“Malpua-मालपुआ: महाराष्ट्रातील खास गोड पदार्थ”

Malpua-मालपुवा म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनवले ला एक स्वादिष्ट गोड पदार्थ. Malpua-मालपुवा ही एक उत्तर भारतातील पारंपारिक पद्धतीने केला जाणारा एक गोड पदार्थ आहे. जो दिवाळी होळी नवरात्रात प्रामुख्याने केला जातो व आवडीने खाल्ला जातो.

Malpua-मालपुवा
Read More : Upma Recipe.

थोडे Malpua-मालपुवा विषयी.

Malpua-मालपुवा हे या आपल्या देशातील एक पारंपारिक मिठाई आहे.मालपुवा ही राजस्थानी मिठाई मध्ये गनली जाते. आज आपण मालपुवा हा अगदी आपल्या नेहमीच्या वापरातील गव्हाच्या पिठापासून कसा  बनवला जातो तर पाहणार आहोत. परंतु Malpua-मालपुवा  अनेक वेगवेगळ्या भागात अनेक पदार्थापासून बनवला जातो म्हणजे मैद्यापासून व रव्यापासूनही बनवला जातो.Malpua-मालपुवा ही खास सणावारांना व उत्सवांना केला जाणारा एक गोड स्वादिष्ट पदार्थ आहे. गणेश उत्सवात गणपतीला एक दिवस Malpua-मालपुवा चा नैवेद्य दाखवला जातो. तसेच नवरात्र उत्सवात सुद्धा देवीला एक दिवस मालपुवा चा नैवेद्य दाखवला जातो. Malpua-मालपुवा हा एक पारंपारिक पदार्थ आहे. Malpua-मालपुवा हा अगदी कमी वेळेत होणारा पदार्थ आहे. अगदी अचानक येणाऱ्या पाहुण्यांसाठी सुद्धा आपण Malpua-मालपुवा सहज थोड्या वेळात तयार करू शकतो. काही ठिकाणी मालपुवा हा जिलेबी च्या मिश्रणासारखा आंबवला जातो . असा मालपुवा बनवताना मिश्रणात थोडे ताजे दही घालतात.पण तसा मालपुवा बनवणे म्हणजे जरा जास्त वेळ जातो. पण प्रत्येक वेळी ते शक्य होईलच असे नाही म्हणून बऱ्याच वेळा हा झटपट होणारा मालपुवा बनवला जातो.

Malpua-मालपुवा कसा बनवावा.

साहित्य.

  • एक वाटी गव्हाचे पीठ.
  • एक वाटी साखर.
  • दोन चमचे मिल्क पावडर.
  • एक चिमूट बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा.
  • स्वादासाठी केशर ,वेलदोडा व थोडी बडीशोप.
  • चार पाच बदाम.
  • थोडे पिस्ता.
  • गरजेनुसार रबडी.

कृती.

