Site icon Ashlesha's Recipe

“आम्लपित्त टाळण्यासाठी Evening Snacks-संध्याकाळी खायला सोपे आणि आरोग्यदायी स्नॅक्स”

Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता म्हणजे मधल्या वेळेचे खाणे. दुपारचे जेवण व रात्रीच्या जेवणात भरपूर वेळ असतो. अशा वेळेत थोडे हलके फुलके पटकन पचणारे व पौष्टिक असा Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता खावासा वाटतो.

Read More : Kokum Sharbat Recipe.

Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता म्हणजे काय.

Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता म्हणजे नाश्ता जो जेवणाचा एक छोटासा भाग आहे. जेवणामध्ये असलेल्या वेळेत केला जातो नाश्ता हा वेगवेगळ्या प्रकारात केला जातो. कधी घरी नाष्टासाठी काहीतरी बनवले जाते. तर कधी बाहेरून काहीतरी मागवले जाते. किंवा बाहेर जाऊन स्ट्रीट फुड चा आनंद घेतला जातो. नाश्ता घरी तयार करताना फार वेळ व साहित्याची तयारी करावी लागत नाही. घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीतून नाश्ता तयार केला जातो. Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता बराच वेळा पोहे, रवा किंवा घरात असलेल्या पदर्था पासून बनवला जातो. Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता पटकन तयार केला जाईल याकडे भर दिला जातो. Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता साठी फार वेळ लागू नये याची काळजी घेतली जाते. घरी केलेला स्नॅक्स बाहेर केलेल्या स्नॅक्सच्या तुलनेत आरोग्यदायी असतो आणि बाजारात पॅकिंग केलेले नाश्त्यासाठी पदार्थ मिळतात पण ते खराब होण्याची शक्यता जास्त असते. तसेच तळलेले पदार्थही असतात पण ते बाहेरच्या पदार्थांमध्ये कोणत्या प्रकारचे व कोणत्या दर्जाचे तेल वापरले जाते ते आपण सांगू शकत नाही. ते आरोग्याला हानिकारक ठरू शकते. म्हणूनच नाश्ता हा घरी केलेल्या उत्तम असतो. तसेच बाहेरच्या स्नॅक्समध्ये जास्त कॅलरीज व कमी पोषक तत्वे असतात. त्या उलट घरी बनवलेल्या नाष्ट्यात योग्य पोषक तत्वेनीं भरलेल्या बनवलेला असतो. नाश्त्यासाठी फळे ड्रायफ्रूट्स भाज्या व अशाच घटकांपासून बनवलेला नाश्ता उत्तम समजला जातो. नाश्ता हा थोड्या प्रमाणात केला जातो. म्हणून शक्यतो पचनासाठी हलका असेल याकडे लक्ष दिला जातो. हल्ली तरुण पिढी जेवणापेक्षा बाहेर मिळणाऱ्या फास्ट पुढचा खाण्यावर जास्त भर देताना दिसते. पण याच फास्ट फूड मुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. बाहेर मिळणाऱ्या फास्ट फूड मुळे आपल्या आहार शास्त्राच्या परंपरेपासून ही पिढी दुरावते चालली आहे. नाश्त्यासाठी पटकन मिळणारा व चालता बोलता खाता येणारा स्नॅक्स ला जास्त मागणी वाढत चालली आहे. तसेच पॉपकॉर्न, सँडविच असे पदार्थ बाहेर जाऊन खाल्ले जातात. या पदार्थांमध्ये पोषक तत्वे फार कमी असतात. या Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता ने पोट तर भरते पण आरोग्य मात्र तितकेसे मिळत नाही. अशावेळी आपण घरी Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता करू शकतो घरी बनवलेल्या स्नॅक्स मुळे पोटही भरते व उत्तम पोषणही मिळते. अशाच काही पटकन तयार होणाऱ्या रेसिपी आपण बघणार आहोत. पटकन तयार होणाऱ्या योग्य पोषण मिळणाऱ्या या रेसिपी आहेत. Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता म्हणजे कधी कणकेची पुरी, कधी तिखट मिठाची पुरी, Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता म्हणजे एखादा लाडू, स्नॅक्स म्हणजे पोट भरल्यासारखे वाटायला हवे व थोडे हलके असायला हवे व पचायला सोपे हवे. म्हणजे रात्रीच्या जेवणापर्यंत भूक लागेल असे असे खाणे. अशाच प्रकारचा स्नॅक्सआपण आता पाहणार आहोत दुपारच्या वेळी काय खावे असा प्रश्न पडतो. अशा वेळेस आधीच काही पदार्थ तयार असले म्हणजे पटकन खाता येतात. बनवण्यात वेळ जात नाही. असेच काही पाककृती किंवा त्यांची पूर्वतयारी करून ठेवावी. त्यात कर्नाटक पुरी तयार करून आठ दिवस ठेवता येते. भरड्याचे वडे किंवा भरड्याचे थालीपीठ करण्यासाठी भरडा आधीच तयार करून ठेवला म्हणजे लगेच दहा मिनिटात आपण वडे किंवा थालीपीठ करू शकतो. तसेच टोमाटो आम्लेट, तांबड्या भोपळ्याच्या पुऱ्या त्याही आधीच करून ठेवल्या की लगेचच खाता येईल. त्यासाठीच या काही सोप्या पाककृती.

