“Puran Poli-पुरणपोळी बनवण्याची कलाकारी: गोड गूढ उलगडतं!”

Puran Poli-पुरणपोळी म्हणजे सण, पुरणपोळी म्हणजे आनंद Puran Poli-पुरणपोळी म्हणजे देवाचा नैवेद्य, पुरणपोळी म्हणजे एक परंपरा जी आजही या फास्टफूडच्या जगात टिकून आहे. छान मऊसर गोड वेलची जायफळाचा स्वाद असलेली पुरण घालून भरपूर तुपात खरपूस भाजलेली पोळी आठवली तरी तोंडाला पाणी सुटले नाही तरच नवल. महाराष्ट्रात अनेक सणांचा भाग पुरणपोळी आहे तसेच अनेक धार्मिक कार्यात देवाला नैवेद्य हा Puran Poli-पुरणपोळी दाखवला जातो.पुरणपोळी प्रमाणेच खव्याची पोळी केली जाते, ती सुद्धा अतिशय लोकप्रिय आहे पुरणा ऐवजी खवा वापरला जातो.Puran Poli-पुरणपोळी बनवण्याची पद्धत सगळीकडे सारखीच असते.फक्त कुठे हरभरा डाळीचे पुरण केले जाते, तर काही ठिकाणी तुरीच्या डाळीचे करतात, तर काही ठिकाणी हरभरा डाळीचे पथ्य असेल तर मुगाच्या डाळीचे ही पुरण करतात.

PURAN POLI
Read More : Thandai Recipe.

थोडे पुरणपोळी-PURAN POLI विषयी.

Puran Poli-पुरणपोळी मुख्य घटक असतो तो म्हणजे आपले नेहमीच्या वापरातले गव्हाचे पीठ.गव्हाच्या पिठाचे खानदेशात पुरणपोळी साठी विशेष प्रकारचे गहू निवडले जातात.Puran Poli-पुरणपोळी म्हणजे गव्हाच्या पिठापासून व हरभरा डाळ साखर तूप या पदार्थांपासून केलेला एक गोड व स्वादिष्ट महाराष्ट्रीयन पदार्थ. महाराष्ट्रात सणावाराच्या निमित्ताने पुरणपोळी आवडीने केली जाते.Puran Poli-पुरणपोळी ही दूध, तूप व आंब्याचा रस या पदार्थांसोबत खाल्ली जाते.Puran Poli-पुरणपोळी देवाला नैवेद्यासाठी सुद्धा महत्त्वाचा भाग मानला जातो.पुरण पोळी दोन प्रकारे केली जाते,एक म्हणजे तव्याची जी आज आपण बघणार आहोत व दुसरी म्हणजे खापराची तिलाच मांडे असे म्हटले जाते.मांडे या प्रकारात पुरणपोळी आकाराने मोठी असते.तीएका मोठ्या आकाराच्या मातीच्या भांड्यावर बनवली जाते.मांडे बनवणे खूप कौशल्याचे काम असते.मांडे करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारचे गहू वापरले जातात.आज आपण पहाणार आहोत तव्यावर केली जाणारी पुरणपोळी .हि पुरणपोळी मुख्यता गहू हरबरा डाळ व गुळ यापासून बनवली जाते.पुरणपोळीत स्वादासाठी वेलची ,जायफळ घातले जाते.

पुरणपोळी कशी बनवतात.

