“भारतीय तडका आणि चायनीज चव: Veg Manchurian-व्हेज मंचूरियनची खास रेसिपी”

Veg Manchurian-व्हेज मंचूरियन हा एक मिश्र भाज्यांनी युक्त असा चविष्ट पदार्थ आहे. चानयनीज Veg Manchurian-व्हेज मंचूरियन असे नाव असले तरी हा पदार्थ पूर्णपणे भारतीय भाज्या व मसाल्यांपासून तयार केलेला आहे. रोज रोज सारखेच खाण्याचा लहान मुले कंटाळा करतात. अशा वेळेस नेहमीच्याच भाज्यांनी हा पदार्थ तयार करता येतात. कोबी, सिमला मिरची, गाजर व कांद्याची पात, आले, लसुण या नेहमीच्याच भाज्या फक्त त्यात सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, असे पदार्थ घालून जरा वेगळी व चविष्ट असा Veg Manchurian-व्हेज मंचूरियन पदार्थ तयार केला जातो. मदतीला कॉर्नफ्लॉवर, मैदा, तांदळाचे पीठ घेऊन कधी कोरडा तर कधी थोडासा ओलसर प्रकारात करतात. नेहमीचाच भाज्या पण ह्या सॉस सोबत एकदम वेगळी चव देतात. भाज्या मुळे ह्या पदार्थाची पौष्टिकताही वाढते व मुले आवडीने खातात. मुलीच काय पण मोठ्यानाही हा पदार्थ आवडतो. मंचुरियन हे नॉनव्हेज प्रकारत ही केले जातातव आवडीने खाल्ले जातात. तसेच मशरूम, बेबी कॉर्न वापरले जाते अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या भाज्यांपासून हा पदार्थ तयार केला जातो. बाहेरचे मंचुरियन खाताना थोडा आरोग्याविषयी काळजी वाटते. कारण मंचुरियन करताना प्रामुख्याने तळलेले असल्यामुळे ते तेल कोणत्या प्रतीचे आहे अशी शंका येते. म्हणून मंचुरियन घरीच केलेले केव्हाही उत्तमच असते. घरी केलेली मंचुरियन उत्तम होऊ शकते.

Veg Manchurian Recipe
Read More : Patra Alu Vadi Recipe.

थोडे Veg Manchurian-व्हेज मंचूरियन विषयी.

