Site icon Ashlesha's Recipe

“दिवाळीची खुसखुशीत Sev-शेव : कुरकुरीत चवीचं गुपित काय?”

Sev-शेव हे भारतातील एक लोकप्रिय स्नॅक्स साठी खाल्ला जाणारा पदार्थ आहे. शेव ही हरभरा डाळीच्या पिठापासून बनवली जाते. व तेलात तळली जाते. दिवाळीच्या पदार्थात घरोघरी बनवला जाणार एक खमंग पदार्थ आहे. शेव ही अनेक पदार्थात वापरले जाते. जसे भेळपुरी, शेवपुरी या पदार्थांमध्ये शेव घातली जाते. तसेच शेव आपल्या संपूर्ण देशभरात लोकप्रिय आहे. शेव वेगवेगळ्या पदार्थापासून बनवले जाते. त्यात मुख्यत्वे करून चना डाळीचे पीठ वापरले जाते. चना डाळीच्या पिठाचे Sev-शेव खमंग लागते. महाराष्ट्रात शेव दिवाळीच्या फराळातील सर्वांचा आवडता पदार्थ आहे. दिवाळीत चिवडा,अनारसा, शंकरपाळी या पदार्थात शेव आवर्जून केली जाते. Sev-शेव हरभरा डाळीच्या पिठापासून बनवली जाते.

Read More : Karanji Recipe.

थोडे Sev-शेव विषयी.

डाळीच्या पिठात ओवा, जिरे, मीठ घालून एका विशिष्ट साच्यातून काढले काढून तळला जाणारा एक दिवाळीतील खमंग पदार्थ म्हणजे शेव. शेव हे भारतातील एक लोकप्रिय स्नॅक्स साठी खाल्ला जाणारा पदार्थ आहे. शेव ही हरभरा डाळीच्या पिठापासून बनवली जाते. व तेलात तळली जाते. दिवाळीच्या पदार्थात घरोघरी बनवला जाणार एक खमंग पदार्थ आहे. शेव ही अनेक पदार्थात वापरले जाते. जसे भेळपुरी, शेवपुरी या पदार्थांमध्ये शेव घातली जाते. तसेच शेव आपल्या संपूर्ण देशभरात लोकप्रिय आहे. शेव वेगवेगळ्या पदार्थापासून बनवले जाते. त्यात मुख्यत्वे करून चना डाळीचे पीठ वापरले जाते. चना डाळीच्या पिठाचे शेव खमंग लागते. महाराष्ट्रात शेव दिवाळीच्या फराळातील सर्वांचा आवडता पदार्थ आहे. दिवाळी चिवडा, अनारसा, शंकरपाळी या पदार्थात शेव आवर्जून केली जाते. शेव हरभरा डाळीच्या पिठापासून तसेच मूग डाळीच्या पिठापासून बनवली जाते व गरम तेलात कुरकुरीत तळली जाते. शेव अनेक पदार्थात मिक्स करता येते जसे चिवडा, फरसाण तसेच अनेक प्रकारचे चाट शेव टाकून खाल्ले जातात. जसे भेळपुरी, दहीपुरी, शेवपुरी. तसेच आपल्या घरात नेहमी केले जाणारे पोहे तर शेव शिवाय अपूर्णच वाटतात. म्हणजेच शेव पदार्थाचा स्वाद वाढवते. काही ठिकाणी शेव मध्ये कांदा बारीक चिरून घातला जातो त्यावर कोथिंबीर व लिंबू पिळून खाल्ले जाते. तसेच गुजराती ढोकळा हा सुद्धा शेव शिवाय अपूर्णच वाटतो. एकूण काय तर शेव ही अनेक पदार्थांची लज्जत वाढवणारा पदार्थ आहे. दिवाळीच्या गोड गोड फराळ खाऊन कंटाळा आल्यावर एक घास शेव सुद्धा मनाला तृप्त करते. शेव ही अनेक प्रकारे केली जाते जसे की बारीक शेव, जाड शेव, भावनगरी शेव, तिखट शेव, अशा अनेक प्रकारात शेव बनवली जाते. हल्ली दिवाळीत च नाहीतर वर्षभर बाजारात शेव उपलब्ध असते. त्यात नेहमीच्या शेव सोबत अनेक प्रकारच्या शेव मिळतात. त्यात नेहमीच्या शेव सोबत अनेक प्रकारच्या शेव मिळतात त्यात नायलॉन शेव, रतलामी शेव, पालक शेव, राजगिरा शेव अशा अनेक प्रकारच्या शेव मिळतात.

Sev-शेव कशी बनवतात.

Sev-शेव बनवताना प्रथम हरभरा डाळ स्वच्छ करून दळून आणावी. नंतर दळून आणलेले पीठ चाळणीने चाळून घ्यावे. हरबऱ्याच्या डाळीत भरपुर प्रमाणात प्रथिने असतात. हरबरा हा स्नायू बळकट बनवतो व शरीराला मजबुत बनवुन शरीराचा बांधेसूद बनवतो. हरबरा डाळी त लोहा चे प्रमाण ही भरपूर असते. त्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लबीन योग्य प्रमाणात रहाते. चाळल्यानंतर आपल्या प्रमाणानुसार लागेल तसेच पीठ परातीत घ्यावे. त्यात हळद ,चटणी ,चवीनुसार मीठ व त्यात कडकडीत तेलाचे मोहन घालावे .नंतर ओवा, जिरे बारीक करून घालावेत. शेव कुरकुरीत येण्यासाठी त्यात थोडे तांदळाचे पीठ घालावे. तांदळाच्या पिठामुळे शेव छान कुरकुरीत होते.नंतर त्या पिठात कडकडीत तेलाचे मोहन घालावे व नंतर पाणी घालून पीठ मळून घ्यावे. शेव बनवतांना बेकिंग सोडा घातला जातो पण त्यामूळेशेव जास्त प्रमाणात तेल शोषून घेते.म्हणुन आपण बेकिंग सोडा न घालता शेव बनवणार आहोत. पीठ भिजवून झाल्यावर एका कढईत तेल गरम करून घ्यावे व शेव काढण्याच्या साचा म्हणजेच सोऱ्याच्या साह्याने शेव काढावी व मध्यम आचेवर तळून घ्यावी .चला तर बघूया कशी करायची कुरकुरीत खमंग शेव.

साहित्य.

कृती.

टिप्स.

FAQs.

प्रश्न १ :- Sev-शेव ही कोणत्या पिठापासून बनवली जाते ?

उत्तर :- शेव बनवण्यासाठी मुख्यत्वे करून हरभरा डाळीचे पीठ मुगाच्या डाळीचे पीठ वापरले जाते.

प्रश्न २:- Sev-शेव बनवण्याचा साचा नसेल तर शेव कशी करावी ?

उत्तर :- शेव बनवण्याचा साचा नसेल तर काही हरकत नाही आपण आपल्या नेहमीचा तळणीचा गोल झाला घेऊन हळूहळू त्याच्याने शेव पाडू शकतो मोठा आकाराचा असल्यास उत्तम किंवा एखाद्या प्लास्टिक पिशवीला आपल्या प्रमाणात छोटे छिद्र करून त्याच्यानेही शेव पाळता येईल थोडा वेळ लागेल परंतु शेव उत्तम होऊ शकते.

Exit mobile version