Maswadi-मासवडी खान्देशातील एक शुद्ध शाकाहारी पदार्थ. Maswadi-मसवडी मध्ये हरभरा डाळीचे पीठ पासून एक रोल बनवतात व त्या रोलमध्ये कांदा खोबरे आले लसूण व खसखस यापासून तयार केलेला मसाला भरतात. व तो रोल कापून घेतात. Maswadi-मासवडी अनेक प्रकारच्या वड्या आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात अनेक प्रकारच्या वड्या आपण पाहतोच. तिखट वड्या,गोड वड्या वेगवेगळ्या पिठापासून फळांपासून कंदमळांपासून बनवलेल्या अनेक प्रकारच्या वड्या आपल्या माहितीत आहेत.तसाच एक महाराष्ट्रीयन जेवणातला लोकप्रिय व अतिशय रुचकर असा वड्यांचा प्रकार म्हणजे Maswadi-मासवडी. बाकरवडी सारखा चविष्ट पदार्थ याच संकल्पनेतून तयार झाला असेल असे वाटते.
थोडे Maswadi-मासवडी विषयी.
Maswadi-मासवडी मध्ये मुख्य घटक असतो हरभऱ्या डाळीचे पीठ. दुसऱ्या घटक म्हणजे त्यात भरले जाणारे मसाले. जसे की खोबरा, कांदा, आले, लसूण, खसखस ही पदार्थांपासून सारण तयार केले जाते. बेसनच्या पिठापासून तयार केलेल्या या रोलमध्ये हे सारण भरले जाते व चौकोनी आकारात वड्या कापल्या जातात. Maswadi-मासवडी मध्ये वापरले जाणारे घटक म्हणजे हरबरा डाळीचे पीठ, कांदा खोबरे आले लसून खसखस हे असतात. हे सर्व घटक आरोग्यासाठी उत्तम मानले जातात.
हरभरा डाळ :- हरभरा डाळीच्या पिठात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, विटामिन्स, कार्बोहायड्रस, फायबर्स, कॅल्शियम आढळतात. तसेच हरभरा डाळीमुळे शरीर धष्टपुष्ट होते.सकाळी भिजवलेले हरभरा खाल्ल्याने शारीरिक ताकद वाढते. रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळेच रोगप्रतिकार शक्तीही वाढते.
कांदा :- आपल्या रोजच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. अनेक प्रकारच्या भाज्या कांदा घालूनच केल्या जाते. मसाल्यात खोबरे वापरल्यामुळे मसाल्याच्या उष्णतेचा त्रास कमी होतो. व पदार्थ पचना सहज होतो.
खोबरे :- कांद्याप्रमाणे खोबरे सुद्धा जेवणाला चव आणते. खोबरे हे मसाल्यामध्ये मुख्य घटक म्हणून वापरले जाते
खसखस :- आपल्या देशात अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये खसखस चा वापर केला जातो. खसखस एक अशा प्रकारची बीज आहे जे फक्त जेवनाची चवच नाही तर उत्तम आरोग्यासाठी वापरले जाते.खसखशी शांत झोपेसाठी वापरले जाते. खसखस ही एका पांढऱ्या रंगाची एक बारीक बी असते.खसखस मध्ये भरपूर कॅलरीज, प्रथिने, फायबर कॅल्शियम, फॉस्फरस असते. खसखस ही पोषण तत्त्वांनी भरलेली एक समृद्धी बी आहे. आपल्या जेवणाला लज्जत तर आणतेस पण पदार्थांचे पौष्टिक पण आहे वाढवतात.
आले लसूण :- आले आणि लसूण शिवाय महाराष्ट्रीयन पदार्थांचा विचार केला जाऊ शकत नाही.अगदी साध्या पदार्थांमध्ये सुद्धा आले लसुन चव आणते. आले लसूण फक्त चव वाढवतात असे नाही तर औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहे. आणि म्हणूनच भारतीय पदार्थांमध्ये त्याचा वापर आवर्जून केला जातो.
Maswadi-मासवडी कशा बनवतात.