Veg Manchurian-व्हेज मंचूरियन हे मसालेदार गोड थोडे तिखट चटणी मध्ये स्वादा तिखट चटणी अशा स्वादाचे तेलात तळलेले भाज्यांच्या मिश्रणाचे एक प्रकारचे वडे आहेत जे एका विशिष्ट ग्रेव्हीत घालून त्यांचा स्वाद वाढवला जातो. Veg Manchurian-व्हेज मंचूरियन ही एक भारतीय चायनीज पदार्थ आहे. Veg Manchurian-व्हेज मंचूरियन साठी ग्रेव्ही म्हणजे एक प्रकारचे सॉस किंवा थोडी पातळ अशी ग्रेव्ही बनवली जाते. ज्या ग्रेव्ही भाज्यांच्या मिश्रणाचे वडे म्हणजेच मंचुरियन बॉल्स घातले जातात. या ग्रेव्हीत वेगवेगळी सॉस म्हणजेच टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस यांचे मिश्रण घालून केली जाते. त्यामुळे तिची चव वाढवली जाते. हे सुद्धा एक प्रकारचे मिक्स सॉस आहे. व्हेज मंचुरियन हे सर्व सर्वात प्रथम कलकत्ता शहरात राहणाऱ्या चिनी लोकांनी केले असे म्हटले जाते व्हेज मंचुरियन ही डिश चायनीज असली तरी ती पूर्णपणे भारतीय भाज्या व भारतीय मसाले घालून केलेली आहे चिनी लोक हे भातासोबत खाणे पसंत करतात व्हेज मंचुरियन हे एक चायनीज डिश म्हणून ओळखली जाते व्हेज मंचुरियन मध्ये पत्ता कोबी सिमला मिरची कांद्याची पात अशा भारतीय भाज्या घालून केली जाते स्वादासाठी व्हेज मंचुरियन मध्ये आले लसूण वेगळी श्वास घातले जातात व्हेज मंचुरियन तिला तळून टाकून खाल्ले जातात व्हेज मंचुरियन मध्ये चटपटीतपणा येण्यासाठी मिरे सोया सॉस अजिनोमोटो यासारखे पदार्थ घालून भाज्यांचे बॉल्स के तळले जातात मंचुरियन दोन प्रकारात केले जातात एक म्हणजे कोरडे व्हेज मंचुरियन म्हणजे हे मंचुरियन फक्त भाज्या मैदा व मसाले सॉस घालून तळले जातात व कोरडे सोबत खाल्ले जातात ओले व्हेज मंचुरियन म्हणजे तळून एक विशिष्ट प्रकारच्या ग्रेवीत घालून खाल्ले जातात थोडा मैदा व थोड्या भाज्या घातल्या जातात चिनी रेस्टॉरंट मध्ये प्रथम केले गेले 1975 साली मुंबईमध्ये क्रिकेट क्लबच्या एका स्वयंपाक घरात एका आचार्याने केले त्याला घरात असतील त्या भाज्यांपासून एक डिश बनवायला सांगितल्यात आले होते तर त्या आचार्याने घरात असलेल्या भाज्यांमधूनच व्हेज मंचुरियन बॉल्स केले बनवले गेले असा उल्लेख केलेला आढळतो या पदार्थात भारतीय मसाले म्हणजे आले लसूण गरम मसाला ऐवजी टाकून केल्याचे आढळते व्हेज मंचुरियन मांसाहारातही केले जातात म्हणजेच आपल्या आवडीच्या व सहज उपलब्ध असणाऱ्या भाज्यांपासून केले जातात व्हेज मंचुरियन कसे बनवतात व्हेज मंचुरियन बनवताना सहज उपलब्ध होणाऱ्या भाज्या वापरल्या जातात जसे पत्ता कोबी कांद्याचे पान सिमला मिरची किंवा घरात असलेल्या कुठल्याही भाज्या घेतल्या जातात भाज्या दोन बारीक चिरून घेतात नंतर चिरलेल्या भाज्यांमध्ये थोडा मैदा थोडे कॉर्न स्टार्च व चवीसाठी अजिनोमोटो म्हणजेच याला सोप्या भाषेत चायनीज मीठ म्हटले जाते हे घातले जाते यामुळे मंचुरियन ला चटपटीत स्वाद येतो त्यानंतर आले लसूण घातले जाते हे सर्व मिश्रण तयार करून त्याचे छोटे छोटे आकाराचे गोळे तयार करून घेतले जातात तयार केलेले गोळे तेलात टाकून मंचुरियन सोनेरी रंगावर तळले जातात हे मंचुरियन छान कुरकुरीत तळले जातात कोरडे मंचूरियन हे सॉस सोबत खाल्ले जातात हॉटेल रेस्टॉरंट मध्ये ड्राय मंचुरियन हे स्टार्टरच्या स्वरूपात दिले जातात नंतर तळलेले मंचुरियन साठी ग्रेव्ही तयार केली जाते एका भांड्यात थोडे पाणी घेऊन त्यात थोडे कॉम्प्लोअर घातले जाते त्यात रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस चवीसाठी मीठ असेच थोडे आले लसूण पेस्ट घातली जाते व आपल्या गरजेप्रमाणे घट्टपणा येईल इतके पाणी घालून उकळी आणले जाते व तयार केलेल्या ग्रेवी तळलेले मंचुरियन बॉल्स टाकून खाल्ले जातात टीप वीज मंचुरियन साठी श्वास वापरताना घरी बनवलेले किंवा उत्तम दर्जाचे वापरावे टोमॅटो केचप किंवा सॉस हे चांगल्या दर्जाच्या मैदा ऐवजी तांदळाचे पीठ वापरू शकतात आरोग्याच्या दृष्टीने अजिनोमोटो वापरण्यावर शंका घेतले जाते पण स्वादासाठी व्हेज मंचुरियन मध्ये पाव चमचा अजिनोमोटो वापरू शकतात व्हेज मंचुरियन बॉल्स मध्ये मिक्स करूनही खाऊ शकतात मंचुरियन हे पनीर मंचुरियन किंवा मशरूम मंचुरियन असेही प्रकारातही केले जातात.