  •  Malpua-मालपुवा बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात साखर घालून त्यात कपभर पाणी घालून उकळायला ठेवावे म्हणजे आपल्याला गुलाबजामला लागतो तसा कच्चा पाक बनवून घ्यावा.
  •  पाकात थोडे केशर वेलदोडा घालावा.पाक बनवतांना साखर सतत ढवळत रहावी नाही तर साखर भांड्याला चिकटते व पाक नित होत नाही
  • आता एका भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन ते दूध घालून छान एकजीव करावे.दुध घातल्यामुळे Malpua-मालपुवा ला छान मलाई चा स्वाद येतो.दूध नसेल तर मिल्क पावडर घातली तरी चालेल. थोडे बडीशोप पावडर अवश्य घालावी.बडीशोप मुळे Malpua-मालपुवा लाएक छान सुगंधित चव येते.
  • आता मिश्रण थोडे सरसरीत बनवावे म्हणजे तळताना आपल्याला मालपुवा चा आकार व्यवस्थित येईल.
  • मिश्रण फार घट्ट झाले तर मालपुवा खूप जाड येतो व मिश्रण पातळ झाले तर मला तळायला वेळ जातो व कुरकुरीत होत नाही.
  • हे मिश्रण थोडा वेळ म्हणजे दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवावे.
  • आता बदाम व पिस्ता थोड्या तुपावर भाजून घ्या.भाजून झाल्यावर त्याचे कप करून ठेवा. पंधरा मिनिटानंतर एका पसरट भांड्यात तळण्यासाठी तूप घ्यावे.तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकतात. तेलाला फार वास नसेल याची काळजी घ्यावी नाही तर Malpua-मालपुवा तेलाचा वास लागण्याची शक्यता असते त्यामुळे स्वाद बदलतो.
  • आता Malpua-मालपुवा करण्याआधी मिश्रणात एक चिमूट बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर घाला.त्यामुळे मालपुवा छान फुलतो व कुरकुरीत होण्यास मदत होते.
  • आता तूप योग्य तापमानाला तापले की एका चमच्याच्या साह्याने मिश्रण घेऊन त्या तुपात वरून सोडावे अगदी हळुवारपणे तेलात टाकावे.मिश्रणाचा गोल पुरी एवढा आकार आला की थांबावे. तळण्याचे भांडे मोठे असेल तर त्याच प्रमाणे दुसरे दुसऱ्या मालपुवा टाकावा भांडे छोटे असेल तर एकावेळी एकच मालपुवा तळावा.
  • आता दोन ते तीन मिनिटे मालपुवातसाच ठेवावा वरून चमच्याने तूप टाकावे नंतर चमच्याच्या साह्याने परत दुसऱ्या बाजूनेही मालपोहा छान तळून घ्यावा मालपोहा सोनेरी रंगावर तळावा.
  • आता तयार झालेला मालपुवा काढून आपण तयार केलेल्या साखरेच्या मिश्रणात घालावा.
  • याच प्रकारे सगळे मालपुवा काढून मिश्रणाचे मालपुवा काढून घ्यावे व पाकात टाकावे.
  • मालपुवा पाकात छान भिजल्यावर एका प्लेटमध्ये काढून त्यावरून आपल्या आवडीचा सुकामेवा टाकावा बदामाचे काप,किसमिस चे काप या पद्धतीने आपण टाकू शकतो.
  • मालपुवा हा रबडी सोबत खाल्ला जातो. मालपुवा वरून रबडी टाकून सर्व्ह करावा. खूप छान लागतो.

टिप.

  • मालपुवा गव्हाचे पीठ, मा मैदा व रवा अशा पदार्थांनी बनवला जातो.
  • मालपुवा कुरकुरीत येण्यासाठी तयार केलेल्या मिश्रणात एक ते दोन चमचा तांदळाचे पीठ घ्यावे म्हणजे मालपुवा छान कुरकुरीत होतो.
  • मालपुवा बनवताना उत्तम स्वादासाठी मालपुवाच्या मिश्रणात थोडा मावा घालावा.
  • मालपुवा बनवताना अगदी पाव चमचा बारीक केलेली बडीशोप वापरावे त्याची चव सुद्धा खूप छान येते.
  • मालपुवा तळण्या साठी शक्यतोवर पसरट भांडे घ्यावे म्हणजे मालपुवा तेलात टाकल्यावर एकमेकाला चिकटत नाही.
  • मालपुवा बनवण्यासाठी रव्याचा वापर करणार असाल तर कमीत कमी मालपवायचे मिश्रण एक तास झाकून ठेवावे म्हणजे रवा छान फुलून येईल व मालपोहे छान होतील.
  •  मालपुवा हा मंद ते मध्यम आचेवर तळावा म्हणजे छान रंग येतो व पूर्णपणे तळला जातो.
  • मालपुवा फार जाड करू नये म्हणजे मालपुवा छान कुरकुरीत होतो.
  • मालपुवा हा तयार झाल्यानंतर साखरेच्या पाकात तीन ते चार मिनिटे बुडवून ठेवावा म्हणजे त्याच्या आतपर्यंत पाक शोषला जाऊन त्याची चव छान होते.

Leave a comment