“Vada Pav-वडापाव: मुंबईचा खजिना, तुमच्या प्लेटवर!”

Vada Pav-वडा पाव म्हटलं तरी आठवण होती ती मुंबई-Mumbai शहराची. मुंबईचा Vada Pav-वडा पाव अगदी पूर्ण देशातच नाही तर परदेशात प्रसिद्ध झाला आहे.अगदी नेहमीच्या उकळलेल्या बटाट्याच्या भाजी पासून तयार केला जातो. साधा पदार्थ अगदी घरी तयार करता येणारा पदार्थ ,पण मुंबईत आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती मुंबईच्या Vada Pav-वडा पाव ची चव घेणारच.मुंबईत गालोगालीत Vada Pav-वडापाव ची हातगाडी बघायला मिळते. प्रत्येकाच्या खिशाला परवडणार हा पदार्थ.Vada Pav-वडापाव खाणारे अगदी गरीब श्रीमंत आपली ओळख विसरून वडापाव खाण्याचा आनंद घेतांना दिसतात.एकूण काय तर मुंबईतल्या वडापावने सगळ्यांना एकाच रांगेत आणले. पंचतारांकित हॉटेल मध्ये जेवणाऱ्या व्यक्तीला सुद्धा वडापावचा मोह टाळता येत नाही.असा हा Vada Pav-वडापाव १९६६ साला पासून तर आज पर्यंत आपल अस्तित्व अगदी दिमाखात टिकवून आहे.तर हा वडापाव कसा बनवायचा ते आपण बघूया.

Vada Pav-वडा पाव
Read More : Malai Kofta Recipe

थोडे Vada Pav-वडा पाव विषयी.

Vada Pav-वडा पाव म्हणजे उकडलेल्या बटाट्याच्या भाजी पासून वडा बनवून तेलात तळून तो मैद्यापासून बनवलेल्या पाव सोबत खाल्ला जातो.Vada Pav-वडा पाव हा महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थ आहे जो फास्ट फुड च्या वर्गात गणला जातो. Vada Pav-वडा पाव मध्ये उकडलेल्या बटाट्याच्या भाजीपासून बनवलेला वडा व तेलात तळून तो पाव सोबत खाल्ला जातो. मराठी माणूस खाण्याचे बाबतीत फारच चोखंदळ म्हटला जातो.कदाचित त्यामुळेच महाराष्ट्रात अगणित वेगवेगळे पदार्थ बनवले जातात व खाल्ले जातात. प्रत्येक भागात आपापले पदार्थ जम बसूवून आहेत.जसे प्रत्येक शंभर किलोमीटर अंतरावर भाषा बदलते,तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ बदलतात.कुठे तिखट जास्त खाल्ले जाते तर कुठे गोड खाल्ले जाते.कुठे मिसळ प्रसिद्ध आहे तर कुठे भेळ प्रसिद्ध आहे.काही ठिकाणी अनेक प्रकारच्या भाज्या प्रसिद्ध असतात.तसेचएकच भाजी वेगवेगळ्या प्रकारात वेगळ्या चवीची केली जाते. प्रत्येकाला आपल्या भागातील पदार्थ व चव जास्त आवडतात.पण तरीही प्रत्येकाला वेगवेगळ्या भागातल्या पदार्थांची चव घेणेही तितकेच आवडते. म्हणजेच जसे नागपूरला गेले की नागपूरची संत्रा बर्फी आवडीने खाल्ली जाते.तसेच पुण्याला गेल्यावर पुण्याचा चाट आवडीने खाल्ला जातो.तसेच मुंबईत Vada Pav-वडा पाव ही खूप प्रसिद्ध आहे. मुंबईत पूर्ण देशभरातले किंवा परदेशातले पदार्थ तयार केले जातात. प्रत्येक पदार्थ एकापेक्षा एक सरस असतात तरीसुद्धा मुंबईतील Vada Pav-वडा पाव च्या आकर्षण व खाण्याचा मोह कमी होत नाही.Vada Pav-वडा पाव पूर्ण मुंबईत शाळा,कॉलेज,बाहेर तसेच समुद्रकिनारी Vada Pav-वडा पाव ची ठेले लागलेले दिसतात. हॉटेलमध्ये कितीही छान पदार्थ असले तर मी मुंबईत गेलेल्या व्यक्तीला गाडीवरचा Vada Pav-वडा पाव खाल्ल्याशिवाय समाधान होत नाही. मुंबईत लोकांना जेवण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी वेळ नसतो.अशा वेळेस Vada Pav-वडा पाव खाऊन कामाला निघता येते. किंवा सोबतही घेऊन जाता येते.मुंबईत पोहे,इडली,डोसा, भेळ, पाणीपुरी सारखे अनेक पर्याय उपलब्ध असताना वडापावला जास्त मागणी व जास्त विक्री असते.वडा पाव साधारण सॉस सोबत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांसोबत खाल्ला जातो.जसे पुदिना चटणी,चिंचेची चटणी, कोथिंबीरची किंवा नारळाची चटणी,अशा चटण्यांसोबत खाल्ला जातो.तसेच तळलेल्या मिरची सोबतही आवडीने खाल्ला जातो. Vada Pav-वडा पाव मुंबईतील स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे तसेच मुंबईतील कामगार वर्गाची भूक कमी पैशात भागवणारा एक उत्तम पर्याय म्हणूनही त्याच्याकडे बघितले जाते.म्हणूनच मुंबई आठवली तरी आपल्याला समुद्र आठवतो तसाच समुद्र किनारी मिळणाऱ्या Vada Pav-वडा पाव ची सुद्धा आठवण येते. असे म्हणतात मुंबईत सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये Vada Pav-वडा पाव हा सर्वच सर्वोच्च स्थानी आहे.मुंबईला गेलेला प्रत्येक व्यक्तीला Vada Pav – वडा पाव खाण्याची इच्छा असते म्हणूनच म्हटले जाते की Vada Pav-वडा पाव खाल्ल्याशिवाय मुंबईची वारी पूर्ण होऊच शकत नाही.

