Site icon Ashlesha's Recipe

कोकणातील परंपरागत Solkadhi-सोलकढी बनवण्याचा गुपित फॉर्मुला

Solkadhi-सोलकढी कोकम फळाची साले काढून व वाळवून तयार झालेलेफळ म्हणजे आमसूल होय. आमसूल शरीराला थंड ठेवते.उन्हाळ्यात शरीरातून घामाच्या धारा वाहतात अशा कडक गर्मीत आमसुलाची सोलकढी-Solkadhi Kokum Curry हे पेय आपल्या शरीराला गारवा देतो. सोलकढी-Solkadhi Kokum Curry तशी तर गोव्यातील प्रसिध्द पेय आहे. गोव्यात प्रत्येक छोट्या मोठ्या हॉटेल्स रेस्टॉरंट मध्ये तुम्ही गेला असाल तर तिथे प्रत्येक फिश डिश सोबत किंवा नॉनव्हेजच्या प्रत्येक डिश सोबत सोलकढी दिली जाते.कारण गोव्यात कडक उन्हाळा व प्रचंड गर्मी असते.

Read More : Appe Recipe.

थोडे सोलकढी विषयी.

सोलकढी हे कोकण व गोव्यातील प्रसिद्ध लोकप्रिय पेय आहे. सोलकढी पाचक व थंड असल्यामुळे कोकण गोव्याच्या उष्ण हवामानात आहारात घेतली जाते.महाराष्ट्रात जेवणानंतर ताक घेतले जाते त्याप्रमाणे कोकण व गोव्यात रोजच्या आहारात किंवा मासे खाल्ल्यानंतर सोलकढी घेतली जाते.सोलकढी थोडी गोड आंबट स्वादाची असते. अशा उन्हाळ्यात फिश करी किंवा चिकन करीचा त्रास जाणवू नये व अन्नपचनाला त्रास होऊ नये म्हणून सोलकढी दिली जाते.सोलकढी ओला नारळ व आमसूल यापासून तयार केले जाते.नारळाच्या दुधात आमसुलाचा अर्क घालून अतिशय चविष्ट अशी सोलकढी तयार केली जाते.यामुळे सुंदर गुलाबी रंगाची सोलकढी शरीराला गारवा तर देतेस पण डोळ्यांनाही गारवा देते.उन्हाळ्यात पित्तापासून दूर ठेवते.सोलकढी कोकणातल्या आहारातला महत्त्वाचा भाग आहे.कोकण गोवा आणि सोलकढी समीकरण आहे. कोकण गोव्याला जाणारा प्रत्येक पर्यटक सोलकढीचा स्वाद घेतल्याशिवाय परत येतच नाही.सोलकढी ही बनवायला अतिशय सोपी आहे अगदी कमी वेळेत व कमी साहित्यात तयार करता येते.चला तर बघूया कशी बनवतात सोलकढी.

सोलकढी कशी बनवतात.

सोलकढी बनवताना मुख्यतः नारळाच्या दुधापासून बनवले जाते. सोलकढी बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळे पद्धत असू शकते.सोलकढी ही नारळ सोडून नारळाचे छोटे छोटे तुकडे करून त्यात आमसूल घालून घेतले जातात व त्यानंतर ओला नारळ व कोकम एकत्र मिक्सरमध्ये फिरवून फिरवले जाते. नारळ नको का मिक्सर मधून फिरवल्या नंतर ते मिश्रण चाळणीने चाळून घेतले जाते.असे दोन ते तीन वेळा केले जातील. जेणेकरून नारळाचं पूर्ण पणे दूध आपल्याला वापर करता येईल. ओल्या नारळाचा कोकम चा अर्क पूर्णपणे काढल्यावर चोथा फेकून दिला जातो. तयार झालेल्या सोलकढीला फोडणी देऊन आहारात घेतली जाते. दुसऱ्या प्रकारात नारळाचे दूध काढून घेतले जाते व आमसूल थोड्या पाण्यात भिजवून त्याचा अर्क काढला जातो. नंतर तो आमसुलाचा अर्क नारळाच्या दुधात मिक्स केला जातो. त्यानंतर सोड कडीला फोडणी दिली जाते. सोलकढी ही फोडणी देऊन किंवा फोडणी न देता अशा दोन्ही प्रकारात घेतली जाते. सोलकढीला फोडणीसाठी लसूण मिरचीचा वापर केला जातो.