टोमॅटो ऑम्लेट.

साहित्य.

कृती.

सातूचे पीठ.

सातूचे पीठ हे अतिशय पोषक असते. आरोग्याला उत्तम ठेवते व पचायला खूप हलकी असते. सातूचे पीठ तयार करून ठेवता येते व महिनाभर टिकते. त्यापासून वेगवेगळ्या पदार्थ करून खाता येतात. सातूचे पीठ हे Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता साठी उत्तम पर्याय आहे.

सातूचे पीठ कसे बनवतात.

सातूचे पीठ बनवताना एक ठराविक प्रमाण असते त्यासाठी तुम्ही कुठलेही माप घेऊ शकतात वाटी, कप किंवा किलो प्रमाणे मी इथे वाटी प्रमाणे सांगत आहे.

साहित्य.

  • दोन वाट्या गहू.
  • एक वाटी हरभरा डाळ किंवा बाजारात मिळणारे फुटाण्याचे डाळे.
  • अर्धी वाटी मूग  डाळ.

पूर्व तयारी.

हे सगळं साहित्य घेऊन वेगवेगळे भाजून घ्यावे.भाजून झाल्यावर गार करायला ठेवावे गार झाले की गिरणीतून दळून आणादळून झाल्यावर दळून आणलेले पीठ चांगले भरून ठेवावे.

फोडणीचे सातूचे पीठ.

साहित्य.

  •  एक वाटी सातुचे पीठ.
  •  एक छोटा कांदा.
  •  एक चमचा आले लसूण पेस्ट.
  •  अर्धा चमचा मोहरी.
  •  अर्धा चमचा जिरे.
  •  फोडणीसाठी तेल.
  •  चवीनुसार मीठ.
  • थोडी कोथिंबीर.
  • चार, पाच पाने कढी पत्ता.

कृती.

  • फोडणीचे सातूचे पीठ करतांना प्रथम एका कढईत थोडे तेल घेऊन गॅसवर ठेवा.
  • तेल तापले की त्यात एक वाटी सातूचे पीठ टाका व मंद आचेवर भाजून घ्या.
  • पीठ भाजून झाल्यावर एका भांड्यात काढून ठेवा.
  • नंतर त्याच कढईत थोडे तेल घालून घ्या. तेलात थोडी मोहरी घाला. मोहरी तडतडली की जिरे घाला.
  • जिरे तडतडले की त्यात कांदा घाला व कांदा छान परतून घ्या. कांदा परतल्यावर मिरची घाला व एक मिनिटांनी.
  • आले लसणाची पेस्ट घाला व थोडे परतून घ्या.
  • नंतर फोडणीत वाटीभर पाणी घाला व मीठ घाला  थोडी कोथिंबीर घाला.पाणी उकळले की त्यात भाजलेले सातूचे.
  • पीठ घाला व हलवत रहा. थोडा वेळ झाकण ठेवून वाफ आणा व छान शिजवून घ्या.
  • वरून कोथिंबीर घालून गरमागरम खायला द्या आरोग्याला व पचनाला सातूचे पीठ उत्तम असते.
  • सातूचे पीठ हे पचनाला अतिशय हलके असते व  म्हणूनच ते वयस्कर व्यक्ती ना अगदी  पचायला सहज होते.
  • सातूचे पीठ हे रात्री किंवा संध्याकाळी दुधात घालून घेतले तरीसुद्धा खूप पौष्टिक असते.लहान मुले किंवा प्रौढ व्यक्तींसाठी उत्तम पर्याय असतो.

कर्नाटकी पुरी.

साहित्य.

  • दोन वाट्या तांदूळ पीठ.
  • एक वाटी मैदा.
  • मोहन देण्यासाठी एक वाटी तूप.
  • एक वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली.
  • डोळ्यांचे पीठ एक वाटी.
  • एक वाटी दाण्याचे कूट.
  • दोन चमचे तीळ.
  • एक चमचा जिरे.
  • थोडे हिंग.
  • मीठ चवीनुसार.
  • थोडा कढीपत्ता.
  • दहा ते बारा मिरच्या.

कृती.

