Patra Alu Vadi-अळूवडी ही एक कंद मुळा वर्गातीलअसलेले वनस्पती आहे. अळूच्या पानांची भाजी व अळूवड्या केल्या जातात. Patra Alu Vadi-अळूवडी हे अळूच्या पानांना डाळीचे पीठ लावून वाफवून व नंतर तळून घेतली जाते.
थोडे अळूच्या पानांविषयी.
अळूचे पाने हे एक कंदापासून येणाऱ्या वनस्पतीची पाने आहेत. ही वर्षभर येणारी वनस्पती आहे.याची पाने व कंद आहारात वापरले जातात. अळूची पाने ही एक औषधी वनस्पती मानले जातात. महाराष्ट्रात अळूची भाजी व Patra Alu Vadi-अळूवडी खूप प्रसिद्ध व लोकप्रिय आहे.अळूच्या पानांमध्ये विटामिन ए मोठ्या प्रमाणात असते, जे आपल्या डोळ्यांसाठी खूप उपयुक्त असते.म्हणून आपले आहार आळूची पाने अळूची भाजी किंवा अळूवडीच्या स्वरूपात खाल्ले जातात. अळूचे पाने ही रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. तसेच अळूच्या पानात विटामिन ए सोबत विटामिन बी व विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच कॅल्शियम जे आपल्या हाडांसाठी उपयुक्त असते तसेच पोटॅशियम व अँटीऑक्सिडेंट चे प्रमाण भरपूर असते. तसेच भरपूर फायबर्स असतात.त्यामुळे आपल्या आतड्यांचे आरोग्य उत्तम राखले जाते व पचनही सुधारते. अळूच्या पानांमध्ये बिटाकारोटीन, फॉलेट, मॅग्नेशियम, कॉपर तसेच आयर्न असे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. पूर्वी घराच्या आजूबाजूला जागा असायची व जागेत छोटीशी बाग असायची या बागेत अळूचे कंद हमखास असायचे.हल्ली जागेच्या कमतरतेमुळे घरचे अळूचे पाने तशी कमी असतात. पण पावसाळ्यात मात्र बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.
थोडे Patra Alu Vadi-अळूवडी विषयी.
Patra Alu Vadi-अळूवडी हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध व लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. खास करून कोकणात जास्त प्रमाणात याची वेगवेगळे प्रकार केले जातात.अळूची पाने सगळीकडे सारखेच असतात पण अळूवडी मात्र वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. महाराष्ट्रातील काही भागात तांदळाचे पीठ व डाळीचे पीठ,हळद,तिखट,मीठ घालून अळूवडी केली जाते. काही ठिकाणी अळूची पाने बारीक कापून त्यात डाळीचे पीठ व मसाले घालून ढोकळ्याप्रमाणे वाफवून घेतात व नंतर फोडणी घालून परतून घेतले जाते. तर काही भागात अळूच्या पानांची भजी काढली जातात. तसेच कोकणात अळूचे पानांची डाळ लावून व पानांची घडी घालून Patra Alu Vadi-अळूवडी तयार केली जाते.वापरले जाते व नंतर कापून तळून घेतले जातात.काही भागात अळूच्या पानांना पात्रा असे म्हटले जाते व अळूवडीला पात्रावडी म्हटले जाते.कुरकुरीत व खमंग अळू वडी सगळ्यांनाच आवडते, मग ती कुठल्याही प्रकारे केलेली असो. अळूवडी बनवताना कशी पाने घ्यावी. अळू वडी बनवताना छान गडद रंग हिरव्या रंगाची पाने घ्यावी. तसेच अळूच्या पानांचे देठ सुद्धा थोडे काळपट असलेली पाने घ्यावी.काही वेळा पाणी आकाराने लहान असतात पण ही पानांची वडी अगदी चविष्ट लागते. ही पाने पातळ असलेली व अगदी मऊ असलेली पाने घ्यावी.मोठ्या आकाराची व जाड असलेली पाने काही वेळी घशात खवखवतात व तोंडाला ही खाजव येते अशा पानांची Patra Alu Vadi-अळूवडी बनवताना त्यात आवर्जून चिंचगुळ घालावा, म्हणजे घशात खवखव होत नाही व चवीलाही छान होतात.अळूची पाने चिरताना कधी कधी हाता नाही खाज सुटल्यासारखे होते अशावेळी हाताला लिंबूरस लावावा.
