Site icon Ashlesha's Recipe

“महाराष्ट्रीय आणि कर्नाटकी चव: खास Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणचे”

Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणचे हा एक चटपटीत पदार्थ, जो जेवणाची चव वाढवतो. महाराष्ट्रात तर लोणचे हा एक आवश्यक पदार्थ आहे ज्याशिवाय महाराष्ट्रीयन लोकांचे जेवण अपूर्ण आहे. असा हा पदार्थ जेवणाची चव तर वाढवणारा पदार्थ प्रत्येक राज्यात केला जातो. अनेक ठिकाणी भाज्यांचे म्हणजे गाजर, फ्लावर, वाटाणे याचे सुद्धा लोणचे घातले जाते. भारतीय आहारात लोणचे खूप महत्त्वाचे स्थान मानले जाते. तसेच लोणचे बनवण्यासाठी काही भाज्या व फळे यांचा वापर केला जातो.

Read More : Rava Laddu Recipe.

थोडे Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणचे विषयी.

महाराष्ट्रात तर लोणचे हा एक आवश्यक पदार्थ आहे ज्याशिवाय महाराष्ट्रीयन लोकांचे जेवण अपूर्ण आहे. असा हा पदार्थ जेवणाची चव तर वाढवणारा पदार्थ प्रत्येक राज्यात केला जातो. अनेक ठिकाणी भाज्यांचे म्हणजे गाजर, फ्लावर, वाटाणे याचे सुद्धा लोणचे घातले जाते. भारतीय आहारात लोणचे खूप महत्त्वाचे स्थान मानले जाते. तसेच लोणचे बनवण्यासाठी काही भाज्या व फळे यांचा वापर केला जातो. ऋतुमानाप्रमाणे फळांचे किंवा भाज्यांचे लोणचे घातले जाते. लोणचं म्हणजे जेवणाची चव वाढवणारा पदार्थ. जेवणात कितीही भाज्या असल्या तरी जेवणाची चव वाढवते ती एक लोणच्याची छोटीशी फोड. लोणचे म्हटले की सर्वात प्रथम आठवते ती कैरी. कैरी पासून घातले जाणारे लोणचे वर्षभर वापरतात. कैरी वर्षभर वापरता यावी म्हणून वाळवून ठेवली जाते. तसेच कैरीचे टिकाऊ लोणच्यांचे तर शंभरापेक्षा अधिक प्रकार आहेत. पण त्यातही गुजरातच्या छूंदा, विदर्भातले हिंग, मेथ्या आणि लसूण घातलेले गोड लोणचे. गोव्याकडचे बाळ कैरीचे लोणचे, हरभरे घातलेले खांडवे आतले लोणचे, तसेच हैदराबादी लाल चुटक चवदार लोणचे. प्रत्येक राज्याची लोणच्याची स्वतःची अशी एक ओळख आहे. भारताप्रमाणे इंडोनेशियात सुद्धा कैरीचे लोणचे घातले जाते. इंडोनेशियातील पारंपारिक लोणच्यात कैरीचे काप, मिरच्या, साखर, मीठ घातले जाते. त्यात लिंबू रसही घातला जातो हे लोणचे तात्पुरत्या स्वरूपात असते हे वर्षभर साठवता येत नाही. अनेक ठिकाणी भाज्यांचे म्हणजेच गाजर, फ्लावर, वाटाणे ,कांदा याची सुद्धा लोणचे घातले जाते, पण हे लोणचे फार काळ टिकत नाही. कैरीच्या लोणच्यात मिठाचा वापर करून ते वर्षभर साठवले जाईल असे बनवले जाते. लोणचे बनवण्यासाठी काही भाज्या व फळे यांचा वापर केला जातो. ऋतू मानाप्रमाणे फळांचे किंवा भाज्यांचे लोणचे घातले जाते. तसेच लोणच्यासाठी कैरी, आवळा, हळद, लिंबू, आले, मिरची अशा पदार्थाचे लोणचे घातले जातात. लोणच्याचा मसाला हा तसा एका परंपरा मानले जाते. ही परंपरा प्रत्येक पिढी पुढे नेते व या परंपरेप्रमाणेच लोणचे घातले जाते. तसे महाराष्ट्रातील लोणचे हे वेगवेगळ्या प्रकारात घातले जाते. काही ठिकाणी गोड लोणचे घातले जाते किंवा कैरीचे लोणचे सुद्धा गोड स्वादाचे केले जाते. काही ठिकाणी तिखट चवीचे लोणचे घातले जाते. ही अनेक काळाची काळापासून बनवत आलेली एक बनवत आले आहेत. लोणचे साधारण उन्हाळ्यात घातले जाते. तसेच Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणचे घातले जाते. आपल्या देशात अनेक राज्यात लोणचे केले जाते. महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, कर्नाटक व काश्मिरी असे बऱ्याच राज्यात वेगवेगळ्या प्रकारे लोणचे तयार केले जाते. सगळेच लोणचे चवदार व स्वादिष्ट असतात. पंजाबी लोणच्यात कचालु चे लोणचे म्हणजे एकदम चविष्ट कचालूची चव कैरी सारखीच असते. राजस्थानी लोणचे हे भरपूर मोहरीची डाळ घातलेले व बडीशेप चा खमंग स्वाद असलेले असते. गुजराती लोणच्यात भोकऱ्याचं लोणचं हे प्रसिद्ध लोकप्रिय लोणचं आहे. तसे काश्मीरमध्ये ड्रायफ्रूटचे लोणचे घातले जाते. काश्मीरच्या लोणच्यात केशराचा सुगंध असतो ते काश्मिरी पुलाव सोबत खाल्ले जाते. लोणचं खाण्याचे नियम आपल्या हवामाना नुसार बदलत असतो, म्हणजेच उन्हाळ्यात लोणचं उन्हाळ्यात आवळ्याचे लोणचे, किंवा लिंबूचे आंबट गोड, चटपटीत लोणचे खाल्ले जाते. तसेच हिवाळ्यात कैरीचे लोणचे खाल्ले जाते, तर पावसाळ्यात औषधी गुणधर्मांनी भरलेले ओल्या हळदीची व आल्याचे लोणचे खाल्ले जाते. भारतीय संस्कृतीत लोणचं चा पूर्वीचा इतिहास काळापासून खाण्यात आल्याचे आढळते. लोणच्यात काळी मिरी, वेलदोडा, तेजपान असे पदार्थ घातले जातात. कैरीचा गुणधर्म म्हणजे सगळ्यांशी मिळवून घेण्याचा कारले, भोकर ,बंद असून मिरच्या लिंबू अशा कोणाशी जमवून घेते व वर्षभर त्या पदार्थांची चव वाढवते. तसेच आज आपण Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणचे पाहणार आहोत.कर्नाटकी लोणच्यात साखर, खजूर, कांदे, लसूण, काजू, बेदाणे, जिरेपूड घालून बनवले जाते. हे लोणचे अतिशय चविष्ट असे लागते.

Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणचे कसे बनवतात.

Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणचे बनवण्यासाठी कैरी धुवून कोरडी केली जाते. तर कैरीचे साले काढून किसून घेतले जाते. तसेच कांदाही किसून घेतला जातो. नंतर आले, लसूण बारीक चिरून किंवा पेस्ट बनवून घेतले जातात. नंतर तेलाची फोडणी तयार करून किसलेला कांदा आणि लसूण परतून घेतले जातात. त्यात कैरीचा कीस घालून शिजवला जातो. कैरीचा किस शिजल्यावर त्यात साखर घातली जाते. साखर विरघळली ही खजुराचे तुकडे, काजूचे तुकडे, तसेच बेदाणे यांचे रिपोर्ट आले, तिखट, मीठ घालते थोडे वापरले जाते. Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणचे अतिशय रुचकर लागते जेवणाची चव वाढवते.

Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणचे साहित्य.

Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणची कृती.

  • Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणचे करण्यासाठी प्रथम कैरीचे कैरी स्वच्छ धुऊन पुसून घ्यावी.
  •  आता धुवून  कोरडी केलेल्या कैरीचे साले काढून घ्यावे व आपल्या नेहमीच्या किसणीने कैरी किसून घ्यावी.
  • आता कांदे किसून घ्यावेत. कांदे किसून झाल्यावर आल्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. लसणाचे कापून बारीक तुकडे करावे.
  • नंतर एका कढईत थोडे तेल घ्यावे व मंद आचेवर ठेवावे. आता थोड्या तेलावर कांद्याचा कीस लसणाचे तुकडे घालून थोडे परतून घ्यावे.
  • कांदा व लसून परतून झाल्यावर त्यात कैरीचा कीस घालून मंद शिजवावा मंद आचेवर शिजवावा.
  • कैरीचा कीस मऊ झाला की त्यात साखर घालून परतावे. साखर विरघळते तोपर्यंत हलवत राहावे. साखर विरघळली की त्यात खजुराचे तुकडे घालावेत.
  • नंतर काजूच्या तुकडे, बेदाणे, जिरेपूड, आले, तिखट व मीठ घालून छान परतून ढवळून पुन्हा झाकण ठेवून वाफ आणावी. हलवत राहावे म्हणजे खाली लागणार नाही. चांगले शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर बरणीत भरावे.