Vada Pav-वडा पाव चा शोध.

‌Vada Pav-वडा पाव खाल्ला असेल तर खाताना नक्कीच विचार मनात येतात की सर्वात प्रथम Vada Pav-वडा पाव कोणी बनवला असेल.ही कल्पना कशी सुचली असेल.सर्वात प्रथम Vada Pav-वडा पाव 1966 सा ली दादर रेल्वे स्टेशनला स्टॉल लावून विकण्यात आला होता.असे म्हटले जाते की भारतात ब्रिटिश आले त्यावेळेस ते पावाचा वापर करून खूप पदार्थ खात होते. व त्याच कल्पनेतुन Vada Pav-वडा पाव चा शोध लागला आहे. म्हणजेच आपला बटाटेवडा व पाव याचा वापर करून Vada Pav-वडा पाव बनवण्यात आला. पुढे हाच Vada Pav-वडा पाव कमी पैशात हात मजूर व कामगार वर्गाची भूक भागवू लागला.

वडापाव कसा बनवतात.

‌वडा म्हणजे बटाटे उकडून साले काढून बटाट्याच्या फोडी करून त्यात आपले मसाल्याची फोडणी दिली जाते. त्या फोडणी दिलेल्या बटाट्याच्या भाजी पासून गोळे तयार केले जातात. त्या भाजीचे ते गोळे  डाळीच्या पिठात बुडवून घेतात व तेलात तळले जातात. तो तळलेला वडा पावांमध्ये ठेवून दिला जातो. तो पाव मध्यभागी कापून त्यात ठेवला जातो व चटणी सॉस किंवा तळलेली मिरची यासोबत दिला जातो व आवडीने खाल्ला जातो. पाव हा मैद्यापासून तयार केलेला बनपाव.हा बेकरीतूनही तयार आणला जातो.तसेच घरी बनवला जातो. घरी बनवणे जरा वेळ खाऊ ठरू शकते. म्हणून सहसा बेकरीतून मागवला जातो.

वडा पाव – Vada Pav साठी लागणारे साहित्य.

  • उकडलेले बटाटे – १/२ किलो (साधारण मध्यम आकाराचे ६ ते ७ बटाटे बसतात.)
  • हिरवी मिरची :- ६ ते ७ (आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात.)
  • दाळीच पीठ – १ मोठी वाटी.
  • लसून – ३ ते ४ पाकळ्या.
  • कढीपत्याचे पान – ५ ते ६.
  • लिंबू – १/२ लिंबाचा रस.
  • आमचूर पावडर – १ छोटा चमचा.
  • थोडी कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्यावी.
  • मोहरी – १/२ चमचा.
  • हळद – १/४ चमचा.
  • रवा – १ चमचा.
  • तांदळाचे पीठ – १ चमचा.
  • तेल – १/२ किलो.
  • पाव – १/२ डझन.

Vada Pav-वडा पाव

वडा पाव – Vada Pav बनवण्याची कृती.

