शरीराला व मनाला तरतरी आणणारा Mojito-मोजीतो.

Mojito -मोजिटो म्हणजे एक प्रकारचे कॉकटेल. साखर, पुदिना, लिंबू ,आणि सोडा यापासून बनवलेले एक कॉकटेल प्रकारातले पेय,जे उन्हाळ्यात शरीराला गार व मनाला प्रसन्न ठेवते.

MOJITO-RECIPE
Read More : How To Make Cutlet Recipe In Marathi

Mojito – मोजिटो विषयी.

Mojito -मोजिटो सर्वात प्रथम क्यूबा या देशात बनवले गेले . Mojito -मोजिटो हे नाव मोजो ह्या शब्द वरून ठेवले गेले. मोजो ह्या शब्दाचा अर्थ मोजो या क्युबा मधील एक मसाल्याचा पदार्थावरून ठेवले गेले. मोजो म्हणजे लिंबू पासून बनवलेला एक मसाला जो पदार्थ ची चव चटपटीत बनवण्यासाठी वापरण्यात येत होता. Mojito -मोजिटो या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे थोडा ओलसर असा होतो.मोजीटो हे पेय सुरुवातीला एक औषधाच्या रूपात बनवण्यात आल्याचे म्हटले जाते. मोजिटो खास करून उष्ण हवामान शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तयार केले गेले. लिंबू, पुदिना या शरीरातील उष्णता कमी करणारे व प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांपासून बनवले जाते. मोजिटो हे अनेक प्रकारात तयार केले जाते. मोजीं तो वेगवेगळ्या फळांपासून तयार केले जाते. Mojito -मोजिटोमध्ये मुख्य स्वाद आंबट रसयुक्त फळांचा असतो. त्यात पुदिन्याची पाने , गुलाबाच्या पाकळ्या यांसारखे नैसर्गिक स्वाद घातले जातात. परदेशात मोजतो हे अल्कोहोल घालून तयार केले जाते . तसेच Mojito -मोजिटोहे ओल्या नारळाचा वापर करून ही बनवले जाते.ओल्या नारळापासून तयार केलेल्या मोजतोला कोजितो म्हटले जाते. Mojito -मोजिटो हे पेय द्राक्ष, नाशपती, संत्री, रसभरी अशा फळांच्या रसापासून तयार केले जाते. तसेच आपल्या नेहमीच्या फळे म्हणजेच लिंबू,  स्ट्रॉबेरी, कलिंगड, आंबा अशा सहज उपलब्ध होणाऱ्या फळांपासूनही बनवले जाते.

Mojito -मोजिटो चा शोध सर्वात प्रथम कुठे लागला.

मोजिटो ची माहिती असलेली प्रथम रेसिपी 1927 साली मोजो क्री ओलो या नावाने सापडल्याचे म्हटले जाते. त्यानंतर एक सप्टेंबर 2011 साली परत त्याबद्दलची माहिती सापडल्याचे म्हटले जाते, व त्यावरूनच मोजीतो हे सगळीकडे प्रसिध्द व लोकप्रिय झाले.

HOW TO MAKE MOJITO – मोजिटो कसे बनवतात.

Mojito -मोजिटो हे एक प्रकारचे कॉकटेल आहे लिंबू, कलिंगड, आंबा, स्ट्रॉबेरी, काकडी अशा फळांपासून बनवले जाते. Mojito -मोजिटो थंडगार बर्फाशिवाय अपूर्ण आहे. तसेच Mojito -मोजिटो मध्ये सोडा वॉटर सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. Mojito -मोजिटोबनवताना एका कॉकटेल च्या ग्लासात लिंबू रस व थोड लिंबू च्या फोडी टाकले जातात. त्यातच थोडी साखर, पुदिन्याची ताजी पाने टाकले जातात व एका छोट्या आकाराच्या मुसळीच्या साह्याने अगदी हलक्या हाताने लिंबूचे तुकडे, पुदिन्याची पाने ठेचून घेतात. लिंबूचा किंवा आपण घातलेल्या कुठल्याही फळांचा रस ग्लासात तयार केला जातो. त्यातच पुदिन्याच्या पानांमुळे त्याला छान स्वाद येतो. नंतर त्यात थोडी साखर, बर्फाचे तुकडे घातले जातात. त्यानंतर त्यात सोडा वॉटर घातले जाते ,वरून पुदिन्याच्या पाने घालून सजवले जाते. थंडगार मोजतो हे मनाला एकदम प्रसन्न करते. उन्हाळ्यातील दिवसात मनाला तृप्त करणारे तसेच तहान भागवणारे व शरीराला उत्साह देणारे आहे. Mojito -मोजिटो हे अनेक प्रकारात केले जाते आपण तीन प्रकारचे Mojito -मोजिटो रेसिपी पाहणार आहोत.

कलिंगड मोजिटो – Watermelon Mojito.

साहित्य.

  • लिंबू एक.
  • कलिंगडाच्या 15 ते 20 चौकोनी तयार केलेल्या फोडी पुदिन्याची पाने पंधरा-वीस.
  • साखर दोन तीन चमचे किंवा आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता.
  • बर्फ आठ ते दहा क्यूब.
  • लिंबूच्या स्लाईस दोन.
  • सोडा वॉटर साधारण आपण घेतलेल्या ग्लासाच्या पाव ग्लास किंवा आपल्या आवडीनुसार.

कृती.

