“Idli-इडली बनवताना कधी चुकू नका: परफेक्ट इडलीसाठी टिप्स!”

Idli-इडली म्हणजे तांदूळ व डाळ भिजवून आंबवून त्या पिठापासून बनवलेला स्वादिष्ट पदार्थ, मूळ दक्षिण भारतातली प्रसिद्ध पदार्थ. हल्ली प्रत्येक शहरात रस्त्याच्या कडे कडेने इडली सांबार याचे ठेले लावलेले दिसतात.

Idli-इडली
                                         Read More : Veg Manchurian Recipe.

थोडे Idli-इडली विषयी.

Idli-इडली म्हणजे तांदळाच्या पिठापासून बनवलेला हलका फुलका व सोपा पदार्थ. Idli-इडली चा नाश्ता हा आरोग्याच्या दृष्टीने उत्तम म्हणायला काही हरकत नाही. Idli-इडली तांदुळापासून बनवल्यामुळे पचायलाही हलकी असते तसेच इडलीचे पीठ आंबवून तयार केली जाते म्हणून तिच्यात अनेक पोषक तत्वे निर्माण होतात जे आपल्या पचनसंस्थेला मजबूत बनवतात. इडली ही दक्षिण भारतात ची खासियत असली तरी सुद्धा इडली ही हल्ली पूर्ण देशभरात तसेच महाराष्ट्रातही अगदी नेहमीच्या पदार्थ बनलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही इडली घराघरात बनवली जाते. परंतु बरेच जणांची तक्रार असते कधी इडलीचे पीठ आंबले नाही किंवा इडली नीट फुगली नाही कडक झाली, किंवा घट्ट झाली व जाळी कमी झाली असे अनेक समस्या येतात. परंतु अगदी योग्य प्रकारे तांदूळ भिजवून धुवून ठेवले तर इडली करायला अगदी सोपा पदार्थ आहे. अगदी स्वयंपाकाला नवीनच सुरुवात करणाऱ्या मुलींसाठी सुद्धा इडली हा अतिशय सोपा पदार्थ असू शकतो. इडली तांदूळ व उडदाची डाळ यापासून मुख्यत्वे करून बनवली जाते. परंतु इडली मुगाची पिवळी डाळ किंवा हरभऱ्याची डाळ यापासूनही आपण बनवू शकतो. तसेच काही ठिकाणी मसुराची डाळ ही वापरली जाते. इडली साठी कोणते तांदूळ वापरायचे हेही अनेक जणांचा प्रश्न असतो.

Idli-इडली कशी बनवायची.

  • Idli-इडली बनवण्याची पारंपारिक पद्धत म्हणजे तांदूळ व डाळ चार ते सहा तासासाठी भिजवून ठेवावे.
  • त्यानंतर ते मिक्सरमधून बारीक वेगवेगळे वाटण तयार करून ते नंतर एकत्र करावे व परत सहा ते आठ तासासाठी आंबवण्याचे प्रक्रियेला ठेवावे.
  • मिश्रण आंबवण्यासाठी त्यात कधी थोडी ताक किंवा मेथीदाणे वापरले जातात, त्यामुळे इडली एकदम हलकी होते. मिश्रण आठ तासानंतर छान आंबते व त्यानंतर इडली पात्रात मिश्रण घालून ते वाफवून घ्यावे.

Idli-इडली साठी कोणता तांदूळ वापरावा.