Gobi Manchurian – कोबी मंचुरियनसाठी वापरले जाणारे घटक.

  • कांद्याची पात :- व्हेज मंचुरियन मध्ये कांद्याची पात आवर्जून घातली जाते. कांद्याच्या पातीमुळे मंचुरियन ला विशिष्ट चव येते. कांद्याची पात आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असते असे म्हटले जाते. कांद्याच्या पातीत अनेक पौष्टिक तत्त्वे असतात. कांद्याच्या पातीमध्ये कार्बोहायड्रेट्स विटामिन C, प्रोटीन, फॉस्फरस, सल्फर आणि कॅल्शियम असते. त्याचप्रमाणे कांद्याची पात खाल्ल्याने तोंडाचे दुर्गंधी दूर होते. कांद्याची पात खाल्ल्याने तुमचे दृष्टी वाढते आणि मोती बिंदूची लक्षणे कमी होतात. कांद्याची पात खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो तसेच हृदयरोगामध्ये रोगांमध्ये खूप उपयुक्त मानले जाते. कांद्याच्या पातीमुळे आपल्या फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच रक्तातील साखरेची पातळी कमी करते कांद्याची पात आतड्यांच्या कर्करोगापासून मुक्त करण्यास उपयुक्त ठरते. कांद्याच्या पातीत सल्फर संयोग शरीरात इन्सुलिन तयार करण्याचे क्षमता वाढवतात त्यामुळेच रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते व आपल्या मधुमेह रोखण्यासाठी बऱ्याच प्रमाणात प्रभावी ठरते. कांद्याच्या पाती मध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते जे पचन सुधारण्यास मदत करते.
  • पत्ता कोबी :- पत्ता कोबी ही वर्षभर सहज उपलब्ध होणारी भाजी आहे. हॉटेलवर रेस्टॉरंट मध्ये बऱ्याच वेळा सॅलडच्या स्वरूपात कच्ची पत्ता कोणी दिली जाते. तसेच भाजी ब्रेड सँडविच किंवा सॅलरी इत्यादींसाठी पत्ता कमी वापरले जाते. पत्ताकोबीमुळे या पदार्थांची चव वाढवतात. पत्ताकोबीमध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. म्हणूनच आपले शारीरिक रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. तसेच शरीरातील लोह शोषले जाण्याची क्रिया ही सुरळीत पार पडते. तसेच कोबी मधील फायबर आणि प्लांट भरपूर असल्याने कोबी खाल्ल्यास पचनास मदत होते व त्यामुळेच आपल्या शरीरातील चांगल्या बॅक्टेरिया ची वाढ सुरळीत व योग्य प्रमाणात होण्यास मदत होते. तसेच लाल रंगाची कोबी पोटॅशियमचा चांगला पुरवठा करते. ही कोबी खाल्ल्याने उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
  • सिमला मिरची :- सिमला मिरची मध्ये जीवनसत्व व खनिजे असतात .सिमला मिरची मध्ये जीवनसत्व A, जीवनसत्व B6, जीवनसत्व C, जीवनसत्व E आणि जीवनसत्व K1 असतात. शिमला मिरची अशक्तपणा सारखे समस्यांपासून आपल्याला बचाव करते. सिमला मिरची चायनीज पदार्थांमध्ये अजून घातले जाते. चायनीज पदार्थाला चायनीज पदार्थ शिमला मिरचीचं वाढवण्याचे काम करते. शिमला मिरची खाल्ल्याने तिच्या औषधीयुक्त गुणधर्मामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद होत नाही. असे तज्ञ यांचे मत आहे. कारण सिमला मिरची मध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप कमी असते.सिमला मिरची नेहमी आहारात घेतल्याने आपल्या त्वचेचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते .
  • आले :- आले हे पाचक म्हणून प्रत्येक पदार्थात वापरले जाते. आले व लिंबू रस जेवणापूर्वी घेतल्याने अरुची वर फायदा होतो. आले व पुदिन्याचा रस थोडे सेंधव मीठ घालून घेतल्यास पोटदुखी बरी होते.
  • लसूण :- लसूण आपल्या भारतीय आहार संस्कृतीतील एक महत्त्वाचा घटक आहे. लसणामध्ये जीवनसत्व बी सिक्स, जीवनसत्व सी, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम सारखे जीवनसत्वे आहेत. त्यामुळे आपल्या शारीरिक समस्यांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. लसून खाण्यामुळे कोलेस्ट्रॉल हे कमी होते.