  • प्रथम कलिंगड कापून त्याचे छान छोटे आकाराचे 15 ते 20 तुकडे तयार करून घ्या.
  • अर्धा लिंबाच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्या व अर्ध्या लिंबाच्या पातळ स्लाईस कापून घ्या.
  • आता लिंबाच्या फोडी ग्लासमध्ये टाका वरून कलिंगडाच्या फोडी घाला .
  • आता पुदिन्याची पाने घाला वरून साखर घाला व एका हलक्या मुसळीच्या साह्याने ग्लासमध्ये सर्व साहित्य हलके हलके ठेचून घ्या जेणेकरून लिंबाचा व कलिंगडाचा रस निघेल.
  • आता सर्व मिक्स करून घ्या.
  • आता कॉकटेल च्या ग्लासामध्ये बर्फ घालून घ्या वरुन लिंबाच्या स्लाईस घाला . लिंबाच्या स्लाइस घातल्यानंतर तयार केलेले मिश्रण घाला. वरून थोड्या कलिंगडाच्या फोडी घाला.
  • आता वरून त्यात सोडा वॉटर घाला व मिक्स करून घ्या थंडगार मोजतो सर्व करा.

   ऑरेंज मोजिटो – Orange Mojito.

साहित्य.

  • एक कप संत्र्याचा रस.
  • लिंबू एक अर्धा लिंबूचे तुकडे करून व अर्धा लिंबू स्लाइस करून घ्याव्या.
  • दहा-बारा पुदिन्याचे पाने.
  • दोन चमचे साखर.
  • बर्फ गरजेनुसार.
  • सोडा वॉटर गरजेनुसार.

कृती.

  • मोजतो साठी तयार करण्यासाठी एक लांबट आकाराचा ग्लास घ्या .त्यात लिंबूच्या तयार केलेल्या फोडी टाका व पुदिन्याचे पाने टाका.
  • आता थोडी साखर घाला व एका हलक्या मुसळीच्या साह्याने हलक्या हाताने दाब देऊन ठेचून घ्या व लिंबू च्या फोडी चा रस काढून घ्या.वरून बर्फ घाला .
  • आता त्यात तयार केलेला संत्र्याचा रस घाला व पुदिन्याची पाने लिंबू स्लाईस टाका व वरून सोडा वॉटर टाका व छान मिक्स करून घ्या.
  • थंडगार ऑरेंज मोजतो सर्व्ह करा.

लेमन मोजिटो – Lemon Mojito.

साहित्य.

  • लेमन मोजतो बनवण्यासाठी मेंट फ्लेवर जास्त प्रमाणात वापरला जातो. त्यासाठी आपण मेंट फ्लेवरच्या कुठल्याही बाजारात मिळणाऱ्या गोळ्या वापरू शकतो. दोन ते तीन मिंट फ्लेवरच्या कॅंडी म्हणजे पोलो गोळया घेऊ शकतात.
  • दोन चमचे लिंबू रस, दोन लिंबूच्या स्लाईस अर्धा लिंबू अर्धा लिंबूचे तुकडे करून घ्यावे.
  • दहा ते बारा पुदिन्याची पाने .
  • दोन चमचे साखर.
  • बर्फ गरजेनुसार .
  • सोडा वॉटर गरजेनुसार.

कृती.

  • प्रथम मिंट फ्लेवरच्या घेतलेल्या कँडी एका हलक्या मुसळीच्या साह्याने बारीक करून घ्या .
  • आता मोजतो साठी घेतलेला लांबट आकाराच्या ग्लासात तयार केलेली गोळ्यांची पावडर टाका .
  • वरून लिंबू रस घाला नंतर त्यातच लिंबूच्या करून घेतलेल्या फोडी घाला व पुदिन्याची पाने घाला व हलक्या हाताने मुसळीच्या साह्याने हलक्या हाताने ठेचून घ्या व रस काढून घ्या.
  • वरून बर्फाचे तुकडे घाला परत लिंबूच्या स्लाईस घाला व वरून सोडा वॉटर घाला व छान मिक्स करून घ्या.
  • आता थंडगार लेमन मोजतो सर्व्ह करा.

टिप्स.

  • मोजिटो  हे एक प्रकारचे कॉकटेल आहे मोजतो बनवताना सोडा वॉटर फार गरजेचे आहे.
  • मोजिटो  हे थंडगारच घेतले जाते त्यासाठी बर्फ आवश्यक आहे.
  • मोजिटो  करताना त्यात घातलेल्या फळांच्या फोडी या ग्लासातच हळूहळू हलक्या हाताने ठेचाव्या व त्यातच वरून बर्फ ,सोडा वॉटर ,साखर घालू शकता किंवा एका खोलगट भांड्यात वेगळे मिश्रण तयार करून ते ग्लासात मिक्स करू शकतात.
  • मोजिटो  है आपल्या आवडीच्या कुठल्याही फळापासून करू शकतो फक्त त्यात लिंबू च्या फोडी आवश्यक आहेत.

FAQs.

प्रश्न १ :- मोजतो हे प्रथम कुठल्या देशात तयार केले गेले ?

उत्तर :- मोजतो हे सर्वात प्रथम औषधाच्या रूपात क्युबा या देशात तयार केले गेले नंतर ते उन्हाळ्यातील पेय म्हणून घेतले जाऊ लागले.

प्रश्न २ :- अल्कोहोल रहित मोजतोला काय म्हणतात ?

उत्तर :- क्युबा देशातील मोजतो हे पेय साधारण व्हाईट रम घालून तयार केले जाते .आपल्याकडे त्यात सोडा वॉटर घातले जाते. अल्कोहोल रोहित मोजीतो ला व्हर्जिन मोजतो म्हटले जाते.

Leave a comment