कैरीचा छुंदा.

कैरीचा छुंदा हा अतिशय चविष्ट पदार्थ आहे. कैरीचा छुंदा साखर, लाल तिखट घालून केला जातो. कैरीचा छुंदा हा साधा पराठा, मेथी पराठा, पोळी सोबत खाल्ला जातो. कैरीचा छुंदा हा गुजराती लोकांचा आवडता पदार्थ आहे.

साहित्य.

कृती.

कैरी व हिरवे मिरचीचा ठेचा.

हिरव्या मिरचीचा ठेचा हा सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे. पण त्या ठेच्याची चव अजून वाढवते ती उन्हाळ्यात मिळणारी कैरी. कैरी घालुन केलेला ह ठेचा अतिशय सुंदर लागतो व जेवणाची लज्जत वाढवतो.

साहित्य.

  • चार घट्ट हिरव्या कैऱ्या.
  • 100 ग्रॅम हिरवी मिरची.
  • अर्धा चमचा मेथी दाणे.
  • अर्धा चमचा मेथी पूड.
  • चिमूटभर हिंग.
  • मीठ चवीनुसार.
  • तेल गरजेनुसार.

कृती.

  • कैरी स्वच्छ धुऊन घ्यावी व पुसून कोरडी करून घ्यावी. आता करीचे साले काढून घ्यावी व किसून घ्यावी.
  • आता हिरव्या मिरचीचे देठ काढून घ्या. नंतर एका कढईत एक चमचा तेल घ्या व त्या तेलावर हिरव्या मिरच्या थोड्या परतून घ्याव्यात.
  • परतलेल्या हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घालुन घ्या व मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावेत.
  • वाटलेली हिरवी मिरची व कैरी किसलेल्या कैरीचा कीस, हिंग, मेथी पूड, अर्धा चमचा हळद, मीठ सर्व एकत्र करून मिसळावे.
  • नंतर दोन चमचे तेलाची फोडणी करावी. फोडणीत मोहरी, जिरे, हळद, मेथी दाणे, घालून छान फोडणी करावी. फोडणी थंड झाल्यावर कैरीच्या किसावर घालावी.
  • सर्व एकत्र छान करून बरणीत भरावे. दोन दिवस ठेचा मुरला की काढून त्यावर परत भरपूर फोडणी घालावी व खायला द्यावा.
  • हा कैरीचा ठेचा अतिशय रुचकर लागतो. भाकरी किंवा थालीपीठ त्याच्यासोबत खाता येतो फ्रीजमध्ये वर्षभर टिकतो.

कैरीची ग्रीन करी.

उन्हाळ्यात बाजारात भाज्या उपलब्ध नसतात व ज्या भाज्या मिळतात त्या बर्याच महाग झालेल्या असतात व उन्हाळ्यात त्याच त्याच भाज्या खावून सगळेच कंटाळलेले असतात. पण उन्हाळ्या बाजारात कैरी भरपूर प्रमाणात आलेली असते. अशा वेळी करीची चटपटीत भाजी म्हणजे करीची ग्रीन करी हा सगळ्यांचाच आवडता मेनू होतो. आकडा नक्की करून बघा.

साहित्य.

  • दोन कैऱ्या किंवा वाटीभर फोडी चालतील. कोवळ्या कैऱ्या घ्याव्या.
  • अर्धी वाटी नारळाचा चव.
  • चार-पाच हिरव्या मिरच्या .
  • थोडासा गूळ.
  • हिंग चिमूटभर. जिरे पाव चमचा.
  • थोडी कोथिंबीर.
  • मीठ चवीनुसार.
  • थोडे तूप.

कृती.

