Chhole-छोले आहे एक पंजाबी पदार्थ आहे ज्यात कांदा, टोमॅटो आणि जिरे, आले, लसूण घालून बनवली जाते. असेच छोल्यां पासून वेगवेगळे तयार होणारे पदार्थ. Chhole-छोले हे पंजाबी लोकांचा आवडता व लोकप्रिय मेनू असला तरीही तो संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. Chhole-छोले भटूरे हे तर सगळ्यांचे आवडते जेवण. छोले म्हणजे मोठ्या आकारातले हरभरे व हरभऱ्या इतकेच पौष्टिक. छोल्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. छोल्यां मध्ये भरपूर प्रमाणात अमायनो ऍसिड असतात ज्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते व आपले आरोग्य उत्तम राहते. छोल्यांमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन, मिनरल्स व तसेच भरपूर फायबरही असतात.
Chhole-छोले विषयी.
Chhole-छोले म्हटलं की आठवते ते पंजाब ची माणसे, पंजाबचे जेवण व त्या लोकांच्या आवडीच्या डिश म्हणजे Chhole-छोले. छोला मसाला याला चना मसाला असे म्हणतात. छोले म्हणजे पांढऱ्या रंगाचे थोड्या मोठ्या आकाराचे हरभऱ्या सारखे असतात.सर्वात प्रथम छोला मसाला तयार करताना सर्वात प्रथम सात ते आठ तास पाण्यात भिजल्यावरच त्याचा वापर करता येतो.छोला मसाला हा कांदा टोमॅटो वाले लसूण व आपले घरगुती मसाले वापरून बनवला जातो. छोला मसाला हा वेगवेगळे खडे मसालेमसाले वापरून बनवला जातो. छोला मसाला हा वेगवेगळा पद्धतीने बनवला जातो. काही ठिकाणी ठेवले शिजवून त्यात कांदा व टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून ती पेस्ट घालून तयार केले जातात.काही ठिकाणी कांद्या, टोमॅटोच्या फोडी घातल्या जातात.घट्टपणासाठी शिजवलेला छोला कुस्करून घेतला जातो. काही ठिकाणी छोला मसाल्याची ग्रेव्ही जरा पातळच असते. छोले मसाल्या मधील ग्रेव्हीच्या चवीसाठी साधारण कांदा, टोमॅटो वापरले जातात.तसेच मॅग्नेशियम, पोटॅशियम व लोही भरपूर प्रमाणात असते. म्हणूनच शारीरिक कसरत करणारी व्यक्ती च्या आहारात नियमित छोले असतात. कारण छोल्यांमुळे शरीराला एक घट्ट व बांधे सुद पणा येतो.याच छोल्यांपासून आपण आज वेगवेगळ्या डिश कशा करणार ते पाहणार आहोत.
Chhole-छोले कसा बनवतात.
Chhole-छोले तयार करताना छोले रात्रभर पाण्यात भिजवून घेतले जातात. सकाळी भिजवलेले छोले प्रेशर कुकरमध्ये तीन पट पाणी घालून शिजवले जातात. Chhole-छोले शिजवताना त्यात काही खडे मसाले घातले जातात. जसे एक तेजपान, दालचिनीचा छोटा तुकडा, एक वेलदोडा, दोन ते तीन लवंग तीन-चार मिरे. हे सर्व साहित्य छोला कुकरमध्ये घातल्यावर घातले जातात. या मसाल्यांनी छोल्यांना छान स्वाद येतो हे मसाले घालून प्रेशर कुकरच्या तीन चार शिट्ट्या घेतल्या जातात. छो ला हाताने सहज दाबला जाईल इतका शिजवला जातो. पूर्ण शिजलेला छोला हा ग्रेव्हीला घट्टपणा व चव आणतो. छोला शिजल्यावर हे सगळे मसाले काढून टाकले