Patra Alu Vadi-अळूवडी कशी बनवतात.
Patra Alu Vadi-अळूवडी बनवतानाही अनेक प्रकारे बनवले जाते.अळूवडीमध्ये वापरण्यात येणारे मसाले साधारण सारखेच असतात.फक्त बऱ्याच ठिकाणी अळूवडीसाठी डाळीचे पीठ वापरले जाते तर काही ठिकाणी तांदळाचे पीठ वापरले जाते. तसेच कुठे Patra Alu Vadi-अळूवडी ही डीप फ्राय केली जाते तर कुठे शॅलोफ्राय केली जाते. तसेच खानदेशात अळूवडी बनवताना अळूचे पानांचे देठे काढून घेतात व पानांना डाळीचे पिठात हळद तिखट मीठ असे आपल्या आवडीचे मसाले घालून एक मिश्रण केले जाते. नंतर आळुच्या पानांना ते मिश्रण लावले जाते व त्याचा रोल तयार त्या पानांचा रोल करून घेतात. नंतर तो रोलचाळणीत आणि ठेवून वाफवला जातो. वाफवल्यानंतर त्याची गोल व चप्पट्या आकारात वडी कापून घेतात. नंतर तेलात कुरकुरीत तळून घेतले जातात व गरम गरम खाल्ले जातात.
साहित्य.
- अळूची पाने चार ते पाच.
- डाळीचे पीठ एक ते दीड वाटी.
- तांदळाचे पीठ दोन चमचे.
- आले-लसूण पेस्ट दोन चमचे.
- धने जिरे पावडर दोन चमचे.
- लाल तिखट दोन चमचे.
- हळद अर्धा चमचा.
- ओवा एक चमचा.
- तीळ दोन ते तीन चमचे.
- मीठ चवीनुसार.
- तेल गरजेनुसार.
- कोथिंबीर मूठभर बारीक चिरलेली.
- चिंचेचा कोळ एक वाटी.
पूर्वतयारी.
- Patra Alu Vadi-अळूवडी बनवताना प्रथम चिंच व गुळ एका भांड्यात घालून पाण्यात भिजत ठेवा व थोड्यावेळाने हाताने कुस्करून घ्या.
- नंतर अळूची पाने स्वच्छ धुऊन घ्या व पानांची देठे काढून घ्या.
- देठ जर मऊ असतील तर ते लाटण्याच्या साह्याने लाटून घ्या. म्हणजे पीठ लावताना व रोल तयार करताना पाणी फाटत नाही. व रोल सहज तयार होतो .
- नंतर एका पातेल्यात किंवा भांड्यात पाणी घेऊन गॅसवर ठेवा व पाण्यावर एक चाळणीला तेल लावून घ्या व पाण्याच्या भांड्यावर ठेवा.
कृती.
- प्रथम एका भांड्यात डाळीचे पीठ घ्या आता डाळीच्या पिठात तांदळाचे पीठ घाला तसेच हळद लाल तिखट मीठ धने जिरे पावडर घाला.
- नंतर त्यात ओवा घाला व चिरलेली कोथिंबीर घाला. आता त्यात चिंचेचा कोळ घाला व हळूहळू लागेल तसे पाणी घालून मिश्रण तयार करा. मिश्रण फार पातळ किंवा फार घट्ट करू नये.
- आता स्वच्छ धुतलेले व देठ काढलेले एक पान घ्या व पानाच्या उलट्या बाजूला म्हणजे त्या बाजूने देठ व पानाच्या शिरा असतात त्या बाजूला डाळीचे पीठ पिठाचे मिश्रण सगळ्या बाजूने लावून घ्या.