Puran Poli-पुरणपोळी बनवणे हे सुद्धा एक कौशल्याचे काम समजले जाते. Puran Poli-पुरणपोळी करताना प्रथम कणिक भिजवून ठेवली जाते. पुरणपोळीत भरण्यासाठी पुरण तयार करताना हरभरा डाळ तीन पट पाणी घालून शिजवून घेतात. डाळ शिजल्यावर चाळणीने ओतून डाळीचे जास्तीचे पाणी काढून घेतात ते पाणी कटाच्या आमटीसाठी वापरले जाते. खानदेशात डाळीच्या या पाण्यापासून मसाल्याची काळी आमटी बनवतात व भातासोबत खाल्ली जाते.नंतर या डाळीत गुळ किंवा आपल्या आवडीप्रमाणे साखर घालून एकजीव केले जाते.नंतर हरभरा डाळ व गुळ चाळणीतून गाळून बारीक एकसारखे केली जाते.गूळ घातल्यामुळे डाळ थोडी पातळ होते आता डाळ गुळ गॅसवर ठेवून गरम केली जाते.पुरणातले जास्तीचे पाणी आटवूनपुरण कोरडे करून घ्यावे.कोरडे पुरण Puran Poli-पुरणपोळी लाटताना छान लाटली जाते. आता भिजवलेली कणिक छान मळून घ्यावी.तिचा एक गोळा घेऊन कोरड्या पिठात बुडवून घ्यावा.त्या गोळ्याला हळूहळूवाटीसारखा आकार देऊन त्यात पुरण भरून घ्यावे.नंतर सगळ्या बाजूने त्याचे तोंड बंद करून हलक्या हाताने पुरणपोळी लाटली जाते व तव्यावर टाकून दोन्ही बाजूने खमंग सोने रंगावर भाजले जाते. गरम गरम Puran Poli-पुरणपोळी तुपा सोबत खाल्ली जाते.

पुरण पोळी मध्ये पावरले जाणारे घटक.

  • गहू :- एक मुख्य धान्य आहे.गव्हाचे पीठ हे शरीराला बांधणी चे काम करते म्हणजेच गहू आपले मास पेशींना आकार देण्याचे काम करत असतो.गव्हापासून पोळी,पाव असे पदार्थ बनवले जातात.गव्हाच्या पिठात भरपूर प्रथिने असतात मॅग्नेशियम व विटामिन बी व गव्हाच्या कोंड्यात विटामिन ई भरपूर प्रमाणात असते जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असते.परंतु बरेच पदार्थ करताना गव्हाचा कोंडा साले म्हणजे कोंड्याच्या रूपाने काढले जातात व वापरले जाते.रोजच्या वापरातले गहू गिरणीतून दळले जातात. दळलेल्या गव्हाचे पीठ बारीक चाळणी किंवा कापडाच्या साह्यान चाळून घ्यावे.म्हणजे गव्हाची साले कोंड्याच्या स्वरुपात काढून घेतात.जेणेकरून पिठातला कोंडा वेगळा काढला जाईल व पिठी वेगळी केली जाते.कारण कोंडा असलेल्या कणकेच्या पोळ्या नीट करता येत नाही.या गाळलेल्या पिठात थोडे तूप मीठ घालून पाण्याच्या साह्याने मऊसूत कणिक भिजवली जाते. Puran Poli-पुरणपोळी कणकेला एक ते दीड तास झाकून ठेवले जाते.झाकून ठेवल्यावर ती कणिक छान मुरते व रबरा सारखी ताणले जाते.अशा कणकेच्या पुरणपोळी अतिशय मऊ व तोंडात विरघळणारी अशी चविष्ट होते.कणिक खूप घट्ट असेल तर पुरणपोळीचे आवरण जाड येते.पुरणपोळी दुसरा घटक असतो हरभरा डाळ.
  • हरभरा डाळ :- हरभरा डाळही फायबर आणि भरपूर प्रथिने असलेली डाळ आहे.डाळी हा प्रथिनांचा प्रमुख साठा असलेले एक अन्नघटक आहे. हरभरा डाळीमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा गुणधर्म असतो. त्याच बरोबर हरभरा डाळीत झिंक, फॉलिक ऍसिड व कॅल्शियम असते.पुरणपोळी साठी प्रथम डाळ शिजवून घेतली जाते.शिजवलेल्या डाळीतले जास्तीचे पाणी काढून घेतात.नंतर त्या डाळिंत गूळ मिक्स केला जातो. हरभरा डाळ छान चाळणीने किंवा मिक्सरमधून बारीक केली जाते.जेणेकरून पुरणपोळी करताना डाळीच्या व गुळाच्या गाठी लागणार नाही व Puran Poli-पुरणपोळी सफाईदारपणे लाटली जाईल. पुरण पोळी लाटून झाल्यावर तव्यावर दोन्ही बाजूने खमंग सोनेरी रंगावर भाजली जाते.Puran Poli-पुरण पोळी तुपा सोबत खाल्ली जाते.आंब्याच्या ऋतूत आंब्याच्या रसासोबत तिचा आस्वाद घेतला जातो खुप रुचकर लागते. गरम तुपा सोबत ही खूप छान लागते. ठिकाणी Puran Poli-पुरणपोळी साखर घालूनही केली जाते. पुरण पोळी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा या राज्यात खाल्ली जाते. पुरणपोळीचा शोध बाराव्या शतकात लागला असे म्हटले जाते. काही ठिकाणी पुरणपोळीत हरभरा डाळी ऐवजी तुरीची किंवा मुगाची डाळ वापरली जाते.काही व्यक्तींना हरभरा डाळीचे पथ्य असते.अशा वेळेस मुगाची डाळ वापरली जाते. मुगाच्या डाळीची Puran Poli-पुरणपोळी सुद्धा छान होते. मुगाच्या डाळीचे पुरण थोडे चिकट होऊ शकते. म्हणून मुगाची डाळ शिजवताना थोडी काळजी घ्यावी लागते.पुरणपोळीसाठी मुगाची डाळ वापरायची असेल तर ती फार जास्त शिजवू नये नाहीतर ती चिकट होते.Puran Poli-पुरणपोळी डाळीसोबत गुळ किंवा साखरे घातली जाते.खान्देशात मात्र गुळाला जास्त पसंती दिली जाते. सुगंधासाठी व पचनासाठी पुराणात जायफळ , वेलदोडा घातला जातो.