  • वडा पाव – Vada Pav बनवण्यासाठी प्रथम उकडलेल्या बटाट्याचे साल काढून घ्यावी.
  • बटाटे चुरून घ्यावी किंवा अगदी बारीक फोडी केल्या तरी चालतात.
  • छोट्या कढाईत फोडणीसाठी तेल घालावे.तेल तापले कि प्रथम त्यात मोहरी घालावी.मोहोरी छान तडतडू द्यावी नाहीतर टी कच्ची राहते व कडवट लागते.नंतर कढीपत्ता टाकावा.
  • हिरवी मिरची,आले लसणाचे वाटण टाकावे व मंद आचेवर परतून घ्यावे त्यात हळद घालावी.
  • नंतर त्यात चुरलेले बटाटे घालावे व थोडे परतून घ्यावे.दोन मिनिटानंतर त्यात मीठ,कोथिंबीर घालावी गस बंद करावा.(बटाटे जास्त ओलसर असतील तर थोडा वेळ परतून घ्यावे.)

Vada Pav-वडा पाव

  • भाजी गार झाल्यावर सारख्या आकाराचे गोळे करून घ्यावे. साधारण ७ ते ८ गोळे होतील.आपल्या आवडी प्रमाणे लहान मोठे करावे.
  • नंतर एका खोल भांड्यात डाळीचे पीठ,तांदळाचे पीठ घ्यावे व थोडे थोडे करत पाणी घालावे.पिठात गोळे होणार नाही याची काळजी घ्यावी.त्यात एक चमचा रवा,थोडी हळद व चिमुटभर बकिंग सोडा घालावा.मिश्रण चांगले सरसरीत करा.

Vada Pav-वडा पाव

  • नंतर कढईत तेल गरम करायला ठेवा.तेल तापल्यावर भाजीचा एक गोळा घेऊन तो पिठाच्या मिश्रणात बुडवा. वडा थोडा चपटा हवा असेल तर गोळा हलक्या हाताने दाबून चपटा करून घ्या.
  • भाजीच्या गोळ्याला छान सगळ्या बाजूंनी मिश्रण लावून अगदी हलकेच तेलात सोडा व मंद ते मध्यम आचेवर तळून घ्या.वडा छान तळून झाल्यावर झार्याच्या साह्याने बाहेर काढा व लगेच टिशू पेपर वर ठेवा म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल.

  • पाव मध्यभागी सुरीच्या साह्याने कापून घ्या व त्यामध्ये वडा ठेवून गरम खायला द्या.वड्यासोबत तळलेली मिरची व शेंगदाण्याची चटणी चांगली लागते.

वडा पाव – Vada Pav बनवतांना काय काळजी घ्यावी.

  • वडा पाव – Vada Pav खुसखुशीत होण्यासाठी डाळीचे पीठ कोरडे भाजून घ्यावे.(आवडत असल्यास गरजेचे नाही.)
  • भाजतांना रंग बदलू देवू नये.मंद आचेवर जाड बुडाच्या पांमध्ये भाजावे.
  • पीठ भिजवतांना रवा घातल्याने वडे जास्त तेलकट होत नाही.
  • सोड्याचे प्रमाण जास्त नसावे जास्तीच्या सोड्यामुळे पदार्थ तेलकट होतो.
  • तांदळाचे पीठ घातल्याने वडा मऊ पडत नाही.
  • बटाटे जास्त शिजवू नये, नाहीतर भाजी सरसरीत होते व तळल्यावर जास्त तेलकट होते. तसे झालेच तर भाजी परतत असतांना थोडे पोहे किंचित ओले करून त्यात घालावे, म्हणजे भाजी थोडी कोरडी होईल.

शेंगदाण्याची चटणी कशी करावी.

  • प्रथम मध्यम आचेवर एका कढईत शेंगदाणे घालून भाजून घ्या.
  • शेंगदाणे दहा ते पंधरा मिनिटे भाजून घ्या भाजताना सतत हलवत रहा.
  • शेंगदाणे छान खरपूस भाजले गेले पाहिजे, शेंगदाणे भाजून झाल्यावर गॅस बंद करा.
  • शेंगदाणे एका डिश मध्ये काढून घ्या. शेंगदाणे थंड झाल्यावर हाताने साले काढून शेंगदाणे स्वच्छ करून घ्या.
  • एका मिक्सरच्या भांड्यात स्वच्छ केलेले शेंगदाणे, चार-पाच लसूण पाकळ्या, थोडे जिरे, चवीपुरते मीठ व चवीपुरते लाल तिखट घाला व मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्या.
  • ही चटणी थोडी जाडसर असली पाहिजे फार बारीक चटणी केली तर तिला ती चिकट होते.

