Site icon Ashlesha's Recipe

खमंग Maswadi Recipe-मासवडी रेसिपी पारंपरिक महाराष्ट्रीयन स्वाद

Maswadi-मासवडी खान्देशातील एक शुद्ध शाकाहारी पदार्थ. Maswadi-मसवडी मध्ये  हरभरा डाळीचे पीठ पासून एक रोल बनवतात व त्या रोलमध्ये कांदा खोबरे आले लसूण व खसखस यापासून तयार केलेला मसाला भरतात. व तो रोल कापून घेतात. Maswadi-मासवडी अनेक प्रकारच्या वड्या आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात अनेक प्रकारच्या वड्या आपण पाहतोच. तिखट वड्या,गोड वड्या वेगवेगळ्या पिठापासून फळांपासून कंदमळांपासून बनवलेल्या अनेक प्रकारच्या वड्या आपल्या माहितीत आहेत.तसाच एक महाराष्ट्रीयन जेवणातला लोकप्रिय व अतिशय रुचकर असा वड्यांचा प्रकार म्हणजे Maswadi-मासवडी. बाकरवडी सारखा चविष्ट पदार्थ याच संकल्पनेतून तयार झाला असेल असे वाटते.

Read More : Kairiche Karnataki Lonche.

थोडे Maswadi-मासवडी विषयी.

Maswadi-मासवडी मध्ये मुख्य घटक असतो हरभऱ्या डाळीचे पीठ. दुसऱ्या घटक म्हणजे त्यात भरले जाणारे मसाले. जसे की खोबरा, कांदा, आले, लसूण, खसखस ही पदार्थांपासून सारण तयार केले जाते. बेसनच्या पिठापासून तयार केलेल्या या रोलमध्ये हे सारण भरले जाते व चौकोनी आकारात वड्या कापल्या जातात. Maswadi-मासवडी मध्ये वापरले जाणारे घटक म्हणजे हरबरा डाळीचे पीठ, कांदा खोबरे आले लसून खसखस हे असतात. हे सर्व घटक आरोग्यासाठी उत्तम मानले जातात.

हरभरा डाळ :- हरभरा डाळीच्या पिठात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, विटामिन्स, कार्बोहायड्रस, फायबर्स, कॅल्शियम आढळतात. तसेच हरभरा डाळीमुळे शरीर धष्टपुष्ट होते.सकाळी भिजवलेले हरभरा खाल्ल्याने शारीरिक ताकद वाढते. रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळेच रोगप्रतिकार शक्तीही वाढते.

कांदा :- आपल्या रोजच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. अनेक प्रकारच्या भाज्या कांदा घालूनच केल्या जाते. मसाल्यात खोबरे वापरल्यामुळे मसाल्याच्या उष्णतेचा त्रास कमी होतो. व पदार्थ पचना सहज होतो.

खोबरे :-
कांद्याप्रमाणे खोबरे सुद्धा जेवणाला चव आणते. खोबरे हे मसाल्यामध्ये मुख्य घटक म्हणून वापरले जाते

खसखस :- आपल्या देशात अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये खसखस चा वापर केला जातो. खसखस एक अशा प्रकारची बीज आहे जे फक्त जेवनाची चवच नाही तर उत्तम आरोग्यासाठी वापरले जाते.खसखशी शांत झोपेसाठी वापरले जाते. खसखस ही एका पांढऱ्या रंगाची एक बारीक बी असते.खसखस मध्ये भरपूर कॅलरीज, प्रथिने, फायबर कॅल्शियम, फॉस्फरस असते. खसखस ही पोषण तत्त्वांनी भरलेली एक समृद्धी बी आहे. आपल्या जेवणाला लज्जत तर आणतेस पण पदार्थांचे पौष्टिक पण आहे वाढवतात.

आले लसूण :- आले आणि लसूण शिवाय महाराष्ट्रीयन पदार्थांचा विचार केला जाऊ शकत नाही.अगदी साध्या पदार्थांमध्ये सुद्धा आले लसुन चव आणते. आले लसूण फक्त चव वाढवतात असे नाही तर औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहे. आणि म्हणूनच भारतीय पदार्थांमध्ये त्याचा वापर आवर्जून केला जातो.

Maswadi-मासवडी कशा बनवतात.

Maswadi-मासवडी बनवताना डाळीच्या पिठाला थोडे पाणी घालून खिशी घेतली जाते. म्हणजेच डाळीचे पीठ, चटणी, तिखट, मीठ व तेल टाकून एक विशिष्ट प्रकारे शिजवले जाते. एका भांड्यात थोडे तेल घालून त्या तेलात जिरे, हिंगाची फोडणी दिली जाते. नंतर त्यात ठरवलेल्या प्रमाणानुसार पाणी घातले जाते. हळद, मीठ, कोथिंबीर घातली जाते. पाणी उकळले की त्या डाळीचे पीठ टाकून चमच्याच्या साह्याने घोटून घेतात वड्यांसाठी लागेल तसे पातळ किंवा घट्ट ठेवतात. पीठ पूर्णपणे शिजले की एका पॉलिथिन बॅगेत घेऊन ते पीठ छान मळून घेतात व त्याचा गोळा तयार केला जातो. ते पीठ लाटण्याच्या साह्याने लाटून एक मोठी व चपटी पोळी तयार केली जाते. त्या पोळीवर तयार केलेले मसाल्यांचे सारण पसरवून पोळीचा चपटा रोल तयार केला जातो. म्हणजे आपोआपच त्याचे पूड तयार होतात. त्या पुडाचा रोलच्या चौकोनी आकारात वड्या कापल्या जातात. वरून सजावटीसाठी कोथिंबीर टाकतात. खानदेशात ह्या पाट वड्या काळ्या आमटी सोबत खाल्ल्या जातात.अतिशय रुचकर पदार्थ आहे.