  • कर्नाटकी पुरी करतांना प्रथम कोथिंबीर व कढीपत्ता बारीक चिरून घ्यावा व मिरची पेस्ट करून ठेवावी.
  • नंतर एका परातीत किवा पसरट भांड्यात दोन वाट्या तांदळाचे पीठ व मैदा घ्यावा.
  • नंतर तांदळाचे पीठ व मैद्यांला एक वाटी तुपाचे मोहन देऊन घ्यावे. तूप पिठाला चांगले चोळून घ्यावे.
  • नंतर त्यात भाजलेल्या डोळ्यांचे पीठ छान मिक्स करावे व परत एकदा सर्व पिठाला हाताने चांगले चोळून एकजीव करावे.
  • नंतर त्यात एक वाटी दाण्याचे कूट, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची पेस्ट, एकत्र करून कणीक भिजवून घ्यावी.
  •  कणिक फार घट्ट किवा पातळ भिजवू नये पुऱ्या  लाटता येतील इतपत मऊ असावी.
  • कणिक भिजवुन झाल्यावर पंधरा मिनिटे झाकून ठेवावे.
  • पंधरा मिनिटानंतर त्या कणकेचे छोटे छोटे गोळे घेऊन अगदी मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटाव्या.
  •  पुऱ्या फार पातळ किंवा जाड नको सगळ्या बाजूने सारखी लाटावी, म्हणजे सगळी कडून एकसारखी तळली जाईल.
  • पुऱ्या लाटून झाल्यावर मध्यम आचेवर त्या छान खरपूस तळून घ्याव्यात.
  • मोठ्या आचेवर तळल्यास पुऱ्यांचा मसाला जळू शकतो व ठसका लागू शकतो.
  • पुऱ्या छान खुटखुटीत व अतिशय चविष्ट होतात.
  •  कर्नाटकी पुऱ्या दुपारच्या चहाच्या वेळी सुद्धा आपण चहा सोबत खाऊ शकतो.

पोहे कबाब.

पोहे कबाब हि अतिशय सोपी व चविष्ट डीश आहे.त्याच बरोबर झटपट तयार होणारी आहे.

साहित्य.

  • डाळीचे पीठ एक चमचा.
  • दोन चमचे कॉर्न फ्लोअर.
  • पोहे दोन वाट्या.
  • दही दोन चमचे.
  • आले-लसूण पेस्ट एक चमचा.
  • मीठ चवीनुसार.
  • हिरवी मिरची.

कृती.

  • पोहे कबाब करतांना प्रथम पोहे चाळणीत घेवून चाळून घ्यावे.
  • चाळून झाल्यावर एका भांड्यात घेवून ओले करून घेणे  थोडा वेळ तसेच ठेवावे म्हणजे मऊ झाले पाहिजे.
  • नंतर पोह्यांमध्ये सर्व आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची वाटून डाळीचे पीठ, कॉर्न फ्लोअर. हे सर्व साहित्य मिक्स करून घेणे.
  • पोह्यांमध्ये सर्व साहित्य एकत्र करून झाल्यावर छान घट्ट गोळा भिजवावा. म्हणजे पोह्याचे कबाब छान बनवता येतील.
  • गरज वाटल्यास थोडा पाण्याचा हात लावून गोळा माळून घ्यावा. नंतर हलक्या हाताने पोह्याचे कबाब आपल्या आवडीच्या आकारात तयार करून घ्यावे.
  • पोह्यांचे कबाब तयार झाल्यावर मंद आचेवर तळावे. हे कबाब टोमॅटो सॉस सोबत अतिशय छान लागतात.

भरड्याचे धिरडे.

साहित्य.

  • एक वाटी मुगाची डाळ.
  • एक वाटी उडदाची डाळ.
  • एक वाटी तांदूळ.
  • गरजेनुसार मिरच्या.
  • चवीनुसार मीठ.
  • थोडी कोथिंबीर.
  • आले लसून पेस्ट.

कृती.

  • भरड्या चे धिरड्या साठी थोडी पूर्वतयारी करावी लागते.
  • प्रथम सगळे कडधान्य सारख्या प्रमाणात घ्यावे.
  • नंतरभरड्या साठी आपण घेतलेले धन्य स्वच्छ करून घ्यावे. धन्य स्वच्छ झाल्यावर  गिरणीतून जरा जाडसरच दळून आणावे.
  • कडधान्य दळून आणल्या नंतर चाळणीने चाळून एका डब्यात भरून ठेवावे. म्हणजे आपल्याला लागेल तेव्हा वापरता येईल.
  • भरड्या चे धिरडे करतांना आयत्यावेळी आपल्या गरजेनुसार पीठ घ्यावे.
  • भरड्याच्या पिठात सर्व मसाला बारीक करून एकत्र करून घ्यावे.
  • सर्व मसाले एकत्र करून लागेल तसे पाणी घालून धिरड्याचे पीठ भिजवून घ्यावे व थोडा वेळ झाकून ठेवावे.
  • म्हणजे  धिरडे छान  होतात.
  • नंतर तव्यावर तेल टाकून छोट्या आकाराचे धिरडे काढून घ्यावे व भाजतांना सर्व बाजूने तेल टाकावे.
  • वरून झाकण ठेवून छान वाफवून घ्यावे. अतिशय चविष्ट पदार्थ आहे.