- आता त्याच पानावर दुसरे पान विरुद्ध दिशेने ठेवावे म्हणजे खालच्या पानाचे एक टोक या बाजूला आहे त्या बाजूला वरच्या पानाचे दोन टोके असलेला भाग ठेवा.
- आता वरच्या पानाला डाळीच्या पिठाचे मिश्रण लावून घ्या असेच सगळी पाने एकावर एक ठेवून पिठाचे मिश्रण लावून घ्या.
- आता पानांच्या उभ्या बाजूच्या दोन्हीकडून पाणी थोडी दुमडून घ्या व सर्व पानांचा एक घट्ट रोल तयार करून घ्या.
- आता पाणी उकळले असेल त्यावर चाळणी ठेवून चाळणीत तयार केलेला रोल वरून तीळ लावून घ्या व पाण्यावर ठेवलेल्या चाळणीत वाफवण्यासाठी अळूच्या पानांचा तयार केलेला रोल ठेवून द्या वरून झाकण ठेवा व मोठ्या ते मध्यम आचेवर पंधरा मिनिटे वाफवून घ्या.
- आता पंधरा मिनिटांनी गॅस बंद करा व आळुच्या पानांचा रोल सुरी किंवा चमच्याच्या साह्याने शिजल्याची खात्री करून घ्या म्हणजे जर सूरी किंवा चमचा रोल मध्ये टाकल्यावर पीठ चिकटले नाही तर रोल पूर्ण शिजला आहे असे समजावे व पीठ चिकटले असेल तर परत एकदा गॅस लावून पाच मिनिटांसाठी आळूचा रोल वापरून घ्या.
- आता रोल काढून पूर्णपणे गार होऊ द्या रोल गार झाल्यावर सुरीच्या साह्याने गोल गोल चकत्याप्रमाणे अळूवडी कापून घ्या. आता एका कढईत तेल घेऊन तेल तापायला ठेवा तेल तापल्यावर मंद आचेवर कापलेल्या अळूवड्या तळून घ्या मंद आचेवर तळलेल्या अळूवड्या छान कुरकुरीत तळल्या जातात.
- आता तळलेल्या कुरकुरीत अळूवड्या खायला द्या अळूवड्या सॉस किंवा चिंचेच्या चटणी सोबत खाल्ल्या जातात किंवा तोंडी लावणे म्हणूनही खाल्ल्या जातात.
टिप्स.
- अळूची पाने चांगल्या पाण्यावर वाढलेली असावी अशी पाने आरोग्याच्या दृष्टीने उत्तम समजले जातात.
- अळूवड्या करताना गडद हिरव्या रंगाची व थोडी काळपट देठे असलेली पाने उत्तम मानले जातात .अळूची पाने वडी करताना चिंच v गुळ घातला तर चव छान येते व तोंड व घसा खवखवत नाही.
- वड्यांचा तयार केलेला रोल कुकरमध्ये शिजवून घेता येतो .वडी कुरकुरीत होण्यासाठी पानाला पिठाचे मिश्रण कमी लावावे जास्त पीठ लावलेली पाने तळताना वेळ लागतो व कमी कुरकुरीत होतात.
- अळूवडी खाल्ल्यावर जास्त खवखवत असेल तर अळूवडीवर थोडे तूप टाकून खावे अळूवडी कमी खवखवते किंवा खवखवणे थांबते.
- घरी पाहुणे येणार असतील किंवा आपल्याला घाई असेल तर अशावेळी अळूच्या पानांचा रोल आदल्या दिवशी वाफवून फ्रीजमध्ये ठेवावा व आयत्यावेळी कापून अळूच्या वड्या तळून द्यावे.
प्रकार २.
अळूवडी अनेक पद्धतीने केली जाते आपल्याला वेळ नसेल किंवा खूप पदार्थ केले व अळूवडी बनवायची राहून गेली अशावेळी झटपट वडी कशी करावी ते पाहू.