साहित्य.

  • हरभरा डाळ एक वाटी.
  • गूळ पाऊण वाटी.
  • चालले गव्हाचे पीठ एक वाटी.
  • वेलची जायफळ स्वादानुसार.
  • मीठ पाव चमचा.
पुरणपोळी-PURAN POLI साहित्य.

पूर्वतयारी.  

  • प्रथम गव्हाचे पीठ बारीक चाळणीने किंवा एका कपड्याने चाळून घ्या.म्हणजे पिठातून सगळा कोंडा निघून जाईल. कोंडा नसलेल्या पिठाच्या पोळ्या एकदम छान होतात
  • एका परातीत चाळलेले पीठ घ्या त्यात दोन-तीन चमचे तेल किंवा तूप टाका.पाव चमचा मीठ टाका व लागेल तसे पाणी घालून कणीक मळून घ्या.
  • कणिक थोडी सैल सर भिजवा. तेल लावून छान मळून ठेवा व साधारण तासभर तरी झाकून ठेवा.
पुरणपोळी-PURAN POLI
  • पुरणपोळी-PURAN POLI साठी पुरण तयार करत असतांना प्रथम हरभरा डाळ स्वच्छ धुऊन घ्या.
  • एका कुकर मध्ये साधारण डाळीच्या तीन पट पाणी घालून डाळ शिजवून घ्या.तीन ते चार शिट्ट्या करून घ्या.तीन चार शिट्ट्या मध्ये डाळ छान शिजते.
  • तीन चार शिट्ट्या झाल्यावर ग्यास बंद करा.आता कुकर मध्ये असलेल्या वाफेवर डाळ पूर्ण शिजेल.कुकर गार झाल्यावर एका चाळणीत शिजलेली डाळ ओतून घ्या.
  • डाळीचे जास्तीचे पाणी निघून जाईल.डाळ गार करायला ठेवा.गाळलेले पाणी फेकू नये.या पाण्याला कट म्हणतात व ह्या पाण्याच्या आमटीला कटाची आमटी म्हणतात.
  • खान्देशात त्या पाण्याची काळी आमटी करतात. ह्या पाण्याची आमटी खूप छान होते.आमटी करायची नसेल तर कुठल्याही भाजीत ते पाणी वापरल्यास भाजीला चव छान येते.
  • पाणी फ्रीज मध्ये ठेवू शकतात.दोन तीन दिवस टिकते.
  • आता डाळ गार झाल्यावर डाळीत किसलेल्या गुळ मिक्स करा.गूळ मिक्स झाल्यावर डाळ व गूळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
  • वाटलेली डाळ पिठाच्या बारीक चाळणीने चाळून घ्या म्हणजे त्यात जर काही जाडसर भाग राहिला असेल तर तो निघून जाईल व सगळे पुरण एकसारखे होईल व पुरणपोळी-PURAN POLI फुटणार नाही.
पुरणपोळी-PURAN POLI
  • आता त्या पुरणात सुगंध व स्वादासाठी वेलची,जायफळ मिक्स करून घ्या व पुरण कढाईत घालुन मध्यम आचेवर गरम करून घ्या.
  • गरम केल्यामुळे पुरण थोडे कोरडे होईल.कोरड्या पुरणाच्या पुरणपोळी-PURAN POLI छान होते. चिकटत नाही किंवा फाटत हि नाही.नंतर पुरण गार करायला ठेवा.