Maswadi-मासवडी बनवताना डाळीच्या पिठाला थोडे पाणी घालून खिशी घेतली जाते. म्हणजेच डाळीचे पीठ, चटणी, तिखट, मीठ व तेल टाकून एक विशिष्ट प्रकारे शिजवले जाते. एका भांड्यात थोडे तेल घालून त्या तेलात जिरे, हिंगाची फोडणी दिली जाते. नंतर त्यात ठरवलेल्या प्रमाणानुसार पाणी घातले जाते. हळद, मीठ, कोथिंबीर घातली जाते. पाणी उकळले की त्या डाळीचे पीठ टाकून चमच्याच्या साह्याने घोटून घेतात वड्यांसाठी लागेल तसे पातळ किंवा घट्ट ठेवतात. पीठ पूर्णपणे शिजले की एका पॉलिथिन बॅगेत घेऊन ते पीठ छान मळून घेतात व त्याचा गोळा तयार केला जातो. ते पीठ लाटण्याच्या साह्याने लाटून एक मोठी व चपटी पोळी तयार केली जाते. त्या पोळीवर तयार केलेले मसाल्यांचे सारण पसरवून पोळीचा चपटा रोल तयार केला जातो. म्हणजे आपोआपच त्याचे पूड तयार होतात. त्या पुडाचा रोलच्या चौकोनी आकारात वड्या कापल्या जातात. वरून सजावटीसाठी कोथिंबीर टाकतात. खानदेशात ह्या पाट वड्या काळ्या आमटी सोबत खाल्ल्या जातात.अतिशय रुचकर पदार्थ आहे.
सारण साहित्य.
- लाल तिखट तीन चमचे किंवा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात.
- कांदे मोठे दोन.
- सुके खोबरे किसलेले एक वाटी.
- लसूण सात-आठ पाकळ्या.
- आले एक इंच.
- खसखस एक चमचा.
- गरम मसाला तीन चमचे.
- मीठ गरजेप्रमाणे.
- थोडी कोथिंबीर.
सारणाची कृती.
- Maswadi-मासवडी बनवतांना प्रथम आपल्या नेहमीच्या किसणीने कांदे किसून घ्या.
- कांदे किसून झाल्या नंतर किसलेल्या कांद्यांमध्ये असलेले पाणी पक्के पिळून घ्या. म्हणजे कांदा परततांना कांदा लवकर परतला जाईल.
- आता खोबरे किसून घ्या वआले लसणाची पेस्ट करून घ्या.
- एका कढईत तेल टाकून त्यात प्रथम किसलेला कांदा घाला व परतून घ्या. कांदा थोडा सोनेरी रंगावर परतून घ्या. कांदा छान परतून झाल्यावर त्यात किसलेले खोबरे घाला व थोडे परतून घ्या.
- खोबरे थोडे परतून झाल्यावर त्यात आले लसूण पेस्ट घाला.हे सगळे छान परतून घ्या.
- आता सर्व साहित्य परतल्यावर त्यात सर्व लाल तिखट घाला,मीठ घाला.
- आता गरम मसाला घाला मसाला आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता.
- त्यानंतर त्यात धणे जिरे पावडर घाला.खसखस घाला. आता कोथिंबीर घाला व परत एकदा छान परतून घ्या.
- हा मसाला थोडा तिखटच छान लागतो.
- आता हे तयार झालेले सारण एका भांड्यात काढून गार करायला ठेवा.
Maswadi-मासवडी.
साहित्य.
- वड्यांसाठी हरभरा डाळीचे पीठ एक वाटी.
- गव्हाचे किंवा मुगाच्या डाळीचे पीठ दोन चमचे.
- तीळ एक चमचा.
- ओवा एक चमचा.
- लसणाची चटणी एक चमचा.
- फोडणीसाठी तेल तीन-चार चमचे.
- मीठ चवीनुसार.
- हळद पाव चमचा.
- थोडी कोथिंबीर.
- पाणी गरजेनुसार.
कृती.
- Maswadi-मासवडी बनवन्यासाठी एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत तेल टाका.
- तेल तापल्यावर त्यात जिरे घाला. जिरे तडतडले कि त्यात लसून व लाल तिखट एकत्र करून वाटलेली लसणाची चटणी घाला.चटणी जाळणार नाही याची काळजी घ्या.
- आता फोडणीत हळद टाका व थोडे पाणी घाला.
- सगळे पाणी एकदम घालू नका. बाजूला थोडे पाणी गरम करायला ठेवावे, म्हणजे गरज लागल्यास गरम पाणी आपल्याला लगेच वापरता येईल.
- आता त्या पाण्यात ओवा व तीळ, मीठ घाला व पाण्याला उकळी आणा.
