Site icon Ashlesha's Recipe

“Vada Pav-वडापाव: मुंबईचा खजिना, तुमच्या प्लेटवर!”

Vada Pav-वडा पाव म्हटलं तरी आठवण होती ती मुंबई-Mumbai शहराची. मुंबईचा Vada Pav-वडा पाव अगदी पूर्ण देशातच नाही तर परदेशात प्रसिद्ध झाला आहे.अगदी नेहमीच्या उकळलेल्या बटाट्याच्या भाजी पासून तयार केला जातो. साधा पदार्थ अगदी घरी तयार करता येणारा पदार्थ ,पण मुंबईत आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती मुंबईच्या Vada Pav-वडा पाव ची चव घेणारच.मुंबईत गालोगालीत Vada Pav-वडापाव ची हातगाडी बघायला मिळते. प्रत्येकाच्या खिशाला परवडणार हा पदार्थ.Vada Pav-वडापाव खाणारे अगदी गरीब श्रीमंत आपली ओळख विसरून वडापाव खाण्याचा आनंद घेतांना दिसतात.एकूण काय तर मुंबईतल्या वडापावने सगळ्यांना एकाच रांगेत आणले. पंचतारांकित हॉटेल मध्ये जेवणाऱ्या व्यक्तीला सुद्धा वडापावचा मोह टाळता येत नाही.असा हा Vada Pav-वडापाव १९६६ साला पासून तर आज पर्यंत आपल अस्तित्व अगदी दिमाखात टिकवून आहे.तर हा वडापाव कसा बनवायचा ते आपण बघूया.

Read More : Malai Kofta Recipe

थोडे Vada Pav-वडा पाव विषयी.

Vada Pav-वडा पाव म्हणजे उकडलेल्या बटाट्याच्या भाजी पासून वडा बनवून तेलात तळून तो मैद्यापासून बनवलेल्या पाव सोबत खाल्ला जातो.Vada Pav-वडा पाव हा महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थ आहे जो फास्ट फुड च्या वर्गात गणला जातो. Vada Pav-वडा पाव मध्ये उकडलेल्या बटाट्याच्या भाजीपासून बनवलेला वडा व तेलात तळून तो पाव सोबत खाल्ला जातो. मराठी माणूस खाण्याचे बाबतीत फारच चोखंदळ म्हटला जातो.कदाचित त्यामुळेच महाराष्ट्रात अगणित वेगवेगळे पदार्थ बनवले जातात व खाल्ले जातात. प्रत्येक भागात आपापले पदार्थ जम बसूवून आहेत.जसे प्रत्येक शंभर किलोमीटर अंतरावर भाषा बदलते,तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ बदलतात.कुठे तिखट जास्त खाल्ले जाते तर कुठे गोड खाल्ले जाते.कुठे मिसळ प्रसिद्ध आहे तर कुठे भेळ प्रसिद्ध आहे.काही ठिकाणी अनेक प्रकारच्या भाज्या प्रसिद्ध असतात.तसेचएकच भाजी वेगवेगळ्या प्रकारात वेगळ्या चवीची केली जाते. प्रत्येकाला आपल्या भागातील पदार्थ व चव जास्त आवडतात.पण तरीही प्रत्येकाला वेगवेगळ्या भागातल्या पदार्थांची चव घेणेही तितकेच आवडते. म्हणजेच जसे नागपूरला गेले की नागपूरची संत्रा बर्फी आवडीने खाल्ली जाते.तसेच पुण्याला गेल्यावर पुण्याचा चाट आवडीने खाल्ला जातो.तसेच मुंबईत Vada Pav-वडा पाव ही खूप प्रसिद्ध आहे. मुंबईत पूर्ण देशभरातले किंवा परदेशातले पदार्थ तयार केले जातात. प्रत्येक पदार्थ एकापेक्षा एक सरस असतात तरीसुद्धा मुंबईतील Vada Pav-वडा पाव च्या आकर्षण व खाण्याचा मोह कमी होत नाही.Vada Pav-वडा पाव पूर्ण मुंबईत शाळा,कॉलेज,बाहेर तसेच समुद्रकिनारी Vada Pav-वडा पाव ची ठेले लागलेले दिसतात. हॉटेलमध्ये कितीही छान पदार्थ असले तर मी मुंबईत गेलेल्या व्यक्तीला गाडीवरचा Vada Pav-वडा पाव खाल्ल्याशिवाय समाधान होत नाही. मुंबईत लोकांना जेवण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी वेळ नसतो.अशा वेळेस Vada Pav-वडा पाव खाऊन कामाला निघता येते. किंवा सोबतही घेऊन जाता येते.मुंबईत पोहे,इडली,डोसा, भेळ, पाणीपुरी सारखे अनेक पर्याय उपलब्ध असताना वडापावला जास्त मागणी व जास्त विक्री असते.वडा पाव साधारण सॉस सोबत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांसोबत खाल्ला जातो.जसे पुदिना चटणी,चिंचेची चटणी, कोथिंबीरची किंवा नारळाची चटणी,अशा चटण्यांसोबत खाल्ला जातो.तसेच तळलेल्या मिरची सोबतही आवडीने खाल्ला जातो. Vada Pav-वडा पाव मुंबईतील स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे तसेच मुंबईतील कामगार वर्गाची भूक कमी पैशात भागवणारा एक उत्तम पर्याय म्हणूनही त्याच्याकडे बघितले जाते.म्हणूनच मुंबई आठवली तरी आपल्याला समुद्र आठवतो तसाच समुद्र किनारी मिळणाऱ्या Vada Pav-वडा पाव ची सुद्धा आठवण येते. असे म्हणतात मुंबईत सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये Vada Pav-वडा पाव हा सर्वच सर्वोच्च स्थानी आहे.मुंबईला गेलेला प्रत्येक व्यक्तीला Vada Pav – वडा पाव खाण्याची इच्छा असते म्हणूनच म्हटले जाते की Vada Pav-वडा पाव खाल्ल्याशिवाय मुंबईची वारी पूर्ण होऊच शकत नाही.