साहित्य.

कृती.

सोलकढी-Solkadhi(Kokum Curry) फोडणीसाठी.

साहित्य.

कृती.

टिप्स.

आमसुलाचे औषधी गुणधर्म.

  • आयुर्वेदानुसार चिंचेपेक्षा आमसुलात जास्त औषधी गुणधर्म असतात. ते शरीरासाठी खूप उपयुक्त असतात.
  • आमसूल पाण्यात घालून त्याचा काढा करून घ्यावा. अपचनासाठी उत्तम उपयोगी असते पचनक्रिया बिघडली असताना म्हणजेच अतिसार किंवा संग्रहणी किंवा जुलाब व यामुळे पोट दुखते अशावेळी आमसूल भिजवून ते पाणी दिवसभर थोडे थोडे घेत राहावे लवकर बरे वाटते.
  • पित्त वाढलेले असताना अंगावर पित्ताच्या गाठी येतात.पूर्ण शरीरावर लाल पुरळ येते .अशावेळी आमसुलाचा पाण्यात भिजवून घ्यावे व मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी ती पेस्ट करून अंगावर लावून घ्यावे पूर्ण लगेच कमी होण्यास मदत होते.
  • पोटात कळ येऊन कधी कधी आव पडते.अशावेळी आमसुलाचे तेल घेऊन भातावर टाकून तो भात खावा लगेच बरे वाटते. बऱ्याच वेळा थंडीच्या दिवसात ओठांना ओठ कोरडे होतात व भेगा पडून काही वेळेस रक्त येते किंवा हिवाळ्यात पूर्ण शरीराची त्वचा कोरडी होऊन भेगा पडत असतील तर आमसुलाचे तेल गरम करून पूर्ण शरीरावर लावल्यास भेगा नाहीसा होतात.
  • आमसुलाचा आहारात नियमित वापर केल्यास जेवणाबद्दलच्या समस्या जसे की अरुची,आम्लपित्त,भूक मंद होणे,अपचन अशा समस्या दूर होत्यास मदत होते व आपले पचन सुधारते.
  • कोकम तेलाचा उपयोग अनेक प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो.
  • आमसुलाचा नियमित आहारात घेतल्यावर आतडे सक्षम होतात व आपले कार्य सुरळीत पार पाडतात.
  • काही व्यक्तींना शीत पित्ताचा त्रास होतो अशावेळी थोडे कोकम पाण्यात भिजत घालून कुस्करून घ्यावे व कोकम भिजवलेल्या पाण्याची जिरे पुड व साखर घालून थोडे थोडे दिवसभर घेत राहावे शरीरावर आलेले शीतपित्त दूर होते.
  • मुळव्याधीचा त्रास होत असेल तर त्यातून रक्त पडत असेल तर अशावेळी आमसूल पाण्यात भिजवून त्याची पेस्ट करावी व ती पेस्ट दह्याच्या निवळीत म्हणजेच दही लावले असताना त्यात जे पाणी निघते त्या पाण्यात मिक्स करून ती निवळी प्यावी रक्त पडणे थांबते.

Coconut Rice – कोकोनट राईस.