सारण साहित्य.

सारणाची कृती.

Maswadi-मासवडी.

साहित्य.

कृती.

टिप्स.

खान्देशी काळी आमटी.

काळी आमटी म्हणजे कांदा सालासकट भाजून खोबरे किसून थोडे भाजून घेतले जाते. गरम मसाला, लाल तिखट, मीठ, मोहरी धणे, जिरे पावडर, तेल इत्यादी घालून मसाल्याचे वाटण तयार केले जाते. त्या तयार केलेल्या वाटना ला तेलात फोडणी देऊन परतून त्यापासून ही आमटी केली जाते. खानदेशी काळी आमटी भात, भाकरी यांसोबत खाल्ली जाते.

साहित्य.

  • दोन कांदे .
  • पाऊण वाटी किसलेले खोबरे.
  •  एक इंच आल्याचा तुकडा.
  •  सात आठ पाकळ्या लसूण.
  • हळद अर्धा चमचा.
  •  गरम मसाला तीन चमचे.
  •  लाल तिखट तीन चमचे.
  •  मीठ चवीनुसार.
  • धने जिरे पावडर एक चमचा.

मसाला वाटण.

  • कांदे साला सकट गॅसवर भाजून घ्यावे.
  • हल्ली  गॅसवर कांदे भाजण्यासाठी  छान जाळ्या मिळतात.जाळी नसेल तर गॅस प्रेशर कूकर च्या आतमध्ये ठेवतात ती जाळी वापरली तरी चालेल
  • कारण कांदा साला सकट भाजल्यावरच या आमटीला काळा रंग येतो.
  • नंतर खोबरे किसून घ्यावे व थोडे भाजून घ्यावे खोबरे मंद आचेवर भाजावे.
  • भाजलेले कांदे मिक्सर च्या भांड्यात घालावे.त्यात खोबरे कीस आले लसूण एकत्र करून घ्यावे.
  • आता या सर्व सामुग्रीचे छान बारीक वाटण तयार करून घ्यावे.
  • हे वाटण मिक्सरमधून थोडे पाणी घालून एकदम बारीक करून घ्यावे.फार पाणी घालू नये.
  • गरम मसाला, लाल तिखट पाणी घालून फोडणी टाकले तर भाजीला छान स्वाद येतो.
  • प्रथम पातेल्यात फोडणीसाठी तेल टाका.

कृती.

  • तेल तापले कि त्यात,मोहरी घाला मोहरी तडतडली कि त्यात जिरे घाला.व थोडे मेथी दाणे,हिंग टाकून फोडणी करा.
  • त्याच फोडणीत एक चमचा डाळीचे पीठ खमंग भाजून घ्या व  थोडे बाजरीचे पीठही खमंग भाजून घ्या.
  • पीठ गरम तेलात लवकर भाजले जाते. मंद आचेवर भाजावे.
  • त्या फोडणीत तयार केलेले वाटण घालून छान परतून घ्या.
  • तेलात घातलेल्या वाटणाला तेल सुटेपर्यंत परतुन घ्यावे.खाली लागणार नाही याची काळजी घ्या.
  • तेल सुटल्यावर त्यात वरून गरम पाणी किंवा कोमट पाणी घालावे.
  •  पाणी आपल्या अंदाजानुसार घ्यावे व आमटीचा दाटसरपणा आपल्या आवडीप्रमाणे ठेवावा.
  • थोडावेळ उकळी आणावी.
  • वरून मीठ घालावे कोथिंबीर,कसुरी मेथी घालावी व थोडा वेळ आमटी उकळू द्यावी.
  • सात पुडच्या पाटवड्यासोबत व भातासोबत वाढावी.

FAQs.

प्रश्न १ :- Maswadi-मासवडी ही कुठला प्रसिद्ध पदार्थ आहे ?

उत्तर :- Maswadi-मासवडी हा एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. प्रामुख्याने तो खान्देशातील  प्रसिद्ध पदार्थ आहे. परंतु हल्ली तो सगळीकडे आवडीने बनवला जातो.

प्रश्न २ :- Maswadi-मासवडी करताना बेसन  ऐवजी कोणते पीठ वापरू शकतो ?

उत्तर :- Maswadi-मासवडी करताना बेसन पीठा ऐवजी तुम्ही मुगाचे पीठ वापरू शकतात. मुगाच्या पिठाच्या पाटवड्या छान होतात किंवा अर्धे मुगाचे व अर्धे बेसन घेतले तरी चालेल.

प्रश्न ३ :- Maswadi-मासवडी करताना मसाला आधीच तयार करून ठेवता येतो का व तयार केलेला मसाला किती दिवस टिकतो ?

उत्तर :- Maswadi-मासवडी करताना मसाला आधीच तयार करता येतो व तो आठवडाभर किंवा त्यापेक्षा जास्त का टिकतो. कारण त्यात पाणी घातलेले नसते. कोरडा मसाला हा फ्रीजमध्ये महिनाभर टिकू शकतो. सातपुडाच्या पाठवण्याचा मसाला करून हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवल्यावर आयत्या वेळेस वापरता येतो.

Exit mobile version