Vada Pav-वडा पाव चा शोध.

‌Vada Pav-वडा पाव खाल्ला असेल तर खाताना नक्कीच विचार मनात येतात की सर्वात प्रथम Vada Pav-वडा पाव कोणी बनवला असेल.ही कल्पना कशी सुचली असेल.सर्वात प्रथम Vada Pav-वडा पाव 1966 सा ली दादर रेल्वे स्टेशनला स्टॉल लावून विकण्यात आला होता.असे म्हटले जाते की भारतात ब्रिटिश आले त्यावेळेस ते पावाचा वापर करून खूप पदार्थ खात होते. व त्याच कल्पनेतुन Vada Pav-वडा पाव चा शोध लागला आहे. म्हणजेच आपला बटाटेवडा व पाव याचा वापर करून Vada Pav-वडा पाव बनवण्यात आला. पुढे हाच Vada Pav-वडा पाव कमी पैशात हात मजूर व कामगार वर्गाची भूक भागवू लागला.

वडापाव कसा बनवतात.

‌वडा म्हणजे बटाटे उकडून साले काढून बटाट्याच्या फोडी करून त्यात आपले मसाल्याची फोडणी दिली जाते. त्या फोडणी दिलेल्या बटाट्याच्या भाजी पासून गोळे तयार केले जातात. त्या भाजीचे ते गोळे  डाळीच्या पिठात बुडवून घेतात व तेलात तळले जातात. तो तळलेला वडा पावांमध्ये ठेवून दिला जातो. तो पाव मध्यभागी कापून त्यात ठेवला जातो व चटणी सॉस किंवा तळलेली मिरची यासोबत दिला जातो व आवडीने खाल्ला जातो. पाव हा मैद्यापासून तयार केलेला बनपाव.हा बेकरीतूनही तयार आणला जातो.तसेच घरी बनवला जातो. घरी बनवणे जरा वेळ खाऊ ठरू शकते. म्हणून सहसा बेकरीतून मागवला जातो.

वडा पाव – Vada Pav साठी लागणारे साहित्य.

वडा पाव – Vada Pav बनवण्याची कृती.

वडा पाव – Vada Pav बनवतांना काय काळजी घ्यावी.

शेंगदाण्याची चटणी कशी करावी.

तळलेल्या मिरच्या.

टिप्स.

FAQs.

प्रश्न १ :- वडापाव चा शोध कोणी लावला ?

उत्तर :- वडापाव चा शोध हा 1966 साली दादर रेल्वे स्टेशनला अशोक वैद्य या नावाच्या गृहस्थाने स्टॉल चालू केला. होता व मुंबईतील गिरणी कामगारांना अगदी कमी किमतीत उदरनिर्वाह यासाठी सुरू केलेला होता.

प्रश्न २ :- वडापाव तयार करताना वडा जास्त तेलकट होऊ नये यासाठी काय करावे ?

उत्तर :- वडापाव तयार करताना वडा जास्त तेलकट होऊ नये यासाठी वड्याच्या पिठात थोडा रवा किंवा थोडे तांदळाचे पीठ घालावे. त्यामुळे वडा कुरकुरीत ही होतो आणि कमी तेल शोषून घेतो. तसेच वडा तळून झाल्यावर लगेचच टिशू पेपरवर ठेवला की त्यातील जास्तीचे तेल निघून जाण्यास मदत होते.

Exit mobile version