  • कैरी ची ग्रीन करी करण्यासाठी करी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करावी व कैरीचे साल काढून मध्यम फोडी करावे.
  • नंतर नारळाचा चव, हिरवी मिरची व कोथिंबीर एकत्र बारीक वाटून घ्यावे.
  • आता एका कढईत तूप घ्यावे तूप तापले कि तुपात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करावी.
  • त्या फोडणीत कैरीच्या फोडी घालून वाटलेले नारळ, हिरवी मिरची घालावी.सर्व मिश्रण एक दोन मिनिट पर्यंत परतावे नंतर मीठ घालावेत.
  • आता त्यात दोन वाट्या पाणी घालून उकळू द्यावे .चवीला गूळ घालावा .कैरीच्या फोडी मऊ शिजवाव्यात व शिजवताना ढवळत राहावे म्हणजे ओतू जाणार नाही.
  • कैरी ची ग्रीन करी आवडीप्रमाणे पातळ किंवा घट्ट करी करू शकतात. हळद वापरू नये हिरवा रंग खूप छान येतो. ही करी भातासोबत सोबतही खाता येते.

कैरीचे उपवासाचे लोणचे.

उपवासाच्या दिवसात साबुदाणा खिचडी किवा भगर सारखे फराळाचे पदार्थ खावून कंटाळा येतो त्यात पटकन काही करायला वेळ नसला तर पटकन काही करता हि येत नाही अशा वेळी एकाच फराळ खावून कंटाळा येतो उपवासात काहीतरी तोंडी लावणे असावे असे वाटते तोंडी लावणे असले कि जेवणाला चव येते म्हणूनच करीचे उपवासाचे लोणचे उत्तम पर्याय ठरतो.

साहित्य.

  • दोन घट्ट हिरव्या कैऱ्या.
  • अर्धी वाटी खारकेचे बारीक तुकडे.
  • अर्धी वाटी बेदाणे.
  • एक चमचा आल्याचा कीस.
  • चार ते पाच हिरव्या मिरच्या.
  • काळे मीठ एक चमचा.
  • अर्धी वाटी साखर.
  • साधे मीठ चवीप्रमाणे.

कृती.

  • कैरीचे उपवासाचे लोणचे करताना कैरी स्वच्छ धुऊन घ्या व पुसून कोरडी करा.
  • आता करीची साल काढून घ्या व आपल्या नेहमीच्या किसणीने किसून घ्यावी.
  • आता खारकांचे योग्य प्रमाणात तुकडे करून घ्यावेत. तसेच आले किसून घ्यावे व आल्याचा कीस व हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घ्याव्यात.
  • कैरीचा कीस, बेदाणे, काळे मीठ व वाटलेले खारीक, मिरची, आले एकत्र करावे. साखर घालून छान मिक्स करावे. चवीसाठी थोडे साधे मीठ घालावे.
  • सर्व मिक्स करून एका बरणीत भरून ठेवावे. दोन दिवस लोणचे मुरूम मुरल्यानंतर अतिशय चविष्ट होते पटकन करता येते व पौष्टिकही आहे. व उपवासाला सुंदर तोंडी लावणे होते.

FAQs.

प्रश्न १ :- Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणचे करताना कैरी कशी घ्यावी ?

उत्तर :- Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणचे करताना कैरी पूर्ण पक्की झालेली कैरी घ्यावी. कर्नाटकी लोणच्यासाठी कच्ची कैरी घ्यावी म्हणजेच कैरी कापल्यानंतर आतून ती पूर्णपणे पांढरी असावी अशा कैरीचे लोणचे छान होते व वर्षभर टिकते.

प्रश्न २ :- Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणचे व महाराष्ट्रीयन लोणचे यात काय फरक आहे ?

उत्तर :- महाराष्ट्रीयन लोणच्यात कैरी सोबतच मोहरीची डाळ, बडीशोप, लवंग, मिरे हे पदार्थ घातले जातात. त्याच बरोबर दुसरीकडे Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणच्यात  कैरी सोबतच खजूर, बेदाणे, काजू असा सुकामेवा घातला जातो व कैरी किसून घातली जाते.

प्रश्न ३ :- Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणचे करताना कोणती काळजी घ्यावी ?

उत्तर :- Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणचे करताना कैरीला ओलसरपणा येऊ देऊ नये व लोणचे भरताना हवाबंद बरणीत भरावे. Kairiche Karnataki Lonche-कैरीचे कर्नाटकी लोणच्याला पाण्याचा संपर्क आला तर लोणचे खराब होते म्हणून लोणचे करताना  कुठल्याही प्रकारे पाण्याशी संपर्क येऊ देऊ नये. गरज वाटल्यास सुकामेवा थोडा भाजून घ्यावा म्हणजे त्यातील ओलसरपणा निघून जाईल.

Exit mobile version