महाराष्ट्र गणेश उत्सव झाला की नवरात्रीचे वेध लागतात. नवरात्र म्हटले म्हणजे नऊ दिवस उपवास फराळ व्रत हे ठरलेले असते. अशावेळी रोज रोज साबुदाणा खाऊन कंटाळा येतो त्यासाठी हे फराळाचे नवीन पदार्थ. भाजलेला साबुदाणा, भाजलेले भगर व भाजलेल्या राजगिरा यांचे यांना दळून तयार केलेले भाजणे पासून बनवलेले हे काही पदार्थ.
थोडे फराळाविषयी.
आपला भारत देश हा व्रत वैकल्याचा देश आहे. चैत्र महिना ते फाल्गुन महिन्यापर्यंत सतत कुठले ना कुठले व्रत वैकल्य व सण वार, उपवास चालूच असतात. व्रत आले म्हणजे उपवास आलेच सोमवार, मंगळवार, गुरुवार, एकादशी, चतुर्थी, पौर्णिमा, महाशिवरात्री असे आठवड्यात एक-दोन दिवस तरी उपवास असणारे व्यक्ती घराघरात असतात. उपवास म्हटला म्हणजे त्याचे काहीतरी खाण्यापिण्याचे नियम असतात. कारण प्रत्येकाला अगदी काहीही न खाता राहावले जात नाही. काही जण अगदी कडक उपवास करतात.पण प्रत्येकाला ते जमेलच असे नाही. अशा वेळेस काहीतरी फराळ करावाच लागतो. त्यात सर्वात आधी येते ते म्हणजे साबुदाणा, साबुदाण्याची खिचडी, किंवा साबुदाणे वडे, साबुदाणा खीर असे पदार्थ. साबुदाणा म्हणजे एका विशिष्ट झाडाच्या चिकापासून तयार केला जातो. साबुदाण्याचे पांढऱ्या रंगाचे मोत्या प्रमाणे गोल आकाराचे छोटे व कडक दाणे असतात. Sabudana Khichdi – साबुदाणाखिचडी मध्येजास्त प्रमाणात कर्बोधके असतात.त्यामुळे दिवसभर शरीराला ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते. साबुदाण्यासोबत त्यात हिरवी मिरची किंवा लाल तिखट शेगदाण्याची जाडसर पूड, बटाटे, थोडे किसलेले खोबरे, पचनासाठी थोडेसे आले असे पदार्थ घालून साबुदाणा चविष्ट बनवला जातो. साबुदाण्याची पदार्थ बनवताना कमीत कमी चार ते पाच तास पाण्यात भिजवून ठेवावा. तसे तर साबुदाणा किती वेळ पाण्यात भिजवावा याचा वेळ त्याच्या म्हणजेच साबुदाण्याच्या दर्जावर ठरतो. म्हणजेच साबुदाणा कोणत्या दर्जाचा आहे यावर ते अवलंबून असते. काही साबुदाणे अगदी दोन तासात सुद्धा मऊ भिजवले जातात. काही साबुदाण्यांना सात ते आठ तास पाण्यात भिजवून ठेवावे लागतात. आपण कुठल्या प्रकारचा साबुदाणा वापरात घेतो त्यावरून ते ठरवावे. साबूदाणा भिजवल्या. नंतरच खाण्यायोग्य होतो.नंतर त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.साबुदाणा पासून वर्ष भर टिकतील व वापरता येतील असे पदार्थ ही बनवले जातात.म्हणजे वर्षभर वाळवणाच्या रूपात साबुदाण्याचे पापड बनवून डब्यात भरून वर्षभर साठवता येतात. बटाटा व साबुदाणा एकत्र करून चकल्या बनवल्या जातात. हे पदार्थ वर्षभर हवे तेव्हा आपल्याला खाता येतात. तसा तर साबुदाणा पचण्यास खूप जड असतो.बऱ्याच जणांना तो खाल्ल्यावर पित्ताचा किंवा पोटदुखीचा ही त्रास होतो.परंतु जर तो बनवताना पचनासाठीचे पदार्थ वापरले गेले तर तो पचायला हलका होतो.जसे साबुदाणा खिचडी वर लिंबू पिळून खावे. लिंबू हा साबुदाणा बसवण्यासाठी चा उत्तम पर्याय आहे. तसेच साबुदाणा खिचडी मध्ये आले किसून अवश्य घालावे, म्हणजे त्याच्याने पित्ताचा त्रास होत नाही व पचण्यास सोपा होतो.
