Site icon Ashlesha's Recipe

“Patra Alu Vadi-पात्रा रेसिपीचे गुपित: साध्या पानातली अनोखी चव!”

Patra Alu Vadi-अळूवडी ही एक कंद मुळा वर्गातीलअसलेले वनस्पती आहे. अळूच्या पानांची भाजी व अळूवड्या केल्या जातात. Patra Alu Vadi-अळूवडी हे अळूच्या पानांना डाळीचे पीठ लावून वाफवून व नंतर तळून घेतली जाते.

 

Read More : Sev Recipe.

थोडे अळूच्या पानांविषयी.

अळूचे पाने हे एक कंदापासून येणाऱ्या वनस्पतीची पाने आहेत. ही वर्षभर येणारी वनस्पती आहे.याची पाने व कंद आहारात वापरले जातात. अळूची पाने ही एक औषधी वनस्पती मानले जातात. महाराष्ट्रात अळूची भाजी व Patra Alu Vadi-अळूवडी खूप प्रसिद्ध व लोकप्रिय आहे.अळूच्या पानांमध्ये विटामिन ए मोठ्या प्रमाणात असते, जे आपल्या डोळ्यांसाठी खूप उपयुक्त असते.म्हणून आपले आहार आळूची पाने अळूची भाजी किंवा अळूवडीच्या स्वरूपात खाल्ले जातात. अळूचे पाने ही रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. तसेच अळूच्या पानात विटामिन ए सोबत विटामिन बी व विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच कॅल्शियम जे आपल्या हाडांसाठी उपयुक्त असते तसेच पोटॅशियम व अँटीऑक्सिडेंट चे प्रमाण भरपूर असते. तसेच भरपूर फायबर्स असतात.त्यामुळे आपल्या आतड्यांचे आरोग्य उत्तम राखले जाते व पचनही सुधारते. अळूच्या पानांमध्ये बिटाकारोटीन, फॉलेट, मॅग्नेशियम, कॉपर तसेच आयर्न असे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. पूर्वी घराच्या आजूबाजूला जागा असायची व जागेत छोटीशी बाग असायची या बागेत अळूचे कंद हमखास असायचे.हल्ली जागेच्या कमतरतेमुळे घरचे अळूचे पाने तशी कमी असतात. पण पावसाळ्यात मात्र बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.

थोडे Patra Alu Vadi-अळूवडी विषयी.

Patra Alu Vadi-अळूवडी हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध व लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. खास करून कोकणात जास्त प्रमाणात याची वेगवेगळे प्रकार केले जातात.अळूची पाने सगळीकडे सारखेच असतात पण अळूवडी मात्र वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. महाराष्ट्रातील काही भागात तांदळाचे पीठ व डाळीचे पीठ,हळद,तिखट,मीठ घालून अळूवडी केली जाते. काही ठिकाणी अळूची पाने बारीक कापून त्यात डाळीचे पीठ व मसाले घालून ढोकळ्याप्रमाणे वाफवून घेतात व नंतर फोडणी घालून परतून घेतले जाते. तर काही भागात अळूच्या पानांची भजी काढली जातात. तसेच कोकणात अळूचे पानांची डाळ लावून व पानांची घडी घालून Patra Alu Vadi-अळूवडी तयार केली जाते.वापरले जाते व नंतर कापून तळून घेतले जातात.काही भागात अळूच्या पानांना पात्रा असे म्हटले जाते व अळूवडीला पात्रावडी म्हटले जाते.कुरकुरीत व खमंग अळू वडी सगळ्यांनाच आवडते, मग ती कुठल्याही प्रकारे केलेली असो. अळूवडी बनवताना कशी पाने घ्यावी. अळू वडी बनवताना छान गडद रंग हिरव्या रंगाची पाने घ्यावी. तसेच अळूच्या पानांचे देठ सुद्धा थोडे काळपट असलेली पाने घ्यावी.काही वेळा पाणी आकाराने लहान असतात पण ही पानांची वडी अगदी चविष्ट लागते. ही पाने पातळ असलेली व अगदी मऊ असलेली पाने घ्यावी.मोठ्या आकाराची व जाड असलेली पाने काही वेळी घशात खवखवतात व तोंडाला ही खाजव येते अशा पानांची Patra Alu Vadi-अळूवडी बनवताना त्यात आवर्जून चिंचगुळ घालावा, म्हणजे घशात खवखव होत नाही व चवीलाही छान होतात.अळूची पाने चिरताना कधी कधी हाता नाही खाज सुटल्यासारखे होते अशावेळी हाताला लिंबूरस लावावा.