तळलेल्या मिरच्या.

  • ४ ते ५ हिरव्या मिरच्या घ्यावा.मिरचीला मध्ये सुरीच्या साह्याने एक चीर द्यावी.
  • थोडा वेळ पाव चमचा मीठ लावून झाकून ठेवाव्यात.
  • मिरच्यांना मिठाचा ओले पणा आल्यावर मिरच्या गरम तेलात टाकाव्या व मिनिटभर झाकण ठेवावे.
  • मिरच्या जाळणार नाही याची काळजी घ्यावी.
  • मिरच्या तळून झाल्यावर मध्ये काढाव्यात व वडा पाव बरोबर सर्व्ह करा.
  • मिरच्या कुरकुरीत आवडत असतील तर टाळून झाल्यावर मीठ लावा.

टिप्स.

  • बटाटा वडा खूप गरम तेलात तळल्यावर तो आतून कच्चा राहतो आणि बाहेरून जास्त तळला जातो व जास्त गरम तेलात तळल्यावर तेल जास्त तेल शोषून घेतो म्हणून वडा तळताना तेल मध्यम गरम असावे.
  • बटाटे वडा तळताना डाळीच्या पिठात थोडा रवा घालावा म्हणजे तेल शोषले जात नाही.
  • वडा भरणे वडा भरण्यासाठी मुख्य घटक म्हणून उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे वापरा ते चांगले शिजवलेले आणि गुळगुळीत असले पाहिजे.
  • वडा पीठ, पाणी, हळद, लाल तिखट आणि मीठ वापरून थोडे घट्टसर पीठ तयार करा पिठात गाठी राहणार नाही याची काळजी घ्या गुळगुळी त असावे योग्य प्रमाणासाठी पाण्याचे प्रमाण जपून वापरा.
  •  वडा कुरकुरीत येण्यासाठी वड्याच्या पिठाची मुठभर बेकिंग पावडर घालू शकतात.
  • वडे तळणे वडे तळण्यासाठी तेल मध्यम आचेवर गरम करावे वडा डाळीच्या पिठात एक सारखा बुडवला गेला पाहिजे.
  • पिठात बुडवलेला वडा गरम तेलात हळुवारपणे टाका आणि सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळा तळलेले वडे तेलातून काढून टाका आणि जास्तीचे तेल शोषून घेण्यासाठी टिशू पेपरवर ठेवा.
  • पाव मऊ आणि किंचित टोस्ट केलेला असावा तुम्ही पाववर  हलके बटर लावू शकतात आणि तळल्यावर किंवा तव्यावर ते पृष्ठभागावर किंचित कुरकुरीत होईपर्यंत टोस्ट करू शकता.
  • पाव गरम केल्यावर त्याला चटणी लावून वडापाव एकत्र करणे.
  • पाव तीन बाजूने सुरीच्या साह्याने कापून घ्या एक बाजू जोडलेली असू द्यावी.
  • पावाच्या आतील बाजूस भरपूर प्रमाणात मसालेदार हिरवी चटणी आणि गोड चिंचेची चटणी लावा.
  • तळलेला वडापावच्या आत ठेवा आणि हळुवारपणे बंद करा सर्व साहित्य एकत्र ठेवण्यासाठी थोडासा वरून दाब द्या.

FAQs.

प्रश्न १ :- वडापाव चा शोध कोणी लावला ?

उत्तर :- वडापाव चा शोध हा 1966 साली दादर रेल्वे स्टेशनला अशोक वैद्य या नावाच्या गृहस्थाने स्टॉल चालू केला. होता व मुंबईतील गिरणी कामगारांना अगदी कमी किमतीत उदरनिर्वाह यासाठी सुरू केलेला होता.

प्रश्न २ :- वडापाव तयार करताना वडा जास्त तेलकट होऊ नये यासाठी काय करावे ?

उत्तर :- वडापाव तयार करताना वडा जास्त तेलकट होऊ नये यासाठी वड्याच्या पिठात थोडा रवा किंवा थोडे तांदळाचे पीठ घालावे. त्यामुळे वडा कुरकुरीत ही होतो आणि कमी तेल शोषून घेतो. तसेच वडा तळून झाल्यावर लगेचच टिशू पेपरवर ठेवला की त्यातील जास्तीचे तेल निघून जाण्यास मदत होते.

Leave a comment