जातात. छोल्या मसाल्याच्या काही प्रकारात बटाट्याच्या मोठ्या फोडी करून किंवा बटाटा उकडून त्याच्या फोडी करून टाकल्या जातात. बटाट्यामुळे छोला मसालाच्या ग्रेव्हीला घट्टपणा व चवही येते. व त्यासाठी थोड्या उकडलेल्या बटाट्याच्या काही फोडी कुस्करून ग्रेव्हीत मिक्स केल्या जातात. छोला मसाला मध्ये थोडी आंबट चव येण्यासाठी व त्याचा रंग छान डार्क होण्यासाठी कोरडे झालेल्या आवळ्याचा तुकडा किंवा आमचूर पावडर घातली जाते. छोला मसाला साठी जर रात्री छोला भिजवायचा राहून गेला तर सकाळी आपण गरम पाण्यात छोला भिजत घालू शकतो. दोन तासानंतर प्रेशर कुकरमध्ये सात ते आठ शिट्ट्या करून घ्याव्यात.मध्यम आचेवर शिजवावा किंवा बाजारात तयार छोला मिळतो तो ही वापरू शकतो. छोला शिजल्यावर कांदा टोमॅटो बारीक चिरून तुपावर चांगला परतून घेतला जातो. जेणेकरून टोमॅटोचा आंबटपणा थोडा कमी होईल. ग्रेव्हीसाठी टोमॅटो घेताना लाल टोमॅटो घ्यावे छोला मसाला मध्ये थोडा गोड स्वादासाठी साखरे ऐवजी ओला नारळ खाऊन घेतलेला म्हणजेच ओल्या नारळाचा चव घातला जातो छोला मसाल्यात सर्वात शेवटी घालावा. ओला नारळाच्या चव मसाल्यात सजावटीसाठी वापरला जातो लिंबू कोथिंबीर सोबत वाढवला जातो.
छोला मसाला करण्यासाठी त्यात वापरलेला मसाला आपण घरी तयार करू शकतो छोला मसाला पावडर तयार करण्यासाठी लागणारे साहित्य.
साहित्य.
- दहा ते बारा सुक्या लाल मिरच्या.
- दोन इंच दालचिनीच्या काड्या.
- तीन ते चार तेच पान.
- एक चमचा शहाजिरे.
- चार चमचे धने .
- दोन चमचे जिरे.
- दोन चमचे बडीशेप.
- एक चमचा लवंग.
- एक चमचा अनारदाना.
- एक चमचा मीरे.
- पाव चमचा जायफळ पावडर.
- पाव चमचा सुंठ पावडर.
- एक चमचा आमचूर पावडर.
- दोन ते तीन चिमूट हिंग.
- एक चमचा काळे मीठ.
कृती.
- Chhole-छोले पावडर तयार करताना प्रथम सुक्या लाल मिरच्या, तेजपत्ता व दालचिनी एका पॅनमध्ये घेऊन थोडे गरम करावे.
- सर्व साहित्य मंद आचेवर गरम करावे. गरम झाल्यावर एका भांड्यात काढून बाजूला ठेवावे.
- गार झाले की त्याची मिक्सरमधून बारीक पावडर वाटून घ्यावी व बाजूला ठेवावे.
- त्यानंतर एका पॅनमध्ये एक चमचा शहाजिरे, जिरे बडीशेप, लवंग, अनारदाना ,हे सर्व साहित्य घालून तेही थोडे गरम करावे.
- गरम झाल्यावर एका भांड्यात काढून गार करायला ठेवा.गार झाले हे सगळं साहित्य मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.
- ह्या वाटलेल्या मसाल्यात पाव चमचा जायफळ पावडर,पाव चमचा सुंठ पावडर,एक चमचा आमचूर पावडर,व दोन ते तीन चिमूट हिंग व एक चमचा काळे मीठ घालून छान मिक्स करावे व एका हवाबंद भरणे ठेवून द्यावे.
Chhole Recipe-छोले रेसिपी.
साहित्य.
- एक ते दीड वाटी उकडलेल्या छोला.
- एक वाटीओल्या नारळाचा चव मिक्सर मधून फिरवून घ्या.
- दोन वाटी नारळाच्या किसात गरम पाणी घालून मिक्सरला वाटून दूध काढून घ्या.