Patra Alu Vadi-अळूवडी कशी बनवतात.

Patra Alu Vadi-अळूवडी बनवतानाही अनेक प्रकारे बनवले जाते.अळूवडीमध्ये वापरण्यात येणारे मसाले साधारण सारखेच असतात.फक्त बऱ्याच ठिकाणी अळूवडीसाठी डाळीचे पीठ वापरले जाते तर काही ठिकाणी तांदळाचे पीठ वापरले जाते. तसेच कुठे Patra Alu Vadi-अळूवडी ही डीप फ्राय केली जाते तर कुठे शॅलोफ्राय केली जाते. तसेच खानदेशात अळूवडी बनवताना अळूचे पानांचे देठे काढून घेतात व पानांना डाळीचे पिठात हळद तिखट मीठ असे आपल्या आवडीचे मसाले घालून एक मिश्रण केले जाते. नंतर आळुच्या पानांना ते मिश्रण लावले जाते व त्याचा रोल तयार त्या पानांचा रोल करून घेतात. नंतर तो रोलचाळणीत आणि ठेवून वाफवला जातो. वाफवल्यानंतर त्याची गोल व चप्पट्या आकारात वडी कापून घेतात. नंतर तेलात कुरकुरीत तळून घेतले जातात व गरम गरम खाल्ले जातात.

साहित्य.

पूर्वतयारी.

कृती.

टिप्स.

प्रकार २.

अळूवडी अनेक पद्धतीने केली जाते आपल्याला वेळ नसेल किंवा खूप पदार्थ केले व अळूवडी बनवायची राहून गेली अशावेळी झटपट वडी कशी करावी ते पाहू.

साहित्य.

कृती.

टीप.

FAQs.

प्रश्न १ :- Patra Alu Vadi-अळूवडी करताना पाणी कशी घ्यावी ?

उत्तर :- Patra Alu Vadi-अळूवडीकरतांना अळूची पाने स्वच्छ पाण्यावर वाढलेली असावी. काही ठिकाणी सांडपाण्यावर वाढलेली पाने असतात अशी पाने चवीला व आरोग्याच्या दृष्टीने योग्य मानली जात नाही.

प्रश्न २ :-Patra Alu Vadi-अळूवडी कुरकुरीत होण्यासाठी काय करावे ?

उत्तर :- Patra Alu Vadi-अळूवडी कुरकुरीत होण्यासाठी पिठाचा चे प्रमाण थोडे कमी घ्यावे व डाळीच्या पिठात थोडे तांदळाचे पीठ घालावे किंवा एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालू शकतो त्यामुळे अळूवडी कुरकुरीत होते तळताना अळूवडी मंद आचेवर तळावे.

प्रश्न ३ :- अळूवडी करून आधीच करून ठेवू शकतो का ?

उत्तर :- हो अगदीच करून ठेवतो अळूवडी ही करून फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस ठेवू शकतो, परंतु अळूवडीही तळून फ्रिजमध्ये ठेवू नये अळूच्या पानांचा रोल वापरून वापरून घेतलेला रोल हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो व लागेल तसे अळूवड्या तळून गरम गरम अळूवडी खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

प्रश्न ४ :- अळूवडी कोणी खाऊ नये ?

उत्तर :- तसे पाहता अळूवडी सगळ्यांनाच खाता येणारा पदार्थ आहे अळूवडीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते तसेच भरपूर जीवनसत्व असतात म्हणून सर्वांना खाण्याचे सल्ला दिले जातात. परंतु हल्ली यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढलेले प्रमाण अधिक आढळून येते. यूरिक ॲसिड वाढलेले असलेल्या व्यक्तींना मात्र अळूची पाने खाऊ नये असे सांगितले जाते. तरीही आपल्या आरोग्याच्या व पचनाच्या दृष्टीने काळजी घेऊन आपण ती वडी खावी.

Exit mobile version