पुरण पोळी-PURANPOLI कृती.

  • पुरणपोळी-PURAN POLI करतांना कणीक परत एकदा तेल लावून छान मळून घ्या.
  • कणिक अगदी मऊ करून घ्या.पुरण गार झाल्यावर पुरणाचा लिंबाएवढा गोळा घ्या व कणकेचा त्यापेक्षा छोटा थोडा छोटा गोळा घ्या व कोरड्या पिठात घोळवून घ्या म्हणजे हाताला चिकटणार नाही.
  • आता मोदकाप्रमाणे कणकेची वाटी करून त्यात पुरण भरा सगळ्या बाजूंनी तो गोळा नीट पक्का बंद करा म्हणजे पुरण बाहेर येणार नाही.
  • नंतर पोळपाटावर कोरडे पीठ किंवा तांदळाची पिठी टाकून पुरणपोळी-PURAN POLI हलक्या हातांनी लाटून घ्या.
  • सगळीकडून लाटणे सारखे फिरवा म्हणजे पुरण सगळीकडे नीट पसरेल.
  • नंतर तव्यावर छान तूप टाकून पुरणपोळी-PURAN POLI दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या व तुपा सोबत खायला द्या.
PURAN POLI-पुरणपोळी
  • सध्या आंब्याचे दिवस आले आहेत आमरसासोबत पुरणपोळी अतिशय चविष्ट लागते.खान्देशात पुरणपोळी-PURAN POLI आणि आमरस हा पाहुणचाराचा खास बेत असतो.

PURAN POLI-पुरणपोळी

टिप्स.

  • पुरण पोळी साठी गव्हाचे पीठ घेतांना उत्तम दर्जाचे गहू वापरावे पोळी ला छान चव येते व पुरणपोळी उत्तम प्रकारे बनवली जाते. गव्हाचे पीठ योग्य प्रमाणात बारीक दळलेले असावे नाहीतर पुरणपोळी लाटताना फाटते व पुरण बाहेर येते.
  • पुरण पोळी साठी डाळ अगदी मऊ शिजवली गेली पाहिजे डाळ हाताने सहज दाबली जाईल इतपत शिजवावी .
  • पुरणाची डाळ जास्त शिजून पातळ झाली तर गुळ मिक्स करण्याआधी डाळ एका सुती कापडाने हलक्या हाताने दाब देवून पिळून घ्यावी .नंतर दलित गुळ मिक्स करावा.म्हणजे डाळ कोरडी करायला फार वेळ लागणार नाही .
  • पुरणात इलायची व जायफळ हे पुरण पूर्ण झाल्यावर टाकावे म्हणजे त्याचा स्वाद छान येतो व्तीकून रहातो
  • पुरण पूर्ण गार झाल्यावरच पुरणपोळी करायला सुरवात करायची .गरम पुरण पोळी फाटून बाहेर येते व पोळपाटा ला व तव्याला चिकटते .
  • काही ठिकाणी हरबरा डाळीऐवजी तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ वापरली जाते.मुगाची डाळ हि पचनासाठी हलकी असते त्यामुळे प्रौढ व्यक्तींना पचनास सहज होते.
  • मुगाची डाळ वापरात असाल तर डाळ शिजवताना काळजी घ्यावी.मुगाची डाळ कमी वेळात शिजते.जास्त शिजली तर खूप चिकट होते म्हणून मुगाची डाळ शिजवताना काळजी घ्यावी.

