Site icon Ashlesha's Recipe

“Puran Poli-पुरणपोळी बनवण्याची कलाकारी: गोड गूढ उलगडतं!”

Puran Poli-पुरणपोळी म्हणजे सण, पुरणपोळी म्हणजे आनंद Puran Poli-पुरणपोळी म्हणजे देवाचा नैवेद्य, पुरणपोळी म्हणजे एक परंपरा जी आजही या फास्टफूडच्या जगात टिकून आहे. छान मऊसर गोड वेलची जायफळाचा स्वाद असलेली पुरण घालून भरपूर तुपात खरपूस भाजलेली पोळी आठवली तरी तोंडाला पाणी सुटले नाही तरच नवल. महाराष्ट्रात अनेक सणांचा भाग पुरणपोळी आहे तसेच अनेक धार्मिक कार्यात देवाला नैवेद्य हा Puran Poli-पुरणपोळी दाखवला जातो.पुरणपोळी प्रमाणेच खव्याची पोळी केली जाते, ती सुद्धा अतिशय लोकप्रिय आहे पुरणा ऐवजी खवा वापरला जातो.Puran Poli-पुरणपोळी बनवण्याची पद्धत सगळीकडे सारखीच असते.फक्त कुठे हरभरा डाळीचे पुरण केले जाते, तर काही ठिकाणी तुरीच्या डाळीचे करतात, तर काही ठिकाणी हरभरा डाळीचे पथ्य असेल तर मुगाच्या डाळीचे ही पुरण करतात.

Read More : Thandai Recipe.

थोडे पुरणपोळी-PURAN POLI विषयी.

Puran Poli-पुरणपोळी मुख्य घटक असतो तो म्हणजे आपले नेहमीच्या वापरातले गव्हाचे पीठ.गव्हाच्या पिठाचे खानदेशात पुरणपोळी साठी विशेष प्रकारचे गहू निवडले जातात.Puran Poli-पुरणपोळी म्हणजे गव्हाच्या पिठापासून व हरभरा डाळ साखर तूप या पदार्थांपासून केलेला एक गोड व स्वादिष्ट महाराष्ट्रीयन पदार्थ. महाराष्ट्रात सणावाराच्या निमित्ताने पुरणपोळी आवडीने केली जाते.Puran Poli-पुरणपोळी ही दूध, तूप व आंब्याचा रस या पदार्थांसोबत खाल्ली जाते.Puran Poli-पुरणपोळी देवाला नैवेद्यासाठी सुद्धा महत्त्वाचा भाग मानला जातो.पुरण पोळी दोन प्रकारे केली जाते,एक म्हणजे तव्याची जी आज आपण बघणार आहोत व दुसरी म्हणजे खापराची तिलाच मांडे असे म्हटले जाते.मांडे या प्रकारात पुरणपोळी आकाराने मोठी असते.तीएका मोठ्या आकाराच्या मातीच्या भांड्यावर बनवली जाते.मांडे बनवणे खूप कौशल्याचे काम असते.मांडे करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारचे गहू वापरले जातात.आज आपण पहाणार आहोत तव्यावर केली जाणारी पुरणपोळी .हि पुरणपोळी मुख्यता गहू हरबरा डाळ व गुळ यापासून बनवली जाते.पुरणपोळीत स्वादासाठी वेलची ,जायफळ घातले जाते.

पुरणपोळी कशी बनवतात.

Puran Poli-पुरणपोळी बनवणे हे सुद्धा एक कौशल्याचे काम समजले जाते. Puran Poli-पुरणपोळी करताना प्रथम कणिक भिजवून ठेवली जाते. पुरणपोळीत भरण्यासाठी पुरण तयार करताना हरभरा डाळ तीन पट पाणी घालून शिजवून घेतात. डाळ शिजल्यावर चाळणीने ओतून डाळीचे जास्तीचे पाणी काढून घेतात ते पाणी कटाच्या आमटीसाठी वापरले जाते. खानदेशात डाळीच्या या पाण्यापासून मसाल्याची काळी आमटी बनवतात व भातासोबत खाल्ली जाते.नंतर या डाळीत गुळ किंवा आपल्या आवडीप्रमाणे साखर घालून एकजीव केले जाते.नंतर हरभरा डाळ व गुळ चाळणीतून गाळून बारीक एकसारखे केली जाते.गूळ घातल्यामुळे डाळ थोडी पातळ होते आता डाळ गुळ गॅसवर ठेवून गरम केली जाते.पुरणातले जास्तीचे पाणी आटवूनपुरण कोरडे करून घ्यावे.कोरडे पुरण Puran Poli-पुरणपोळी लाटताना छान लाटली जाते. आता भिजवलेली कणिक छान मळून घ्यावी.तिचा एक गोळा घेऊन कोरड्या पिठात बुडवून घ्यावा.त्या गोळ्याला हळूहळूवाटीसारखा आकार देऊन त्यात पुरण भरून घ्यावे.नंतर सगळ्या बाजूने त्याचे तोंड बंद करून हलक्या हाताने पुरणपोळी लाटली जाते व तव्यावर टाकून दोन्ही बाजूने खमंग सोने रंगावर भाजले जाते. गरम गरम Puran Poli-पुरणपोळी तुपा सोबत खाल्ली जाते.

