवडाभर तरी तापवलेल्या दुधाची अशी साय काढून एका भांड्यात साचवावे.
  • काढलेल्या साईला थोडे दह्याचे विरजण लावावे व छान मिक्स करावे व रात्रभर ते भांडे बाहेर झाकून ठेवावे . अशा पद्धतीने तयार झालेले साईचे दही एका थोड्या मोठ्या भांड्यात घेऊन ते छान घुसळून घ्यावे.

Desi Ghee Recipe

  • तुम्ही लाकडी रवी किंवा आत्ता इलेक्ट्रिक ब्लेंडरही वापरले जातात ब्लेंडरनेही तुम्ही दही घुसळू शकतात पाच ते दहा मिनिटे दही घुसळल्यावर छान एक लोण्याचा गोळा व तरंगायला लागतो.

Desi Ghee Recipe

  • तो लोण्याचा गोळा हाताने अलगद काढून दुसऱ्या भांड्यात घ्यावा व तीन ते चार वेळा गार पाण्याने स्वच्छ धुवावा म्हणजे त्यातील पूर्णपणे ताकाचा किंवा दह्याचा अंश निघून जाईल व तूप तयार व्हायला वेळ कमी लागेल.

Desi Ghee Recipe

  • आता तीन ते चार वेळा धुतलेले लोण्याचा गोळा एका जाड भांड्यात टाकून मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवावा व तो चमच्याने सतत ढवळत राहावे त्यामुळे तूप चांगल्या पद्धतीने तयार होते.

Desi Ghee Recipe

  • आता लोणी पूर्णपणे वितळायला लागेल लोणी वितळल्यावर हळूहळू ते पारदर्शक होऊ लागते. लोणी पूर्ण पारदर्शक झाले म्हणजे ते तूप तयार झाले असे समजावे.त्यात थोडाफार दह्याचा राहिलेला अंश म्हणजे तो भाग थोडासा सोनेरी तांबूस रंगाचा होतो त्यालाच बेरी असे म्हटले जाते. तू पारदर्शक होत आले की त्यावर एक दोन चमचा पाणी टाकून बघावे पाणी कडकडले की तू झाले असे समजावे.

Desi Ghee Recipe

  • आता पूर्णपणे पारदर्शक झालेले तूप एका काचेच्या बरणीत किंवा आपल्या नेहमीच्या भांड्यात बारीक चाळणीने चाळून ओतून घ्यावे व गार झाले की झाकण बंद करून ठेवावे तूप अनेक दिवस टिकते. घरी बनवलेल्या साजूक तुपाची चव अतिशय सुंदर असते. त्यापासून तुम्ही तुमचे नेहमीचे पदार्थ बनवू शकतात.पोळी, पराठा, भाजी, सँडविच असे अनेक पदार्थ बनवले जातात. तूप कढवल्यानंतर राहिलेल्या पदार्थ खाली राहिलेल्या पदार्थ म्हणजेच बेरी ही सुद्धा खाल्ली जाते.

टीप.

  • तूप तयार करण्यासाठी लावलेले साईचे दही हे चांगल्या प्रकारे मुरलेले असले पाहिजे, म्हणजे ते चांगल्या प्रकारे आंबट झालेले पाहिजे कारण जर विरजण नीट लागले नाही तर दही घुसळताना लोण्याचा गोळा तयार व्हायला खूप वेळ लागतो. काही वेळेस लोणी पटकन गोळा होत नाही अशा वेळेस मिश्रणावर बर्फाच्या पाणी टाकावे व थोडा वेळ तसेच ठेवावे थोड्यावेळाने परत घुसळून घ्यावे लोणी पटकन तयार होते.
  • हिवाळ्यात त साईचे दही हे खूप घट्ट झालेले असते व थंडी असल्यामुळे लोणी पटकन निघत नाही अशा वेळेस अर्धा कप गरम पाणी घालून घुसळावे लोणी पटकन गोळा होते.
  • उन्हाळ्यात किंवा उष्ण हवामानात लोणी तयार करताना बर्फाचे पाणी वापरावे लोण्याचा गोळा पटकन निघतो.
  • विरजण लावलेल्या साईच्या दह्याला शक्यतोवर फ्रीज किंवा डीप फ्रिजरमध्ये ठेवावे म्हणजे त्याला वास येत नाही.
  • लोणी कडवताना त्यात उत्तम सुगंधासाठी एक हिरवा वेलदोडा घालावा तसेच त्याच्या शुद्धतेसाठी व उत्तम दर्जासाठी एक विड्याचे पान घातले जाते.
  • काही वेळेस तू जास्त गरम होते व रंगही त्याचा थोडा काळपट होतो म्हणजेच तूप जळाले असे आपण म्हणतो अशा वेळेस तुपात हळूहळू ताक घालावे म्हणजे त्याचा जळकटपणा निघून जातो व वासही कमी होतो व तुपाचा रंगही बदलतो ताक टाकताना अतिशय सावधानता बाळगावी ताक एकदम ओतले तर तू भांड्या बाहेर येऊ शकते ताक हळूहळू घालावे व तूप ढवळत राहावे म्हणजे त्याचा जळका वास व रंग निघून जाण्यास मदत होते व तूप वाया जात नाही.

FAQs.

Q.1. Desi Ghee-देसी तूप कोण कोणत्या पदार्थांमध्ये वापरले जाते ?

उत्तर: Desi Ghee-देसी तूप आपली नेहमीची पोळी, भाजी, दाल तडका, बिर्याणी, पराठा अशा अनेक पदार्थांमध्ये वापरले जाते. तसेच खीर लाडू व मिठाई लाडू अशा अनेक प्रकारच्या गोड पदार्थांमध्ये वापरले जातात.

Leave a comment