Jain Pav Bhaji-जैन पावभाजी म्हणजे बटाटा व कांदा लसूण न घालता बनवलेली पाव भाजी हल्ली ही अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. अगदी आपल्या नेहमीच्या पावभाजी प्रमाणे जैन पावभाजीची सुद्धा ठेला बाजारात लागलेला दिसतो. कांदा लसूण न घालता सुद्धा भाजी खूप छान होते.
थोडे Jain Pav Bhaji-जैन पावभाजी विषयी.
जैन धर्मात बरेचसे कंदमुळे व कांदा लसूण खाल्ला जात नाही. त्यामुळे अनेक पदार्थ म्हणजे स्ट्रीट फूड, चाट असे पदार्थ बनवताना त्यांना खूप समस्या निर्माण होतात. आपण चवीसाठी कांदा, लसूण वापरतात. परंतु कांदा लसूण न वापरता सुद्धा पदार्थाची अतिशय उत्तम चव येवु शकते हे आपण या रेसिपी मध्ये पाहणार आहोत. बऱ्याच जैन पाककृतीमध्ये बटाट्याच्या ऐवजी कच्ची केळी वापरले जाते. कच्ची केळी वापरणे हे पूर्णपणे आपल्या आवडीवर अवलंबून आहे, आवडत नसल्यास आपण ती टाळू शकतो. Jain Pav Bhaji-जैन पावभाजी हे टोमॅटो मटार व बटाट्याच्या जागी कच्ची केळी वापरून बनवली जाते. मी आज कच्ची केळी घालून पावभाजीची पाककृती लिहिणार आहे.
साहित्य.
- शिमला मिरची मध्यम आकाराचे एक.
- टोमॅटो दोन.
- फ्लावरची फुले एक वाटी.
- अर्धी वाटी हिरवे वाटाणे.
- एक ते दोन कच्ची केळी.
- कोरड्या लाल मिरच्या दोन-तीन.
- लोणी गरजेनुसार.
- पावभाजी मसाला दोन ते तीन छोटे चमचे.
- अर्धा चमचा जिरे.
- चवीनुसार मीठ.
- थोडी कोथिंबीर.
- पाव चार ते पाच.
- पाव भाजण्यासाठी तूप किंवा बटर.
कृती.
- Jain Pav Bhaji-जैन पावभाजी बनवताना प्रथम कच्ची केळी वाफवुन घ्या.
- वाफवलेली केळी गार करून घ्या व गार झाल्यावर केळीची साल काढून घ्यावे व बटाट्याच्या मेसेज करून घ्यावी.
- कच्ची केळी हे बटाट्याप्रमाणे भाजीला एक संघपणा आणते.
- आता काश्मिरी लाल कोरड्या मिरच्या ची बारीक पावडर करून घ्या किंवा तयार तिखट असेल ते वापरले तरी चालेल काश्मिरी मिरची ही भाजीला रंग आणण्यासाठी वापरले जाते.
- काश्मिरी मिरची ही तुम्ही पाण्यात भिजवून व मिक्सरमध्ये फिरवून तिची बारीक पेस्ट करूनही वापरू शकतात त्यामुळे भाजीला सुंदर रंग येतो.
- आता शिमला मिरचीचे छान बारीक चौकोनी तुकडे करून घ्या तसेच टोमॅटोही बारीक चिरून घ्या.
- हिरवे वाटाणे व फ्लावरची फुले स्वच्छ धुऊन वाफवून घ्यावे.
- आता एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात प्रथम जिरे घाला जिरे तडतडले की त्यात मिरचीची पेस्ट किंवा मिरची पावडर घालावी मिरची पावडर घालताना आज मंद ठेवा त्यानंतर त्यात वाफवून मॅच केलेली कच्ची केळी घाला.
- केळी छान परतून घ्यावे केळी परतल्यामुळे तिचा चिकटपणा व कमी होतो तसेच केळीत वाफवल्यावर पावभाजी मसाला घालावा व मिरची पावडर हळद ही मसाले घालावे. व छान वाफवून घ्यावी गरज पडल्यास थोडे पाणी घालून झाकण ठेवून वापरावे म्हणजे भाजीला तेल सुटेल.
- आता केळी व मसाला छान परतून घ्यावा त्यानंतर त्यात चिरलेली शिमला मिरची व चिरलेला टोमॅटो व तोही छान परतून घ्यावा एक मिनिटभर झाकण ठेवून वाफवून घ्यावा व त्यात थोडे पाणी घालावे म्हणजे टोमॅटो छान मऊ शिजतो. व भाजीला तेल ही सुटेल.
- आता त्यात मॅश केलेले फ्लावर व वाटाणे घाला व तीही छान परतून घ्या. भाजी छान हलवून मिक्स करून घ्यावी व आपल्या गरजेनुसार घट्ट किंवा पातळ ठेवावे फार पाणी घालू नये.
- आता भाजी आठ ते दहा मिनिटे छान उकळून घ्यावे व सतत ढवळत राहावे भाजी खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी आता भाजी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
- आता पावभाजी सोबत खाण्यासाठी पाव भाजून घ्यावे त्यासाठी पाव बरोबर मधून कापून त्याला बटर किंवा तूप लावून तव्यावर छान भाजून घ्यावे.
- पाव भाजल्यामुळे पाव छान कुरकुरीत होतो व पावभाजी सोबत छान खमंग स्वाद देतो.
- आता पावभाजी व लिंबाची फोड, टोमॅटोच्या फोडी व पावभाजी वर एक चमचा लोणी घालून भाजी खायला द्यावी.
टीप.
- Jain Pav Bhaji-जैन पावभाजी बनवताना त्यात कच्ची केळी घातल्यामुळे भाजीला एक सरसरीतपणा येतो तसेच जर केली घालायची नसेल तरीसुद्धा तुम्ही टाळू शकतात व बाकीच्या साहित्य पावभाजी बनवता येते ती सुद्धा छान होते.
- कच्ची केळी वापरताना ती वाफवून घ्यावी म्हणजे तिचा तुरटपणा कमी होतो व तेलात छान परतून घ्यावी त्यामुळे केळीचा चिकटपणा कमी होतो.
- Jain Pav Bhaji-जैन पावभाजी कच्ची केळी घातल्यामुळे बटाट्याची जागा भरून काढते. तसेच पावभाजीची चवही फार बदलत नाही.
- Jain Pav Bhaji-जैन पावभाजी बनवताना तेलाऐवजी पूर्णपणे तुपातही फोडणी देऊ शकतात किंवा बटरचा वापर करू शकता.
- जैन पावभाजी मध्ये मिरची काश्मिरी लाल मिरचीची पावडर किंवा पेस्ट बनवू नये टाकता येते.आपल्या आवडीप्रमाणे पावडर घाला. लाल मिरचीची पावडर घालताना ती तुम्ही भाजी पूर्ण झाल्यावर वरून भाजी उकळत असताना घालू शकतात त्याने रंग छान येतो.
- काश्मिरी मिरची नसेल तर आपल्याकडे उपलब्ध असलेले कुठलेही लाल रंगाची मिरची घ्यावी पण काश्मिरी मिरची मुळे भाजीला रंग छान येतो व भाजीच्या तिखट चवीवर फारसा बदल होत नाही.