Veg Manchurian Recipe

साहित्य.

  • किसलेला पत्ता कोबी अर्धी वाटी.
  • किसलेले गाजर अर्धी वाटी.
  • कापलेली कांद्याची पात पाव वाटी.
  • मैदा पाव वाटी.
  • मिरीपूड अर्धा चमचा.
  • मीठ चवीनुसार.
  • बारीक चिरलेला लसूण दहा ते बारा पाकळ्या.
  • आले एक इंच तुकडा.
  • हिरव्या मिरच्या दोन-तीन बारीक चिरून.
  • सोया सॉस दोन ते तीन चमचे.
  • रेड चिली सॉस दोन ते तीन चमचे.
  • लाल तिखट आवडीनुसार.

कृती.

  • Veg Manchurian-व्हेज मंचूरियन करण्यासाठी प्रथम सर्व भाज्या स्वच्छ धुऊन घ्याव्या.
  • सर्व भाज्या धुवून झाल्यावर शक्य तेवढ्या कोरड्या करून घ्याव्या.म्हणजे भाज्यांचे पाणी पूर्णपणे निथळून जाईल व Veg Manchurian-व्हेज मंचूरियन बनवण्या साठी मिश्रण करताना मिश्रण फार पातळ होणार नाही.
  • मिश्रण पातळ झाले तर मैदा जास्त टाकला जातो .त्यामुळे Veg Manchurian-व्हेज मंचूरियन ची चव बिघडू शकते. प्रमाणापेक्षा जास्त मैदा लागणार नाही.याची काळजी घ्यावी.
  • आता धुवून घेतलेल्या सर्व भाज्या चिरून घ्या.पत्ता कोबी एकदम बारीक व उभा चिरावा. किंवा पत्ता कोबी किसून घ्यावा गजर हि किसून घ्यावे.
  • कांद्याची पात बारीक चिरावी. सिमला मिरची किसून घ्यावी म्हणजे मिश्रणात छान मिक्स होते.
  • आता एका भांड्यात सर्व चिरलेल्या भाज्या एकत्र करून घ्या. कोबी, गाजर, शिमला मिरची, कांद्याची पात.
  • आता एकत्र केलेल्या भाज्यांमध्ये लाल तिखट, नंतर त्यात थोडा मैदा, थोडे कॉर्न फ्लोअर थोडं किसलेले आले घाला.
  • आता चवीनुसार मीठ घाला. चिरलेली मिरची घाला, लाल तिखट घाला व आले लसून पेस्ट घाला किवा आले व लसून बारीक चिरून घातले तरी चालते मिरे पूड घाला.
  • आता सर्व साहित्य एकत्र करा. सर्व साहित्य छान मिक्स करून घ्या. Veg Manchurian-व्हेज मंचूरियन मध्ये आले लसून व मिरे पुड ची खास महत्व असते.
  • Veg Manchurian-व्हेज मंचूरियन मध्ये कॉर्न फ्लोअर किंवा मैदा कमी जास्त लागू शकतो. मिश्रणात चे गोळे तयार होतील इतपत घट्ट करा.
  • मिश्रण फार पातळ नको नाहीतर मंचुरियन बॉल्स जास्त तेल शोषून घेतात. मिश्रण तयार करताना पाण्याचा वापर सांभाळूनच करा.
  • मिश्रण तयार झाल्यावर लगेच लहान लहान गोळे तयार करून घ्या.गोळे तयार झाल्यावर कढईत तेल गरम करून घ्यावे.तेल चांगले तापले की मध्यम आचेवर गोळे तळून घ्या. गोळे छान सोनेरी रंगावर तळावे छान खरपूस होतात. सर्व गोळे तळून एका ताटात काढून घ्यावे.