1. राजगिऱ्याच्या पिठाची खमंग पुरी.
साहित्य.
- साबुदाणा पीठ पाव वाटी.
- राजगिरा पीठ तीन वाटी.
- वाटलेली हिरवी मिरची अर्धा चमचा.
- पाव वाटी दाणे भाजून बारीक केलेली पूड.
- अर्धा चमचा जिरेपूड.
- पाव वाटी दही.
- चवीनुसार मीठ.
- मोहन घालण्यासाठी तेल.
कृती.
- साबुदाण्याची खमंग पुरी बनवण्यासाठी एका भांड्यात राजगिऱ्याचे पीठ घ्या. त्यात साबुदाणा पीठ, दाण्याचे भाजून तयार केलेले दाण्याचे कूट, वाटलेली हिरवी मिरची व जिरेपूड घाला मीठ घाला.
- आता या पूर्ण पीठ एकत्र करून घ्या आता ह्या पिठाला तेल गरम करून कडकडीत तेलाचे मोहन घाला त्यात थोडे दही घालून सगळे पीठ एकत्र छान मिक्स करून घ्या व लागेल तसे पाणी घालून पीठ छान मळून घ्या.
- आता या पिठाचे लहान लहान आकारात गोळे घेऊन पुऱ्या लाटून घ्या.
- राजगिऱ्याची पुरी गरम तेलावर लालसर रंगावर तळून घ्या व बटाट्याच्या उपवासाच्या भाजी सोबत खायला द्या अतिशय सुंदर लागते.
राजगिऱ्याचे पोषकतत्वे.
राजगिरा हे एक पोषक धान्य आहे खसखस सारख्या छोट्या आकाराचा राजगिरा शरीराला उत्तम पोषण देतो. राजगिऱ्याचे पीठ किंवा लाह्या करून किंवा राजगिऱ्याचे पीठ तयार करून उपवासासाठी वापरले जाते. राजगिऱ्या -मुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते तसेच उपवासात दिवसभर ऊर्जा टिकवण्यासाठी राजगिरा मदत करतो राजगिऱ्याची भाकरी खीर बनवली जाते. तसेच साबुदाणा भगर व शिंगाडा यांच्या पिठात मिक्स करून उपवासाचे अनेक चविष्ट व खमंग पदार्थ बनवले जातात. राजगिऱ्याच्या पिठात विटामिन सी, विटामिन ई, लोह, मॅग्नेशियम ,फॉस्फरस व पोटॅशियम सारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात .तसेच राजगिरामध्ये प्रोटीनही भरपूर प्रमाणात असतात.
2. भगर साबुदाणा मिसळचे वडे.
साहित्य.
- एक वाटी भिजलेल्या साबुदाणा .
- अर्धी वाटी शिजवलेली भगर .
- दोन उकडलेले बटाटे.
- उपवासाचे भाजणीचे पीठ एक ते दीड वाटी .
- चार-पाच हिरव्या मिरच्या वाटून घ्या.
- अर्धा चमचा जिरेपूड.
- पाव वाटी दाण्याची पूड.
- पाव वाटी दही.
- चवीनुसार मीठ.
- अर्धा लहान चमचा साखर.
- तळण्यासाठी तेल.
कृती.
- साबुदाणा पीठ ,शिजवलेली भगर, उकडलेले बटाटे यात उपवासाचे भाजणीचे पीठ एकत्र करा. त्यात हिरव्या वाटलेल्या हिरव्या मिरच्या, जिरेपूड, दाण्याचे कूट व दही घालून छान घट्ट गोळा मळून घ्या.
- आता या पिठाचे हातावर छान लहान आकारात वडे तयार करून घ्या .
- एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा तेल चांगले तापले की गॅस बंद करा व त्या गरम तेलात वडे छान सोनेरी रंगावर तळून घ्या व दह्याच्या चटणी सोबत खायला द्या.
साबुदाण्याचे पोषकतत्वे.