- तिखट चवीप्रमाणे.(तिखटा ऐवजी लाल मिरची पाण्यात भिजवून वाटून घातली तर स्वाद छान येतो).
- हळद पाव चमचा.
- फोडणीसाठी तेल.
- जिरं पाव चमचा.
- कढीपत्ता आठ दहा पाने.
- चिमूटभर हिंग.
- गरम मसाला एक चमचा.
- धने पूड अर्धा चमचा.
- जिरेपूड अर्धा चमचा.
- बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी.
- आमसुले तीन ते चार बारीक चिरून.
- आले लसूण पेस्ट एक चमचा.
कृती.
- Chhole-छोले बनवण्यासाठी प्रथम छोला सहा ते सात तास पाण्यात भिजवून घ्यावा लागतो. त्यासाठी छोला रात्री भिजत घालावा.म्हणजे सकाळी वापरता येतो.
- छोला भिजवल्या नंतरच तो पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकतो.छोला शिजवण्यासाठी एका प्रेशर कुकर मध्ये छोल्याच्या तीन पट पाणी घ्यावे.
- त्या पाण्यात दोन ते तीन लवंगा चार, पाच मिरे,एक छोटा दालचिनीचा तुकडा घालावा.खडे मसाला मुळे छोल्या ला छान सुगंध व स्वाद येतो.
- छोला शिजवण्यासाठी प्रेशर कुकर मध्ये तीन ते चार शिट्ट्या घ्याव्या. छोला शिजल्यावर छोला हाताने दाबून बघावा.छोला हाताने सहज दाबला गेला तर छोला पूर्ण शिजलेला आहे असे समजावे.
- नंतर एका कढईत तेल टाकून गॅसवर ठेवा. तेल तापल्यावर त्यात जिरे घाला. हिंग व कढीपत्ता घाला .नंतर बारीक चिरलेला कांदा घाला व कांदा छान परता.
- कांदा परतून झाला की त्यात आले लसूण पेस्ट घाला. जळणार नाही याची काळजी घ्या.
- नंतर खवलेला नारळ घाला. नंतर सगळेच मसाले म्हणजे तिखट, मीठ, हळद, धने पूड ,जिरे पूड, घालून छान परतून घ्या.
- परतून झाल्यावर दोन वाटी नारळाचे दूध घाला. नंतर आमसुले व उकडलेला छोले घाला. छान ढवळून घ्या. उकळल्यानंतर मीठ व गरम मसाला घाला. चवीनुसार चिमूटभर साखर घाला. मसाला छोले खूप छान लागतो.
- थोडी वेगळी चव आहे पण अतिशय स्वादिष्ट होतो.
टिप्स.
- छोला मसाला बनवताना स्वादासाठी खडा मसाला हा चांगल्या प्रतिसा असावा. छोला मसाला करताना चवीसोबत सुगंधाचा विचार केला जातो छोला मसाला शिजवताना घातलेले पाणी ग्रेव्हीत वापरावे.
- छोला मसाला शिजवताना थोडा सोडा घातला तर चालतो. छोला मसाला भटूरे साधा राईस जीरा राईस कोई ना सोबत खाल्ला जातो.
- छोला मसाला मध्ये आमचूर पावडर टाकताना सर्वात शेवटी घालावी आधी घातल्यास त्याच्या आंबटपणामुळे छोला लवकर शिजणार नाही.
FAQs.
प्रश्न १ :- छोला मसाला करतांना कोणता हरभरा वापरावा ?
प्रश्न २ :- छोला मसाल्यातून कोणते जीवनसत्वे मिळतात ?
प्रश्न ३ :- चोला मसाला शिजवतांना मसाल्याची पावडर वापरली तर चालेल का ?
उत्तर :- .छोला मसाला शिजवतांना मसाल्याची पावडर ही घातली तर छोला मसाला हा जास्त तिखट होतो व खाताना जिभेचा दाह होऊ शकतो. म्हणून छोला मसाला शिजवतांना खडा मसाला वापरावा. चोला शिजून झाल्यावर खडा मसाला काढून टाकावा म्हणजे त्याचा छान स्वाद येईल व त्रास होणार नाही.