Idli-इडलीसाठी दक्षिण भारतात वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ वापरले जातात आपल्याकडे हल्ली ते मिळतात परंतु उकडीचा तांदूळ हा इडली साठी चांगला मानला जातो. तसेच आपल्याकडे मिळणारा रेशनचा तांदळापासून बनलेली इडली ही अतिशय उत्तम होते. त्यामुळे रेशनचा तांदूळही वापरला जातो. तसेच हल्ली तांदळाचा व डाळीचा रवा सुद्धा बाजारात उपलब्ध असतो तो इडली पटकन तयार व्हावे यासाठी वापरण्यात येतो. पारंपारिक पद्धतीने इडली बनवताना मुख्यत्वे करून उडदाची डाळ वापरली जाते. काळया डाळीचे साल काढून तिला स्वच्छ करून घेतात व ती स्वच्छ झालेली पांढरी उडदाची डाळ इडलीला वापरली जाते. परंतु का काही वेळा हरभरा किंवा पथ्य म्हणून मुगाची डाळ ही वापरली जाते किंवा मसुराची डाळ वापरण्याचाही काही जणांचा अनुभव आहे. पारंपारिक पद्धतीने तांदूळ व उडदाची डाळ वापरून बनवलेली इडली ही आरोग्यदायी मानले जाते तसेच डाळिंमधील प्रथिने कॅल्शियम व आवश्यक पोषक तत्वे मिळतात.
दक्षिण भारतात इडली बनवण्याची अनेक प्रकार आहेत. तांदूळ व डाळ चार ते सहा तास भिजवून परत सहा ते आठ तास आंबवून ठेवण्यासाठी खूप वेळ जातो, म्हणून इडली वेळखाऊ ठरते. त्यामुळे दक्षिण भारतात तांदळाचा झटपट इटली बनवण्यासाठी तांदळाच्या रवा व उडदाच्या डाळीचा रवा यापासूनही बनवली जाते. तांदळाचा व डाळीचा रवा हा बाजारात उपलब्ध असतो. ह्या रव्यापासून बनवलेल्या इडल्या लुसलुशीत होतात. तसेच दक्षिण भारतात अर्धवट शिजलेल्या भातापासूनही इडली बनवली जाते. ही इडली हलकी होत इडली बनवण्या साठी कमी चिकट होणारा तांदूळ वापरला जातो.

साहित्य.

  • तीन वाट्या इडलीचा तांदूळ.
  • एक वाटी उडदाची पांढरी डाळ.
  •  एक चमचा मेथी दाणे.
  •  एक वाटी पोहे.

मिश्रण तयार करण्यासाठीची कृती.

  • Idli-इडली साठी मिश्रण तयार करताना प्रथम इडलीचा तांदूळ म्हणजेच कमी चिकट होणारा तांदूळ घ्यावा.
  • तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन चार ते पाच तासासाठी एका भांड्यात भिजत घालावा.
  • तांदूळ भिजत घालताना त्यात एक चमचा मेथी दाणे भिजत घालावे मेथीदाणे पीठ आंबवण्यासाठी तसेच इडली हलकी होण्यासाठी उपयुक्त ठरतात.
  • नंतर दुसऱ्या एका भांड्यात उडदाची पांढरे डाळ घेऊन व दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून ते सुद्धा वेगळी दिसत घालावी.
  • चार ते पाच तासानंतर डाळ व तांदूळ अगदी छान भिजले जातात.
  • त्यानंतर पाणी निथळून घ्यावे व मिक्सरच्या साह्याने अगदी बारीक पेस्ट करावी डाळ व तांदूळ मिक्सर मधून फिरवताना त्यात मूठभर पोहे बारीक करून घ्यावे म्हणजे इडली छान मऊ लुसलुशीत होते.
  • त्यानंतर तयार केलेले मिश्रण एकत्र करून छान तीन ते पाच मिनिटांसाठी हलवून घ्यावे त्यासाठी तुम्ही इलेक्ट्रिक ब्लेंडर चा वापर करू शकतात .
  • हे मिश्रण फिरवल्यामुळे पीठ छान तयार होते व इडली अतिशय हलकी होते या मिश्रणात अर्धी वाटी ताकही घालावे इडली पांढरे शुभ्र होते .
  • त्यानंतर हे पीठ पक्क्या झाकणाच्या भांड्यात किंवा डब्यात झाकून 10 ते 12 तासासाठी ठेवावे उन्हाळ्यात फार वेळ लागत नाही परंतु हिवाळ्यात पीठ आंबण्यासाठी वेळ लागतो दहा तासानंतर म्हणजेच रात्री पीठ आंबवण्यासाठी ठेवावे व सकाळी इडली करावी. त्यानंतर आठ ते दहा तासानंतर पीठ छान तयार झालेले असेल.

Idli-इडली कशी तयार करावी.