Sabudana Khichdi-साबुदाणा खिचडी मध्येजास्त प्रमाणात कर्बोधके असतात.त्यामुळे दिवसभर शरीराला ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते. साबुदाण्यासोबत त्यात हिरवी मिरची किंवा लाल तिखट शेगदाण्याची जाडसर पूड, बटाटे, थोडे किसलेले खोबरे, पचनासाठी थोडेसे आले असे पदार्थ घालून साबुदाणा चविष्ट बनवला जातो. साबुदाण्याची पदार्थ बनवताना कमीत कमी चार ते पाच तास पाण्यात भिजवून ठेवावा. तसे तर साबुदाणा किती वेळ पाण्यात भिजवावा याचा वेळ त्याच्या म्हणजेच साबुदाण्याच्या दर्जावर ठरतो. म्हणजेच साबुदाणा कोणत्या दर्जाचा आहे यावर ते अवलंबून असते.काही साबुदाणे अगदी दोन तासात सुद्धा मऊ भिजवले जातात. काही साबुदाण्यांना सात ते आठ तास पाण्यात भिजवून ठेवावे लागतात.आपण कुठल्या प्रकारचा साबुदाणा वापरात घेतो त्यावरून ते ठरवावे. साबूदाणा भिजवल्या.नंतरच खाण्यायोग्य होतो.नंतर त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.साबुदाणा पासून वर्ष भर टिकतील व वापरता येतील असे पदार्थ ही बनवले जातात. म्हणजे वर्षभर वाळवणाच्या रूपात साबुदाण्याचे पापड बनवून डब्यात भरून वर्षभर साठवता येतात. बटाटा व साबुदाणा एकत्र करून चकल्या बनवल्या जातात. हे पदार्थ वर्षभर हवे तेव्हा आपल्याला खाता येतात. तसा तर साबुदाणा पचण्यास खूप जड असतो. बऱ्याच जणांना तो खाल्ल्यावर पित्ताचा किंवा पोटदुखीचा ही त्रास होतो.परंतु जर तो बनवताना पचनासाठीचे पदार्थ वापरले गेले तर तो पचायला हलका होतो.जसे साबुदाणा खिचडी वर लिंबू पिळून खावे. लिंबू हा साबुदाणा बसवण्यासाठी चा उत्तम पर्याय आहे.तसेच साबुदाणा खिचडी मध्ये आले किसून अवश्य घालावे, म्हणजे त्याच्याने पित्ताचा त्रास होत नाही व पचण्यास सोपा होतो.तसेच साबुदाणा खिचडी करताना खोबऱ्याचा कीस घातल्याने साबुदाणा मुळेशरीराला येणारा कोरडेपणा येतो, तो कमी होण्यास मदत होते व पचायलाही बरे पडते.साबुदाणा म्हणजे एका विशिष्ट झाडाच्या चिकापासून तयार केला जातो. साबुदाण्याचे पांढऱ्या रंगाचे मोत्या प्रमाणे गोल आकाराचे छोटे व कडक दाणे असतात. Sabudana Khichdi – साबुदाणा खिचडी मध्येजास्त प्रमाणात कर्बोधके असतात. त्यामुळे दिवसभर शरीराला ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते. साबुदाण्या -सोबत त्यात हिरवी मिरची किंवा लाल तिखट शेगदाण्याची जाडसर पूड, बटाटे, थोडे किसलेले खोबरे, पचनासाठी थोडेसे आले असे पदार्थ घालून साबुदाणा चविष्ट बनवला जातो.
3. भगरीच्या पिठाचा उपमा.
साहित्य.
- दोन वाटी भगरीचे भाजून दळून आणलेले पीठ.
- मध्यम आकारातील बटाट्याच्या फोडी पाव वाटी.
- चार ते पाच हिरव्या मिरच्या.
- चमचाभर जिरे .
- पीठ भाजण्यासाठी तूप.
- चवीनुसार मीठ.
कृती.
- भगरीच्या पिठाचा उपमा तयार करण्यासाठी एका कढईत थोड्या तुपावर भगरीचे पीठ खमंग भाजून घ्या. पीठ मंद आचेवर भाजावे म्हणजे पीठ पिठाला जळका वास लागणार नाही. पिठाचा छान खमंग वास आला म्हणजे पीठ भाजले गेले असे समजावे.