- पाणी उकळले की त्यात डाळीचे पीठ हळूहळू टाकत जावे व हळूहळू चमच्याने किवा लाटण्याच्या साह्याने हलवत राहावे.यासाठी दुसर्याची मदत घेवू शकता.
- फोडणीच्या पाण्यात एकदम सगळे पीठ टाकू नका. पिठाच्या गाठी पडू शकतात.म्हणून गाठ पडणार नाही याची काळजी घ्या.
- सर्व पीठ टाकून झाल्यावर हलवत राहा व पीठ छान शिजवून घ्या.पाणी लागेल तसे वापरा,गरज वाटल्यास वरून गरम पाणी घाला,गार पाणी घालू नका.
- Maswadi-मासवडीसाठी पीठ मऊसूद असले पाहिजे फार घट्ट असू नये. घट्ट पिठा मुळे वड्यांना तडे पडतात. व पातळ पीठ मुळे पीठ चिकट होते. त्यामुळे Maswadi-मासवडी लाटल्या जाणार नाही. म्हणून पीठ शिजवतांना काळजी घ्यावी.
- पीठ पूर्ण शिजल्यावर थोडा वेळ झाकण ठेवून एक वाफ आणा व छान शिजल्याची खात्री करून घ्या.
- आता पीठ गरम असतानाच थोडे थोडे एका परातीत काढून घ्या व तेल लावून मळून घ्या.पीठ मळण्यासाठी पॉलिथिन पिशवी वापरली तरी चालेल.
- पॉलिथिनच्या पिशवीत घेऊन थोडे तेल टाकून पीठ छान मळून घ्या. पीठ मळून झाल्यावर एका पोळपाटावर खाली प्लास्टिकचा कागद घेऊन तो पोळपाटा ला छान पाण्याच्या साह्याने चिकटवून घ्यावा.
- आता त्याला थोडे तेल लावून मळून घेतलेल्या पिठाचा गोळा घेवून पोळपाटा वर ठेवा व वरूनही प्लास्टिक ठेवले तरी चालेल.म्हणजे पीठ लाटण्याला चिकटणार नाही.
- आता थोडी मोठी पोळी छान लाटून घ्या. पोळी जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक लाटा सगळीकडून सारखी करा.
- Maswadi-मासवडीसाठी पोळी लाटून झाल्यावर त्या पोळीवर तयार केलेले सारण सगळीकडून पसरवून घ्या.
- सारण पसरवून झाल्यावर दोन्ही हाताच्या साह्याने एका बाजूने हळूहळू पोळी चा चपटा रोल तयार करा.
- रोल करतांना आपोआप पूड तयार होतात. असाच पूर्ण पोळीचा रोल तयार करून घ्यावा.
- आता Maswadi-मासवडी साठी रोल तयार झाल्यावर आपल्या आवडीप्रमाणे त्याच्या वड्या करा.
- Maswadi-मासवडी कापून झाल्यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व गरमच खायला द्या. खानदेशात ह्या वड्या काळ्या आमटी सोबत खाल्ल्या जातात.
टिप्स.
- Maswadi-मासवडी साठी मसाला करताना मसाला तेलात चांगला परतून घ्यावा जर ओलसरपणा राहिला तर वड्या चिकट होतात.
- Maswadi-मासवडी बनवताना वापरलेले डाळीचे पीठ जर बाजारातून विकत आणलेले असेल तर ते आधी गाळून घ्यावे. कारण बाजारातल्या बेसन पिठाच्या पाण्यात टाकल्यावर पटकन गाठी तयार होतात.
- बाजारातून आणलेले तयार पीठ शिजवताना पाणी बेतानेच घालावे कारण बाजारातून आणलेल्या पिठाला पाणी खूप कमी लागते.
- Maswadi-मासवडी करताना जर हरभरा डाळीचे पीठ जुने झाले असेल तर त्या ला शिजण्यासाठी पाणी जास्त लागते.जर कमी पाणी झाले तर वड्यांना पटकन तडे जातात.
- Maswadi-मासवडी करताना डाळीच्या पिठात चमचाभर मैदा किंवा एक चमचा गव्हाचे पीठ घालावे.म्हणजे पोळी लाटताना त्याला तडे जाणार नाही.
- सारणात घालतांना जर खसखस उपलब्ध नसेल तरतील वापरु शकता.