हिरव्या मुगाची उसळ.

Evening Snacks-संध्याकाळचा नाश्ता साठी मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. मोड आलेले हिरवे मूग प्रथिने आणि जीवनसत्वाचा खूप मोठा साठा असलेले कडधान्य आहे. मुख्य म्हणजे हिरव्या मुगात असलेले प्रथिने हे पचनासाठी अतिशय हलके असतात. लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांना सहज पचवता येतील इतके सोपे असतात.तसेच शाकाहारी असणाऱ्या व्यक्तींना प्रथिने मिळवण्यासाठी आहारात नियमित घेणे हा उत्तम पर्याय आहे. चला तर बघू मोड आलेल्या मुगाची उसळ कशी बनवतात.

साहित्य.

  •  मोड आलेले हिरवे मूग एक वाटी.
  • कांदा एक छोटा.
  • टमाटा एक लहान आकाराचा.
  • मीठ चवीनुसार.
  • कोथिंबीर चिरलेली मूठभर.
  • लाल तिखट चवीप्रमाणे.
  • चाट मसाला एक चमचा.
  • अर्धा लिंबाची फोड.

पूर्वतयारी.

  • मुगाला मोड आणण्यासाठी सकाळी अख्खे मूग रात्री भिजवलेल्या मुगाचे पाणी काढून निथळत ठेवावे.पाणी पूर्णपणे निथळल्यावर मुग एका सुती कापडात बांधून ठेवावे व झाकून ठेवावे.
  • सकाळी मुगाला छान मोड येतात.
  • मोड आलेले हिरवे मूग आपण जास्तीचे करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो.
  • हवाबंद डब्यात ठेवावे तीन ते चार दिवस सहज टिकतात.

कृती.

  • प्रथम कांदा चिरून फोडी कराव्या. तसेच टोमॅटोच्याही बारीक फोडी करून घ्याव्या.
  • नंतर मोड आलेले हिरवे मूग धुवून घ्या व एका चाळणी निथळ ठेवा. हिरव्या मोड आलेल्या हिरव्या मुगाचे पाणी निथळून झाल्यावर मोड आलेले हिरवे मूग एका खोल भांड्यात घ्या.
  • आता मोड आलेल्या मुगामध्ये बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेल्या टोमॅटोच्या फोडी घालून एकत्र करा.
  • नंतर मुगामध्ये मीठ,चाट मसाला घालून चमच्याच्या साह्याने एकत्र करा वरून कोथिंबीर घाला व लिंबू पिळावा व खायला द्यावे.
  • मोड आलेल्या मुगाची उसळ खूप छान लागते.

FAQs.

प्रश्न 1. सातूचे पीठ कसे बनवतात ?

उत्तर :- सातूच्या पिठात गहू, मूग व फुटण्याचे डाळ किंवा हरभरा डाळ हे घटक पदार्थ घेऊन ते वेगवेगळे भाजले जातात व एकत्र  बारीक दळून घेतले जातात. यालाच सातूचे पीठ म्हणतात. सातूचे पीठ हे अतिशय पौष्टिक असते.

प्रश्न 2. सातूच्या पिठापासून  कोणकोणते पदार्थ केले जातात ?

उत्तर :- सातूच्या पिठाचे थालीपीठ किंवा कोथिंबीर मेथी याचे पराठे किंवा मुटकुळे करतात. सातूच्या पिठाचे वडे करता येतात किंवा सातूचे पीठ हे कुठल्याही भाज्यांचे  थालीपीठ करता येते. तसेच सातूच्या पिठाचे पौष्टिक लाडू ही करतात.

प्रश्न 3. भरडा करताना कोणते धान्य वापरावे ?

उत्तर :- भरडा तयार करताना मुगाची डाळ, उडदाची डाळ, तांदूळ किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपण थोडे गहू किंवा बाजरी घालू शकतो. भरड्याचे वडे किंवा भरड्याचे थालीपीठ फार चविष्ट लागतात. तयार केलेला भरडाचे पीठ आपण कुठल्याही थालीपीठात घालून थालीपीठ करू शकतो.

Exit mobile version