Site icon Ashlesha's Recipe

“घरी बनवा दिवाळीची शाही Karanji-करंजी: खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी”

Karanji-करंजी आतून सुंदर स्वादिष्ट नारळ व गुळाचे सारण भरलेले व वरून खुसखुशीत तोंडात टाकल्यावर विरघळणारी अशी Karanji-करंजी सगळ्यांनाच आवडते.

Read More : Chakli Recipe.

थोडे Karanji-करंजी विषयी.

दिवाळी म्हणजे भारतीय परंपरा व दिवाळीचा फराळ म्हणजे भारतीय परंपरेचा एक भाग. फराळात तिखट, गोड, आंबट गोड असे वेगवेगळ्या चवीचे पदार्थ दिवाळीत केले जातात. प्रत्येक पदार्थ हा वेगळ्या चवीचा असतो. प्रत्येक पदार्थत साखर घातली जाते. पण तरीसुद्धा प्रत्येक गोड पदार्थाची चव ही वेगळी असते. लाडू, अनारसे, गोड शंकरपाळी, करंजी, चिरोटे सगळे पदार्थ एकापेक्षा एक चवीला सरस असतात. कुठल्याही पदार्थाची तुलना करता येत नाही हे पदार्थ चवीप्रमाणेच गृहिणीचे चे स्वयंपाकातले कौशल्याची परीक्षा घेणारे असतात. तसाच एक पदार्थ म्हणजे Karanji-करंजी. लक्ष्मीपूजनाच्या नैवेद्याच्या ताटातील एकविभाज्य घटक असते. लक्ष्मीपूजनाच्या ताटात जसा खीर, पुरण पुरणाचे महत्त्व तसेच करंजीचा ही मान असतो .सोनेरी रंगाची ही Karanji-करंजी  नैवेद्याच्या ताटाची शोभा वाढवते. वेगवेगळ्या प्रांतात ही करंजी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते उत्तरेत भुजिया, गोव्याकडे नेवरी, तर गुजराती गुजिया म्हणून ओळखले जाते. करंजी करंजी बनवताना अनेक पर्याय असतात .करंजीचे आवरण म्हणजेच तिची वरची पारी रवा मैदा एकत्र करून बनवले जाते. तसेच काही ठिकाणी फक्त रव्याचे किंवा काही ठिकाणी फक्त मैद्याचे आवरण बनवले जाते. परंतु Karanji-करंजी जर खुसखुशीत हवी असेल तर रवा व मैदा समान प्रमाणात एकत्र करून केलेली पारी छान होते. तसेच सारणही वेगवेगळ्या प्रकारात केले जाते. ओले नारळ, सुके नारळ, खवा, पनीर असे वेगवेगळ्या प्रकारात चे सारण भरून करंज्या बनवल्या जातात. पिठाच्या करंज्या, गुलकंदाचे सारण भरून केलेल्या करंज्या, सुकामेव्याचे सारण भरून केलेल्या करंज्या परंतु सगळ्यांना आवडते ती ऑल नारळ व गूळ किंवा साखर घालून केलेले सारण घालून तयार केलेली करंजी.करंजीचे वरचे आवरण तयार करतानाही अनेक प्रकारे केले जाते. काही ठिकाणी साधी पुरी लाटून त्यात करणे सारण भरून Karanji-करंजी बनवले जाते. तर काही प्रकारात पुडाच्या करंज्या म्हणजेच चार ते पाच पारी एकावर एक ठेवून आत मध्ये तांदळाच्या पिठी चा साटा लावून त्याच्या छोटे छोटे गोळे तयार करून त्यात त्या करंज्या बनवल्या जातात. या करंजीला साटा करंजी असे म्हटले जाते. ही करंजी तळल्यावर तिचे वेगवेगळे पूड तयार होतात दिसायलाही अतिशय सुंदर दिसते व खायलाही खूप खुसखुशीत होते. पूर्वी करंजी हाताने भरून कडेला हातानेच डिझाईन केले जात होते. परंतु आता Karanji-करंजी साठी अतिशय सुंदर साचे मिळतात. त्या साच्यात घालून करंजी बनवता येते ह्या साच्या ज्या कडेला आधीच डिझाईन असते. त्यामुळे हाताने डिझाईन करावे लागत नाही व करंजी खूप सुंदर व सगळ्या करंज्या एक सारख्या आकाराच्या येतात.करंजी तळताना मंद आचेवरच तळावे लागते. म्हणजे ती छान खुसखुशीत होते छान सोनेरी गुलाबी रंग आला की करंजी चवीला व आपल्या डोळ्यांना अतिशय हवी हवीशी वाटते.

How To Make Karanji-ओल्या नारळाची करंजी कशी बनवली जाते.

ओल्या नारळाची Karanji-करंजी बनवताना ओले नारळ छान खऊन घेतले जाते व खवलेले नारळ व गूळ किंवा आपल्या आवडीनुसार साखर आपण घालू शकतो त्याचे मिश्रण गरम करून छान कोरडे केले जाते. करंजीत कोरडे मिश्रण छान भरता येते व करंजी मऊ पडत नाही. करंजीचे त्यात वेलची पावडर घालून छान चव आणण्यासाठी वेलची पावडर मिक्स केली जाते. तसेच वरचे आवरण करण्यासाठी रवा व मैदा एकत्र करून त्यात तुपाचे मोहन घालून दुधात भिजवावे. दुधात भिजवलेले Karanji-करंजी चे पारी अतिशय सुंदर होते. दहा ते पंधरा मिनिटं भिजवलेले पीठ झाकून ठेवावे व त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी ते पीठ थोडासा दूध किंवा पाण्याचा हात लावून कुटुन घेतले जाते.किंवा मिक्सरमधून फिरवले जातात. म्हणजे पीठ अतिशय मऊ होते व पारी छान लाटली जाते. साठ्याची करंजी करताना चार ते पाच पोळ्या लाटल्या जातात. व तू व तांदळाची पिठी एकत्र करून त्याचा साठा प्रत्येक पोळीला लावून एकावर एक ठेवून ठेवली जाते त्या पोळ्यांचे घट्ट रोल केला जातो. त्याच्यापासून छोटे छोटे गोळे करून एकेक पारी लाटली जाते. त्या पारीत सारण भरून सुंदर सुबक करंजा भरल्या जातात. साचा असेल तर साच्याने केल्या जातात व तेलात मंद आचेवर सोनेरी रंग येतो तळून घेतात.

सारणासाठी साहित्य.

एक वाटी खवलेला ओला नारळ पाहून कप किसलेला गूळ किंवा आपल्याला आवडत असेल तर साखर घातली तरी चालेल अर्धा चमचा वेलची पावडर.

पारीसाठी साहित्य.

कृती.

करंजीच्या आवरण.

टिप्स.

Exit mobile version