खान्देशी काळी आमटी.
साहित्य.
- दोन कांदे .
- पाऊण वाटी किसलेले खोबरे.
- एक इंच आल्याचा तुकडा.
- सात आठ पाकळ्या लसूण.
- हळद अर्धा चमचा.
- गरम मसाला तीन चमचे.
- लाल तिखट तीन चमचे.
- मीठ चवीनुसार.
- धने जिरे पावडर एक चमचा.
मसाला वाटण.
- कांदे साला सकट गॅसवर भाजून घ्यावे.
- हल्ली गॅसवर कांदे भाजण्यासाठी छान जाळ्या मिळतात.जाळी नसेल तर गॅस प्रेशर कूकर च्या आतमध्ये ठेवतात ती जाळी वापरली तरी चालेल
- कारण कांदा साला सकट भाजल्यावरच या आमटीला काळा रंग येतो.
- नंतर खोबरे किसून घ्यावे व थोडे भाजून घ्यावे खोबरे मंद आचेवर भाजावे.
- भाजलेले कांदे मिक्सर च्या भांड्यात घालावे.त्यात खोबरे कीस आले लसूण एकत्र करून घ्यावे.
- आता या सर्व सामुग्रीचे छान बारीक वाटण तयार करून घ्यावे.
- हे वाटण मिक्सरमधून थोडे पाणी घालून एकदम बारीक करून घ्यावे.फार पाणी घालू नये.
- गरम मसाला, लाल तिखट पाणी घालून फोडणी टाकले तर भाजीला छान स्वाद येतो.
- प्रथम पातेल्यात फोडणीसाठी तेल टाका.
कृती.
- तेल तापले कि त्यात,मोहरी घाला मोहरी तडतडली कि त्यात जिरे घाला.व थोडे मेथी दाणे,हिंग टाकून फोडणी करा.
- त्याच फोडणीत एक चमचा डाळीचे पीठ खमंग भाजून घ्या व थोडे बाजरीचे पीठही खमंग भाजून घ्या.
- पीठ गरम तेलात लवकर भाजले जाते. मंद आचेवर भाजावे.
- त्या फोडणीत तयार केलेले वाटण घालून छान परतून घ्या.
- तेलात घातलेल्या वाटणाला तेल सुटेपर्यंत परतुन घ्यावे.खाली लागणार नाही याची काळजी घ्या.
- तेल सुटल्यावर त्यात वरून गरम पाणी किंवा कोमट पाणी घालावे.
- पाणी आपल्या अंदाजानुसार घ्यावे व आमटीचा दाटसरपणा आपल्या आवडीप्रमाणे ठेवावा.
- थोडावेळ उकळी आणावी.
- वरून मीठ घालावे कोथिंबीर,कसुरी मेथी घालावी व थोडा वेळ आमटी उकळू द्यावी.
- सात पुडच्या पाटवड्यासोबत व भातासोबत वाढावी.
FAQs.
प्रश्न १ :- Maswadi-मासवडी ही कुठला प्रसिद्ध पदार्थ आहे ?
उत्तर :- Maswadi-मासवडी हा एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. प्रामुख्याने तो खान्देशातील प्रसिद्ध पदार्थ आहे. परंतु हल्ली तो सगळीकडे आवडीने बनवला जातो.
प्रश्न २ :- Maswadi-मासवडी करताना बेसन ऐवजी कोणते पीठ वापरू शकतो ?
उत्तर :- Maswadi-मासवडी करताना बेसन पीठा ऐवजी तुम्ही मुगाचे पीठ वापरू शकतात. मुगाच्या पिठाच्या पाटवड्या छान होतात किंवा अर्धे मुगाचे व अर्धे बेसन घेतले तरी चालेल.
प्रश्न ३ :- Maswadi-मासवडी करताना मसाला आधीच तयार करून ठेवता येतो का व तयार केलेला मसाला किती दिवस टिकतो ?
उत्तर :- Maswadi-मासवडी करताना मसाला आधीच तयार करता येतो व तो आठवडाभर किंवा त्यापेक्षा जास्त का टिकतो. कारण त्यात पाणी घातलेले नसते. कोरडा मसाला हा फ्रीजमध्ये महिनाभर टिकू शकतो. सातपुडाच्या पाठवण्याचा मसाला करून हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवल्यावर आयत्या वेळेस वापरता येतो.