ग्रेव्ही.

  • Veg Manchurian-व्हेज मंचूरियन च्या ग्रेव्ही साठी एकाकडे एका कढईत थोडे तेल घ्या.तेल मंद आचेवर तापत ठेवा.
  • तेल तापले कि त्या तेलात कापलेला लसूण, कापलेल्या हिरव्या मिरच्या, किसलेले आले घालावे.
  • आता दीड कप पाणी घेऊन त्यात चमचाभर कॉर्नफ्लॉवर व चमचाभर मैदा घालून मिक्स करून घ्यावा.
  • गाठी होणार नाही याची काळजी घ्यावी.नंतर त्यात दोन चमचे सोया सॉस, दोन चमचे रेड चिली सॉस, चिमुट भर साखर व चवीप्रमाणे मीठ घालून घ्यावे.
  • आता या मिश्रणात थोडा कापलेला कोबी, थोडी कापलेली कांद्याची पात, घालावी. हे मिश्रण मोठ्या आचेवर शिजवून घ्यावे, शिजवताना मिश्रण ढवळत राहावे.
  • मिश्रण उकळले की गॅस बंद करावा. आयत्यावेळेस मंचुरियन बॉल्स या मिश्रणात टाकून खायला द्यावे.
  • मंचुरियन बॉल्स खूप वेळ ग्रेव्हीत टाकून ठेवू नये, नाहीतर ते मऊ पडतात.

FAQs.

प्रश्न १ :- Veg Manchurian-व्हेज मंचूरियन बॉल्स कुरकुरीत कसे करावे ?

उत्तर :- Veg Manchurian-व्हेज मंचूरियन कुरकुरीत होण्यासाठी प्रथम भाज्यांचे पाणी पूर्णपणे निथळून घ्यावे व त्यात मैदा व कॉर्नफ्लोर घालावे. मिश्रण घट्ट असावे व मंचुरियन बॉल्स कुरकुरीत येण्यासाठी त्यात थोडा बेकिंग सोडा घालावा. मंचुरियन बॉल्स होण्यासाठी ते  मंद आचेवर तळावे.

प्रश्न २ :- Veg Manchurian-व्हेज मंचूरियन करताना मंचुरियन मध्ये अजिनोमोटो घालावे का ?

उत्तर :- Veg Manchurian-व्हेज मंचूरियन करताना अजिनोमोटो घालण्यास काही हरकत नाही. परंतु तज्ञांच्या मते आरोग्याच्या दृष्टीने ते योग्य मानले जात नसल्यामुळे काही ठिकाणी घालत नाही. त्याच्याने कोबी मंचुरियन ला चव येते त्यामुळे योग्य प्रमाणात घातले तर काही हरकत नाही

प्रश्न ३ :- मंचुरियन हे नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारात बनवता येते का ?

उत्तर :- खरे तर मंचुरियन हा पदार्थ नॉनव्हेज ह्याच प्रकारात होता. परंतु आपल्या भारतीय संस्कृतीनुसार तो शाकाहारी प्रकारात उपलब्ध असलेल्या भाज्या वापरून  बनवला गेला.

Leave a comment