Palak Cheela-पालक चिला म्हणजे एक प्रकारचे धिरडे. जसे आपण तांदळाचे धिरडे, हरभऱ्याच्या डाळीचे धिरडे बनवतो किंवा सगळ्या डाळी मिक्स करून तयार केलेले धिरडे, याचप्रमाणे त्यालाच चिला असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे मुगाच्या डाळीत किंवा हिरव्या मुंग भिजवून मिक्सर मधून त्याचे छान बारीक पेस्ट तयार करून त्यात चिरलेला पालक किंवा पालकाची पेस्ट घालून Palak Cheela-पालक चिला तयार केला जातो.
थोडे Palak Cheela-पालक चिला विषयी.
हिरवा मूग किंवा मुगाची डाळ हे अतिशय पौष्टिक धान्य म्हणून सगळ्यांनाच परिचयाचे आहे. मोड आलेले हिरवे हे मूग हे भरपूर विटामीन व पौष्टिक तत्त्वांनी भरलेले एक संपूर्ण आहारात घडल्या जातात. अगदी लहान मुलांचा आहार सुरू होतो तो याच मुगाच्या पातळ सूप पिण्यापासून कारण मुगामध्ये असलेले प्रोटीन्स व विटामिन से बसायला अगदी सहज असतात. लहान मुलांप्रमाणेच वयस्कर व्यक्तींना व आजारी व्यक्तींना सुद्धा मुगाचे पदार्थ दिले जातात. त्यात मुगाचे कडून मुगाचे सूळ, मुगाची खिचडी, मुगाचे वरून असे अनेक पदार्थ बनवले जातात. मुगातील मॅग्नेशियम, लोह, असेल थायमिन, पोटॅशियम, फॉस्फरस, विटामिन B6 यासारखे पोस्ट भरपूर पोषक तत्वे आढळतात. त्यामुळे मोघे लहान मुले, आजारी व्यक्ती तसेच वयस्कर व्यक्तींसाठी परिपूर्ण आहार मानला जातो. त्याचप्रमाणे जी व्यक्ती चिकन, मटण, अंडी असा मांसाहार करत नाही किंवा काही कारणास्तव करू शकत नाही अशा व्यक्तींसाठी मूळ हा परिपूर्ण आहार मानला जातो. मुगाची डाळ त्याप्रमाणे हिरव्या मुगात फायबर सुद्धा भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे आपले जयाच यापचय क्रिया मजबूत होते. हे पचायला सुद्धा हलके असतात. मूग किंवा मुगाची डाळ आहारात ठेवल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. मुगाचे फक्त पथ्याचेच पदार्थ नाही तर मिठाई सुद्धा बनवले जाते. मुगाचे लाडू, मुगाचा शिरा, मुगाची बर्फी यासारखे शरीराला मास धातू वाढवणारे व शक्ती देणारे पदार्थ बनवले जातात. त्याचप्रमाणे मुगात वेगवेगळे भाज्या घालून भाज्या घालून त्याचेही पदार्थ बनवले जातात त्यातलाच एक पदार्थ आपण आज पाहणार आहोत तो म्हणजे पालक घालून तयार केलेल्या मुगाचा Palak Cheela-पालक चिला. त्यात स्वादासाठी जिरे, ठेचलेले आले, लाल तिखट किंवा हिरवी मिरची, कोथिंबीर असे पदार्थ घालून स्वाद वाढवला जातो. Palak Cheela-पालक चिला तयार करताना मुगाची साले काढलेले पिवळे डाळ किंवा हिरवा मूग असे दोन्ही प्रकार वापरले जातात किंवा हरभऱ्याची डाळ व तयार बेसन यामध्येही पालक बारीक चिरून किंवा मिक्सरमधून पेस्ट तयार करून घालून त्याचाही Palak Cheela-पालक चिला बनवला जातो. परंतु बऱ्याच वेळेस हरभऱ्याची डाळ ही अनेक जणांना चालत नाही त्यामुळे बरेच जण बेसन वापरणे टाळतात म्हणून आपण आज मुगाचा चिला पाहणार आहोत.
साहित्य.
- मूग डाळ एक वाटी.
- स्वच्छ निवडून तयार केलेला पालक दहा ते आठ ते दहा पाने.
- लाल तिखट एक चमचा किंवा दोन ते तीन हिरव्या मिरच्या.
- एक एक चमचा आले लसणाची पेस्ट.
- अर्धा चमचा जिरे पावडर.
- चवीनुसार मीठ.
- पाव चमचा हळद.
- गरजेप्रमाणे तेल.
कृती.
- पालक जिल्हा करण्यासाठी प्रथम मूग डाळ स्वच्छ धुऊन मग अर्धा ते एक तासासाठी पाण्यात भिजत ठेवावे.
- एका तासानंतर मिक्सरच्या भांड्यात फिरवून छान बारीक पेस्ट तयार करावे.
- नंतर पालक ची जोडी स्वच्छ करून पालक निवडून घ्यावा देठ थोडे कोवळे असतील तर तेही घ्यावे व स्वच्छ धुऊन निथळत ठेवावे.
- आता पालक बारीक चिरून घ्यावा.
- फिरवलेल्या डाळी बारीक चिरलेला पालक लसणाची पेस्ट जिरे पावडर मीठ हळद हिरव्या मिरच्या बारीक वाटून किंवा बारीक चिरून फिरवलेल्या मूग डाळीच्या पिठात घालाव्या व छान ढवळून घ्यावे.
- आता पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत हे मिश्रण झाकून ठेवावे.
- वीस मिनिटानंतर एक गॅस वर एक पॅन किंवा तवा घेऊन छान गरम करून घ्या तव्याला चिकटणार नाही त्यासाठी तवा चांगला तापवून त्याच्यावर थोडे तेल घालून कापडाने छान तव्यावर पसरवून घ्यावे.
- आता एका चमच्याच्या किंवा मातीच्या साह्याने थोडे मिश्रण घेऊन त्यावर टाकावे व हलक्या हाताने छान गोलाकार फिरवून पसरवून घ्यावे.
- आता Palak Cheela-पालक चिला छान तांबूस रंगाचा मंद आचेवर थोडा सोनेरी रंगावर वाफवून घ्यावा वरून पूर्णपणे कोरडा झाला दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यावा.
- आता Palak Cheela-पालक चिला छान कुरकुरीत झालेला असेल.
- Palak Cheela-पालक चिला हा गरमच खायला द्यावा म्हणजे त्याचा स्वाद खूप छान लागतो.
टीप.
- Palak Cheela-पालक चिला करताना मुगडाळी ऐवजी बेसनही वापरू शकतात परंतु बेसन हे बऱ्याच जणांना अपथ्य होते म्हणून अशा वेळेस मुगडाळ वापरली जाते.
- तसेच Palak Cheela-पालक चिला बनवताना हिरवा मूग भिजवून वापरता येतो.
- वाटीभर हिरव्या मूग असेल तर एक ते दोन चमचा उडदाची डाळ घ्यावी चिला तव्याला चिकटत नाही व पटकन निघतो, तसेच चवीलाही खूप छान होतो.
- Palak Cheela-पालक चिला बनवताना थोडा कुरकुरीतपणा हवा असल्यास त्यात चमचाभर तांदळाचे पीठ टाकू शकता.