खव्याची पोळी.

साहित्य.

  • खवा एक वाटी.
  • पिठीसाखर एक वाटी.
  • वेलची पूड एक चमचा.
  • कणीक एक वाटी.
  • तांदळाची पिठी गरजेनुसार.
  • तेल चार ते पाच चमचे.

कृती.

  • खव्याच्या पोळी साठी सुद्धा कणीक छान चाळून घ्या,चाळलेल्या कणकेत तेल गरम करून घाला,पूर्ण पिठाला हाताने छान चोळून घ्या व लागेल तसे पाणी घालून कणिक भिजवून घ्या.
  • कणिक मऊ भिजवा व तेलाचा हात लावून गोळा झाकून ठेवा.
  • खवा हाताने एकसारखा करून घ्या व एका कढईत मंद आचेवर परतून घ्या.थोडा गुलाबीसर भाजा भासताना करपणार नाही याची काळजी घ्या.
  • खवा परतून झाल्यावर खवा गार करून घ्या वं गार झाल्यावर त्यात पिठीसाखर व वेलची पूड मिसळून घ्या.
  • साखर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात मिश्रण नीट एकत्र करून घ्या.
  • भिजवलेल्या कणकेचा गोळा जरा मऊ करा.आता छोटा गोळा घेऊन तो वाटी चा आकाराप्रमाणे तयार करून घ्या.
  • त्यात मावेल एवढा खवा घाला व व्यवस्थित तोंड बंद करून घ्या.
  • तांदळाची पिठी लावून तो लाटण्याने पोळपाटावर हलक्या हाताने लाटून घ्या व मंद गॅसवर छान भाजून घ्या
  • खव्याची पोळी गार झाल्यावरच छान लागते.म्हणून आधी करून ठेवली तरी चालते तुपाबरोबर खायला द्या.

FAQs.

प्रश्न १ :- पुरणपोळी साठी कोणत्या डाळी वापरता येतात ?

उत्तर :- पुरणपोळी करताना पुरणपोळी साठी मुख्यतः हरभऱ्याची डाळ वापरली जाते परंतु काही जणांना हरभऱ्या डाळीचे पथ्य असल्यामुळे मुगाची किंवा तुरीची डाळ वापरली तरी चालते मुगाच्या डाळीचे पुरण थोडे चिकट होते म्हणून शिजवताना थोडी काळजी घ्यावी मुगाची डाळ कमी वेळेत शिजते म्हणून तिला काळजीपूर्वक शिजवावी.

प्रश्न २ :-  पुरणपोळी ही मैद्यापासून तयार केली जाते का ?

उत्तर :- पुरणपोळी ही साधारण गव्हाच्या पिठापासून तयार केले जाते. परंतु काही प्रकारच्या गव्हांपासून पुरणपोळी केली जात नाही. म्हणून गव्हाच्या पिठात थोडा मैदा घातला तर चालतो परंतु पूर्णपणे मैद्याची पुरणपोळी ही पचायला जड होते व त्रास होऊ शकतो.
 

प्रश्न ३ :- पुरणपोळी करताना पुरणपोळीतील पुरण बाहेर येऊन पोळी का फाटते ?

उत्तर :- पुरणपोळी करताना पुरण बाहेर येते कारण पुरण हे पूर्ण पणे कोरडे झालेले नसते. पुरणपोळी करताना पुरण कढईत घालून छान गरम करून त्यातले पाणी आटवून घ्यावे व पुरण पूर्णपणे कोरडे करून घ्यावे अशा पुरणाची पुरणपोळी फाटत नाही व चिकटतही नाही.

Leave a comment