पुरण पोळी मध्ये पावरले जाणारे घटक.

साहित्य.

पूर्वतयारी.  

  • प्रथम गव्हाचे पीठ बारीक चाळणीने किंवा एका कपड्याने चाळून घ्या.म्हणजे पिठातून सगळा कोंडा निघून जाईल. कोंडा नसलेल्या पिठाच्या पोळ्या एकदम छान होतात
  • एका परातीत चाळलेले पीठ घ्या त्यात दोन-तीन चमचे तेल किंवा तूप टाका.पाव चमचा मीठ टाका व लागेल तसे पाणी घालून कणीक मळून घ्या.
  • कणिक थोडी सैल सर भिजवा. तेल लावून छान मळून ठेवा व साधारण तासभर तरी झाकून ठेवा.
  • पुरणपोळी-PURAN POLI साठी पुरण तयार करत असतांना प्रथम हरभरा डाळ स्वच्छ धुऊन घ्या.
  • एका कुकर मध्ये साधारण डाळीच्या तीन पट पाणी घालून डाळ शिजवून घ्या.तीन ते चार शिट्ट्या करून घ्या.तीन चार शिट्ट्या मध्ये डाळ छान शिजते.
  • तीन चार शिट्ट्या झाल्यावर ग्यास बंद करा.आता कुकर मध्ये असलेल्या वाफेवर डाळ पूर्ण शिजेल.कुकर गार झाल्यावर एका चाळणीत शिजलेली डाळ ओतून घ्या.
  • डाळीचे जास्तीचे पाणी निघून जाईल.डाळ गार करायला ठेवा.गाळलेले पाणी फेकू नये.या पाण्याला कट म्हणतात व ह्या पाण्याच्या आमटीला कटाची आमटी म्हणतात.
  • खान्देशात त्या पाण्याची काळी आमटी करतात. ह्या पाण्याची आमटी खूप छान होते.आमटी करायची नसेल तर कुठल्याही भाजीत ते पाणी वापरल्यास भाजीला चव छान येते.
  • पाणी फ्रीज मध्ये ठेवू शकतात.दोन तीन दिवस टिकते.
  • आता डाळ गार झाल्यावर डाळीत किसलेल्या गुळ मिक्स करा.गूळ मिक्स झाल्यावर डाळ व गूळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
  • वाटलेली डाळ पिठाच्या बारीक चाळणीने चाळून घ्या म्हणजे त्यात जर काही जाडसर भाग राहिला असेल तर तो निघून जाईल व सगळे पुरण एकसारखे होईल व पुरणपोळी-PURAN POLI फुटणार नाही.

पुरण पोळी-PURANPOLI कृती.

टिप्स.

खव्याची पोळी.

साहित्य.

कृती.

FAQs.

प्रश्न १ :- पुरणपोळी साठी कोणत्या डाळी वापरता येतात ?

उत्तर :- पुरणपोळी करताना पुरणपोळी साठी मुख्यतः हरभऱ्याची डाळ वापरली जाते परंतु काही जणांना हरभऱ्या डाळीचे पथ्य असल्यामुळे मुगाची किंवा तुरीची डाळ वापरली तरी चालते मुगाच्या डाळीचे पुरण थोडे चिकट होते म्हणून शिजवताना थोडी काळजी घ्यावी मुगाची डाळ कमी वेळेत शिजते म्हणून तिला काळजीपूर्वक शिजवावी.

प्रश्न २ :-  पुरणपोळी ही मैद्यापासून तयार केली जाते का ?

उत्तर :- पुरणपोळी ही साधारण गव्हाच्या पिठापासून तयार केले जाते. परंतु काही प्रकारच्या गव्हांपासून पुरणपोळी केली जात नाही. म्हणून गव्हाच्या पिठात थोडा मैदा घातला तर चालतो परंतु पूर्णपणे मैद्याची पुरणपोळी ही पचायला जड होते व त्रास होऊ शकतो.
 

प्रश्न ३ :- पुरणपोळी करताना पुरणपोळीतील पुरण बाहेर येऊन पोळी का फाटते ?

उत्तर :- पुरणपोळी करताना पुरण बाहेर येते कारण पुरण हे पूर्ण पणे कोरडे झालेले नसते. पुरणपोळी करताना पुरण कढईत घालून छान गरम करून त्यातले पाणी आटवून घ्यावे व पुरण पूर्णपणे कोरडे करून घ्यावे अशा पुरणाची पुरणपोळी फाटत नाही व चिकटतही नाही.

Exit mobile version