- आता पीठ भाजल्यानंतर एका भांड्यात पीठ काढून घ्या नंतर कढ ई त थोडे तूप घालून त्यात फोडणीसाठी तूप घालून त्यात जिरे घाला.
- जिरे लालसर झाल्यावर हिरव्या मिरचीचे तुकडे व बटाट्याचे काप घाला व लालसर रंगावर परतून घ्या.
- आता दीड वाटी पाणी घाला चवीनुसार मीठ घाला पाण्याला उकळी आल्यावर भाजलेले पीठ घाला. पीठ चांगले हलवून घ्या झाकण ठेवून वाफ येऊ द्या व पूर्ण वाफ आल्यानंतर त्यात त्यावर थोडे खोबऱ्याचा कीस घालून खायला द्या . हा उपमा लिंबू सोबत स्वादिष्ट लागतो.
भगरीचे पोषकतत्वे.
BHAGAR – भगर ही फक्त उपवासातच खाल्ले जाते. पण भगरीतले पोषक घटकांचा विचार केला तर भगर इतर दिवशी खाल्ली जायला काही हरकत नाही. BHAGAR-भगर साध्या भातासारखी चव असते.त्यात वेगवेगळे घटक पदार्थ घालून चव आणले जाते. असे म्हटले जाते की BHAGAR-भगर हे शेतात आपोआप येणाऱ्या गवताची बी आहे. परंतु अतिशय पोषक तत्वे असणारे बी आहे हे आपल्या वापरात नेहमी असणे आरोग्यदायी ठरू शकते. भगरीतील फायबर हे पचनासाठी उपयुक्त असतात. BHAGAR-भगर खाल्ल्याने पोट साफ राहण्यास मदत होत असते. BHAGAR-भगर खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. म्हणूनच तज्ञांच्या मते मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी भाताऐवजी BHAGAR-भगर आहारात नेहमी ठेवावी. तसेच भगरी मुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. BHAGAR-भगर हे ग्लूटेन फ्री धान्य आहे.पचायला जड असते.बऱ्याच व्यक्तींना पचनाच्या समस्या असतात अशा समस्यांना ग्लूटेन फ्री असलेले धान्य खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच काही व्यक्तींना ग्लूटेन ची ऍलर्जी असते. अशावेळी बाजरी व ज्वारी खाण्याचा सल्ला दिला जातो. अशा समस्यांमध्ये BHAGAR-भगर खाल्ली तर फार फायदेशीर ठरू शकते. भगरीत आयर्न व खनिज भरपूर असतात.
4. उपवासाच्या पिठाची खमंग चकली.
पूर्वतयारी.
उपवासाची भाजणी म्हणजेच भाजलेला राजगिरा ,भाजलेला साबुदाणा व भाजलेली भगर हे एकत्र करून घेणे भाजून एकत्र करून दळून आणावे.
साहित्य.
- उपवासाची भाजणीचे पीठ दोन वाटी.
- अर्धा चमचा जिरेपूड.
- अर्धा चमचा वाटलेली हिरवी मिरची.
- चवीनुसार मीठ.
- तळण्यासाठी तेल.
- पिठाला मोहन देण्यासाठी तीन ते चार लहान चमचे तेल.
- पाव चमचा आल्याची पेस्ट.
कृती :-
- उपवासाच्या पिठाची चकली करण्यासाठी उपवासाची भाजणी व भगरीचे पीठ एकत्र करा करून घ्यावे.
- त्यात अर्धा चमचा जिरे किंवा जिरेपूड ,आल्याची पेस्ट ,हिरवी मिरचीची पेस्ट व चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घ्यावे.
- आता कडकडीत तेल गरम करून कडकडीत तेलाचे मोहन घालावे व पीठ भिजवण्यासाठी पण थोडे कोमट पाण्याने लागेल तसे पाणी घालून पीठ भिजवून घ्या.
- आता पीठ थोडा वेळ म्हणजे पाच ते दहा मिनिटे झाकून ठेवा.
- आता चकलीच्या साच्याने सोऱ्याने चकली तयार करून गरम तेलावर मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घ्यावे चकल्या गरम गरम चकल्या खायला द्या सोबत दह्याची चटणी देऊ शकतात.
1 thought on “Navratri Upavas Padarth | उपवासाचे वडे, उपमा व चकली नवरात्रात रोज करा नवीन फराळाचा पदार्थ.”