Site icon Ashlesha's Recipe

“Idli-इडली बनवताना कधी चुकू नका: परफेक्ट इडलीसाठी टिप्स!”

Idli-इडली म्हणजे तांदूळ व डाळ भिजवून आंबवून त्या पिठापासून बनवलेला स्वादिष्ट पदार्थ, मूळ दक्षिण भारतातली प्रसिद्ध पदार्थ. हल्ली प्रत्येक शहरात रस्त्याच्या कडे कडेने इडली सांबार याचे ठेले लावलेले दिसतात.

                                         Read More : Veg Manchurian Recipe.

थोडे Idli-इडली विषयी.

Idli-इडली म्हणजे तांदळाच्या पिठापासून बनवलेला हलका फुलका व सोपा पदार्थ. Idli-इडली चा नाश्ता हा आरोग्याच्या दृष्टीने उत्तम म्हणायला काही हरकत नाही. Idli-इडली तांदुळापासून बनवल्यामुळे पचायलाही हलकी असते तसेच इडलीचे पीठ आंबवून तयार केली जाते म्हणून तिच्यात अनेक पोषक तत्वे निर्माण होतात जे आपल्या पचनसंस्थेला मजबूत बनवतात. इडली ही दक्षिण भारतात ची खासियत असली तरी सुद्धा इडली ही हल्ली पूर्ण देशभरात तसेच महाराष्ट्रातही अगदी नेहमीच्या पदार्थ बनलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही इडली घराघरात बनवली जाते. परंतु बरेच जणांची तक्रार असते कधी इडलीचे पीठ आंबले नाही किंवा इडली नीट फुगली नाही कडक झाली, किंवा घट्ट झाली व जाळी कमी झाली असे अनेक समस्या येतात. परंतु अगदी योग्य प्रकारे तांदूळ भिजवून धुवून ठेवले तर इडली करायला अगदी सोपा पदार्थ आहे. अगदी स्वयंपाकाला नवीनच सुरुवात करणाऱ्या मुलींसाठी सुद्धा इडली हा अतिशय सोपा पदार्थ असू शकतो. इडली तांदूळ व उडदाची डाळ यापासून मुख्यत्वे करून बनवली जाते. परंतु इडली मुगाची पिवळी डाळ किंवा हरभऱ्याची डाळ यापासूनही आपण बनवू शकतो. तसेच काही ठिकाणी मसुराची डाळ ही वापरली जाते. इडली साठी कोणते तांदूळ वापरायचे हेही अनेक जणांचा प्रश्न असतो.

Idli-इडली कशी बनवायची.

Idli-इडली साठी कोणता तांदूळ वापरावा.

Idli-इडलीसाठी दक्षिण भारतात वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ वापरले जातात आपल्याकडे हल्ली ते मिळतात परंतु उकडीचा तांदूळ हा इडली साठी चांगला मानला जातो. तसेच आपल्याकडे मिळणारा रेशनचा तांदळापासून बनलेली इडली ही अतिशय उत्तम होते. त्यामुळे रेशनचा तांदूळही वापरला जातो. तसेच हल्ली तांदळाचा व डाळीचा रवा सुद्धा बाजारात उपलब्ध असतो तो इडली पटकन तयार व्हावे यासाठी वापरण्यात येतो. पारंपारिक पद्धतीने इडली बनवताना मुख्यत्वे करून उडदाची डाळ वापरली जाते. काळया डाळीचे साल काढून तिला स्वच्छ करून घेतात व ती स्वच्छ झालेली पांढरी उडदाची डाळ इडलीला वापरली जाते. परंतु का काही वेळा हरभरा किंवा पथ्य म्हणून मुगाची डाळ ही वापरली जाते किंवा मसुराची डाळ वापरण्याचाही काही जणांचा अनुभव आहे. पारंपारिक पद्धतीने तांदूळ व उडदाची डाळ वापरून बनवलेली इडली ही आरोग्यदायी मानले जाते तसेच डाळिंमधील प्रथिने कॅल्शियम व आवश्यक पोषक तत्वे मिळतात.
दक्षिण भारतात इडली बनवण्याची अनेक प्रकार आहेत. तांदूळ व डाळ चार ते सहा तास भिजवून परत सहा ते आठ तास आंबवून ठेवण्यासाठी खूप वेळ जातो, म्हणून इडली वेळखाऊ ठरते. त्यामुळे दक्षिण भारतात तांदळाचा झटपट इटली बनवण्यासाठी तांदळाच्या रवा व उडदाच्या डाळीचा रवा यापासूनही बनवली जाते. तांदळाचा व डाळीचा रवा हा बाजारात उपलब्ध असतो. ह्या रव्यापासून बनवलेल्या इडल्या लुसलुशीत होतात. तसेच दक्षिण भारतात अर्धवट शिजलेल्या भातापासूनही इडली बनवली जाते. ही इडली हलकी होत इडली बनवण्या साठी कमी चिकट होणारा तांदूळ वापरला जातो.

साहित्य.

मिश्रण तयार करण्यासाठीची कृती.

Idli-इडली कशी तयार करावी.

टीप.

 

Exit mobile version