  • Idli-इडली तयार करताना त्यात एका वेगळ्या भांड्यात थोडे मिश्रण घेऊन त्यात चवीसाठी मीठ घालावे व मिश्रणात थोडे पाणी घालून थोडे सरसरीत करून घ्यावे.
  • आता इडली बनवण्यासाठी इडली स्टॅन्ड म्हणजेच एक इडलीपात्र असते त्या इडली पात्रात प्रथम खाली थोडे पाणी टाकून नंतर इडलीच्या साच्यात तेल लावून घ्यावे व गॅसवर ठेवावे.
  • आता तेल लावलेल्या साच्यात चमच्याच्या साह्याने थोडे थोडे इडलीचे मिश्रण घालावे व साचे एकावर एक ठेवून त्यावर झाकण ठेवावे व पंधरा मिनिटांसाठी इडल्या वाफवून घ्याव्या.
  • आता पंधरा मिनिटानंतर झाकण काढून इडलीचे साचे बाहेर काढून ठेवावे म्हणजे इडल्या पटकन गार होतील व व्यवस्थित निघतील गरम गरम इडली साच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी खराब होते बऱ्याच वेळा ती साच्याला चिकटते.
  • आता काढलेले इडली छान सांबार किंवा नारळाच्या हिरव्या चटणी सोबत खायला द्यावी.

टीप.

  • Idli-इडली तयार करताना इडली साठी कमी चिकट होणारा तांदूळ वापरावा त्यासाठी तुम्ही रेशनचा तांदूळही अगदी सहज वापरू शकतात. किंवा बाजारात मिळणारा उकडीचा तांदूळ घ्यावा.
  • Idli-इडली साठी डाळ पांढऱ्या उडदाची डाळ वापरली जाते जर पथ्य असेल तर आपण मुगाची डाळ ही वापरू शकतो डाळीमुळे पीठ थांबवण्याचा वेळ कमी जास्त होऊ शकतो.
  • इडली साठी मी तयार केलेले मिश्रण छान फेटून घ्यावे व त्यानंतरच थांबवण्यासाठी व्यवस्थित झाकून ठेवावे म्हणजे इडल्या छान मऊ लुसलुशीत व हलक्या होतात.
  • इडलीच्या मिश्रणात मेथी दाण्यांचा वापर अवश्य करावा.
  • तसेच पोहेही घालावे व इडली च पीठ व्यवस्थित आंबण्यासाठी थोडे ताक घालावे हिवाळ्यात आंबट दह्यात दह्याचे ताक वापरले तरी चालेल हिवाळ्यात पीठ पटकन पीठ आंबवण्याची प्रक्रिया पटकन होत नाही म्हणून थोडे आंबट ताक चालते.
  • हिवाळ्यात इडलीचे मिश्रण आंबवण्यासाठी तुम्ही बंद डब्यात इडलीच्या मिश्रणाचे भांडे ठेवून शकतात म्हणजे डब्यात भांड्या भोवती उष्णता निर्माण होऊन पीठ पटकन आबंते.
  • Idli-इडली वाफवताना पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वापरू नये जास्त वापरल्यास इडली कोठे होते व घट्ट होते तसेच कमी सुद्धा वापरू नये नाहीतर इडली आपण कच्चे राहते.
  • इडलीचे मिश्रण हे फार पातळ किंवा फार घट्ट नसावे इडली वाफवताना गरज वाटल्यास अगदी चिमूटभर सोडायचा वापर तुम्ही करू शकतात. पण जर पीठ छान आंबवलेले असेल तर सोडायची गरज पडत नाही.
  • इडलीचे पीठ जर उरले असेल तर मीठ न घालता ते आपण फ्रीजमध्ये एका बंद डब्यात ठेवू शकतो.
  • लहान मुलांसाठी Idli-इडली करताना आपण त्यात भाज्या म्हणजेच फ्लावर, मटार, मोड आलेले मूग, कांदा, किसलेले गाजर, अशा वेगवेगळ्या भाज्या घालून मसाला इडली तयार करू शकतो ही इडली सुद्धा खूप छान लागते व मुलांसाठी पौष्टिक होते.

 

Leave a comment