नारळ शरीरासाठी आरोग्यदायी असते म्हणून नारळ नेहमी आपल्या आहारात घ्यावे. नारळाच्या दुधापासून अनेक प्रकारचे पदार्थ केले जातात. नारळाच्या दुधाचे पदार्थ चवीला खूप छान होतात. असाच एक नारळाच्या दुधाचा पदार्थ आपण बघूया.नारळाच्या दुधात केलेला भात या भातात भाज्या घालून केला जातो म्हणून त्याला पुलाव म्हटले गेले आहे. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या व आपल्या आवडीच्या भाज्या घालून हा भात केला जातो व नारळाच्या दुधात शिजवला जातो. करायला अगदी सोपा असणारा हा पदार्थ चवीला खूप छान लागतो. हा दक्षिण भारतातील पदार्थ आहे .चला तर बघूया कसा करतात नारळाच्या दुधातला भात. आपल्या सर्वांनाच माहित आहे की भारतीय पौराणिक कथांमध्ये तसेच आपल्या परंपरांमध्ये नारळाचे किती महत्त्व आहे. नारळ हे एक पवित्र फळ मानले जाते.नारळ अनेक शुभकार्यात तसेच प्रत्येक पूजा विधीमध्ये अग्रभागी असते व अनेक वर्षापासून वापरले जाणारे एक महत्त्वाचा भाग आहे. नारळापासून अनेक प्रकारचे पदार्थही बनवले जातात. नारळात भरपूर अँटिऑक्सिडंट व अनेक पोषक तत्त्वांनी युक्त आहे. म्हणून नारळ आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले समजले जाते. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होते व अशक्त झाल्यासारखे जाणवते अशा वेळेस नारळाचे पाणी म्हणजे शहाळ्याचे पाणी पिण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो.

साहित्य.

कृती.

टीप.

ओले नारळ खाण्याचे फायदे.

  • शहाळ्याचे पाणी घेतल्यावर लगेचच बरे वाटते.तसेच तज्ञांच्या मतानुसार सकाळी उपाशीपोटी नारळाचे पाणी घेतले तर ते अमृता समान आहे असे मानले जाते.
  • नारळात भरपूर जीवनसत्व,खनिजे,कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने असतात. रोज सकाळी ओल्या खोबऱ्याचा तुकडा खाल्ला तर शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते तसेच स्मरणशक्ती वाढते.
  • असे म्हटले जाते की रात्री झोपण्यापूर्वी ओल्या नारळ खोबऱ्या नारळाचा तुकडा खाल्ल्याने आरोग्याला वरदान ठरू शकते .त्यामुळे झोप शांत लागण्यास मदत होते तसेच हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
  • ओले नारळ खाणे हा एक नैसर्गिक उपाय आहे. ओल्या नारळ खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. ओल्या नारळात उच्च दर्जाचे फायबर असते. केसांच्या वाढीसाठी नारळाचे तेल,नारळाचे दूध खूप फायदेशीर असते.
  • काही जणांना उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याचा त्रास होतो अशावेळी ओले खोबरे व काळ्या मनुका आणि खडीसाखर एकत्र करून खाल्ले तर त्रास कमी होतो.
  • काही व्यक्तींना अशक्तपणाचा त्रास होत असतो अशा व्यक्तींनी खडीसाखळी सोबत ओले खोबरे खाल्ल्यास अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.
  • ओले नारळ व गूळ खाल्ल्याने अंगातली कडकी जाऊन वजन वाढण्यास मदत होते.

FAQs.

प्रश्न 1:- सोलकढी हीबनवून ठेवता येते का ?

उत्तर :- नाही कारण सोलकढी मध्ये नारळाचे दूध वापरले जाते  नारळाचे दूध लगेच जास्त काळ राहिल्यास त्याला वास येतो व त्याचा स्वाद बदलतो नारळाच्या दुधाला वास लागू शकतो म्हणून सोलकढी ही आयत्या वेळेस करावी छान चव येते

प्रश्न 2:-सोलकढी जास्त आंबट झाली तर काय करावे ?

उत्तर :- सोलकडी जास्त आंबट झाली तर सोलकढी मध्ये थोडे घट्ट असलेले नारळाचे दूध घालावे सोलकटची चव छान होईल.

प्रश्न 3:- सोलकढी करताना बाजारात मिळणारे नारळाचे दूध वापरू शकतो का ?

उत्तर :- हो सोलकढी करताना  बाजारात मिळणारे नारळाचे दूध नक्की वापरू शकतात बाजारात मिळणारे नारळाचे दूध जास्त घट्ट असते त्यामुळे त्यात थोडे पाणी घालावे.

Exit mobile version