साहित्य.
- अळूची पाने तीन ते चार.
- डाळीचे पीठ तीन चार चमचे.
- तांदळाचे पीठ एक चमचा.
- एक तीळ एक चमचा.
- ओवा एक चमचा.
- हळद अर्धा चमचा .
- लाल तिखट दोन चमचे.
- जिरे एक चमचा.
कृती.
- प्रथम अळूची पाने स्वच्छ धुऊन घ्यावी .
- नंतर अळूची पाने अगदी बारीक चिरून घ्यावी.
- आता एका भांड्यात चिरलेली पाने घ्यावी नंतर त्यात डाळीचे पीठ ,तांदळाचे पीठ ,ओवा ,हळद ,लाल तिखट ,मीठ, जिरे असे सर्व मसाले घालावे व थोड्या पाण्याच्या साह्याने थोडे घट्टसर मिश्रण तयार करावे.
- आता हे मिश्रण एका पसरट भांड्यात किंवा ताटात टाकावे व अळूवडी चा रोल वाफवतो त्याप्रमाणे पाण्यावर ते ताट ठेवून द्यावे व झाकण ठेवावे. पंधरा मिनिटात अळूवडी छान शिजते .
- आता मिश्रण गार होऊ द्यावे मिश्रण गार झाले की त्याच्या वड्या पाडाव्या व तळून घ्याव्या किंवा शॅलो फ्राय करून घ्या या वड्या सुद्धा खूप खमंग होतात.
टीप.
- या वड्या करताना डाळीचे व तांदळाचे पीठ योग्य प्रमाणात घ्यावे .जास्त पीठ घेतले तर वड्या मऊ होण्याची शक्यता असते.
FAQs.
प्रश्न १ :- Patra Alu Vadi-अळूवडी करताना पाणी कशी घ्यावी ?
उत्तर :- Patra Alu Vadi-अळूवडीकरतांना अळूची पाने स्वच्छ पाण्यावर वाढलेली असावी. काही ठिकाणी सांडपाण्यावर वाढलेली पाने असतात अशी पाने चवीला व आरोग्याच्या दृष्टीने योग्य मानली जात नाही.
प्रश्न २ :-Patra Alu Vadi-अळूवडी कुरकुरीत होण्यासाठी काय करावे ?
उत्तर :- Patra Alu Vadi-अळूवडी कुरकुरीत होण्यासाठी पिठाचा चे प्रमाण थोडे कमी घ्यावे व डाळीच्या पिठात थोडे तांदळाचे पीठ घालावे किंवा एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालू शकतो त्यामुळे अळूवडी कुरकुरीत होते तळताना अळूवडी मंद आचेवर तळावे.
प्रश्न ३ :- अळूवडी करून आधीच करून ठेवू शकतो का ?
उत्तर :- हो अगदीच करून ठेवतो अळूवडी ही करून फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस ठेवू शकतो, परंतु अळूवडीही तळून फ्रिजमध्ये ठेवू नये अळूच्या पानांचा रोल वापरून वापरून घेतलेला रोल हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो व लागेल तसे अळूवड्या तळून गरम गरम अळूवडी खाण्याचा आनंद घेऊ शकतो.
प्रश्न ४ :- अळूवडी कोणी खाऊ नये ?
उत्तर :- तसे पाहता अळूवडी सगळ्यांनाच खाता येणारा पदार्थ आहे अळूवडीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते तसेच भरपूर जीवनसत्व असतात म्हणून सर्वांना खाण्याचे सल्ला दिले जातात. परंतु हल्ली यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढलेले प्रमाण अधिक आढळून येते. यूरिक ॲसिड वाढलेले असलेल्या व्यक्तींना मात्र अळूची पाने खाऊ नये असे सांगितले जाते. तरीही आपल्या आरोग्याच्या व पचनाच्या दृष्टीने काळजी घेऊन आपण ती वडी खावी.